#Journalist
Currently working in Saam
Ex Content Producer Time's Group, EX web editor of Zee, Ex Reporter of Lokshahi News, Ex trainee Reporter of DD National
आज ट्रेन मधून प्रवास करत असताना हा दगड काही अज्ञात व्यक्तीने चालू ट्रेन मध्ये फेकला सुदैवाने मला जास्त दुखापत झाली नाही पण घटना अतिशय गंभीर आहे हा असा प्रकार कोणाच्या जिवावर बेतू शकतो... @WesternRly@raosahebdanve@raosaheboffice यांची आपण दखल घ्याल अशी आशा करते @RPFCRBB
महाराष्ट्राच्या राजकारणातील नियम - 'नो निधी, नो प्रगती!' विरोधी बाकांवर राहून मतदारसंघाचा विकास रखडतो.. जनता नाराज होते, म्हणुन भीतीपोटी लोकप्रतिनिधींनी विरोधी पक्ष सोडून सत्तेचा मार्ग धरला..बरोबर ना मतदारांनो काय वाटते तुम्हाला?
#maharashtrapolitics#shivsena
मुजोर PWD अधिकार्यांचा प्रताप.. BDD चाळीतील घरांसाठी पैसा फेका आणि रूम नावावर करून घ्या.. माझ्या आजोबांच्या घरात अनधिकृत शिरलेल्या बाईने पैसे फेकल्यावर खऱ्या वारसदारांना सोडून अनधिकृत महिलेला रूम मिळाला @Shivendraraje11@mahapwdofficial#dadar#BDD
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !
#mahanagarpalika#mayor#महापौर
छ.संभाजीनगर महापालिका OPEN प्रवर्ग
वसई विरार महापालिका OPEN प्रवर्ग
परभणी महापालिका OPEN प्रवर्ग
सोलापूर महापालिका OPEN प्रवर्ग
सांगली महापालिका OPEN प्रवर्ग
पिंपरी-चिंचवड महापालिका OPEN प्रवर्ग
अमरावती महापालिका OPEN प्रवर्ग
#mahanagarpalika#mayor#महापौर
नवी मुंबई महापालिका OPEN-महिलांसाठी राखीव
नागपूर महापालिका OPEN-महिलांसाठी राखीव
मीरा भाईंदर महापालिका OPEN- महिला
नांदेड महापालिका OPEN-महिलांसाठी राखीव
मालेगाव महापालिका OPEN-महिलांसाठी राखीव
मुंबई लोकलपेक्षा वाईट परिस्तिथी @MumbaiMetro01 अंधेरी वर्सोवा मेट्रोची आहे.. म्हणजे अगदी श्वास घ्यायला सुद्धा जागा नसते प्रत्येक मेट्रो अश्यावेळी मेट्रो संख्या वाढवणे गरजेचे आहे ना की बाऊन्सर उभा करून दारे लावुन घेणे.. #mumbaimetro#varsovaghatkopar
Dr. Manmohan Singh (1932 - 2024) 💔
He made India the fastest growing economy, gave us Right to Education Act, Right to Information Act, secured the nuclear deal and ensured free and independent media.
He was also the last Indian prime minister to give a press conference in 2014
मिस्टर अमित शाह, तुम्हाला सप्रेम जय भीम…
आंबेडकर, आंबेडकर असा जप करण्यापूर्वी लोक फक्त ईश्वर-ईश्वराचा जप करत असत. त्यांच्या सात जन्मांचा लेखाजोखा माझ्याकडे नाही, पण सात पिढ्यांचा इतिहास नक्कीच उपलब्ध आहे आणि ते सर्व गुलाम, बहिष्कृत, तुच्छ आणि अपमानित करून ठेवण्यात तुमच्या पूर्वजांनी हयात घालवली आहे.
आंबेडकर - आंबेडकर ही तुमच्या सारख्या लोकांसाठी एक भीती निश्चितच आहे. पण आमच्यासाठी ती फॅशनच आहे. अशी फॅशन की, जी आमच्या पॅशन मध्ये कनवर्ट होतं. ज्यामुळे आम्हाला खरा मुक्तीचा मार्ग सापडलेला आहे. या बाबासाहेबांनीच आम्हाला स्वाभिमान आणि स्वाभिमान बाळगण्याचे धैर्य दिले. ज्यांना त्यांचा इतिहास किंवा तुमच्या दैवी आणि समाजव्यवस्थेची योग्य माहिती आहे त्यांना हे माहित आहे की, स्वर्ग आणि देव ही केवळ भंपक कल्पनाच आहे. ज्या स्वर्गाची भाषा तुम्ही करताय तो स्वर्ग तुम्हालाच लखलाभ होवो. आमच्यासाठी तो नरकच आहे. त्या नरकातून आम्हाला बाबासाहेबांनी बाहेर काढले.
त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता बंद करा आणि देशाचे गृहमंत्री म्हणून उत्तर द्या की, हाथरसचं काय झालं, मणिपूरचे काय झालं, ईवीएमच्या मशीनचं काय झालं, परभणीतील आंबेडकरी वस्त्यात मध्यरात्री घुसून निर्दोषांवर अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवरील कारवाईचे काय झालं, सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायाचं काय झालं, बीडच्या संतोष देशमुखच्या न्यायाचं काय झालं, देशाचे गृहमंत्री आहात ना.. मग यावर उत्तर द्या. आम्ही इथेच आहोत, हातात संविधान आणि खांद्यावर आंबेडकर नावाच्या बाप माणसाचा खांद्यावर हात घेऊन लढ्याला सज्ज आहोत.