राजमाता जिजाऊंच्या दूरदृष्टीतून रुजलेल्या संस्कारांचे बीज पुढे स्वराज्याच्या भक्कम पायाभरणीचे सामर्थ्य ठरले. मातृत्वाच्या सामर्थ्याने राष्ट्रघडणीचा आदर्श निर्माण करत त्यांनी असंख्य पिढ्यांसाठी प्रेरणेचा अखंड दीप प्रज्वलित केला. स्वराज्याच्या विचारांचे बीज रोवणाऱ्या राजमाता जिजाऊंना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन
ज्ञान, विचारस्वातंत्र्य आणि सामाजिक परिवर्तन यांचा अखंड पुरस्कार करणारे महाराष्ट्रातील आधुनिक विचारसरणीचे अग्रणी, बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#GopalGaneshAgarkar#गोपाळ_गणेश_आगरकर
श्रीरामपूरमध्ये आर. बी. नारायणराव बोरावके कॉलेजमध्ये ‘रयत’च्या उत्तर विभागीय मॅनेजिंग कौन्सिलची बैठक झाली. यावेळी विविध संस्थांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि कामकाज याचा आढावा घेऊन भविष्यात गुणवत्ता वाढीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, राबवण्यात येणारे शैक्षणिक प्रकल्प आणि प्रयत्न यावर चर्चा करण्यात आली. यावेळी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने, ॲड. संदीप वर्पे, मा. बाबासाहेब भोस, मा. राजेंद्र चांदे, मा. सुरेश बोळीज आदी उपस्थित होते.
#रयतशिक्षणसंस्था #QualityEducation #AcademicDevelopment #shrirampur
महाराष्ट्राच्या सामाजिक पुनर्निर्माणाचे शिल्पकार, विवेकवाद व बुद्धिप्रामाण्यवादाचे कणखर पुरस्कर्ते, अंधश्रद्धा व जातिभेदाविरुद्ध आयुष्यभर लढणारे समाजसुधारणेचे निर्भीड अग्रदूत,थोर तत्त्वचिंतक, लेखक व 'सुधारक'कार गोपाळ गणेश आगरकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!