भाजपाचा प्रशासनाविरोधात रुद्रावतार!
चेंबूर येथे झाड पडून झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर दिसून आले की, भाजपा ने प्रशासनाविरूध्द भूमिका घेत अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे.
भाजपासाठी सत्ता ही पदाची शान नसून, कर्तव्याची ओळख आहे.
चेंबूर एम पश्चिम विभाग आर सी मार्ग वर Airtel फायबर टाकायचा काम बंद ठेऊन नागरिकना नाहक त्रास होत आहे यांचीपरवानगी तपासून त्वरित कारवाई करावी
रवी केदार
भाजपा विधान सभा अध्यक्ष
9833468488
@mybmc@mybmcWardMW@CMOMaharashtra@mieknathshinde@ShelarAshish
मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांसंदर्भात आज संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
२०१६ च्या सर्वेक्षणानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यातील सुमारे ४१९४ एकर शासकीय जमिनीवर अतिक्रमण झाले असून, या जमिनी राज्य सरकार, मुंबई म��ानगरपालिका, म्हाडा आणि केंद्र सरकारच्या मालकीच्या आहेत. शासकीय जमिनीवर असलेल्या या अतिक्रमणांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचा आढावा घेतला. सद्यस्थितीत ९२६ प्रकल्पांपैकी १६० प्रकल्प पूर्ण झाले असून ३२२ प्रकल्प प्रगतीपथावर आहेत, तर ११४ प्रकल्प विविध कारणांमुळे स्थगित आहेत. या सर्व प्रकल्पांमधून सुमारे १ लाख ७५ हजार ५११ पात्र झोपडपट्टीधारकांना घरे उपलब्ध होणार आहेत. यासाठी आवश्यक असलेली Provisional PAP घरे, अतिरिक्त घरे आणि ट्रांझिट कॅम्प यांची उभारणी देखील प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीत प्रलंबित व स्थगित प्रकल्पांतील अडथळ्यांचा सखोल आढावा घेत, संबंधित विभागांनी आवश्यक ती प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही तातडीने पूर्ण करून प्रकल्प मार्गी लावावेत, अशा स्पष्ट सूचना दिल्या. पात्र लाभार्थ्यांना वेळेत घरे मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे असल्याचे बैठकीत सुचित केले.
तसेच, यापुढे शासकीय जमिनींवर पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत, यासाठी कठोर उपाययोजना राबविण्याचे संबंधित ��धिकाऱ्यांना निर्देश दिले.
प्रधानमंत्री गतीशक्ती अभियानांतर्गत विकसित करण्यात आलेली ‘नेत्रम’ ही सॅटेलाईट आधारित संगणकीय प्रणाली अतिक्रमण रोखण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या प्रणालीद्वारे मिळणाऱ्या माहितीनुसार तात्काळ कारवाई करून अतिक्रमणे रोखावीत, तसेच संबंधित विभागांनी सातत्याने देखरेख ठेवून भविष्यातील अतिक्रमणांना आळा घालण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
#Maharashtra #AshishShelar
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026
भाजपा दक्षिण मुंबई . (मंडल प्रशिक्षण शिबी��)
चेंबूर विधानसभेतील चेंबूर कॅम्प घाटला मंडलांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.
श्री नारायण भ��्ति पंथाचे प्रवर्तक, परमपूज्य सदगुरू श्री लोकेशानंद महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त घाटकोपर येथे दर्शन घेऊन मनःपूर्वक शुभेच्छा अर्पण केल्या.
सदगुरूंचा कृपाशिर्वाद सदैव आमच्यावर राहो.
जय श्री नारायण 🙏
मा. अजितदादांनी जिथं विकासरुपी फुलांची बाग फुलवली तिथंच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल, असं कधी स्वप्नातही आलं नाही.. पण नियतीच्या क्रूर खेळापुढं कुणाचं काही चालत नाही.. अजितद��दांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून अद्यापपर्यंत डोकं सुन्न आहे… मन बर्फाप्रमाणे थिजलंय.. काय झालं, कसं झालं आणि का झालं, या विचाराचं मनातलं काहूर थांबत नाहीय… आपल्यात आत्तापर्यंत जे-जे काही संभाषण झालं, चर्चा झाल्या, विशेषतः शेवटच्या काही दिवसांमध्ये झालेल्या भावनिक चर्चा, हे सगळं काही एखादा टेपरेकॉर्डप्रमाणे सारखं सारखं कानात घुमतंय. जणू काही तुम्हीच अदृश्य स्वरुपात बोलत आहात असा भास होतोय. तुमची ती काम करण्याची शैली, प्रशासनावर पक्की मांड, राजकारणावर मजबूत कमांड, परखड स्वभाव, हो ला हो आणि नाही ला नाही न करता जे असेल ते स्पष्ट सांगून समोरच्या व्यक्तीसोबत राजकारण न खेळ��्याची पद्धत, कामाचा झपाटा, वेळेचं काटेकोर नियोजन या सगळ्याचं आम्हाला अक्षरशः कौतुक आणि आश्चर्यही वाटायचं. सत्ता असो किंवा नसो, कायम तुमचा दरारा वाटायचा, आदरयुक्त भिती असायची. तुमचा सार्वजनिक वावर बघून तुम्हाला न भेटलेल्या अनेकांना तुम्ही फणसाप्रमाणे कठोर वाटायचात पण तीच व्यक्ती जेंव्हा तुमच्या संपर्कात यायची तेंव्हा फणासातील रसाळ आणि मधुर गऱ्याप्रमाणे तुमचा स्वभाव पाहून ती तुमच्��ा प्रेमात पडायची, याचे आम्ही साक्षीदार आहोत.
पण अचानक असं काय झालं? दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा गाडा हाकणारा, दररोज भेटणाऱ्या शेकडो माणसांना मदत करणारा, त्यांची कामं करणारा, पहाटेपासून रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या विकासाचाच ध्यास घेणारा, सामान्य माणसासाठी वाऱ्याच्या वेगाने उर फाटेस्तोवर धावणारा पहाडासारखा माणूस असा एका क्षणात कसा निघून जाऊ शकतो? या प्रश्नाने डोक्याचा भुगा झालाय. पण काही प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात, असं म्हणतात. पण मा. अजितदादांच्या विकासाचा वेगच कदाचित नियतीला आवडला असावा आणि म्हणूनच अजितदादा लोकांसाठी धावत असतानाच त्याच वेगाने नियतीने त्यांच्यावर झडप घातली असावी. या नियतीबाबतच माझी तक्रार आहे.. ती कुठं करायची हे कळत नाही. पण माझा त्या नियतीला प्रश्न आहे, ‘‘आमच्यासारखे लाख नेले असते तरी चाललं असतं, पण आमचा ला��ांचा पोशिंदा तू का असा चोरून नेला? एका क्षणात तू लाखो जणांच्या लाखो स्वप्नांची राख का केलीस. दे ना उत्तर.’’
अजितदादा तुमच्याविषयी देखील माझी तक्रार आहे. दोन दिवसांपासून महाराष्ट्र अक्षरशः स्तब्ध आहे.. प्रत्येकाच्या डोळ्यांतला अश्रूचा पूर कमी होत नाहीये.. हुंदके आणि आक्रोश ऐकून काळजात चर्रर्र होतंय.. आपल्या जाण्याने पाठीमागे दुःखाचे असे पाट वाहतील, याची चिंता दादा तुम्ही का केली नाही? ���रवी कुणी थोडं जरी चुकलं ��र त्याला चार चौघात झाप झाप झापणारे तुम्ही त्या नियतीलाही त्याच जरबेच्या आवाजात का नाही खडसावलं? महाराष्ट्राची अजून कित्येक कामं बाकी असताना वेळ न घेता तू अशी आलीच कशी? दादा, तुमचा आवाज ऐकूणच ती नक्की घाबरली असती. पण तुम्ही तिलाही नाराज केलं नाही. मोकळ्या हाताने तिलाही माघारी पाठवलं नाही. आलेल्या प्रत्येकाचं काम करायचं, हेच तर तुमचं वैशिष्टय होतं. पण दोन दिवसांपासून दुःखाच्या पुरात आकंठ बुडालेला महाराष्ट्र पाहून आता त्या नियतीलाही नक्कीच पश्चात्ताप होत असेल.
दादा काय बोलू? आज तुमची राख जमा करत असताना वाटत होतं की फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही या राखेतूनही अचानक त्याच रुबाबात उभं रहाल आणि नेहमीच्या खर्जातल्या आवाजात आम्हाला म्हणाल, ‘‘अरे वेड्यांनो, का अश्रू ढाळताय? मी तुमची गंमत करत होतो? एखाद्या संकटाला सामोरं जाण्याची तुमची किती तयारी आहे हे ‘मॉक ड्रील’प्रमाणे चेक ���रत होतो.. आता उठा, कामाला लागा… महाराष्ट्रासाठी, इथल्या सामान्य माणसासाठी आपल्याला खूप काम करायचंय.. चला, उशीर नका करु…’’
दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय..😭
Love U दादा!💔🙏
#AjitdadaPawar
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये
भारतीय जनता पार्टी
मानखुर्द – वार्ड क्र. १३५ मधून
आमचे बंधुतुल्य मित्र, नवनिर्वाचित नगरसेवक मा. श्री. नवनाथ बन यांनी मिळवलेल्या दणदणीत व ऐतिहासिक विजयाबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!
रवि केदार
���ंडल अध्यक्ष
आज भाजपा कार्यालय, चेंबूर कॅम्प येथे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक १५४ मधील भाजपा–शिवसेना–रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय महादेवजी शिवगण यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा अत��यंत उत्साहात संपन्न झाला.
भाजपा वॉर्ड क्र. १५४ वॉर्ड न���वडणूक संचालन समितीची बैठक माझ्या अध्यक्षतेखाली पार पडली. निवडणुकीच्या दृष्टीकोनातून सखोल चर्चा-विनिमय करण्यात आला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले
लोकशक्तीचा आणि विकासाचा ऐतिहासिक विजय!
या अभूतपूर्व यशाचा आनंद
फटाके फोडून, जल्लोष करत
विजय उत्सव म्हणून साजरा करण्यात आला.
सर्व कार्यकर्ते व नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे
हा क्षण अविस्मरण��य ठरला.
🚩 विकासाचा विजय, जनतेचा विश्वास!
19 वर्ष के देवव्रत महेश रेखे जी ने जो उपलब्धि हासिल की है, वो जानकर मन प्रफुल्लित हो गया है। उनकी ये स��लता हमारी आने वाली पीढ़ियों की प्रेरणा बनने वाली है।
भारतीय संस्कृति में आस्था रखने वाले हर एक व्यक्ति को ये जानकर अच्छा लगेगा कि श्री देवव्रत ने शुक्ल यजुर्वेद की माध्यन्दिन शाखा के 2000 मंत्रों वाले 'दण्डकर्म पारायणम्' को 50 दिनों तक बिना किसी अवरोध के पूर्ण किया है। इसमें अनेक वैदिक ऋचाएं और पवित्रतम शब्द उल्लेखित हैं, जिन्हें उन्होंने पूर्ण शुद्धता के साथ उच्चारित किया। ये उपलब्धि हमा��ी गुरु परंपरा का सबसे उत्तम रूप है।
काशी से सांसद के रूप में, मुझे इस बात का गर्व है कि उनकी यह अद्भुत साधना इसी पवित्र धरती पर संपन्न हुई। उनके परिवार, संतों, मुनियों, विद्वानों और देशभर की उन सभी संस्थाओं को मेरा प्रणाम, जिन्होंने इस तपस्या म���ं उन्हें सहयोग दिया।
वार्ड १५४
महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभाग व परिरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चरई नाल्याची पाहणी करून नाल्याच्या बाजूंच्या पायवाटा अत्यंत खराब अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या पायवाटा तातडीने दुरुस्त करण्यात याव्यात अशी मागणी केली
🪷भारतीय जनता पार्टी 🪷
चेंबूर कॅम्प घाटला मंडल
वार्ड १५४
कोकण नगर व सम्राट अशोक नगर परिसरातील गटार तुंबलेले निदर्शनास येताच तत्काळ महानगर पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या सहकार्याने साफसफा��� करण्यात आली तसेच तुटलेली धापे बदली करून घेतले.
आपला
रवी केदार
मंडल अध्यक्ष