बालमटाकळीत मराठा समाजातील अनेक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
शेवगाव : शेवगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या बालमटाकळी गावात विविध पक्षांतील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. सामाजिक कार्यकर्ते बंडू पाटील शिंदे आणि अशोक वाघुबरे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. किसन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महेश खरात, सागर पाटेकर, बाळासाहेब शिंदे, आदिनाथ राजपुरे, संभाजी काटे, शंकर बांगडे, डिगांबर कोकाटे, सरताज शेख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शाहूराव खंडागळे, तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, अरुण झांबरे, पाटील बन्नूभाई शेख, धोंडीराम मासाळकर, विष्णू वीर, दाराशींग भोंगळे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे अरुण भोंगळे आणि सूर्यकांत भोंगळे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
#Balmatakali #Shevgaon #VanchitBahujanAghadi #VBA #VBAJoinings #PoliticalNews #MaharashtraPolitics
वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटीचे दीक्षाभूमीवर अभिवादन!
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटीने दीक्षाभूमीवर अभिवादन केले.
यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक सोनोने, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, जितरत्न पटाईत, दीपक डोके, उत्तम वनशिव उपस्थित होते.
📍नागपूर विभागीय आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष मा.राजेंद्र पातोडे यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य कार्यकारणी सदस्य यांच्या बैठकीत पार पडली.
#Nagpur@VBAforIndia
📍मुंबई
आयआयटी मुंबईत संस्थात्मक हत्या झालेल्या साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून त्यांचे आई-वडील मुंबईत आंदोलन करत आहेत. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच राहुल सोनपिंपळे आणि त्यांची संघटना AIISCA च्या पदाधिकाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
आंदोलकांना का ताब्यात घेण्यात आले आहे? त्यांची तत्काळ सुटका करा, असे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी साकीनाका, मुंबई येथील पोलीस ठाण्यातील पोलिसांना सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणी मुंबई पोलीस दलाच्या वेस्ट झोन-३ च्या डीसीपींशी फोनवरून चर्चा करून हस्तक्षेप केला. त्यांच्या हस्तक्षेपानंतर साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून लढणाऱ्यांची पोलिसांकडून सुटका करण्यात आली.
#JusticeForSahilWakode #IITMumbai
चलो अकोला
भव्य धम्म मेळावा
धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव - 2026
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गेल्या ४२ वर्षांपासून अकोला येथे भव्य धम्म मेळावा पार पडतो. या मेळाव्यात दरवर्षी बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करतात.
यावर्षी होणाऱ्या भव्य धम्म मेळाव्यात फुले-शाहू-आंबेडकरवादी आणि संविधानवादी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
: प्रमोद देंडवे
अकोला जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
दिनांक :🗓️ 21 ऑक्टोबर 2026
वेळ :🕕 सायंकाळी 6 वाजता
स्थळ :📍अकोला
#धम्मचक्र_प्रवर्तन_दिन
#भव्य_धम्म_मेळावा
#Akola
📍नागपूर
वंचित बहुजन आघाडीत तरुणांचा पक्षप्रवेश
आज वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे आणि राज्य कार्यकारिणी नागपूर दौऱ्यावर असताना नागपूर येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडला. तरुणांनी मोठ्या संख्येने प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला.
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक सोनोने, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, जितरत्न पटाईत, दीपक डोके, उत्तम वनशिव, कृष्णा देशमुख, प्रशांत इंगोले, नागोराव पांचाळ,
#Akola #VBAForIndia
📍दीक्षाभूमी, नागपुर
वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटीचे दीक्षाभूमीवर अभिवादन!
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटीने दीक्षाभूमीवर जाऊन तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक सोनोने, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, राज्य कार्यकारिणी सदस्य जितरत्न पटाईत, दीपक डोके, उत्तम वनशिव उपस्थित होते.
#धम्मचक्र_प्रवर्तन_दिन #Nagapur #नागपुर
📍मुंबई
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्तक्षेपानंतर साहिल वाकोडे यांच्यासाठी लढणाऱ्यांची पोलिसांकडून सुटका.
आयआयटी मुंबईत संस्थानिक हत्या झालेले साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणारे साहिल वाकोडे यांचे आई - वडील मुंबईत आंदोलन करताय. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच राहुल सोनपिंपळे आणि त्यांची संघटना असलेल्या AIISCA च्या पदाधिकाऱ्यांना ही पोलिसांनी घेतले होते.
आंदोलकांना का ताब्यात घेण्यात आले आहे, तत्काळ त्यांची सुटका करा असे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी साकीनाका, मुंबई येथील पोलीस ठाण्यातील पोलिसांना सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणी मुंबई पोलीसच्या वेस्ट झोन 3 चे डिसीपी यांच्याशी फोनवर बोलून या प्रकरणात हस्तक्षेप केला. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्तक्षेपानंतर साहिल वाकोडे यांच्या न्यायासाठी लढणाऱ्यांची पोलिसांतून सुटका करण्यात आली आहे.
#JusticeForSahilWakode #IITMumbai
चलो अकोला
3 Days To Go... ✊
भव्य धम्म मेळावा
धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव - 2026
: प्रमुख मार्गदर्शक
बाळासाहेब आंबेडकर
दिनांक :🗓️ 21 ऑक्टोबर 2026
वेळ :🕕 सायंकाळी 6 वाजता
स्थळ :📍अकोला
#धम्मचक्र_प्रवर्तन_दिन#भव्य_धम्म_मेळावा#Akola
जय भीम Gen - Z
🗓 31 ऑक्टोबर
📍 नांदेड
फुले-शाहू-आंबेडकरवादी Gen Z सुजात आंबेडकरांसोबत आपल्या नांदेड मध्ये चर्चा करण्यास तयार रहा!
#JaiBhimGenZ#VBAxGenZ#MH26@VBAforIndia
चलो अकोला
भव्य धम्म मेळावा
धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव - 2026
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गेल्या ४२ वर्षांपासून अकोला येथे भव्य धम्म मेळावा पार पडतो. या मेळाव्यात दरवर्षी बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करतात.
या वर्षी होणाऱ्या भव्य धम्म मेळाव्यास फुले शाहू आंबेडकरवादी आणि संविधानवादी जनतेने मोठ्या संख्येने सामील व्हावे.
: मिलिंद इंगळे
अकोला जिल्हा महासचिव, वंचित बहुजन आघाडी
दिनांक :🗓️ 21 ऑक्टोबर 2026
वेळ :🕕 सायंकाळी 6 वाजता
स्थळ :📍अकोला
#धम्मचक्र_प्रवर्तन_दिन
#भव्य_धम्म_मेळावा
#Akola
चलो अकोला
3 Days To Go... ✊
भव्य धम्म मेळावा
धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव - 2026
: प्रमुख मार्गदर्शक
बाळासाहेब आंबेडकर
दिनांक :🗓️ 21 ऑक्टोबर 2026
वेळ :🕕 सायंकाळी 6 वाजता
स्थळ :📍अकोला
#धम्मचक्र_प्रवर्तन_दिन#भव्य_धम्म_मेळावा#Akola
महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स विधेयक रुग्ण हक्कांचा बळी देणारे, दरपत्रक लावल्याने रुग्ण हक्क कसे जपणार?
राजेंद्र पातोडे
महाराष्ट्र सरकारने आणलेले ‘महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्सनोंदणी व नियमन विधेयक, २०२६’ हे रुग्णांच्या हितासाठी नसून खासगी हॉस्पिटल्सच्या नफेखोरीला मोकळे रान देणारे आहे. सर्वोच्च न्यायालयाने विविध निकालांद्वारे स्पष्टपणे बजावले आहे की, 'घटनेच्या कलम २१ नुसार मिळणारा जगण्याचा अधिकार म्हणजे वेळेत, रास्त आणि सन्मानजनक वैद्यकीय उपचार मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे.' तसेच, पैसे भरले नाहीत म्हणून मृतदेह रोखून धरणे किंवा रुग्णाला ओलीस ठेवणे हे बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मात्र, महायुती सरकारने या विधेयकातून सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, रुग्णांचे मूलभूत हक्क आणि तक्रार निवारण यंत्रणाच धाब्यावर बसवली आहे. रुग्णांच्या आरोग्याचा हक्क हिरावून घेणारा हा नवा कायदा म्हणजे जनतेच्या पाठीत खंजीर उपसण्याचाच प्रकार आहे.नुसते दरपत्रक लावल्याने रुग्ण हक्क कसे जपणार ह्याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी घेतली आहे.
या विधेयकात रुग्णांच्या विरोधात जाणारे आणि खासगी हॉस्पिटल्सचे भले करणारे अनेक गंभीर दोष आहेत. पूर्ववत लागू असलेल्या महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन नियमावली २०२१ मध्ये रुग्णांना दिलेले अनेक महत्त्वाचे हक्क नव्या मसुद्यात थेट वगळण्यात आले आहेत.यात बिल न भरल्यास रुग्णाला किंवा मृतदेहाला रोखून ठेवण्याविरोधातील स्पष्ट संरक्षण काढण्यात आले आहे.तसेच रुग्णांच्या तक्रारींचे २४ तासांत निवारण करणारी जिल्हास्तरीय व स्थानिक तक्रार निवारण यंत्रणा आणि टोल-फ्री हेल्पलाइन रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. उपचाराच्या खर्चावर, अवाजवी बिलांवर किंवा औषध-वैद्यकीय साहित्यातील नफेखोरीवर कोणतीही मर्यादा यात घातलेली नाही.अनिवार्य मानके व प्रमाणित उपचार पद्धती बंधनकारक न केल्यामुळे रुग्णांची आर्थिक लूट आणि अनावश्यक चाचण्यांचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
वंचित बहुजन आघाडी या जनविरोधी आणि रुग्णविरोधी विधेयकाचा तीव्र निषेध करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून या विधेयकात त्वरित सुधारणा करण्यात याव्यात; उपचारांच्या दरांवर मर्यादा घालावी, स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा उभारावी आणि राष्ट्रीय रुग्ण हक्क सनदेतील सर्व हक्क समाविष्ट करावेत. जर सरकारने सर्वसामान्यांच्या आरोग्याचा खेळ मांडणारा हा कायदा असाच लादण्याचा प्रयत्न केला, तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून रुग्णांच्या हक्कासाठी आंदोलन करणार असल्याचे देखील वंचितने जाहीर केले आहे.
राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष,
वंचित बहुजन आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
@CMOMaharashtra@maha_governor
#महाराष्ट्रक्लिनिकलएस्टॅब्लिशमेंट्सविधेयक
दुष्काळ निवारण म्हणजे निवडणुकीचे घोषणापत्र नाही.५ हजार रुपये देऊन ३०५ तालुक्यांचे प्रश्न सुटत नाहीत. मराठवाड्याचे भूजल खालावले, हे जलसंधारण योजनांच्या अपयशाचे निदर्शक आहे. सरकारने जाहीर करावे की किती निधी, कोणत्या विभागाकडून, कधी आणि कोणत्या अटींवर दिला जाणार ह्याचे उत्तर नसेल, तर या घोषणा म्हणजे निव्वळ शेतकऱ्यांची थट्टा आहे.
: राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#VBAForIndia
'गाव तिथे शाखा, शाखा तिथे संघटन'; पक्षबांधणीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा – सुजात आंबेडकर
औरंगाबादमध्ये शेकडो युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश; तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा निर्धार
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीची ध्येयधोरणे, जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची ताकद, अन्याय-अत्याचारांविरोधात उभारलेली आंदोलने आणि समाजातील प्रत्येक घटकाला संधी देण्याची व्यापक भूमिका यामुळे प्रभावित होऊन बुधवारी (दि. १४ ऑक्टोबर) औरंगाबाद येथे शेकडो युवकांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्याचे आयोजन वंचित बहुजन युवा आघाडीचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड यांनी केले होते. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी युवकांना मार्गदर्शन करताना सुजात आंबेडकर यांनी फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीची वैचारिक भूमिका, पक्षसंघटन मजबूत करण्याची गरज आणि अन्यायाविरोधात लढण्याची कार्यकर्त्यांची जबाबदारी अधोरेखित केली.
"आपण फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीचे प्रतिनिधित्व करतो. आपण बाळासाहेब आंबेडकरांचे सैनिक आणि प्रतिनिधी आहोत, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिपाई म्हणून काम करतो. ही जबाबदारी समजून घेऊन पक्षात प्रवेश केलेल्या युवकांनी ती आपल्या खांद्यावर घ्यावी," असे आवाहन त्यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आणि प्रतिनिधी म्हणून जिथे जिथे अन्याय-अत्याचार होतील, तिथे आवाज उठवणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे सांगून सुजात आंबेडकर म्हणाले की, पक्षाने आणि बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेली भूमिका समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवली पाहिजे. तळागाळातील लोकांना पक्षाची भूमिका समजावून सांगणे, गावागावांत संघटन उभे करणे आणि पक्षबांधणी करणे, ही युवकांची महत्त्वाची जबाबदारी आहे.
पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात शाखा स्थापन करावी, तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर (बूथवर) दहा जणांची कमिटी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश सुजात आंबेडकर यांनी दिले. "गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे संघटन" या पद्धतीने काम करून वंचित बहुजन आघाडी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले.
वंचित बहुजन आघाडी हा इतर पक्षांपेक्षा वेगळा पक्ष असल्याचे स्पष्ट करताना ते म्हणाले की, हा पक्ष केवळ नेत्यांना सत्तेत पोहोचवण्यासाठी किंवा त्यांच्या पाठराखणीसाठी स्थापन झालेला नाही. ज्या वंचित समूहातील लोकांपर्यंत आजवर सत्तेच्या संधी पोहोचल्या नाहीत, अशा लोकांना ताकद देऊन सत्तेत सहभागी करण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली आहे.
वंचित बहुजन आघाडी ही तळागाळातील कार्यकर्त्यांना संरक्षण देणारी आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी संघटना आहे, असे सांगत सुजात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांच्या सन्मानाचा आणि सुरक्षिततेचा मुद्दा मांडला.
इतर पक्षांमध्ये एखाद्या नेत्यावर टीका झाल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून आंदोलने केली जातात; मात्र वंचित बहुजन आघाडीमध्ये कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना आणि त्यांच्या न्यायाच्या लढ्याला प्राधान्य दिले जाते, असे त्यांनी नमूद केले.
"वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला त्रास झाला किंवा त्याच्यावर अत्याचार झाला, तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची आणि चक्का जाम करण्याची ताकद पक्षात आहे," असा ठाम इशारा सुजात आंबेडकर यांनी दिला.
#SujatAmbedkar #VanchitBahujanAghadi #VBA #Aurangabad #PartyJoining #YouthLeadership #YouthEmpowerment #PartyBuilding #AmbedkariteMovement #PhuleShahuAmbedkar #SocialJustice
📍औरंगाबाद
"भव्य पक्षप्रवेश सोहळा"
आपण फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीचे प्रतिनिधित्व करतो. आपण बाळासाहेब आंबेडकरांचे प्रतिनिधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिपाई म्हणून काम करतो.
हे समजून घेऊन, ज्या युवकांनी पक्षप्रवेश केला आहे, त्यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी.
: सुजात आंबेडकर
राज्य कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन आघाडी
#VBAForIndia
📍औरंगाबाद
"भव्य पक्षप्रवेश सोहळा"
पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात शाखा आणि बुध बांधणी करावी. त्या बुथमध्ये 10 लोकांची कमिटी करणे हे आपले टार्गेट असेल पाहिजे.
गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे संघटन या पद्धतीने काम करून तळागळात पक्ष वाढवायचा आहे.
: सुजात आंबेडकर
राज्य कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन आघाडी
#VBAForIndia
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
आजचा दिवस म्हणजे इतिहासाचा सुवर्णक्षण!
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार करून मानवतेच्या नव्या युगाची सुरुवात केली.
धम्मचक्र प्रवर्तन दिन हा फक्त धर्मांतराचा दिवस नाही, तर तो स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांचा मूलाधार आहे.
या पवित्र दिनी आपण बाबासाहेबांना अभिवादन करूया, त्यांच्या विचारांना आचरणात आणूया, आणि समाजात करुणा, समता आणि बंधुत्वाचा विचार पोचवूया...सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा..!