MP, Mumbai North West Loksabha | Ex-Minister of State, Govt. of Maharashtra | Ex-Guardian Minister, Ratnagiri District | Ex-MLA, Jogeshwari East | Shivsena
भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला नवी दिशा देणाऱ्या आणि 'इंग्रजांनो चले जाव' चा नारा देत अखंड देशाला एकवटणाऱ्या ऑगस्ट क्रांति दिनाच्या व स्वातंत्र्यलढ्यातील सर्व हुतात्म्यांना व क्रांतीवीरांना विनम्र अभिवादन! 🇮🇳🙏
📍 #नवी_दिल्ली |
देशाचे आदरणीय पंतप्रधान @narendramodi जी यांची आज त्यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी उपस्थित राहून #शिवसेना खासदारांसह सदिच्छा भेट घेतली. या भेटीत लोकसभेचे संसदीय अधिवेशन, त्यातील कामकाज, शिवसेनेच्या खासदारांची भूमिका तसेच राज्यात सुरू असलेली विकासकामे, केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वय, राज्यातील पाऊसपाण्याची सद्यस्थिती यावर सविस्तर चर्चा झाली.
पंतप्रधान महोदयांनी या भेटीवेळी दाखवलेले आदरातिथ्य, त्यांची आपुलकी आणि राज्याच्या विकासाबाबत घेतलेली सहकार्याची भूमिका पाहता त्यांच्याबद्दलचा आम्हा सर्वांच्या मनातील आदर अधिकच दुणावला.
यावेळी शिवसेना पक्षाचे संसदीय गटनेते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, रवींद्र वायकर, नरेश म्हस्के, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाघचौरे, संजय दिना पाटील, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि राज्यसभेतील खासदार प्रा.डॉ.ज्योती वाघमारे उपस्थित होत्या.
#NarendraModi #PrimeMinister #NewDelhi #Shivsena #EknathShinde #Maharashtra
@Shivsenaofc@DrSEShinde@MPShrirangBarne@RavindraWaikar@nareshmhaske@SDPatil_16@OmRajenimbalkr@SanjayJadhavPbn
देशाचे आदरणीय पंतप्रधान मा.ना.श्री. नरेंद्रजी मोदी साहेबांची आज शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या खासदारांसह दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, सध्याची पावसाची परिस्थिती यांसह विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सर्वश्री खासदार श्रीरंग बारणे, रवींद्र वायकर, नरेश म्हस्के, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, संजय दिना पाटील आणि राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे उपस्थित होत्या.
#Shivsena #EknathShinde #NarendraModi
🚨 पवई, पासपोली व विहार तलाव परिसरातील बेकायदेशीर बांधकामांवर तात्काळ 'स्टॉप-वर्क नोटीस' जारी करा!
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील अतिसंवेदनशील भाग असलेल्या पवई तलाव, पासपोली आणि विहार तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे व ध्वनिप्रदूषण सुरू आहे. यामुळे आपल्या स्थानिक वन्यजीव अधिवासाचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे. हे मुंबई उच्च न्यायालयाने २०२२ मध्ये दिलेल्या स्पष्ट आदेशांचे थेट उल्लंघन आहे.
या गंभीर समस्येकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मी लोकसभेत 'नियम ३७७' अंतर्गत प्रस्ताव मांडून खालील प्रमुख मागण्या लोकसभेच्या पटलावर ठेवल्या आहेत:
📌 माझ्या प्रमुख मागण्या:
१. तात्काळ 'स्टॉप-वर्क नोटीस': केंद्र सरकार आणि पर्यावरण मंत्रालयाने या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून सर्व अनधिकृत बांधकामांना स्थगिती देणारी 'स्टॉप-वर्क नोटीस' जारी करावी.
२. केंद्रीय तथ्य-शोध समिती (Fact-Finding Committee): झालेल्या पर्यावरणाच्या नुकसानाचे अचूक मूल्यमापन करण्यासाठी तात्काळ एक केंद्रीय तपास पथक पाठवण्यात यावे.
३. दोषींवर कठोर कारवाई: वन्यजीवांचे अधिवास नष्ट करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि विकासकांवर (Developers) वन्यजीव संरक्षण अधिनियम (१९७२) च्या कलम ५१ अन्वये कडक दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
🚨 पर्यावरणाला असणारा गंभीर धोका:
* मगरींचा अधिवास धोक्यात: हा परिसर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची-१ (Schedule-I) अंतर्गत संरक्षित असलेल्या मगरींच्या प्रजननाचा व अस्तित्वाचा मुख्य आधार आहे, जो आता धोक्यात आला आहे.
* इको-सेंसिटिव्ह झोनचा नियमभंग: विहार तलाव हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) इको-सेंसिटिव्ह झोनचा भाग आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या (NBWL) पूर्वपरवानगीशिवाय येथे निर्माणकार्य करणे हा गंभीर कायदेशीर गुन्हा आहे.
* दुर्मिळ पक्षी व रामसर स्थळ: IUCN च्या 'रेड लिस्ट' मधील अनेक दुर्मिळ पक्षांचे नैसर्गिक घर नष्ट होत आहे, तर दुसरीकडे सध्या पवई तलावाला 'रामसर स्थळ' (Ramsar Site) दर्जा मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मुंबईचे पर्यावरण, आपले तलाव आणि येथील वन्यजीव वाचवण्यासाठी माझा हा लढा असाच सुरू राहील!
जय हिंद! जय महाराष्ट्र! 🚩
#RavindraWaikar #ShivSena #LokSabha #Rule377 #SavePowaiLake #SaveViharLake #MumbaiEnvironment #EnvironmentMinistry #WildlifeProtection #NorthWestMumbai @DrSEShinde@mieknathshinde@LokSabhaSectt
बेस्ट बस दिन निमित्त सर्व मुंबईकरांना हार्दिक शुभेच्छा! 🚌✨
रस्ते बदलले, काळ बदलला, पण मुंबईकरांचा BEST बसवरील विश्वास आजही तसाच अबाधित आहे. मुंबईच्या गतीला आणि प्रत्येक प्रवाशाला आपल्या गंतव्यस्थानी पोहोचवणाऱ्या 'बेस्ट'च्या अविरत सेवेचा आपल्याला सार्थ अभिमान आहे.
दिवसरात्र मुंबईकरांची सेवा करणाऱ्या बेस्ट प्रशासनातील सर्व कर्मचार्यांच्या अहोरात्र सेवेला मानाचा मुजरा! 💐
— रविंद्र दत्ताराम वायकर
शिवसेना खासदार, मुंबई उत्तर-पश्चिम
#BESTBusDay #BESTBus #Mumbai #MumbaiLifeline #RavindraWaiker #Shivsena #NorthWestMumbai
Tomorrow, 7th August is National Handloom Day. Let’s make India’s handloom diversity popular.
Share your videos with your favourite handloom products, including GRWM videos on social media.
Don’t forget to use #NationalHandloomDay.
भारतीय राष्ट्रगीताचे रचनाकार, थोर तत्त्वज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते विश्वविख्यात कवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन! 💐🙏
त्यांच्या विचार, साहित्य आणि दृष्टीकोनाने भारतीय संस्कृती आणि साहित्याला समृद्ध केले आहे.
#GurudevRabindranathTagore #RabindranathTagore #Smrutidin #Tribute #RavindraWaikar
वर्सोवा जेटीच्या आधुनिकीकरणासाठी आणि कोळी बांधवांच्या सक्षमीकरणासाठी खासदार रविंद्र वायकर यांचा पुढाकार 🌊⚓ @LalanSingh_1
मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघाचे खासदार रविंद्र दत्ताराम वायकर यांनी केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री श्री राजीव रंजन सिंह जी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी त्यांनी वर्सोवा जेटीच्या आधुनिकीकरणाच्या विषयाचे गांभीर्य आणि महत्त्व केंद्रीय मंत्र्यांना सविस्तर समजावून सांगितले.
'प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने' (PMMSY) अंतर्गत वर्सोवा जेटीच्या ₹४९८.१५ कोटींच्या विस्तृत प्रकल्प अहवालास (DPR) तातडीने मंजुरी देण्याची मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
पत्रातील प्रमुख मुद्दे:
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ च्या लाभांची अंमलबजावणी: सीमाशुल्क कायद्यातील (Customs Act) नवीन कलम 56A नुसार विशेष आर्थिक क्षेत्र (EEZ) आणि हाय-सीझमधून पकडलेल्या माशांवर मिळालेल्या शुल्कमुक्तीचा थेट फायदा स्थानिक कोळी बांधवांना मिळवून देणे.
आधुनिक पायाभूत सुविधा: खोल समुद्रातील मासेमारीला (Deep Sea Fishing) प्रोत्साहन देण्यासाठी वर्सोवा जेटी येथे आधुनिक लँडिंग प्लॅटफॉर्म आणि फ्लोटिंग जेटीची उभारणी करणे.
कोल्ड स्टोरेज आणि निर्यात: आंतरराष्ट्रीय दर्जाची शीतगृहे (Cold Storage) आणि बर्फ साठवणूक केंद्रे उभारून माशांच्या निर्यातीला चालना देणे.
कोळी समाजाची आर्थिक प्रगती: 'ब्लू इकॉनॉमी'चा (Blue Economy) प्रत्यक्ष लाभ वर्सोवा येथील हजारो कोळी कुटुंबांपर्यंत पोहोचवणे.
या प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी केंद्रीय अधिकारी, महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी आणि खासदार यांची संयुक्त बैठक आयोजित करून DPR ला लवकरात लवकर मंजुरी देण्याची विनंती खासदार रविंद्र वायकर यांनी केली आहे.
#RavindraWaikar #VersovaJetty #KoliSamaj #PMMSY #BlueEconomy #MumbaiNorthWest #Fisheries #MumbaiInfrastructure #DeepSeaFishing @DrSEShinde@mieknathshinde@LokSabhaSectt
माजी परराष्ट्र मंत्री स्व. सुषमा स्वराज जी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! 🙏✨
आपल्या वक्तृत्वाने, कर्तृत्वाने आणि असीम संवेदनशीलतेने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला जनसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवणाऱ्या आदरणीय सुषमा जी यांची आज पुण्यतिथी.
जगाच्या पाठीवर कुठेही संकटात सापडलेल्या प्रत्येक भारतीयासाठी त्या नेहमी आशेचा किरण ठरल्या. त्यांच्या या अलौकिक जनसेवेचा आणि नेतृत्वाचा वारसा सदैव प्रेरणा देत राहील.
महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती मा. सचिन भाऊ अहिर यांचे माझ्या दिल्ली येथील शासकीय निवासस्थानी सस्नेह स्वागत केले. या प्रसंगी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पुष्पगुच्छ व शाल देऊन उपसभापती महोदयांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. 💐✨@AhirsachinAhir@DrSEShinde@mieknathshinde
खासदार मा. श्री. रविंद्र वायकर साहेब यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला ऐतिहासिक यश!
लोकसभा निवडणूक २०२४ च्या प्रचारादरम्यान जुहू सर्कल व जुहू-वर्सोवा लिंक रोड परिसरातील नागरिकांना आम्ही दिलेले महत्त्वाचे आश्वासन आज पूर्णत्वास आले आहे.
गेल्या २० वर्षांपासून संरक्षण मंत्रालयाच्या (Ministry of Defence GOVT of INDIA ) निर्बंधांमुळे रखडलेला आणि परिसरातील २०० हून अधिक इमारतींच्या पुनर्विकासाच्या मार्गातील मोठा अडथळा अखेर दूर झाला आहे. त्यामुळे या परिसरातील शेकडो कुटुंबांच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
हे यश खासदार मा. श्री. रविंद्र वायकर साहेब यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, प्रभावी प्रयत्न आणि विकासाभिमुख नेतृत्वामुळे शक्य झाले आहे.
जनतेला दिलेला शब्द आम्ही कृतीतून पाळला. नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे प्रयत्न यापुढेही अविरत सुरू राहतील.
वचन विकासाचे… पूर्तता विश्वासाची!
अल्ताफ पेवेकर
विभाग प्रमुख- शिवसेना
@mieknathshinde@DrSEShinde@samant_uday@isiddheshRkadam@iYogeshRKadam@RavindraWaikar@AltafPevekar@Shivsenaofc
बीएचएमएस (BHMS) विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची मुदतवाढ द्यावी – केंद्रीय मंत्री श्री प्रतापराव जाधव जी यांच्याकडे मागणी!
शैक्षणिक वर्ष २०१५-२०१६ मध्ये BHMS अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे निर्धारित वेळेत परीक्षा देता आल्या नाहीत. सध्या परीक्षा अर्ज भरण्याचे पोर्टल बंद असल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक भविष्य धोक्यात आले आहे.
यापूर्वी केंद्र सरकारने बीडीएस (BDS) विद्यार्थ्यांसाठी असाच निर्णय घेऊन दोन वर्षांची मुदतवाढ दिली होती. त्याच धर्तीवर समान न्याय आणि विद्यार्थीहित विचारात घेऊन २०१५-१६ च्या BHMS विद्यार्थ्यांना देखील विशेष बाब म्हणून दोन वर्षांची मुदतवाढ (Extension) मंजूर करावी, अशी नम्र विनंती पत्राद्वारे केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मा. श्री. प्रतापराव जाधव जी @mpprataprao यांच्याकडे केली आहे.
विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी शासन या मागणीचा सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करेल असा विश्वास वाटतो.
#RavindraWaikar #BHMS #StudentsFirst #AyushMinistry #PratapraoJadhav #MumbaiNorthWest #EducationSupport @DrSEShinde@DrSEShinde
नवी दिल्ली येथे केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्री प्रतापराव जाधव जी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित 'आरोग्य आणि आयुष' (Health and Ayush) विषयावरील विशेष सादरीकरणास शिवसेनेच्या माननीय खासदारांसोबत उपस्थित राहिलो.
या प्रसंगी आरोग्य व आयुष क्षेत्रातील विविध महत्त्वपूर्ण उपक्रम आणि भविष्यातील योजनांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. @mpprataprao
#HealthAndAyush #PratapraoJadhav #ShivSena #AyushMinistry #HealthMinistry #NewDelhi @DrSEShinde@mieknathshinde
नवी दिल्ली येथे आयोजित नगर विकास आणि गृहनिर्माण संसदीय स्थायी समितीच्या (Standing Committee on Housing and Urban Affairs) बैठकीस उपस्थित राहिलो.
या बैठकीत गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत जनरल पूल रेसिडेन्शियल अकोमोडेशन (GPRA) वसाहतींचा पुनर्विकास आणि सरकारी निवासस्थानांची उपलब्धता वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. या वेळी प्रलंबित प्रकल्प जलद गतीने पूर्ण करणे, घरांची टंचाई दूर करणे, 'ई-संपदा' (e-Sampada) प्रणालीद्वारे घर वाटपात पारदर्शकता आणणे, आणि पर्यावरणपूरक व शाश्वत पायाभूत सुविधांची निर्मिती करणे यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.
सुसज्ज, नियोजनबद्ध आणि आधुनिक नागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
#UrbanDevelopment #GPRA #HousingAndUrbanAffairs #NewDelhi #InfrastructureDevelopment @DrSEShinde@mieknathshinde@LokSabhaSectt
सततच्या पाठपुराव्याला यश! 🚩
तब्बल ७५ वर्षानंतर जुहू येथील 'सिग्नल ट्रान्समीटिंग स्टेशन'च्या १०० मी. पुढील इमारती व झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. ५०० मी. ऐवजी १०० मी. ची अट लागू करून संरक्षण मंत्रालयाने नवीन राजपत्र जारी केले आहे.
या निर्णयामुळे २०० इमारतींमधील १००० हून अधिक कुटुंबे व रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे!
आदरणीय पंतप्रधान श्री @narendramodi जी, केंद्रीय गृहमंत्री श्री @AmitShah जी, संरक्षण मंत्री श्री @rajnathsingh जी, केंद्रीय मंत्री श्री @byadavbjp जी, CM श्री @Dev_Fadnavis जी व DyCM श्री @mieknathshinde जी यांचे मनःपूर्वक आभार! 🙏
#RavindraWaikar #Juhu #Redevelopment #Mumbai #LokSabha #MumbaiNorthWest @DrSEShinde
शिक्षण क्षेत्रातील एक दूरदृष्टीचे दीपस्तंभ हरपले!
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या दुःखद निधनाने शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनातील एका सुवर्णयुगाचा अस्त झाला आहे. त्यांनी रोवलेले शिक्षणाचे रोपटे आज वटवृक्ष बनून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देत आहे. त्यांच्या उत्तुंग आणि बहुआयामी कार्याचा ठसा येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल.
शिक्षणाच्या या महान शिल्पकारास विनम्र श्रद्धांजली! 💐
ग्लासगो येथे पार पडलेल्या २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा मोठ्या उत्साहात समारोप झाला. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ९ कांस्य अशी एकूण ३९ पदके जिंकून पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले. या उल्लेखनीय यशात महाराष्ट्राचाही मोलाचा वाटा राहिला. राज्याच्या दिलीप गावित यांनी पॅरा-एथलेटिक्समध्ये सुवर्णपदक पटकावले, तर सर्वेश अनिल कुशारे यांनी उंच उडी प्रकारात रौप्यपदक जिंकत महाराष्ट्राचा आणि देशाचा गौरव वाढवला.
भारतीय खेळाडूंनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर जगासमोर भारताची क्रीडाशक्ती अधोरेखित केली. सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
#Shivsena #Drshrikanteknathshinde
आज केंद्रीय रेल्वेमंत्री मा. श्री. अश्विनी वैष्णव जी यांची भेट घेऊन आमच्या मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील आणि कोकणवासीयांच्या महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांबाबत सकारात्मक चर्चा केली, ज्यामध्ये प्रामुख्याने जोगेश्वरी जंक्शनच्या टर्मिनल कामाला गती देण्याबाबत, गोरेगाव रेल्वे स्टेशनचा 'अमृत भारत स्टेशन योजने'त समावेश करून कायापालट करण्याबाबत, जोगेश्वरीतून थेट कोकणात गाड्या सुरू करण्यासाठी जुईचंद्र येथील जमीन हस्तांतरण प्रक्रियेचा आढावा आणि प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या कामावर सविस्तर चर्चा झाली; या सर्व प्रकल्पांना गती देऊन नागरिकांचा व कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखकर आणि जलद करण्यासाठी आमचे निरंतर पाठपुरावे सुरूच राहतील! @AshwiniVaishnaw 🚆✨ #MumbaiNorthWest #KokanRailway #Infrastructure #Goregaon #Jogeshwari @DrSEShinde@mieknathshinde@RailMinIndia@LokSabhaSectt