"पीक विमा योजना ही संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी आहे की, शेतक��्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी? धाराशिवमधील अपंग आणि दृष्टीहीन निराधार दाम्पत्य शेतकऱ्याने ७०० रुपये उसने घेऊन #पीकविमा भरला, पण नुकसानभरपाई म्हणून त्यांच्या खात्यात अवघे २११ रुपये जमा झाले. ही मदत आहे की शेतकऱ्यांच�� थट्टा? सरकारने पीक विमा योजनेतील नुकसानभरपाईचे महत्त्वाचे 'मापदंड' Triggers काढून टाकल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. परिणाम या मध्ये शेतकरी भरडला जातोय आणि विमा कंपन्यांची नफेखोरी वाढतेय. यावरून सिद्ध होते की पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी नाही तर कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे.
@Dev_Fadnavis @bharanemamaNCP
#पीकविमा #पीकविमा_ट्रिगर_लागू_करा #शेतकरी #अन्नदाता #धाराशिव #Maharashtra
प्रति,
मा. ॲड. श्री. आशिष शेलार जी
इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री, महाराष्ट्र
माझे फेसबुक पेज (https://t.co/MUFYcm6VQO)
suspend करण्यात आले आहे. कारण दिले आहे -
"We suspended your Page
This is because Kapil Patil goes against our Community Standards"
आता तुम्हीच बघा, अदृश्य हात कुणाचे आहेत ?
आपला स्नेहांकित,
कपिल पाटील
@ShelarAshish
"सरकार एक परीक्षा पारदर्शक आणि प्रामाणिकपणे घेऊ शकत नाही का?"
देशातील तब्बल २२ लाख विद्यार्थी डॉक्टर होण्याचं स्वप्न डोळ्यांत घेऊन #NEET परीक्षेला बसतात. गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी अहोरात्र मेहनत करतात. पालक आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शेतजमीन विकून, सोनं विकून, घर गहाण ��ेऊन लाखो रुपये क्लासेसवर खर्च करतात.
पण परीक्षा झाल्यावर समजतं की? पेपर आधीच फुटलेला आहे. तोही परीक्षा होण्याच्या दहा दिवस आधीच काही खाजगी क्लास चालकांच्या हातात पोहोचलेला असतो.
हा फक्त भ्रष्टाचार किंवा घोटाळा नाही तर २२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टाकलेला दरोडा आहे.....
पेपर सेट करणारे, परीक्षा घेणाऱ्या यंत्रणांतील लोक आणि काही खाजगी क्लास चालक यांच्या संगनमतातून हा घृणास���पद प्रकार घडत असेल, तर याला जबाबदार कोण? २२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार यांना कोणी दिला?यांच्या पाठीशी कोण आहे?खरे सूत्रधार कोण आहेत?
पेपरफुटीमुळे विद्यार्थी नैराश्यात जात आहेत, काहीजण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत… यामध्ये सरकार नक्की काय करतं आहे? २०२४ मध्येही पेपरफुटी झाली होती…त्या दोषींना काय शिक्षा झाली?
#CBI चौकशी करत आहे... परंतु सरकार उत्तरदायी आह��� की नाही?
सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सरकार एक परीक्षा पारदर्शक आणि प्रामाणिकपणे घेऊ शकत नाही का?
@narendramodi
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@NCPspeaks
#NEET #NEETPaperLeak #JusticeForStudents #SaveStudents #EducationSystem #StopPaperLeak
अवघा महाराष्ट्र पाणावला आहे. सुन्न आहे.
दादा कसे काय गेले?
जितके फटकळ, तितकेच अत्यंत प्रेमळ. विकासाचा अखंड ध्यास घेतलेला, सामान्य माणसाबद्दल कणव असलेला, प्रगतीशील, तितकाच सेक्युलर आणि सत्यशोधक विचारांचा नेता हरपला आहे. शेतकरी, शेतमजूर, एकूणच ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला नेता गेला. कितीही वाद होवोत लोक अजित दादा पवार यांच्यावर प्रेम करत होते.
म्हणून हा अपघात महाराष्ट्राला पटत नाही आणि सहन होत नाहीये. दादा असे जायला नको होते. दादा माणूस. भला माणूस गेला. आपला माणूस गेला. म्हणून जळलेल्या विमानाची ती दृश्य पहावत नाहीत.
#Ajitdadapawar #अजितदादापवार
पुण्यात दि��्ती चौधरी यांनी सासरच्या अमानुष छळाला कंटाळून केलेली आत्महत्या ही अत्यंत वेदनादायक आणि धक्कादायक घटना आहे.
लग्नात ५० तोळे सोनं आणि गाडीसाठी २५ लाख रुपये देऊनही सासरच्यांचा छळ थांबला नाही अखेर एका विवाहितेने आपले जीवन संपवले.
महापुरुषांनी समाजासाठी उभारलेली सुधारणावादी चळवळ, स्त्री-पुरुष समतेचा लढा आज कुठे हरवला आहे?
दुर्दैवाची बाब म्हणजे आपण आपलाच पुरोगामी, सुधारणावादी वारसा ह���ूहळू विसरत चाललो आहोत का, की तो पूर्णपणे विसरून ��ेलो आहोत? असा गंभीर प्रश्न आज निर्माण झाला आहे.
प्रबोधनकार ठाकरे यांनी हुंडा प्रथेविरोधात आयुष्यभर कडाडून टीका केली, समाजाशी संघर्ष केला, लेखणी आणि विचारांच्या माध्यमातून जनजागृती केली.
आज त्यांचे विचार आणि कार्य आपण विसरत चाललो आहोत का?
पुण्यात दिप्ती चौधरी प्रकरण असो किंवा याआधीचे वैष्णवी हगवणे प्रकरण सासरच्या छळामुळे विवाहित महिलांना आत्महत्येचा मार्ग निवडावा लागतो, ही वस्तु��्थिती तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत लज्जास्पद आहे.
हुंडा ही अमानवी प्रथा आजही जिवंत आहे, ही खरी शोकांतिका आहे. आणखी दुर्दैवाची बाब म्हणजे ही प्रथा केवळ अशिक्षितांपुरती मर्यादित नाही; ती शिकलेल्यांकडूनही खुलेआम जोपासली जाते आणि समाजात खतपाणी घातले जाते.
घटना घडल्यानंतर काही दिवस निषेध, संताप व्यक्त होतो पण लवकरच सगळं शांत होतं. दोषींना कठोर शिक्षा होत नाही, आणि परिणामी पुन्हा पुन्हा अनेक लेकी बळी ठरतात.
आता तरी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
कठोर कायदा आणि त्याची कठोर अंमलबजावणी, तसेच समाजातील ढोंगीपणाविरोधात स्पष्ट भूमिका घेतल्याशिवाय या अमानवी प्रथेला आळा घालता येणार नाही.
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@supriya_sule
@NCPspeaks
#पुणे
#हुंडा_गुन्हा_आहे
#DowryDeath
#StopDowry
#दीप्तीचौधरी
महापालिका निवडणुकीत लोकशाहीची थट्टा सुरू आहे का?
मतदानानंतर बोटाला लावली जाणारी शाई सर्रास सहज पुसली जात आहे, तर काही ठिकाणी मतदारांच्या बोटावर मार्कर पेनने मार्क केला जात असून तो सहज पुसला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
पनवेलमधील मतदान केंद्रावर हा प्रकार उघडकीस आला असून संबंधित उमेदवारांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. पूर्वी अमिट शाई वापरली जायची, मग अचानक हा बदल का?
हा सर्व प्रकार ठरवून, नियोजनपूर्वक केला जात आहे का?
कुठे मतदानाची शाई पुसली जातेय, कुठे ईव्हीएम बंद पडतेय, तर कुठे मतदारांनाच गोंधळात टाकले जात आहे.
निवडणूक जिंकण्यासाठी अजून क��ती बोगस, संशयास्पद आणि लोकशाहीविरोधी प्रकार केले जाणार आहेत?
निवडणूक आयोग यावर मौन का बाळगत आहे?
लोकशाहीची विश्वासार्हता धोक्यात आणणाऱ्या या प्रकारांची तत्काळ चौकशी झालीच पाहिजे.
लोकशाही वाचवण्यासाठी आवाज उठवणं ही आपली जबाबदारी आहे.
@ECISVEEP
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@NCPspeaks
@supriya_sule
#लोकशाही_धोक्यात
#निवडणूक_आयोग_जागा_हो
#मतदानाचा_अधिकार
#ElectionIntegrity
#DemocracyUnderThreat
#Panvel
महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.ना.राजेश भैया टोपे साहेब यांना ��ाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
आपणांस आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा !
@rajeshtope11
@NCPspeaks
#HappyBirthdayRajeshTope
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता तथा संघटक सचिव पोरोगामी विचारांचे अभ्यासक, भाष्यकार, मा���्गदर्शक मा.श्री.विकास लवांडे सर आपणास वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा..!
#वाढदिवसाच्या_शुभेच्छा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हि सदिच्छा!
@VikasLawande1#FilePhoto
"पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहाराला नक्की अभय कोण देत आहे?"
कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू आहे, सभापती व संचालक मंडळाने कोणतीही शासकीय मंजुरी, प्रक्रिया किंवा ई-निविदा न करता आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे ���ाटली.
वाहन प्रवेश शुल्क, संगणकीकृत आवक नोंद, सुरक्षा रक्षक, वाहनतळ, कचरा वाहतूक, मनुष्यबळ पुरवठा अशा अनेक कामांत कोट्यवधींचा खेळ सुरू आहे.
१० जुलै २०२५ रोजी विधिमंडळात स्वतः पणनमंत्री जयकुमार रावळ यांनी ई-निविदा न करता दिलेले सर्व टेंडर्स रद्द करण्यात येतील अशी स्पष्ट घोषणा केली होती. मात्र पाच महिने उलटूनही परिस्थिती जैसे थे आहे, एकही काम बंद नाही, एकही नवी निविदा प्रक्रिया नाही.
चौकशीचे आदेश दिले गेले, पण सुरुवातीला केवळ वेळकाढूपणा करण्यात आला. आता चौकशी सुरू असल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात बेकायदेशीर कामे सुरूच आहेत.
��े केवळ प्रशासनाचे अपयश नाही, तर सत्तेच्या आशीर्वादाशिवाय शक्यच नाही. नक्की या बेकायदेशीर कारभारामागे कोणाचा हात आहे? पुणे बाजार समितीला अभय कोण देत आहे? सभापती आणि सचिव शासनाची सातत्याने दिशाभूल का करत आहेत?
शेतकऱ्यांच्या नावावर चालणाऱ्या बाजार समितीला लुटीचे अड्डे बनवणाऱ्यांना वाचवले जात असेल, तर ते सहन केले जाणार नाही.
सरकारने या सर्व प्रकरणाची तात्काळ गंभीर दखल घ्यावी, तसेच पणनमंत्र्यांनी विधानसभेत जी घोषणा केली होती, त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी.
या सर्व बेकायदेशीर व गैरव्यवहारांवर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे.
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@JaykumarRawal
@NCPspeaks
@supriya_sule
@PawarSpeaks
#पुणेबाजारसमिती
#भ्रष्टाचार
#ईनिविदा
#शेतकऱ्यांचीलूट
#उत्तरद्या
#कायद्याचा_भंग
#Accountability
#FarmersFirst
"सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका शेतकऱ्यांना कसा बसतो यांचे ज्वलंत उदाहरण म्हणजे — पीक विमा योजना!"
सरकारने मोठ्या गाजावाजात राबवलेली नवी पीकविमा योजना प्रत्यक्ष��त आणली मात्र शेतकऱ्यांच्या काहीच कामाची ठरलेली नाही. नोव्हेंबर अखेरपर्यंत राज्यातील हजारो बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाचीही मदत जमा झालेली नाही, हे अत्यंत धक्कादायक वास्तव आहे.
नव्या पीकविमा योजनेत आधी अस्तित्वात असलेले पाच निकष रद्द करून फक्त एकच निकष — ‘पीक कापणी प्रयोग’ ठेवण्यात आला. परिणामी, यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्तींमुळे जिथे शेतात पीकच उभे राहिले नाही, तिथे पीक कापणी प्रयोगच शक��य नाही. आणि पीकच नसेल तर प्रयोग कसा? प्रयोग नसेल तर भरपाई कशी? हा सरळसरळ शेतकऱ्यांवर अन्याय नाही का?
आज परिस्थिती अशी आहे की पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले तरी शेतकरी मदतीपासून वंचित राहतो.
ही योजना शेतकऱ्यांसाठी नसून खासगी विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी आखलेली आहे.
शेतकरी कर्जात बुडतो, अडचणीत सापडतो आणि विमा कंपन्या मात्र कोट्यवधींचा नफा कमावतात.
ही योजना म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक आण�� भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण ��हे.
शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, आणि त्याच बरोबर पीकविमा योजनेत शेतकरी हिताच्या दृष्टीने मूलभूत बदल झालेच पाहिजे.
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@supriya_sule
@NCPspeaks
@bharanemamaNCP
@shindespeaks
@PawarSpeaks
#शेतकरी_वाचवा
#पीकविमा_फसवणूक
#शेतकरी_विरोधी_धोरणे
#भ्रष्ट_सरकार
#शेतकऱ्यांना_न्याय
#पीकविमा_सुधारणा
"फडणवीस साहेब शेतकऱ्यांची अजून किती दिशाभूल करणार आहात ?
महाराष्ट्रातील भीषण अतिवृष्टीमुळे लाखो शेतकऱ्यांचे संसार कोलमडले. शेतातील माती वाहून गेली, पशुधनाचे नुकसान झाले, अनेक कुटुंबे अजूनही अडचणीत आहेत.
पण इतके महिने झाले तरीही कर्जमाफीसाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्तावच पाठवलेला नाही.याबाबतची वस्तुस्थिती केंद्रानेच जाहीर केली आहे.
शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि सरकार मात्र शांत आहे हे चित्र हृदय पिळवटून टाकणारे आहे.
संकटात सरकारने तातडीचा निर्णय घेणे ही गरजेचे असताना आहे. प्रकर मात्र टाळाटाळ करत आहे
फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे आजून किती काळ दुर्लक्ष करणार आहात?
@Dev_Fadnavis@supriya_sule@NCPspeaks
#महाराष्ट्र_पूरनुकसान #शेतकरीवाचवा #पूरबाधितांना_न्याय #कर्जमाफी_तत्काळ
जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये उघड बोगस मतदान !
पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी पुण्याहून आलेल्या तरुणाच्या नावावर इतर कुणीतरी मतदान करून गेले — हा प्रकार धक्कादायकच नाही तर निवडणूक प्रक्रिये वरती मोठे प्रश्न चिन्ह आहे?
आज अंबडमध्ये तरुणाला म���दान न करू देता परत पाठवण्यात आलं…
उलट काही ठिकाणी गाड्यांनी बोगस मतदारांना मतदानासाठी आणले जात आहे. बहुतांश ठिकाणी हिच परिस्थिती आहे.
मग निवडणूक आयोग नेमकं करतंय तरी काय?
आता आणखी कोणते पुरावे हवेत?
बोगस मतदारांचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे.
ही प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक म्हणायची का?
लोकशाहीचा आत्मा म्हणजे मतदाराचा हक्क —
आणि तोच हक्क आज पायदळी तुडवला जातोय.
आता तरी निवडणूक आ���ोगाला जाग जागं येणार का?
@ECISVEEP @MaharashtraSEC
@NCPspeaks @supriya_sule
@shindespeaks @RRPSpeaks
#लोकशाहीचा_अपमान #बोगसमतदान #जालना #अंबड #Election2025 #VoterFraud #ECI #लोकशाही_संकटात
बिहारच्या मुख्यमंत्रीपदी दहाव्यांदा शपथ घेणारे आदरणीय नीतीश कुमार जी यांची समाजवादी नेते कपिल पाटील यांनी काल पटना येथे ��दिच्छा भेट घेतली. अभिनंदन केले.
त्यावेळी सोबत बिहार सरकारचे मंत्री विजय चौधरी , जेडीयू राष्ट्रीय महासचिव मनीष वर्मा, खासदार देवेशचंद्र ठाकूर आणि साथी अतुल देशमुख उपस्थित होते.
@NitishKumar
#NitishKumar #नीतीशकुमार
संवाद !
आपल्या श्रद्धांच्या आधारे एका तरूण विद्यार्थिनीने ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक, ‘संवादकार’ व आध्य प्रबोधनकार, श्री राजू परूळेकर सरांना विचारलेला प्रश्न आणि त्यांनी विनम्रपणे दिलेले उत्तर आवश्य ऐकावे असे आहे. असे ‘संवाद’ व्हायला हवेत. @rajuparulekar सर 🫡
1 डॉलर = 89.64 रुपया"
नरेंद्र मोदी का कहना था: जैसे-जैसे रुपया गिरता है, प्रधानमंत्री की साख गिरती है।
मोदी साहेब आपण मागच्या 11 वर्षी पासून पंतप्रधान आहात आणि रुपया 89.64 डॉलर वर का गेला आहे उत्तर दया मोदी जी!
देश जवाब मांग रहा है!
@narendramodi#मोदीजीअनुस्वारदो#JababDoModi
#Accountability
"महात्मा फुले–सावित्रीबाई फुले यांनी समाजातील शेवटच्या घटकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, स्त्रीशिक्षणाचा पाया घालण्यासाठी, शोषित-वंचितांच्या उन्नतीसाठी आयुष्य झोकून दिलं."
त्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका ५ जानेवारीपासून स्टार प्रवाह वाहिनीवरुन खासदार डॉ. अमोल कोल्हे घेऊन येत आहेत.
राजा शिवछत्रपती आणि स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचवणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आता फुले दांपत्यांचे क्रांतिकारी विचार आणि कार्य पडद्यावर उलग���णार आहे.!"
आज त्यांच्या विचारांची, त्यांच्या संघर्षाची, त्यांच्या सत्य इतिहासाची नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याची ही एक मोठी संधी आहे.
फुले दांपत्यांच्या कार्यातून समाजाला दिशा मिळो आणि ही मालिका घराघरात पोहोचो — हीच सदिच्छा!
@kolhe_amol
#मीसावित्रीबाईजोतीरावफुले #स्टारप्रवाह