इराणी भिंत भेदत भारताकडून सुवर्णपदक काबीज
आशियाई क्रीडा स्पर्धा : अर्जुनच्या लक्ष्यवेधी चढाया, अस्लमची दिमाखदार कामगिरी
भारतीय पुरुष संघाने फजल अत्राचाली व मोहम्मदरेजा शादलूचा समावेश असलेली इराणी भिंत ४०-३४ अशी भेदत आशियाई क्रीडा स्पर्धेच्या कबड्डीमध्ये ९वे सुवर्णपदक काबीज केले.
नबीला न्याय! जम्मू-काश्मीरचा २९ वर्षीय वेगवान गोलंदाज आकिब नबीला बुमराच्या जागी भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघात त्याची प्रथमच निवड झाली असून, त्याच्या पदार्पणाच्या आशा बळावल्या आहेत. #indiancricket#cricketfans#cricketmarathi#cricketupdates#cricketnews
📷 फिफा विश्वचषक फुटबॉल २०२६
अंतिम सामना
📷 अर्जेंटिना वि. स्पेन
रविवारी, १९ जुलै २०२६ | मध्यरात्री १२.३० वाजता
तिसऱ्या क्रमांकाचा सामना
📷 इंग्लंड वि. फ्रान्स
शनिवारी, १८ जुलै २०२६ | मध्यरात्री २.३० वाजता
फ्रान्सची वृत्ती, २०२२ची पुनरावृत्ती!
हा सामना २०२२च्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीची पुनरावृत्ती ठरला. त्यावेळीही फ्रान्सनं मोरोक्कोवर २-० अशी मात केली होती.
एक झुंज वादळाशी!
फिफा विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात अर्जेंटिनाने इजिप्तवर ३-२ अशी थरारक मात करत अविश्वसनीय पुनरागमन केले. ७९व्या मिनिटापर्यंत अर्जेंटिना ०-२ अशा पिछाडीवर होता आणि विद्यमान विश्वविजेत्यांचा प्रवास संपणार असेच चित्र दिसत होते.