६ एप्रिल… हा दिवस प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात अभिमान, समर्पण आणि राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारा दिवस! 🚩
भारतीय जनता पक्ष स्थापना दिवस
६ एप्रिल १९८० रोजी स्थापन झालेला भारतीय जनता पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर तो विचारांची, संस्कारांची आणि राष्ट्रसेवेची अखंड परंपरा आहे. "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास" या मंत्राने प्रेरित होऊन पक्षाने देशाच्या प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा ध्यास घेतला.
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या राष्ट्रवादी विचारांचा वारसा पुढे नेत, लाखो कार्यकर्त्यांच्या त्याग, तपस्या आणि संघर्षातून हा वटवृक्ष आज भव्य रुप धारण करून उभा आहे. कठीण काळातही तत्त्वांशी तडजोड न करता, देशहित सर्वोच्च मानणारी ही परंपरा आजही तितक्याच ताकदीने पुढे चालत आहे.
सामान्य कार्यकर्त्याच्या घरापासून ते देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेले नेतृत्व हीच या पक्षाची खरी ताकद आहे.
बूथस्तरावर काम करणारा कार्यकर्ता असो किंवा देशाचे नेतृत्व करणारा पंतप्रधान — प्रत्येकामध्ये राष्ट्रसेवेचीच भावना आहे.
आज भारत जागतिक पातळीवर नवे कीर्तिमान प्रस्थापित करत आहे. आत्मनिर्भर भारत, डिजिटल क्रांती, पायाभूत सुविधा विकास, गरीब कल्याण योजना — या सर्व यशामागे कार्यकर्त्यांची निष्ठा आणि जनतेचा आशीर्वाद आहे.
स्थापना दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी पुन्हा एकदा संकल्प करूया राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि स्वतः शेवटी!
प्रत्येक घरात कमळ फुलवण्याचा, प्रत्येक मनात राष्ट्रप्रेम जागवण्याचा आणि भारताला विश्वगुरू बनवण्याचा निर्धार करूया.
🚩 भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना हार्दिक शुभेच्छा!
#BJP #स्थापना_दिवस #राष्ट्रप्रथम #SabkaSaathSabkaVikas
📍 वसई
आगामी वसई–विरार महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मा. भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री रविंद्र चव्हाण साहेब तसेच वसई–विरार शहर महानगरपालिका मुख्य निवडणूक प्रमुख श्रीमती पूनमताई महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यकर्ता संवाद व संघटन आढावा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमामध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक तयारी, बूथ स्तरावरील मजबुती, कार्यकर्त्यांची जबाबदारी, मतदारांशी थेट संवाद, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांचा प्रभावी प्रचार यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. वसई–विरार शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाची स्पष्ट दिशा, धोरणे व विजन कार्यकर्त्यांसमोर मांडण्यात आले.
या प्रसंगी माझ्यासह पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा. श्री डॉ. हेमंत विष्णु सवरा, वसई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित ताई, भाजपा वसई–विरार जिल्हाध्यक्षा सौ. प्रज्ञा ताई पाटील, आगरी सेना राज्य उपाध्यक्ष श्री कैलास (काका) पाटील तसेच वसई–विरार परिसरातील भाजपाचे सर्व पदाधिकारी, मोर्चांचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून व प्रचंड उपस्थितीतून भाजपाच्या संघटनाची ताकद स्पष्टपणे दिसून आली. आगामी वसई–विरार महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय निश्चित करण्याचा दृढ निर्धार या कार्यक्रमातून व्यक्त झाला.
विकास, सुशासन, पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास हाच भाजपाचा मंत्र – आणि याच मंत्राच्या बळावर वसई–विरारमध्ये परिवर्तन घडवण्याचा संकल्प आज पुन्हा एकदा करण्यात आला.
#VasaiVirarMahapalika
#कार्यकर्ता_संवाद
#BJP
#RavindraChavan
#PoonamMahajan
#DrHemantSavara
#SnehaDubeyPandit
#PradnyaPatil
#mlarajannaik
सूर्यदेव को समर्पित छठ महापर्व बिहार की सांस्कृतिक परंपरा का भव्य और दिव्य उत्सव है। मुझे यह बताते हुए अत्यंत प्रसन्नता हो रही है कि हमारी सरकार इस महापर्व को UNESCO की सांस्कृतिक धरोहर की सूची में शामिल कराने के प्रयासों में जुटी है।
#MannKiBaat