जय जय जी गणराज विद्यासुखदाता |
वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील मंडळातील तसेच घरगुती विराजमान गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी बाप्पाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. तसेच उपस्थित सर्वांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. गणपती बाप्पाची कृपादृष्टी सदैव सर्वांवर राहो आणि प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान व समृद्धी नांदो, हीच बाप्पाच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना!
Had the heartfelt darshan of Lord Ganesha at the mandals as well as at homes in the Versova Assembly Constituency. On this occasion prayed at Bappa feet for the happiness, prosperity and good health of everyone. Also extended heartfelt Ganeshotsav wishes to everyone present. May Lord Ganesha blessings always remain upon everyone and may happiness, contentment and prosperity prevail in everyone life this is my heartfelt prayer at Bappa feet!
॥ श्री गणेशाय नमः ॥
‘वर्षा’ या मुख्यमंत्री शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे आज मनोभावे दर्शन घेतले.
विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली. राज्यातील प्रत्येक कुटुंबात आनंद आणि समाधान नांदो, शेतकऱ्यांच्या मेहनतीला भरभरून यश मिळो, तरुणांना नव्या संधी मिळोत आणि प्रत्येक नागरिकाचे जीवन सुखकर होवो, अशी मनोकामना व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग असाच कायम राहो, राज्यातील प्रत्येक भाग प्रगतीच्या प्रवाहात सहभागी होवो आणि जनकल्याणासाठी सुरू असलेल्या प्रत्येक प्रयत्नाला बाप्पांचे आशीर्वाद लाभोत, हीच श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया! 🙏
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@BJP4Versova
परिवर्तिनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल!
#ParivartiniEkadashi#ekadashi
बाप्पा मोरया रे!
वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील विविध गणेश मंडळे तसेच घरगुती गणपतींची भेट घेऊन श्री गणरायाचे आशीर्वाद घेतले. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या कल्याणासाठी तसेच समाजकार्य करण्यासाठी बळ मिळावे याकरिता मनोभावे प्रार्थना केली. यावेळी गणेशभक्तांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या उत्साहात सहभागी होत गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या!
Bappa morya re!
Visited various Ganesh Mandals as well as household Ganpati celebrations in the Versova Assembly Constituency and sought the blessings of Lord Ganesha. Bowing at Bappa feet I sincerely prayed for the well being of everyone and for the strength to work for society. On this occasion I warmly interacted with the devotees participated in their enthusiasm and extended heartfelt wishes to everyone on the occasion of Ganeshotsav!
@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@BJP4Versova
#GanpatiBappaMourya #गणपतीबाप्पामोरया
गेली पाच दिवस बाप्पा आपल्या घरी विराजमान होते. या मंगलमय वातावरणात आज, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाच्या चरणी दीप प्रज्वलित करून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना केली. 🙏🪔
आज घरी भजन मंडळीच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात भजन झाले. यावेळी मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त विशेष भजन गाऊन, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि देशसेवेसाठी सदैव बळ मिळावे, अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली.
जनसेवेला आणि राष्ट्रसेवेला समर्पित असलेल्या मोदीजींच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आरोग्य सदैव नांदो, त्यांच्यावर बाप्पाचा आशीर्वाद कायम राहो आणि भारतमातेची सेवा करण्यासाठी त्यांना अखंड ऊर्जा मिळो, हीच मनापासून इच्छा.
गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺
मोदीजींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🇮🇳🙏
#narendramodi #happybirthdaypmmodi #ashirwadkadiya #snehadubepandit
Visited their beautiful home to seek Bappa’s blessings. 🙏✨ It was wonderful meeting such a warm family and spending time with the incredibly talented and brilliant actor. ❤️
Ganpati Bappa Morya! 🌺🙏
@RohitashvG
आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध मराठी गायक श्री. आदर्श शिंदे जी यांनी माझ्या निवासस्थानी विराजमान लाडक्या गणरायाचे दर्शन घेतले. याप्रसंगी भक्तिमय वातावरणात बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले!
Renowned Marathi singer Mr.Adarsh Shinde Ji who has won the hearts of music lovers with his melodious voice had the darshan of the beloved Lord Ganesha enshrined at my residence. On this occasion in a devotional atmosphere he bowed at the feet of Bappa and sought His blessings!
@adarsh_shinde
#Ganpatibappa #गणपति_बप्पा_मोरया #Adarshshinde #Ganeshotsav
📍 मंगल वंदन सोसायटी, एव्हरशाईन सिटी, वसई पूर्व
🗓️ दिनांक : १५ सप्टेंबर २०२६
"गणरायाच्या चरणी स्नेहबंध… भक्ती, श्रद्धा आणि आपुलकीचा अविस्मरणीय सोहळा!"
गणरायाच्या आगमनाने घराघरात आनंद, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले आहे. आमच्या घरच्या श्री गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, BLA-2, पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बांधव, नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावली.
बाप्पाच्या चरणी नतमस्तक होताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारी श्रद्धा आणि आपुलकी मनाला स्पर्शून गेली. आपल्या माणसांची ही प्रेमळ भेट, मनापासून झालेला संवाद आणि बाप्पाच्या साक्षीने अनुभवलेले हे सुंदर क्षण आयुष्यभर हृदयात जपून ठेवावे असे आहेत.
हीच माणसं, हेच प्रेम आणि हा स्नेह हेच आमचे खरे बळ आहे.
श्री गणरायाच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी नांदो, प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होवोत आणि आपल्या सर्वांच्या वाटचालीला बाप्पाचे आशीर्वाद सदैव लाभोत, हीच चरणी प्रार्थना!
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!
#GanpatiBappaMorya #Ganeshotsav2026 #Vasai #GanpatiDarshan
#गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव२०२६ #गणपतीदर्शन #वसई #बाप्पाचाआशीर्वाद #आपुलकीचास्नेह
गणरायाच्या स्वागतासाठी चाकरमान्यांच्या लक्झरी बसेस कोकणाकडे रवाना!
गणेशोत्सव आणि कोकणवासीयांचे नाते हे काही वेगळेच आहे. गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच प्रत्येक चाकरमान्याला आपल्या गावाकडे जाण्याची ओढ लागते. याच भावनेतून वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची प्रवासासाठी गैरसोय होऊ नये, याकरिता माझ्या माध्यमातून मोफत लक्झरी बससेवा उपलब्ध करून देण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. नितेश नारायणराव राणे जी यांच्या प्रमुख उपस्थितीत समस्त कोकणवासीय चाकरमानी या बससेवेच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात कोकणाकडे रवाना झाले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणरायाच्या स्वागतासाठी आपल्या गावच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनापासून समाधान वाटले!
Luxury Buses Carrying Devotees Depart for Konkan to Welcome Lord Ganesha!
The bond between Ganeshotsav and the people of Konkan is truly special. As the arrival of Lord Ganesha approaches every Chakarmani eagerly looks forward to returning to their native village. Keeping this sentiment in mind, free luxury bus services were made available through my initiative so that the citizens of the Versova Assembly Constituency would not face any inconvenience while travelling to Konkan.
In the presence of the Hon Minister of Fisheries and Ports Government of Maharashtra and Guardian Minister of Sindhudurg District Mr.Nitesh Narayanrao Rane Ji, all the Konkan residing Chakarmani departed for Konkan with great enthusiasm through this bus service. The initiative received an overwhelming response from the citizens. Seeing the happiness on the faces of the Chakarmani setting out towards their native villages to welcome Lord Ganesha brought immense satisfaction to my heart!
@narendramodi @amitshahofficial @nitinnabinbjp @ravindrachavanofficial @advocateashishshelar @AmeetSatam@NiteshNRane@bjp4india@bjp4maharashtra@bjp4mumbai
बाप्पा मोरया रे!
आज आमच्या निवासस्थानी लाडक्या गणरायाचे भक्तिभावाने आगमन झाले. दीड दिवसांसाठी विराजमान झालेल्या बाप्पाची मनोभावे पूजा-अर्चा करून त्यांच्या चरणी नतमस्तक झालो. गणरायाच्या कृपाशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, हीच प्रार्थना!
Bappa Morya Re!
Today Lord Ganesha our beloved Bappa arrived at our residence with devotion and reverence. Bappa will be gracing our home for one and a half days and we offered our heartfelt prayers and performed the puja and aarti before seeking His blessings. May Lord Ganesha divine blessings bring happiness, peace and prosperity into everyone lives. This is my heartfelt prayer!
🌾🏠 शेत-पाणंद रस्ते आणि निवासी अतिक्रमणांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण आढावा बैठक
वसई विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत आज उपविभागीय अधिकारी, वसई यांच्या कार्यालयात दोन महत्त्वपूर्ण आढावा बैठका घेण्यात आल्या.
यावेळी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना’ तसेच १ जानेवारी २०११ पर्यंत शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबतच्या शासन धोरणाची अंमलबजावणी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य रस्ते उपलब्ध नसल्याने शेतीची कामे, शेतीमालाची वाहतूक आणि दैनंदिन कृषी व्यवहारांवर परिणाम होतो. त्यामुळे शेत-पाणंद रस्त्यांची कामे प्रभावीपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने मार्गी लागणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे, शासनाच्या धोरणानुसार पात्र असलेल्या नागरिकांच्या निवासी अतिक्रमणांच्या नियमितीकरणाचा प्रश्न त्यांच्या सुरक्षित आणि हक्काच्या निवासाशी संबंधित आहे. यासाठी प्रशासनाने केवळ नागरिकांच्या अर्जांची प्रतीक्षा न करता स्वतःहून पुढाकार घेऊन जनजागृती करावी, तसेच आवश्यक ठिकाणी विशेष शिबिरे आयोजित करून नागरिकांना अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करावे, अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या.
या दोन्ही विषयांवर संबंधित विभागांकडून सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेत, पुढील प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधण्यात आला.
वसईतील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना केवळ आवाज देणे नाही, तर त्यावर शासन-प्रशासनाच्या माध्यमातून ठोस कार्यवाही होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा करणे हीच भूमिका आहे.
🌾 शेतकऱ्यांच्या सुविधांसाठी पाठपुरावा
🏠 पात्र नागरिकांच्या हक्काच्या निवासासाठी प्रयत्न
🤝 प्रशासनाशी समन्वयातून प्रश्नांच्या निराकरणासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न
या बैठकीस माझ्यासह उपविभागीय अधिकारी,श्री. शेखर घाडगे, गटविकास अधिकारी, श्री. प्रदिप डोलारे, नायब तहसीलदार,श्री. राजाराम देवकाते, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. १ वसईचे उपविभागीय अभियंता श्री. संजय यादव, जिल्हा परिषद पालघरचे प्रभारी उप अभियंता (बांधकाम) श्री. एकनाथ ठाकरे, वसई विरार शहर महानगरपालिकेतील सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते वसई विधानसभा स्तरीय समितीचे सह-अध्यक्ष श्री. प्रविण गावडे आणि श्री. देवदत्त मेहेर उपस्थित होते.
#vasai #administration #SnehaDubePandit
#vasai #administration #SnehaDubePandit
मनोजवं मारुततुल्यवेगं
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयूथमुख्यं
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥ 🙏
जय श्री राम 🚩 | जय बजरंगबली 🚩
#jaishreeram#jaihanuman#snehadubepandit
दहीहंडीच्या मंगलमय पर्वानिमित्त वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी आयोजित दहीहंडी उत्सवांना भेट देऊन गोविंदा बांधवांचा उत्साह वाढवला.
यावेळी राजेश बागडी जी यांच्या वतीने आयोजित दहीकाला उत्सव, सावरकर फाउंडेशन व भाजप प्रभाग क्र. ६३ यांच्या वतीने प्रभाग क्र. ६३ चे नगरसेवक श्री. रूपेश गजानन सावरकर जी यांच्या आयोजनातून झालेला दहीहंडी उत्सव, भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र. ५९ यांच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सव तसेच रामकरन मित्र मंडळाच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहिलो.
या संपूर्ण दौऱ्यात प्रभाग क्र. ६० च्या नगरसेविका सौ. सायली कुलकर्णी जी तसेच भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचताना दाखवलेली मेहनत, जिद्द, शिस्त आणि एकजूट खरोखरच वाखाणण्याजोगी होती. ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भगवान श्रीकृष्णाची कृपादृष्टी सदैव सर्वांवर राहो, हिच प्रार्थना.
जय श्री कृष्ण!
On the auspicious occasion of the Dahi Handi festival, I visited various Dahi Handi celebrations held across the Versova Assembly Constituency and encouraged the enthusiastic Govinda brothers.
On this occasion, I attended the Dahi Kala celebration organized by Rajesh Bagdi Ji, the Dahi Handi celebration organized by Sawarkar Foundation and BJP Ward No. 63 under the leadership of Corporator of Ward No. 63, Shri Rupesh Gajanan Sawarkar Ji, the Dahi Handi celebration organized by the Bharatiya Janata Party Ward No. 59, as well as the Dahi Handi celebration organized by Ramkaran Mitra Mandal.
Throughout this visit, Corporator of Ward No. 60, Smt. Sayali Kulkarni Ji, along with various office bearers and workers of the Bharatiya Janata Party, was also present.
The hard work, determination, discipline and unity displayed by the Govinda teams while forming human pyramids were truly commendable. The entire atmosphere resonated with the chants of “Govinda Re Gopala.” May the blessings of Lord Shri Krishna always remain upon everyone. This is my heartfelt prayer.
Jai Shri Krishna!
📍 ५)पाचूबंदर, वसई पश्चिम | ६)एन. जी. सुरतवाला इमारत समोर, वसई पश्चिम | ७)झेंडा बाजार, वसई पश्चिम
🗓️ दिनांक : ०५ सप्टेंबर २०२६
गोविंदा आला रे आला…!
वसई पश्चिम परिसरातील ५)तेजस्वी भारत, पाचूबंदर आयोजित दहीहंडी उत्सव, तसेच ६) एन. जी. सुरतवाला इमारत समोरील युवा मित्र मंडळ आयोजित दहीहंडी उत्सव सोहळ्यात हंडीचे पूजन करण्याचे भाग्य लाभले.
तसेच ७) झेंडा बाजार, वसई पश्चिम येथील शिव साम्राज्य संस्था वसई आयोजित दहीहंडी उत्सव – २०२६ मध्ये उपस्थित राहून गोविंदा पथकांचा उत्साह वाढविण्याचा आनंद लाभला.
दहीहंडीच्या निमित्ताने परिसरात अनुभवायला मिळणारा उत्साह, जल्लोष, एकजूट आणि श्रीकृष्णभक्तीचा सुंदर संगम मनाला आनंद देणारा आहे.
यावेळी माझ्यासह आयोजक, विविध गोविंदा पथकांचे सदस्य, स्थानिक नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#DahiHandi2026 #GovindaAalaRe #Janmashtami #vasai #snehadubepandit
दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील राधे कृष्णा गोविंदा पथक, बाळ एकता गोविंदा पथक आणि सवेरा गोविंदा पथकातील गोविंदा बांधवांना भेट दिली. तसेच माझ्या माध्यमातून देण्यात आलेल्या टी-शर्टचा वितरण सोहळा उत्साहात पार पडला!
Against the backdrop of Dahi Handi festival I met the Govinda brothers from Radhe Krishna Govinda team, Bal Ekta Govinda team and Savera Govinda team in the Versova Assembly Constituency. The distribution ceremony of the T - shirts provided through my initiative was also held with great enthusiasm!
📍 नायगाव पूर्व
🗓️ ०४ सप्टेंबर २०२६
“गोविंदा आला रे आला…!” “जल्लोष, उत्साह आणि परंपरेचा थरार!”
भारतीय जनता पार्टी वसई-विरार शहर जिल्हा व भाजपा वसई पूर्व दक्षिण मंडळाचे सरचिटणीस श्री. धरेंद्र कुलकर्णी, भाजपा वसई-विरार शहर जिल्हा सचिव श्री. प्रवीण गावडे, भाजपा वसई पूर्व दक्षिण मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा सौ. हर्षला गावडे व श्री. हरिहर पाटील यांच्या वतीने आयोजित सराव दहीहंडी–२०२६ आज नायगाव पूर्व येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली.
या सोहळ्यास उपस्थित राहून उत्साहाने दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालेल्या सर्व गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला व त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच उद्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवानिमित्त सर्व गोविंदा, आयोजक आणि नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी माझ्यासह नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय दादू हजारे, भाजपा वसई-विरार शहर जिल्हा अध्यक्षा तथा नगरसेविका सौ. प्रज्ञा पाटील, भाजपा वसई-विरार शहर जिल्हा सरचिटणीस श्री. बिजेंद्र कुमार, भाजपा वसई-विरार शहर जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. ज्योत्स्ना मेहेर, सौ. सकिना नुरानी, वसई पूर्व दक्षिण मंडळ अध्यक्ष श्री. उदय शेट्टी, श्री. केदारनाथ म्हात्रे, श्री. गोपी मेनन, सौ. निशा फाटक, श्री. एच. आर. सक्सेना, श्री. महेश शुक्ला, सौ. ऋचा देसाई, श्री. निशांत शर्मा, श्री. प्रवेश दुबे, श्री. कल्पेश मोहिते, श्री. जीत सिंग तसेच असंख्य नागरिक, गोविंदा पथकांचे सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गोविंदांच्या उत्साहात सहभागी होणे, त्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन देणे आणि आपल्या संस्कृतीच्या उत्सवाला बळ देणे, हीच खरी आनंदाची गोष्ट!
#DahiHandi2026 #GovindaAalaRe #GovindaPathak #MLA #SNEHADUBEPANDIT #VASAI #Janmashtami #Naygaon #VasaiVirar #BJP #दहीहंडी२०२६ #गोविंदांचा_उत्साह
दहीहंडीचा उत्सव म्हटलं की सर्वत्र दिसणारा गोविंदांचा उत्साह आणि जल्लोष काही वेगळाच असतो. वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील राधे कृष्णा गोविंदा पथक, बाळ एकता गोविंदा पथक आणि सवेरा गोविंदा पथकातील गोविंदा बांधवांना भेट दिली. तसेच माझ्या माध्यमातून देण्यात आलेल्या टी-शर्टचा अनावरण सोहळाही पार पडला. दहीहंडी उत्सव साजरा करताना आपल्या संस्कृती आणि परंपरेचे जतन करतानाच हा उत्सव सुरक्षिततेने साजरा करण्याचे आवाहनही यावेळी केले!
When it comes to the Dahi Handi festival the enthusiasm and excitement of the Govindas seen everywhere is truly unmatched. I visited the Govinda brothers from the Radhe Krishna Govinda Team, Bal Ekta Govinda Team and Savera Govinda Team in the Versova Assembly Constituency. The unveiling ceremony of the T - shirts provided through my initiative was also held. While celebrating the Dahi Handi festival,I also appealed to everyone to celebrate the festival safely while preserving and upholding our rich culture and traditions!