कौशल्यविकासानेच घडवूया सक्षम पिढी !
आज प्रथम एज्युकेशन फाऊं��ेशन यांच्या कोल्हापूर येथील वर्कशॉपला भेट देण्याचा योग आला. प्रथम एज्युकेशनद्वारे अतिशय चांगले उपक्रम राबविले जात आहेत हे पाहून समाधान वाटले. आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आपण 'जयंत दारिद्��्य निर्मूलन अभियाना'मार्फत प्रथम एज्युकेशनमधील विविध कौशल्य विकास कोर्सेस शिकण्याची मोफत संधी उपलब्ध करून देतो.
आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या तरुणांना स्वावलंबी होण्याचा मार्ग या उपक्रमाद्वारे मिळतो. आजच्या भेटीत प्रथमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला,उपक्रमांची माहिती घेतली. त्यांचे त्यांच्या कुटुंबासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी चालू असलेले प्रयत्न पाहून ���ला देखील प्रेरणा मिळाली.
#pratham
#skilldevelopment #students #trainingcentre #workshop #visit
@Prateek_J_Patil म��ाठी नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा!
गुढीपाडव्याच्या या पवित्र दिवशी आपले घर आनंद, समृद्धी आणि सुखाने भरून जावो. नव्या उमेदीने आणि नव्या जोमाने हे वर्ष सुखसमृद्धीचे जावो.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
समाजकार्याला हातभार 🤝
आज राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना,राजारामनगर येथे राजारामबापू विकास प्रतिष्ठान,मुंबई यांच्या वतीने वाळवा तालुक्यात सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळांना नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी आर्थिक मदतीच्या चेकचे वाटप करण्यात आले.
समाजहिताच्या कार्यात हा उपक्रम मोलाचा आहे.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याद्वारे लोकनेते स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्या ४१व्या पुण्यतिथी निमित्ताने परिसरातील शंभरहून अधिक लहान-थोर कीर्तनकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला हो���ा. माजी मंत्री श्री. लक्ष्मणराव ढोबळे आणि आदरणीय आमदार जयंत पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भक्तीपर सोहळा संपन्न झाला.
तसेच प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. विशाल महाराज खोले यांनी विशेष कीर्तनाद्वारे आपल्या मधुर वाणीतून उपस्थितांना प्रबोधन केले.
वारकरी संप्रदायाने सुरू ठेवलेली परंपरा आजही आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवीत आहे. त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व���यक्त केली आणि सर्वांचे मनापासून आशीर्वाद घेतले.
#लोकनेते #राजारामबापू_पाटील #पुण्यतिथी
#कीर्तनकार_यांचा_सन्मान #kirtan #कीर्तन
आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ प्रचार व गावभेटी दौऱ्यास गावोगाव�� लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
काल मसूचीवाडी व बोरगाव गावातील विविध ठिकाणी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला जयंत पाटील साहेबांच्या विजयाची अष्टपदी पूर्ण करण्यासाठी सर्वजण एकजुटीने उभे आहेत.
लक्षात ठेवा "२" नंबर बटण ✌🏻l
चिन्ह - तुतारी वाजवणारा माणूस 📯
#jayantpatilsaheb #islampurconstituency #maharashtra #Vidhansabha2024
भर पावसात वाळवा तालुक्याच्या निष्ठावंत जनतेने दाखवलेला उदंड प्रतिसाद आणि प्रेम;
हा क्षण खऱ्या अर्थाने इतिहासात कोरला जाईल!
📍शिवस्वराज्य यात्रा सांगता सभा, उरूण-इस्लामपूर
#शिवस्वराज्य_यात्रा#महाराष्ट्र_विधान���भा_2024
आजी, तुझ्या आठवणींची शिदोरी आयुष्यभर पुरणारी आहे. आम्ही तुझ्या प्रेमाला पोरके झालो असलो तरी, जिथे असश���ल तिथे प्रेम वाटत असणार हा विश्वास आहे...
पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन 🙏🏼
#memories💕 #grandmother #goodmemories
उरुण इस्लामपूर शहरातील दत्त टेकडी परिसराच्या विकासासाठी बैठकीच्या माध्यमातून मी वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निधीची मागणी केली होती. आज वनविभागाच्या वतीने दत्त टेकडी परिसर सुशोभीकरणासाठी ५ कोटी २५ लाख रुपयांच्या निधीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली. वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष आभार!
दत्त टेकडी परिसराच्या सुशोभीकरणाद्वारे नागरिकांसाठी नयनरम्य असे पर्यटनस्थळ निर्माण हो���न उरुण इस्लामपूर शहराच्या वैभवात भर पडेल असा मला विश्वास आहे.
@SMungantiwar
माझे आजोबा स्व. राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर अवघ्या २२व्या वर्षी माझे वडील मा. आ. जयंत पाटील साहेब यांनी सामाजिक जीवनात प्रवेश केला. गेल्या ३५ वर्षांपासून त्यांनी बापूंच्या आदर्श विचारांचा वारसा जपला. आम्हाला एक आदर्श घालून दिला. त्यांचे सामाजिक, राजकीय जीवनातील समर्पण आम्ही जवळून पाहिले. त्यांच्या वैचारिक विचारांची शिदोरी ही माझ्या आयुष्यात मार्गदर्शक ठरत आहे. मला माझ्या वडिलांचा सार्थ अभिमान आहे.
#HappyFathersDay @Jayant_R_Patil
#अभिमान #स्वाभिमान #महाराष्ट्र
जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान आणि प्रथम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ऑटो सर्व्हिस टेक्निशियन, इलेक्ट्रिकल कोर्स, त्याचबरोबर संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, मुलाखतीची तयारी, व्यवसाय मार्गदर्शन असे ४५ दिवसाचे प्रशिक्षण शिबिर मॉडर्न हायस्कुल साखराळे येथे झाले होते. यात ३५ सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ���ाटप कार्यक्रम आज राजारामबापू ज्ञान प्रबोधिनी इस्लामपूर येथे संपन्न झाला.
यामधील काही प्रशिक्षणार्थीनी स्वतःचा व्यवसाय चालू केला आहे. काहींना नोकरी लागली आहे. या बॅचमध्ये असलेल्या माझ्या भगिनीने मुलांच्या सोबतीने, पारंपरिक दृष्टिकोनास छेद देत हे कठीण प्रशिक्षण घेतले, तिचे मनापासून अभिनंदन करतो.
जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी ��िक्षण, आरोग्य, स्वयंरोजगार, शासनाच्या विविध पेन्शन योजना इत्यादी क्षेत्रात काम केले जाते. याद्वारे समाज उन्नतीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आष्टा नगरीच्या वतीने माझी भव्य मिरवणूक आणि मा. आ. जयंत पाटील साहेबांच्या उपस्थितीत नागरी सत्कार करण्यात आला. माझ्यावर प्रचंड विश्वास ठेवल्याबद्दल मी सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानतो 🙏
खरंतर स���व. राजारामबापू यांचा नातू म्हणून आणि मा. आ. जयंत पाटील साहेब यांचा मुलगा म्हणून आपण सर्वांनी मला भरभरून प्रेम दिलेले आहे. या दोघांच्याही कार्यकर्तृत्वामुळे आष्टा आणि परिसराचा कायापालट झालेला आहे. १९७० साली स्थापन झालेल्या आपल्या कारखान्याच्या आता चार शाखा झाल्या आहेत.
सध्या तरुणांचा शेतीकडे जास्त कल आहे आधुनिक पद्धतीने शेती करणारे अनेक तरुण आपल्याकडे आहेत. त्यांच्याकडून मी वेळोवेळी माहिती घेत असतो. ठिबक सिंचनाद्वारे शेती करून उत्पादन वाढविणारे शेतकरी मी पाहिले. यावर अभ्यास करून आपण सुमारे ८ हजार क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणले आहे, ड्रोन द्वारे फवारणी करण्याचे तंत्र सुद्धा आपण आता वापरत आहोत. सवलतीच्या दरात शेती साहित्य देण्याच्या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी शेती मार्गदर्शन पुस्तिका आपण प्रकाशित केली आहे. आपल्या ��ागातील शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी मी आणि सर्व संचालक मंडळ कटिबध्द आहे.
यावेळी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक व आष्टा शहरातील सर्व प्रमुख नेते व कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
होळीच्या अग्नीमध्ये नकारात्मकता, अहंकार, असत्य व अनिष्ट रूढी-परंपरांचे दहन होऊन, सकारात्मकतेच्या चैतन्याने आपल्या विचारांना नवी झळाळी प्राप्त होवो, ही मनोकामना. सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
#HappyHoli#होळीपोर्णिमा
एकसंघपणा, संयम आणि लढण्याची जिद्द असली तर लोकशाही अधिक बळकट होते. एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐
लोकांच्या न्याय हक्कांसाठी आपले सर्वस्व पणाला लावणारा अध���कारी वर्ग आपल्या माध्यमातून भविष्यात निर्माण होईल हा आम्हाला विश्वास आहे.#MPSC