काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी साहिल चीटिंग करत होता, असा आरोप करून सोशल मीडियावर सुरू असलेल्या जातीवादाला प्रोत्साहन दिले आहे. यामुळे काँग्रेसचा खरा जातीवादी चेहरा समोर येतो.
: सुजात आंबेडकर
राज्य कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन आघाडी
#JUSTICE_FOR_SAHIL#VBAForIndia
फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे विचारवंत, कार्यकर्ते, अधिकारी वर्ग हा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आयोजित १ ऑक्टोबर रोजीचा 'आम्ही इराण सोबत' या मोर्च्याबद्दल विचारायला लागलेत. चर्चा करायला लागलेत. चळवळ ही व्यक्ती केंद्रीत मुद्द्यांवर नसून सार्वत्रिक मुद्द्यांवर देखील आहे.
'आम्ही इराण सोबत' आहोत, हा परराष्ट्र धोरणाचा मुद्दा आहे. आम्ही देश म्हणून इराण बरोबर का ? कारण, इराण आमच्या सोबत आहे म्हणून.
• काश्मीरच्या प्रश्नावर इराणने जागतिक पातळीवर भारताची बाजू घेतली.
• इराण हा भारताला उधार तत्वावर क्रूड ऑईल देणारा देश आहे.
आज अमेरिका-इस्त्रायल इराणला संपवण्याची भाषा करताय. अशा परिस्थितीत देश म्हणून आपण इराण सोबत उभे राहिले पाहिजे. दुर्दैवाने आरएसएस-भाजपचे सरकार हे उघडपणे इस्रायल सोबत आहेत. या युद्धात त्यांनी इस्रायलला शस्त्रास्त्रे पुरवली आहेत. ही घटना वंचित बहुजन आघाडीने बाहेर काढली.
युद्धामुळे तेलाच्या किंमती वाढल्या तर सामान्य लोकांचे घरगुती बजेट कोलमडून पडेल. इराणकडून कच्चे तेल स्वस्त आणि वेळेत आले, तर महागाईची झळ सामान्य माणसाला बसणार नाही.
१ ऑक्टोबरचे आंदोलन हे देशातील दोगले सरकारला उघडे पाडण्यासाठी आहे. अशा गोंधळलेल्या परिस्थितीत भारतीय जनता इराण सोबत आहे, हे सांगण्यासाठी सर्वांनी १ ऑक्टोबर रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे जमावे आणि आपले मत नोंदवावे.
#IndiaWithIran #IranWar #VBAForIndia
📌 औरंगाबाद !
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र कोअर कमिटीचे सदस्य आणि नव्याने स्थापन करण्यात आलेल्या एक्शन ग्रुप-२०२६ यांची आज औरंगाबाद येथे आगामी “जय भीम Gen-Z” तसेच इतर अभियानांच्या उपक्रमांसाठी सविस्तर रणनीती आखण्यासाठी बैठक घेण्यात आली.
या बैठकीत जनसंपर्क आणि माध्यमांशी संपर्क अधिक मजबूत करण्यावर, तसेच हे अभियान संपूर्ण राज्यात प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी पक्षाच्या युवा आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्यातील समन्वयाचे नियोजन करण्यावर भर देण्यात आला.
VBA Maharashtra Core Committee members and the newly-constituted Action Group-2026 convened in Aurangabad today to draw an elaborate strategy for the upcoming “Jai Bhim GenZ” and other campaign initiatives.
The meeting focused on strengthening public and media outreach, planing coordination among the party’s Yuva Aaghadi and Samyak Vidyarti Andolan to take the campaign forward effectively across the state.
#GenZ #JaiBhimGenZ #Vanchit_Bahujan_Aaghadi #Rajendrapatode
#NewBeginningsConstruction
जपतलाईतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित करा; राज्यातील सर्व वसतिगृह आश्रमशाळांचे १५ दिवसांत सामाजिक सर्वेक्षण करा- राजेंद्र पातोडे
मुंबई : दि.११ - गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. ही घटना केवळ दुर्दैवी अपघात म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही.आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा, निवास व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि प्रशासनाची कार्यक्षमता यावर या घटनेने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, ह्या घटनेची तयस्थ यंत्रणे कडून चौकशी करून कार्यवाही आणि राज्यातील सर्व वसतिगृह आश्रमशाळा ह्यांचे सोशल ऑडिट करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी ई मेलद्वारे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव ह्यांना केली आहे.
९ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीनंतर जपतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात ७९ विद्यार्थिनी जमिनीवर झोपलेल्या होत्या.त्यापैकी सापाने सहा विद्यार्थिनींना दंश केला.त्यापैकी दीपिका लाकडा, सुष्मिता मांडल आणि अनु कोरेटी या तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.अन्य विद्यार्थिनींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर आहे. ही अत्यंत गंभीर घटना घडली आहे.या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांकडे निवेदन देऊन जपतलाई दुर्घटनेची स्वतंत्र व सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.तसेच एका आश्रमशाळेची चौकशी करून प्रश्न संपणार नाही.जपतलाईच्या घटनेची चौकशी आवश्यक आहेच; मात्र राज्यातील हजारो विद्यार्थी आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये राहत असल्याने संपूर्ण व्यवस्थेची तपासणी होणे गरजेचे आहे. राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहे आणि छात्रालयांचे तातडीने सामाजिक सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी वंचितने केली आहे.
महत्त्वपूर्ण सूचना
प्रिय वंचित बहुजन आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि परिवर्तनाच्या चळवळीतील सहकारी,
सर्वांना जयभीम,
सर्वप्रथम, पक्षांतर्गत संघटनात्मक निवडणुकीत आपण दाखविलेला विश्वास, दिलेला जनादेश आणि लोकशाही मूल्यांवर ठेवलेली निष्ठा याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनःपूर्वक ऋणी आहे.
ही निवडणूक कोणत्याही व्यक्तीच्या विजय किंवा पराभव साठी नव्हती, तर पक्ष संघटन बांधणी आणि वाढीची जबादारी घेण्यासाठी होती.वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद अधिक सक्षम करण्यासाठी होती. आपण दिलेला जनादेश हा फुले शाहू आंबेडकरांच्या समतावादी विचारांचा आणि संविधानिक मूल्यांवर असलेल्या आपल्या विश्वासाचा सन्मान आहे.आज आपण अशा टप्प्यावर उभे आहोत, जिथे प्रत्येक क्षण, प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक रुपया हा चळवळीच्या बळकटीसाठी खर्च होणे आवश्यक आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि इतर निवडणुकांची तयारी, तसेच गावागावात संघटना उभारण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे.याच पार्श्वभूमीवर मी आणि प्रदेश कमिटीच्या सर्व सदस्यांनी एकमताने निर्णय घेतला आहे की, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात, शहरात किंवा तालुक्यात सत्कार स्विकारायचा नाही.
माझी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती आहे की, कृपया हार तुरे, शाल श्रीफळ, फटाके, बॅनर, स्वागत समारंभ किंवा सत्कारावर कोणताही खर्च करू नका.त्या खर्चातून पक्षानिधी द्या, नवीन कार्यकर्ते जोडा, बूथ मजबूत करा, बाळासाहेब आंबेडकर यांचे बहुजनवादी विचार प्रसार करा.एखाद्या गरजू विद्यार्थ्याला गरजवंताला मदत करा.तोच आमच्यासाठी सर्वात मोठा सत्कार असेल.आपल्या चळवळीची परंपरा ही व्यक्तिपूजेची नाही; ती विचारपूजेची, संघर्षाची, त्यागाची आणि समाजपरिवर्तनाची आहे.आपण पदासाठी नव्हे, तर समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा म्हणून लढत आहोत. म्हणूनच आज आपण व्यक्तींचा गौरव बाजूला ठेवून संघटना, विचार आणि जनतेच्या विश्वासाला सर्वोच्च स्थान देऊया.निवडणूक संपली आहे; आपण सर्व वंचित बहुजन आघाडीचे सैनिक आहोत.आपल्या एकजुटीतच पक्षाचे सामर्थ्य आहे आणि आपल्या सामर्थ्यातच सत्ता परिवर्तनाचा मार्ग आहे.
आता सत्कारासाठी नव्हे तर संघर्षासाठी एकत्र येऊया. हार-तुऱ्यांपेक्षा जनतेचा विश्वास जिंकूया.फटाक्यांच्या आवाजापेक्षा आपल्या कामाचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवूया.
आपल्या प्रेमाबद्दल, विश्वासाबद्दल आणि निष्ठेबद्दल मी पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण आमच्या या निर्णयाचा आदर कराल आणि नव्या जोमाने, नव्या उमेदीने संघटन बांधणीच्या कार्यात स्वतःला झोकून द्याल, असा मला पूर्ण विश्वास आहे.
आपला
राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी,
महाराष्ट्र प्रदेश.
डॉक्टरांच्या न्याय्य आंदोलनाबाबत सरकारने तातडीने तोडगा काढावा – राजेंद्र पातोडे
मुंबई : राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या 'बीएमएस-सीसीएमपी' नोंदणी प्रक्रियेविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स तसेच विविध तज्ज्ञ डॉक्टर संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनामुळे सामान्य जनता हवालदिल झाली असून, संपूर्ण आरोग्य यंत्रणा ठप्प होण्याची वाट न पाहता सरकारने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.
राज्य शासनाच्या प्रस्तावानुसार बीएमएस पदवीधारकांना सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएमपी) पूर्ण केल्यानंतर आधुनिक वैद्यक (अॅलोपॅथी) पद्धतीतील काही औषधे लिहिण्याची आणि मर्यादित स्वरूपात उपचार करण्याची नोंदणी देण्याचा प्रस्ताव आहे. या निर्णयाला डॉक्टर संघटनांचा तीव्र विरोध असून, अशा प्रकारे अपुरे प्रशिक्षण असलेल्या व्यक्तींना आधुनिक वैद्यकीय उपचारांचा अधिकार देणे हे रुग्णांच्या जीविताशी खेळण्यासारखे असल्याचे त्यांचे मत आहे.
आधुनिक वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांना साडेपाच वर्षांचे पदवी शिक्षण, त्यानंतर इंटर्नशिप, नोंदणी आणि अनेकदा पदव्युत्तर विशेष प्रशिक्षण घ्यावे लागते. अशा परिस्थितीत अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या आधारे आधुनिक वैद्यकीय उपचारांचा अधिकार देणे हे वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असून, रुग्णांच्या सुरक्षिततेलाही गंभीर धोका निर्माण करू शकते.
ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता असल्यास त्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणजे सरकारी रुग्णालयांमध्ये रिक्त पदे तातडीने भरणे, प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करणे, आवश्यक औषधे व आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे आणि पात्र डॉक्टरांना ग्रामीण सेवेसाठी प्रोत्साहन देणे हा आहे. वैद्यकीय शिक्षणातील मूलभूत निकष शिथिल करून किंवा समांतर व्यवस्था निर्माण करून हा प्रश्न सुटणार नाही.
वंचित बहुजन आघाडीचे मत स्पष्ट आहे की, प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि वैज्ञानिक पुराव्यावर आधारित आरोग्यसेवा मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. शासनाने डॉक्टर संघटनांशी तातडीने चर्चा करून त्यांच्या आक्षेपांचा गांभीर्याने विचार करावा आणि रुग्णहिताला बाधा पोहोचेल असा कोणताही निर्णय घेऊ नये.
आज राज्यभरातील डॉक्टरांनी अत्यंत संयमाने आंदोलन करत आपली भूमिका मांडली आहे. शासनाने वेळेत सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी तातडीने हस्तक्षेप करून हा वाद तत्काळ सोडवावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात येत आहे.
#RajendraPatode
#VanchitBahujanAghadi
#DoctorsProtest #DoctorsStrike #Maharashtra #Healthcare #PatientSafety #MedicalEducation #BMS #CCMP
#ModernMedicine
कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक हे 'कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, क्रांतीवीर छत्रपती' ही शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा लोकांना समजू नये, असे आरएसएसला वाटते.
आरएसएस छावणीतील हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचे षडयंत्र रचले होते, ते षडयंत्र उद्ध्वस्त करण्याचे काम 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाने केले आहे.
“शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाची चर्चा आयोजित करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा, तालुका आणि महानगर समित्यांना करण्यात येत आहे.
कायदा म्हणजे कायदाच असतो!
औरंगाबादमधील एक विवाहित महिला पतीच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. तिला मदत करण्यासाठी पुण्यातील तीन सामाजिक कार्यकर्त्या महिला पुढे आल्या. त्यांनी तिला ‘वन स्टॉप सखी सेंटर’मध्ये दाखल केलं आणि तिला स्वावलंबी होण्यासाठी मदत केली.
या महिलेच्या नातेवाईकांपैकी एक व्यक्ती औरंगाबादमध्ये निवृत्त पोलिस अधिकारी असल्याचे सांगितले जाते. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पुणे पोलिसांची मदत घेतली, असा आरोप आहे. यानंतर कोथरूड पोलिसांनी कोणत्याही वॉरंटशिवाय या तीन महिलांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात नेलं.
पुणे पोलिस त्या आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत, ज्यांनी मध्यरात्री तीन महिला तक्रारदाराच्या घरात घुसून त्यांना जातीय आणि स्त्रीद्वेषी शिवीगाळ केली.
मी पुणे शहराच्या पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधून त्यांना तात्काळ एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले. मी त्यांना स्पष्ट सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की पोलिसांना मिळालेल्या माहितीत जर कुठल्याही संज्ञेय गुन्ह्याचा उल्लेख होत असेल, तर एफआयआर नोंदवणे बंधनकारक आहे. मी ठामपणे सांगितले, कायदा म्हणजे कायदाच असतो!
वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा समित्यांनी एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांविरोधात आंदोलन केले होते. जर पोलिसांनी यानंतरही एफआयआर दाखल केला नाही, तर आम्ही मोठ्या संख्येने एसपी कार्यालयासमोर एकत्र येऊन तीव्र आंदोलन करू.
फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांना विनंती की त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईला आर्थिक मदत त्यांचे बँक खात्यात जमा करावी.
बाळासाहेब.
Name - VIJAYABAI VENKAT SURYAWANSHI
Account No -80011387658
IFSC CODE MAHG0004322
Branch Name - Maharashtra Gramin Bank, Kasar Shirshi*
शालेय शिक्षणमंत्री @dadajibhuse महोदय, एकदा Law Department ला विचारून घ्या की, परीक्षेच्या हॉल तिकिटाची कायद्याची वैधता किती आहे आणि शाळेच्या शाळा सोडण्याच्या दाखल्याची किती आहे ?
जनता आपल्याला उगीचच वेड्यात काढेल असे स्टेटमेंट देऊ नका. हा एक नवीन प्रकार आहे की, कोणत्या विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण करायचे आणि कोणाला नापास करायचे.
70च्या दशकात तोंडी परीक्षेत विद्यार्थ्यांच्या पाठीवर थोपटतांना चाचपून निर्णय घेतला जात होता की, याला पहिल्या प्रयत्नात पास करायचे की 3-4 प्रयत्न करायला लावायचे.
ही तीच पद्धत नव्याने आणताय. बाटली बदलली तरी दारू तीच आहे. दारूच्या वासाने कुठली दारू आहे हे कळते. तेव्हा तुमचे आताचे धोरण म्हणजे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची जात हॉल तिकिटावर आणून तुम्ही काय करू बघताय, हे लोकांना कळते.
लोकं एवढे मूर्ख नाहीत !
पूर्वी शेतमाल खरेदी साठी शेतकऱ्याची जात नोंदणी सक्ती करण्यात आली होती आता दहावी बारावी परीक्षेच्या हॉल तिकीट वर विद्यार्थी विद्यार्थिनीची जात नमूद करण्यात येणार आहे!
@EduMinOfIndia
Remembering Rohit Vemula and his resistance.
The spark of resistance lit by him against caste oppression is being carried forward by the students’ movement in campuses.
गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी वक्तव्या विरोधात भव्य निदर्शन !
प्रमुख उपस्थिती- ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर
आज दुपारी 2 वा. सर्वांनी उपस्थित राहावे.
ठिकाण : सीएसटी रेल्वे स्टेशन मुंबई
#VBAForIndia
लाठ्या मारा किंवा गोळ्या घाला म्हणत मारकडवाडीत बॅलेट वर मतदान घेण्याची घोषणा, गावाला पोलीस आणि राखीव दलाचा वेढा.प्रशासनाला भीती का वाटते आहे ?
निवडणुक आयोग व प्रशासनाला संधी आहे निष्पक्ष निवडणुक होत असल्याचे सिद्ध करण्याची.होवून जाऊ द्या
राजेंद्र पातोडे
#MarkadwadiSolapur