‘सलाम पुणे’च्या ‘पुस्तकदोस्ती’ उपक्रमात पुण्यातल्या पाच वस्त्यांमधल्या शाळकरी मुलांपर्यंत चांगलीचुंगली पुस्तकं पोहोचावीत, असा प्रयत्न आहे. नुकताच पुस्तकदोस्तीचा पुण्यातील तिसरा कार्यक्रम पार पडला. ३५ हून अधिक मुलांना आणि काही पालकांना पुस्तकांचं वाटप करण्यात आलं.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते एकनाथ आवाड यांचा स्मृतिदिन. एकनाथ आवाड यांचं व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक क्षेत्रातलं त्यांचं योगदान उलगडून दाखवणारा लेख.
एकनाथ आवाड एक वाघ माणूस
- सुहास कुलकर्णी
पूर्ण लेख वाचण्यासाठी लिंक : https://t.co/wJSuIEgQ0i
माणसाच्या मनाचा वेध घेणारा, मानसिक आरोग्याबद्दल समाजात संवेदनशील संवाद घडवून आणणारा आवाज आज हरपला. त्यांच्या लेखनातून, विचारांतून आणि कामातून अनेकांना स्वतःकडे नव्याने पाहण्याची दृष्टी मिळाली.
समकालीन प्रकाशनतर्फे डॉ. आनंद नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.💐
पुस्तकप्रेमींनी स्टॉल क्रमांक ३५ ला आवर्जून भेट द्यावी.
🎟️स्टॉल क्रमांक ३५
🗓️ दिनांक: ३० एप्रिल ते ४ मे २०२६
📍 स्थळ: गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट
⏰ वेळ: सकाळी १० ते रात्री ८
📞अधिक माहितीसाठी संपर्क: 93709 79287
#samakaleenprakashan#ChildrensBooks#PuneEvents
📚पुणे बाल पुस्तक जत्रा २०२६ 📚
'पुणे बाल पुस्तक जत्रा २०२६' निमित्त पुण्यात सध्या लहानग्यांसाठी पुस्तकांची एक खास मेजवानी रंगली आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांची कल्पनाशक्ती समृद्ध व्हावी आणि मोबाईलच्या दुनियेबाहेर त्यांना पुस्तकांच्या सुंदर विश्वाची ओळख
व्हावी या उद्देशाने या पुस्तक जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पुस्तकांचा मोठा खजिना या जत्रेत उपलब्ध आहे. त्यामुळे मुलांसह पालकांसाठीही ही एक खास पर्वणी ठरत आहे. या जत्रेत समकालीन प्रकाशन देखील सहभागी झाले असून वाचकांसाठी स्टॉलवर विविध दर्जेदार आणि आकर्षक पुस्तके उपलब्ध आहेत.
या पुस्तकातून मांडले आहे. समकालीन प्रकाशन तर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची किंमत २०० रुपये आहे. ग्रामीण जीवन, आरोग्यसेवा आणि कोकणातील सामाजिक वास्तव जाणून घेऊ इच्छिणाऱ्या वाचकांसाठी हे पुस्तक विशेष लक्षवेधी ठरत आहे.
पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क : 93709 79287
'मी कोकणचो डॉक्टर' या पुस्तकाची मे महिन्याच्या ललित मासिकाच्या लक्षवेधी पुस्तकांच्या यादीत निवड करण्यात आली आहे. लेखक डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी कोकणातील वैद्यकीय सेवा, ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्था आणि डॉक्टर म्हणून आलेले अनुभव यांचे वास्तववादी आणि संवेदनशील चित्रण
तुम्हाला महाराष्ट्राबद्दल खरचं माहिती आहे का?
सर्व जिल्ह्यांचं रूपडं डोळ्यांसमोर उभं करणारं, प्रत्येक मराठी घरात असायलाच हवं असं पुस्तक म्हणजे महाराष्ट्र दर्शन!
• मूळ किंमत - 500 रु /-
• सवलत किंमत - 350 रु /- (फ्री घरपोच)
• पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क : 93709 79287
कल्पनाशक्ती इथे भन्नाट झेप घेते, पण विज्ञानाचा तर्कशुद्ध हात घट्ट धरूनच. या कथांमध्ये साहस आहे. थरार आहे. अधूनमधून थोडा मजेदार गोंधळ आहे. मग आहात तयार या भन्नाट सफरीवर जायला?
* पुस्तकाची किंमत : 150/ - (फ्री घरपोच)
* संपर्क : 9370979287
📖 समकालीन प्रकाशनाचं नवं पुस्तक 📖
एलियन्स येतील तेव्हा
- मेघश्री दळवी
कधी आकाशाकडे बघताना मनात येतं आपल्यासारखे कोणी तिथे असतील का? कधी मोबाईलवरून जग भटकताना वाटतं हा मोबाईल नव्हता तेव्हा काय करायचे सगळे? कधी रोबॉटच्या अजब बातम्या ऐकून डोक्यात चमकून जातं- हा माझ्यासारखा
विचार करू शकतो का? असे प्रश्न तुम्हाला पडत असतील, तर हा कथासंग्रह नक्कीच तुमच्यासाठी आहे. या पुस्तकातल्या कथा तुम्हाला एलियनच्या गंमतीजंमतीत सामील करून घेतील, डायनोसॉरच्या गूढ काळात नेतील. अगदी थेट चंद्रावर राहायला घेऊन जातील. या कथा भविष्य दाखवतात, पण ते खूप दूरचं नाही.