@sandesh_samant गंमत पाहा..ही तिच संघटना आहे जी बेळगाव-कारवार-निपाणीत मराठीला विरोध करते...मराठी महापौरांवर शाईहल्ला, महाराष्ट्रातल्या ST ड्रायव्हरला कन्नड येत नाही म्हणून त्यांना काळं फासणं यांची लोकं करत आली आहेत. आज मराठी भाषेचे तारणहार त्यांनाच जाऊन भेटले
@sandesh_samant नक्कीच हा प्रश्न हिंदुत्वा���ा नाही. माझा मुद्दा आहे की आपल्याला दैनंदिन जिवनात भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल सर्वसामान्य जनता म्हणून आपण पाठपुरावा करत नाही. बापट समोर येऊन बोलला...पण ज्या लोकांना त्रास होतोय..ती लोकं नगरसेवकाकडे..किंवा संबंधित व्यक्तींकडे जात असतील का? प्रेशर गट वगैरे
ही चळवळ थांबली नाही पाहिजे..
ना या मुलांना कोणी महाराष्ट्र द्रोही बोलू शकणार,
ना टुलकीट , ना भाडे के टट्टे...
ही जनता आहे ज��याला चांगले रस्ते, चांगलं पाणी,
शुद्ध हवा, अन्न आणि सुरक्षा पाहिजे..
सरकारने प्रश्न विचारला म्हणून समोरच्यांना विरोधक असा टॅग देण्याची गरज नाही आणि विरोधक असले तरी मागणी रास्त असेल तर काम करणे हे सरकारच काम आहे, केलंच पाहिजे.
मी कोणाची खिल्ली उडवत नाही पण, आ�� देशभरात आरक्षण आणि मेरिट या मुद्द्यावर बोलले जात आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या भाषणावर बोलावसे वाटते.
आंबेडकरवादी चळवळीतून व्याख्याने ऐकणारा, चळवळीचे कार्यक्रम, उपक्रम आपल्या गाव-खेड्यात, गल्लीत राबवणारा एक कार्यकर्ता अगदी स्पष्टपणे, निर्भीडपणे, सामाजिक भान जपत अन्याय-अत्याचाराविरुद्ध आणि समाज परिवर्तनावर परखड मत मांडू शकतो.
बहुजन��ादी, आदिवासी, कामगार, डाव्या चळवळीतील विद्यार्थी त्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडतात. आताच CJP च्या आंदोलनातील मुले अत्यंत प्रभावीपणे बोलताना, सरकारला जाब विचारताना दिसले. ही सर्व मुले अमित ठाकरे यांच्यापेक्षा अधिक प्रभावीपणे मुद्दे मांडताना दिसली आहेत. त्यांना कोणी लिहून देईल, मग ते बोलतील, मग ते मांडतील, अशी वेळ त्यांच्यावर कधीही येत नाही. प्रश्नांचे आकलन, मते निर्भीडपणे मांडण्य��चा, व्यक्त होण्याचा अभ्यास चळवळीतील कार्यकर्त्यांना आहे.
तथाकथित मेनस्ट्रीम मीडिया विसरलेली भाषणे, मांडता न आलेले मुद्दे कव्हर करणे आणि त्याला महत्त्व देण्याचे काम करतात. पण याच्यापेक्षा कित्येक पटीने सक्षम असलेल्या चळवळीतील आणि आंदोलनातील लोकांना दाखवण्याची हिंमत का करत नाही? त्यांच्या योग्यतेचे श्रेय त्यांना कधीच दिले जात नाही.
आरक्षण आणि मेरिटवर बोलणाऱ्यांना हे का दिसत नाही? अमित ठाकरेपेक्षा आमच्या आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ता प्रभावीपणे आपली मते ��ांडू शकतो आणि मांडत आहे. फरक फक्त एवढाच आहे की, जरी या मुलांकडे खूप जास्त टॅलेंट, क्षमता आणि मेरिट असलं तरी मीडिया स्पेस काहीच लोकांसाठी ‘Reserved’ असते.
@sandesh_samant भावपूर्ण श्रद्धांजली बाबांना.... मित्रा स्वतःची काळजी घे...तू स्ट्राँग आहेस याची कल्पना आहे...पण कधीही गरज लागली तर आम्ही आहोत हे व���सरु नकोस...बाकी भेटू लवकरच 🙏🙏
HISTORIC NIGHT FOR INDIAN VOLLEYBALL 🇮🇳🏐
- Qualified for Semi Finals of AVC Men's Volleyball Cup for First time ever in History with 5/5 wins 🥹
JUST LOOK AT THE CROWD REACTION! ��🔥
पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी ?
नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असता कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मरा���ी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत.
भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे.
सभागृहात नक्की कोण उपस्थित होतं माहित नाही पण अनेक ज्येष्ठ आमदार इथे असणार हे नक्की त्यांच्यापैकी एकानेही विरोध दर्शवला नाही ? सभागृहात श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहित नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी ( स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात) म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं ! पण त्यांच म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडा��ोडीची कामं होत आहेत ना बरोबर , अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना ? बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो. शोकप्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला. महाराष्ट्रातील आधीच्या, आताच्या पिढ्या हे पाहात आहेत आणि हे रेकॉर्ड झालेले सभापतींचे भाषण पुढच्या पिढ्या पाहतील याचं भान आणि जाणीव दोन्हीही नाही ? माणूस शिक्षित असला पाहीजे पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत का नाही ?
आणि श्री. एकनाथ शिंदेंना पण याच्याशी घेणंदेणं असण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान पंन्नास हजार फुटावरून चाललंय म्हणून त्यांचा पण दूर दूर पर्यंत संबंध नाही ! ही अवस्था आहे आज आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला समोरच्या कागदावर लिहिलेलं मराठी वाचता येत नाही, ते सभागृह मराठ�� भाषेविषयी काय आस्था बाळगणार किंवा मराठीची गळचेपी होत आहे म्हणून काय कारवाई करणार?
या सभागृहाला अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव माळवणकर लाभले जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात त्या अलिबागचे दत्तात्रय काशिनाथ कुंटे विधानसभेचे अध्यक्ष होते, अरुणभाई गुजराथी होते, बाळासाहेब भारदे होते, अगदी आत्ता आता अध्यक्ष असलेले दिलीप वळसे पाटील होते. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची काय ही अवस्था ? कधीकधी विधिमंड��ाच्या कामकाजाचं चित्रण समोर येतं ते ऐकावंसं आणि बघावसं पण वाटत नाही इतकं सुमार पद्धतीने सुरु आहे.
आपल्या भाषेची गळचेपी ही हिंदी लादून केंद्राकडून सुरु आहे, ती राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांकडून सुरु आहे आणि राज्याच्या विधिमंडळाकडून पण सुरु आहे याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं, चीड येते.
काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसा��े विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत.
महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध !
राज ठाकरे ।
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून चांदिवली विधानसभा उपविभाग सचिव श्री. शुभम रावराणे यांनी भटक्या श्वानांसाठी पावसाळी निवाऱ्यांची उभारणी केली आहे. मुक्या प्राण्यांसाठी उभा केलेला हा निवारा हे खरंच स्तुत्य काम आहे आणि त्याबद्दल चांदिवली विधानसभेतील महाराष्ट्र सैनिकांचं मनापासून अभिनंदन.
#MNSAdhikrut
@sandesh_samant मला सलग दोन महिने २ हजाराच्या वर आलंय...गणितच लागत नाही यांच्या बिलींगचं... माझा अर्धा पगार हप्त्यांमध्ये...बाकीचं थोडंफार सेव्हींग...मग उरलेला पगार बिलं भरण्यात जातो...🥲🥲🥲🥲
"मुंबई हातातून जातेय', "मराठी माणूस मागे पडतो' ''बाहेरचे येतायत" अशा घोषणा आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत.
पण माझा अनुभव थोडा वेगळा आहे.
मी नाशिकचा. तब्बल २६ वर्षे नाशिकमध्ये राहिल्यानंतर कामानिमित्त मुंबईत आलो. मुंबईचा पाऊस, दमट उकाडा, लोकलची गर्दी, घरांचे प्रचंड दर आणि ईएमआय स्वीकारत इथेच स्थायिक झालो. शेवटी मुंबईत स्वतःचं घरही घेतलं.
माझ्यासारखे लाखो लोक रोज हेच क��त आहेत.
मराठी माणूस काम करत नाही, हे कधीच खरं नव्हतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मेहनती आणि कर्तृत्ववान लोक आहेत. पण एक गोष्ट प्रामाणिकपणे मान्य करावी लागेल.... काहींना मुंबईतील संधी हव्या असतात, पण मुंबईचा संघर्ष स्वीकारायचा नसतो.
''त्या गर्दीत कोण राहणार?", ''तो दमट उकाडा कसा सहन करायचा?'', ''त्या पावसात कसं जगायचं?''
असे प्रश्न अनेकदा ऐकायला मिळतात. आणि ते चुकीचेही नाहीत. मुंबई ��ोपं शहर नाही. पण मुंबईची संधी आणि मुंबईची किंमत या दोन्ही गोष्टी एकत्रच येतात.
मराठी असल्याचा स्वाभिमान जरूर असावा. आपली भाषा, संस्कृती आणि ओळख जपलीच पाहिजे. पण स्वाभिमान आणि अनावश्यक गर्व यात फरक असतो.
कधी कधी असं वाटतं की आपण मराठी माणसाच्या कर्तृत्वाबद्दल कमी आणि त्याच्या असुरक्षिततेबद्दल जास्त बोलतो. प्रत्यक्षात महाराष्ट्रातील लाखो मराठी लोक रोज कष्ट करून स्वतःचं स्थान निर्माण करत आहेत. त्यासाठी त्यांना कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही.
मुंबईत स्थान भाषा, आडनाव किंवा घोषणांमुळे मिळत नाही. ते काम, कष्ट, कौशल्य, सातत्य आणि जिद्दीमुळे मिळते.
म्हणून मला "मुंबई कोणाची?" या प्रश्नापेक्षा "मुंबईसाठी आपण काय करतो?" हा प्रश्न जास्त महत्त्वाचा वाटतो.
मुंबई कुणाच्या हातातून जात नाही आणि कुणाच्या हातातही जात नाही. मुंबई रोज लाखो लोकांना संधी देते. त्या संधीचा उपयोग कोण ���रतो, हा खरा प्रश्न आहे.
मी नाशिकहून मुंबईत आलो. मुंबईत स्वतःचं स्थान निर्माण केलं.
घोषणांपेक्षा कामावर माझा जास्त विश्वास आहे...
स्वतः वर विश्वास ठेवा....
Nonsense आंदोलन .
ह्या बाईंना त्यांच्या मुलाला pick up करायचे ह��ते. असे कित्येक नागरिक रस्त्यात अडकले होते.
पोलिस ��त्तर द्यायची तसदी घेत नव्हते? फक्त नेत्यांच्या पुढे पुढे करणार ? जाब विचारला पाहिजे ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना की त्यांना नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज वाटत नाही?
ह्यापुढे जर भाजपाच्या नेत्यांनी रस्ते बंद केले तर लोकांच्या क्रोधला तोंड द्यावे लागेल.
बंद करा हे nonsense हे मुंबईत कोणीही खपवून घेणार नाही.
ह्या महिलेला माझा सलाम
Gazab proud feel hota hoga Sachin ki mother ko… Sachin
jaisa beta mila unko.
Har maa ka sapna hota hai aisa beta… par India ko sirf ek hi Sachin mila. 🇮🇳
Winning the World Cup twice in a row, the first time any team has done so in the T20 format. Totally deserving and rightful winners of the trophy.
What a fantastic performance by our team and a special brand of cricket on display.
Well done, Team India. Jai Hind! 🇮🇳🏆