वागळेंना मराठी शब्द सापडले नाहीत, म्हणून त्यांनी हिंदीत व्यक्त केलेल्या भावना पाहता ते त्यांच्या स्वतःच्या चरित्रातील घटनांचा इतिहास इतरांवर लादू पाहातात हे स्पष्ट होते. ज्या ठाकरे सेनेकडून सपाटून मार खाल्ला, ज्यांच्या नावाने बोटे मोडत पत्रकार म्हणून प्रसिद्धी मिळवण्याची धडपड केली, त्यांच्यासमोर बसून त्यांच्या प्रचारासाठी परवानगी मागणारे आणि तसा लाचार फोटो मिरवणारे वागळे लाचारीची भाषा करतात तेव्हा त्यांना लाज वाटत नसेल का?…
कल्याण पूर्व येथील मंगलराघो नगर परिसरातील सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींवर उपचार करण्यात येत आहे. तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना लवकरात लवकर बाहेर काढून या इमारतीतील इतर रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांनी दिले आहेत. तसेच या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना जिल्हा आपत्ती निवारण निधीतून आर्थिक सहाय्य देखील देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली..!!
Nation Always First..!!
As part of Operation Sindoor and India’s ongoing efforts to combat cross-border terrorism, seven All-Party Delegations are scheduled to visit key partner nations, including members of the United Nations Security Council, later this month. I have the honor of leading one of these delegations. We will firmly convey to the international community that terrorism has no place in India, and that it is Pakistan which continues to nurture terrorism on its own soil. When it comes to matters of national interest, there is no division, only duty. It is a privilege to serve my country in this capacity and I will carry out this sacred responsibility with unwavering devotion and a resolute commitment to India’s zero tolerance stance against terrorism.
I extend my heartfelt gratitude to Hon’ble Prime Minister Shri Narendra Modi and the Central Government for entrusting me with this important responsibility.
Jai Hind..!!
राष्ट्रहितासाठी सदैव तत्पर..!!
ऑपरेशन सिंदूर आणि सीमापार दहशतवादाविरुद्ध भारताच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, सर्वपक्षीय सात शिष्टमंडळ या महिन्याच्या अखेरीस संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांसह प्रमुख भागीदार राष्ट्रांना भेट देणार आहेत. या शिष्टमंडळांपैकी एका मंडळाचे नेतृत्व करण्याचा मान मला मिळाला आहे.
आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला ठामपणे सांगणार आहोत की '' दहशतवादाला भारतात कोणतेही स्थान नाही आणि पाकिस्तानच आपल्या भूमीवर दहशतवादाचे पोषण करत आहे.'' जेव्हा राष्ट्रीय हिताचा प्रश्न येतो, तेव्हा तिथे कोणतीही फूट नसते, तिथे असते केवळ कर्तव्य. देशाची सेवा करण्याची ही संधी मला लाभली आहे, आणि मी ही पवित्र जबाबदारी अत्यंत निष्ठा आणि भारताच्या दहशतवादाविरोधातील शून्य सहिष्णुतेच्या ठाम भूमिकेसह पार पाडणार आहे.
ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी आणि केंद्र सरकार यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
जय हिंद .. !
#Shivsena #Drshrikanteknathshinde #NationFirst
From sons of the soil to tourists of India—how far the Thackerays have fallen.
While bullets flew in #Pahalgam, they were vacationing in Europe. On #Maharashtra Day, they vanished without a word.
No statement. No solidarity. No shame.
This isn’t leadership—it’s luxury politics.
In contrast, DCM @mieknathshinde ji led from the front, stood with victims & honoured our heroes.
Maharashtra needs warriors on duty, not part-time Netas on holiday.
" जम्मू - काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज दिल्ली येथे केंद्र सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सर्वांना बोलण्याची संधी देण्यात आली. यावेळी सर्व राजकीय पक्ष सरकारच्या प्रत्येक निर्णयात संपूर्ण ताकदीने उभे राहतील असे स्पष्ट केले. शिवसेना देखील सरकार समवेत अगदी भक्कमपणे उभी आहे.
- डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार, शिवसेना
Against the backdrop of the cowardly terrorist attack that took place in Pahalgam, Jammu & Kashmir an all-party meeting was organized today in Delhi on behalf of the Central Government. During the meeting, everyone was given the opportunity to speak. At that time, all political parties clearly stated that they will stand firmly behind every decision of the government with full strength.Shiv Sena is also standing firmly alongside the government.
- Dr. Shrikant Eknath Shinde, Member of Parliament, Shiv Sena
#Shivsena #Drshrikanteknathshinde
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर राज्यातील अनेक पर्यटक त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्यासाठी शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब स्वतः श्रीनगर येथे पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळ असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली.
याठिकाणी अडकलेल्या काही पर्यटकांनी उपमुख्यमंत्री महोदयांशी फोनवरून संवाद साधून मदतीची मागणी केली होती. यासाठी उपमुख्यमंत्री महोदयांनी खासदार मा.डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेबांचे स्वीय सहाय्यक मा.अभिजीत दरेकर आणि उपजिल्हाप्रमुख मा.राजेश कदम यांच्यासह शिवसेनेच्या मदत पथकाला याठिकाणी अडकलेल्या राज्यातील पर्यटकांच्या मदतीसाठी पाठवले.
या मदतकार्याला वेग येण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनी श्रीनगर येथे पोहोचून पर्यटकांची भेट घेतली. तसेच त्यांच्याशी संवाद साधून सुखरूप आपल्याला लवकर घरी नेण्यात येईल. त्यासाठी विशेष विमानाची सोय करण्यात आल्याचे सांगत या सर्वांना मदतीचा आधार दिला. तर शिंदे साहेबांच्या रूपाने आपल्यासाठी आपल्या हक्काचा माणूस मदतीला धावून आल्याची भावना यावेळी पर्यटकांनी व्यक्त करत साहेबांचे मनापासून आभार मानले.
#PahalgamTerroristAttack #Shivsena #EknathShinde
पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राज्यातील ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातील मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे पार्थिव आणि नातेवाईकांना पुन्हा राज्यात आणण्याची प्रक्रिया सरकारच्या वतीने सुरू झाली आहे. मी स्वतः यासंदर्भात बारकाईने आढावा घेत असून सर्वांशी समन्वय साधून आहे.
श्रीनगर येथे या पर्यटकांचे पार्थिव आणि त्यांच्या नातेवाईकांना विमानात बसवून देण्यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर आणि त्यांची टीम काल रात्रीच श्रीनगरमध्ये पोहोचली आहे. तर मुंबईत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे समन्वयासाठी उपस्थित राहणार आहेत.
यासोबतच श्रीनगरमध्ये अडकलेल्या इतर पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी शिवसेनेची एक टीम अद्यापही श्रीनगरमध्ये तळ ठोकून आहे.
या घटनेतील संजय लेले आणि दिलीप देसले यांचे पार्थिव श्रीनगर-मुंबई एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे. हे विमान आज दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी मुंबईला निघेल.
पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव संध्याकाळी ६ वाजता निघणाऱ्या विमानाने पुण्यात आणले जाईल.
तर डोंबिवलीचे रहिवासी असलेल्या हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन येणारे विमान १ वाजून १५ मिनिटांनी निघून मुंबईला पोहोचेल.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे हेच विचार, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर पोहोचवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन.
#Shivsena#EknathShinde@mieknathshinde@DrSEShinde@Shivsenaofc@RahoolNKanal