महावितरणचे ग्राहकांना आवाहन!
देशभर सुरू करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री - सूर्यघर मोफत वीज योजने’त तीन किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी देण्यात येणार आहे. १/२
चंद्रपूर येथील बैठकीत राज्य शासनाच्या विविध योजनांतील विद्युत विकासाची कामे दर्जेदार व निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश संचालक (प्रकल्प) श्री. प्रकाश रेशमे यांनी दिले. यावेळेस मुख्य अभियंता श्री.सुनील देशपांडे उपस्थित होते.
#MSEDCL
महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर १ ते ४ फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. या स्पर्धेत १६ परिमंडलातील एक हजारांहून जास्त अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत.
#MSEDCL
सर्व औद्योगिक ग्राहकांना तत्पर सेवा मिळण्यासाठी अकोला जिल्ह्यातील विद्युत भवन येथे स्वतंत्र संचालक श्री. आशिष चंदाराणा यांच्या हस्ते स्वागत सेलचे उद्घाटन करण्यात आले.
#MSEDCL#स्वागत_सेल
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महावितरणने पी.एम. जनमन योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील आदिम जमातीच्या ४८० घरांना नवीन वीजजोडणी देऊन त्यांची घरे प्रकाशित केली आहेत.
#MSEDCL#NewConnection
अमरावती परिमंडलातील कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या वैशाली अग्निहोत्री यांची साऊथ एशियन ऐरोबिक व हिप-हॉप चॅम्पियनशिप-२०२३ आंतरराष्ट्रीय स्पर्धेची पंच म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. या उत्तम कामगिरीसाठी मुख्य अभियंता श्री. ज्ञानेश कुलकर्णी यांनी कौतुक केले आहे.
#MSEDCL
घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर वर्गवारीतील ग्राहकांना मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंदणी करुन दोहोंद्वारे दरमहा वीजबिल मिळविण्याची सोय उपलब्ध आहे.
#MSEDCL#RegisterNow
यावेळी दैनिक सकाळ, मुंबई आवृतीचे मुख्य संपादक श्री.राहुल गडपाले यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देण्यात आले.
यावेळी अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री.अनिल अग्रवाल, भारतीय जनसंचार संस्थेचे स्थानिक केंद्र संचालक श्री.राजेश कुशवाह आदी मान्यवर उपस्थित होते. २/२
#MSEDCL
अकोला परिमंडलांतर्गत येणाऱ्या अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी गो-ग्रीन योजनेअंतर्गत वीजबिलासाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करुन ई-मेल व एसएमएस पर्यायाची निवड केली आहे व १३,५३९ ग्राहकांकडून १६,२४,६८०/- रू. वार्षिक बचत सुरु आहे.
#MSEDCL#GoGreen#InTheNews
गो-ग्रीन योजनेअंतर्गत छापील कागदी देयकाऐवजी पुणे जिल्ह्यातील तब्बल १,२३,३९६ ग्राहकांनी 'ई-मेल व एसएमएस’ पर्यायाचा अवलंब केला असून प्रत्येक बिलामागे १० रुपयांची बचत करत आहेत.
#MSEDCL#GoGreenScheme
स्वतंत्र भारताला एकसंघ करणारे स्वातंत्र्य सेनानी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#VallbhabhaiPatel#MSEDCL#Electricity
हा दसरा सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान, समृद्धी व आनंद घेऊन यावा ही सदिच्छा...
विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!! 🙏☘️
#विजयादशमी#दसरा#MSEDCL#Power#Electricity
लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री.सुंदर लटपटे यांच्या निर्देशानुसार आकडेमुक्त गाव मोहीम राबविण्यात येत आहे.
निलंगा विभागातील मदनसूरी शाखेतील बामणी गावामध्ये वीजचोरी विरोधात मोहीम राबवून गाव आकडेमुक्त करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत रॅली काढण्यात आली.
जुनी मालमत्ता विकत घेताना वीज देयकाच्या नावात बदल करणे झाले सुसह्य.
- नोंदणी व मुद्रांक विभागाची संगणक प्रणाली महावितरणशी जोडण्यात आली आहे.
#MSEDCL#Elctricity#Power