मिरा-भाईंदरमध्ये शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला नवे बळ! 🚩
पक्षाच्या विचारांना अधिक व्यापक करण्यासाठी आणि जनसेवेची गती वाढवण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या संपन्न झाल्या. पक्षाने सोपवलेल्या जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडत संघटनवाढ, जनसंपर्क आणि लोकहितासाठी सर्व पदाधिकारी समर्पित भावनेने कार्य करतील, असा विश्वास आहे.
नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!
#PratapSarnaik #ShivSena #MiraBhayandar #मिराभाईंदर #शिवसैनिक
🗓️ ४ जुलै २०२६ l 📍 मिरा भाईंदर
शिवसेनेची विचारधारा व ध्येयधोरणांवर विश्वास ठेवत आरती परमार, गोपाल राणे,वर्षा गाथाणी, रूपाली पाटील, हरेश पाटील यांनी आज माझ्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला.
सर्वांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या सर्वांच्या सहभागातून मिरा भाईंदर मध्ये शिवसेना पक्षाची ताकद वाढेल.
#Pratapsarnaik #shivsena #MiraBhayandar
मिरा भाईंदर जनसंपर्क कार्यालयातील माझे तरुण सहकारी श्री. अमित जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आपणांस सुख, समृद्धी, निरोगी आरोग्यासह दीर्घायुष्य लाभो ही शुभकामना.
#birthdaywish
📍 ठाणे
शिवसेनेची विचारधारा व ध्येयधोरणांवर विश्वास ठेवत धुळे जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या उपनेत्या श्रीमती शुभांगी पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह खासदार श्री. श्रीकांत शिंदे, खासदार श्री. नरेश म्हस्के आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
या पक्षप्रवेशामुळे धुळे जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद अधिक बळकट होणार असून, स्थानिक पातळीवर संघटनात्मक विस्ताराला नवी चालना मिळणार आहे.
@Shivsenaofc
#PratapSarnaik #ShivSena #Dhule #PartyJoining #शिवसेना
🗓️ ३ जुलै २०२६ |📍 विधानसभा
सन २०२६, मोटार वाहन (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक क्रमांक १९ विधानसभेत मांडण्यात आले. या चर्चेत शासनाच्यावतीने भूमिका स्पष्ट मांडली.
दारू पिऊन वाहन चालविण्यामुळे होणारे रस्ते अपघात हा विषय अत्यंत गंभीर आहे. हा विषय केवळ कायद्याचा नाही तर लाखो नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे. या विषयावर सभागृहातील सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावना योग्य असून, त्या भावनांशी मी पूर्णपणे सहमत आहे.
महाराष्ट्रात दरवर्षी हजारो नागरिक रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडतात, तर देशभरात हा आकडा दीड लाखांहून अधिक आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब असून, अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता वाढविण्यासाठी परिवहन विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर विद्यमान कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाते. अशा प्रकरणांमध्ये वाहनचालकाचा परवाना तत्काळ निलंबित करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी प्रकरण न्यायालयात पाठविले जाते.
तथापि, बदलत्या परिस्थितीनुसार विद्यमान कायद्यामध्ये आणखी प्रभावी सुधारणा होण्याची आवश्यकता असल्यास राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे त्याबाबत प्रस्ताव मांडण्यात येईल. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेला प्रत्येक सकारात्मक बदल करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
राज्य परिवहन विभागामार्फत एसटी महामंडळाच्या नव्या बसमध्ये चालकाने मद्यप्राशन केले असल्यास बस सुरूच होणार नाही, अशी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसविण्यात येत आहे. या तंत्रज्ञानामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला अधिक बळ मिळणार असून, भविष्यात अशाच प्रकारची व्यवस्था इतर सार्वजनिक तसेच खासगी वाहनांमध्येही लागू करता येईल का, याचाही गांभीर्याने विचार केला जाईल.
रस्ते अपघातांमध्ये मृत्यू झालेल्या किंवा गंभीर जखमी झालेल्या नागरिकांना अधिक चांगली मदत आणि संरक्षण मिळावे, यासाठी विद्यमान तरतुदींचा आढावा घेऊन आवश्यक बदल करण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात येईल. यासाठी माननीय मुख्यमंत्री, संबंधित विभाग आणि केंद्र शासनाशी समन्वय साधून पुढील कार्यवाही करण्यात येईल.
या विषयावर उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. ना. श्री नितीनजी गडकरी तसेच संबंधित विभागांशी आवश्यक त्या बैठका आयोजित करून कायद्यातील सुधारणा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रभावी अंमलबजावणी यासाठी शासन सकारात्मक पावले उचलेल.
#PratapSarnaik #MaharashtraAssembly #RoadSafety #SafeDriving
🗓️ ३ जुलै २०२६ l 📍 विधान भवन
विधान परिषदेत आमदार ॲड. अनिल परब यांनी एसटी महामंडळात २०२४ साली GCC तत्वावर कंत्राटी पद्धतीने १३१० बसेस घेण्याबाबत भ्रष्टाचार झाल्या प्रकरणी प्रश्न उपस्थित केला.
एसटी महामंडळात २०२४ साली १३१० बसेस GCC तत्वावर कंत्राटी पद्धतीने घेण्याची प्रक्रिया चालू केली होती. परंतु या प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे काही लोकप्रतिनिधींनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. त्या अनुषंगाने ही योजना रद्द करून एसटी महामंडळात फक्त स्वमालकीच्या बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या कथित भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असून चौकशी अहवाल आल्यानंतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका सभागृहात मांडली.
@msrtcofficial
#PratapSarnaik #TransportMinister #MaharashtraLegislature #MonsoonSession2026 #MSRTC
विधान भवनातील आजच्या कामकाजादरम्यान मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस जी आणि नवनिर्वाचित विधानपरिषद उपसभापती श्री. सचिन अहिर यांच्यासमवेत उपस्थित राहिलो.
महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारे महत्त्वपूर्ण निर्णय, जनतेच्या अपेक्षा आणि लोकहिताच्या प्रश्नांप्रती असलेली बांधिलकी यांची पुन्हा एकदा जाणीव करून देणारा हा क्षण होता. अशा प्रत्येक अनुभवातून जनसेवेची प्रेरणा अधिक दृढ होते आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अधिक समर्पितपणे कार्य करण्याची ऊर्जा मिळते.
@Dev_Fadnavis@AhirsachinAhir
#PratapSarnaik #TransportMinister #Maharashtra #VidhanBhavan #MonsoonSession2026
विधान परिषदेच्या उपसभापती पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मा. श्री. सचिन अहिर यांचे हार्दिक अभिनंदन!
सचिन भाऊ हे माझे जुने मित्र आणि सहकारी आहेत. ते अत्यंत अभ्यासू, जमिनीशी जोडलेले आणि सामाजिक प्रश्नांची जाण असलेले लोकप्रतिनिधी आहेत. कष्टकरी आणि श्रमिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी झटणारे संवेदनशील कामगार नेते म्हणून त्यांचे मोठे काम आहे.
आपल्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभवाचा उपयोग करत ते विधान परिषद उपसभापती पदाच्या गौरवशाली परंपरेचा सन्मान राखतील. सत्ताधारी आणि विरोधकांचा सन्मान राखत सर्वांना न्याय देतील असा मला विश्वास आहे.
श्री. सचिन अहिर यांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि त्यांच्या यशस्वी कारकीर्दीसाठी शुभेच्छा!
#PratapSarnaik #SachinAhir #VidhanParishad #Upsabhapati #congratulation
@AhirsachinAhir
🗓️ १ जुलै २०२६ l 📍 मुंबई
'एसटी'च्या तीर्थाटन योजनेत खासगी भागीदारीला हिरवा कंदील!
'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन' योजनेला वेग; राज्यभर सहा प्रादेशिक पर्यटन संस्थांची होणार निवड
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महत्त्वाकांक्षी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन' योजनेला अधिक व्यापक आणि व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी खासगी पर्यटन संस्थांच्या सहभागाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो भाविकांना सुरक्षित, सुसूत्र, किफायतशीर आणि सर्वसमावेशक तीर्थयात्रेची सुविधा उपलब्ध होणार असून, एसटी महामंडळालाही अतिरिक्त महसुलाचा नवा स्रोत निर्माण होईल.
नव्या धोरणानुसार तीर्थाटन व धार्मिक सहलींचे नियोजन, निवास, भोजन, स्थानिक पर्यटन, मार्गदर्शक, टोल, पार्किंग, प्रवेश शुल्क आदी सर्व पूरक सुविधा खासगी पर्यटन संस्थांकडून वाजवी दरात आणि दर्जेदार स्वरूपात पुरविण्यात येतील. मात्र, बस सेवा, प्रवासी वाहतूक आणि प्रवासभाड्याचे संपूर्ण उत्पन्न एसटी महामंडळाकडेच राहणार आहे. त्यामुळे भाविकांना सर्व सुविधा 'वन-स्टॉप' पद्धतीने उपलब्ध होतील आणि एसटीच्या उत्पन्नालाही चालना मिळेल.
शासनाच्या विविध सामाजिक घटकांना लागू असलेल्या प्रवास सवलती या योजनेतही लागू राहतील. त्यामुळे खासगी पर्यटन संस्थांच्या तुलनेत या योजनेतील प्रवास खर्च तुलनेने कमी असेल.
'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन' योजना ही राज्यातील मराठी तरुण-तरुणींसाठी रोजगार आणि उद्योजकतेचे नवे दालन खुलं करणारी योजना आहे. कोणतीही मोठी भांडवली गुंतवणूक न करता, केवळ नियोजन, व्यवस्थापन कौशल्य आणि पर्यटनाविषयीची आवड यांच्या जोरावर या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करता येऊ शकते. महाराष्ट्राच्या समृद्ध धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन वारशाला चालना देतानाच स्थानिक युवक-युवतींना स्वावलंबी बनण्याची ही मोठी संधी आहे.
भाविकांच्या श्रद्धेला सेवाभावाची जोड आणि एसटीच्या आर्थिक बळकटीला नवा आधार' या दुहेरी उद्देशाने राबविण्यात येणारी ही योजना राज्यातील धार्मिक पर्यटनाला नवी दिशा देण्याबरोबरच एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठीही प्रभावी ठरेल!
#PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #PilgrimageScheme #PublicPrivatePartnership
@msrtcofficial
जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगी आशेचा किरण बनून रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टरांना सेवाभावी वृत्तीला सलाम!
राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त सर्व डॉक्टरांना हार्दिक शुभेच्छा!
#NationalDoctorsDay#DoctorsDay#HealthcareHeroes#MedicalProfession #SaluteToDoctors
ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे.
मराठी रंगभूमीवर विजया मेहता यांना बाई म्हणून ओळखलं जायचं. त्यांच्या नाटकाच्या शिस्तीच्या मुशीत विक्रम गोखले, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार घडले.
त्यांनी रंगायन संस्थेची स्थापना करून प्रायोगिक रंगभूमीची चळवळ मराठी भाषेत सुरू केली. आपल्या सृजनशील दृष्टिकोनातून आणि कलेप्रति असीम निष्ठेतून त्यांनी मराठी रंगभूमीला नवी ओळख प्राप्त करून दिली. त्यांनी रंगभूमीसाठी दिलेले योगदान पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. विजया बाईंना भावपूर्ण श्रद्धांजली.
🗓️ ३० जून २०२६ l 📍 मंत्रालय
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमण, निष्कासन व पुनर्वसनाबाबत आज वन मंत्री मा. ना. गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली.
या बैठकीत अतिक्रमण निष्कासन, पात्र लाभार्थ्यांचे पुनर्वसन तसेच पुढील कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
@NaikSpeaks
#Pratapsarnaik #Ganeshnaik
#SanjayGandhiNationalPark
#Rehabilitation
#ForestConservation
शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच नेतृत्व जगाने स्वीकारलं आहे. भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी आपलं कर्तुत्व सिद्ध केलेलं आहे. अशा परिस्थितीत जर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारत असतांना त्यांना मंत्रिपद मिळत असेल तर तो त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा गौरव आहे असं मला वाटतं. त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद त्यांच्या सोबत असणार आहेत.
@DrSEShinde
#PratapSarnaik #TransportMinister #DrShrikantShinde #BestWishes #CabinetExpansion
चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून एका निरागस विद्यार्थ्याचा झालेला दुर्दैवी मृत्यू अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारा आहे. या दुःखद घटनेत जखमी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
दिवंगत विद्यार्थ्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहवेदना व्यक्त करतो. या कठीण प्रसंगी त्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ लाभो, ही प्रार्थना.
🗓️ ३० जून २०२६ | 📍मुंबई
माझे जुने मित्र, माजी मंत्री, कामगार नेते तथा आमदार श्री. सचिन अहिर यांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या बाबत शिंदे साहेबांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली.
सचिन अहिर यांच्या नव्या राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! तसेच त्यांनी आज विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला. आपला विजय नक्की होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#EknathShinde #Pratapsarnaik #ShivSena #SachinAhir #MaharashtraPolitics #Mumbai
@mieknathshinde@AhirsachinAhir@Shivsenaofc