@MarathiRT होता स्काय-बल्यू कलरचा. आई-दादा गेल्यानंतर नातेवाइकांच्या संपर्कात राहाता यावं म्हणून मी घेतला होता. पण झालं उलटंच. फोन घ्यायचं आता बंरं सुचलं याला, असं म्हणत अनेकजण स्वत:हून दूर गेले. ‘नोकिया-3310’ ची ही सल कायम लक्षात राहील. हा, पण या फोनमुळेच रेशिमगाठी जुळल्यात आमच्या..