‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’मधून सुमारे १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार; महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षमतेवर उद्योगविश्वाचा विश्वास
महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि भारताच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे १० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आले असून, हा महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षमतेवर उद्योगविश्वाने दाखविलेला मोठा विश्वास आहे.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@JaykumarRawal@MPLodha@midc_india
#InvestMaharashtra #MaharashtraIndustry #IndustrialDevelopment #MaharashtraGrowth #MakeInMaharashtra #IndustrialGrowth
“प्रख्यात कवी, लेखक, गीतरामायणकार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मराठी साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन”
‘गीत रामायण’च्या माध्यमातून त्यांनी मराठी साहित्य आणि संस्कृतीला अजरामर ठेवा दिला. त्यांच्या शब्दांनी मराठी मनाला समृद्ध केले आणि मराठी भाषेच्या वैभवात मोलाची भर घातली.
मराठी साहित्यविश्वातील त्यांच्या अमूल्य योगदानाला मनःपूर्वक अभिवादन
#GDMadgulkar #GitRamayan #MarathiLiterature #MarathiSahitya #marathipoetry
लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीच्या ‘संवाद २०२६’ या कार्यक्रमात सहभाग घेतला.
यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा माझ्या हस्ते सत्कार करण्यात आला. लोकशाही मराठीचे संपादक श्री. विशाल पाटील यांच्यासोबत यावेळी विविध विषयांवर संवाद साधला.
@Shivsenaofc@Dev_Fadnavis@mieknathshinde@LokshahiMarathi
#udaysamantsaheb #ratnagiripalakmantri #संवाद२०२६ #LokshahiMarathi #लोकशाहीमराठी #संवाद #महाराष्ट्र #Maharashtra #PublicDialogue #MaharashtraUpdates #जनसंवाद #कर्तृत्ववान #सन्मान
टाकळीभान ते आशियाई क्रीडा स्पर्धा: अस्लमचा ऐतिहासिक पराक्रम!
मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर 'शून्य ते शिखर' असा प्रवास कसा असावा, याचं जिवंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचा स्टार कबड्डीपटू अस्लम इनामदार! अहिल्यानगर जिल्ह्यातील टाकळीभान या छोट्याशा गावातील अस्लमचा हा प्रवास अजिबात सहज सोपा नव्हता. अत्यंत बिकट परिस्थितीमुळे त्याला अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. रेल्वेच्या सीटखाली झोपून सामने खेळायला जाणे, कधी पोट भरण्यासाठी फक्त वडापाव खाऊन दिवस काढणे, तर कधी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी स्वच्छतागृहांची साफसफाई करणे... अशा अत्यंत कठीण प्रसंगांना सामोरे जात अस्लम इनामदारनं हे यश गाठलंय!
प्रो कबड्डी लीगमध्ये (PKL) पुणेरी पलटन संघाचा कर्णधार असताना, आपल्या जबरदस्त चढाई आणि चपळाईने त्याने सर्वांची मनं जिंकली. आता भारताचे प्रतिनिधित्व करताना आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून त्याने भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला!
अस्लमच्या या जिद्दीला कडक सलाम! महाराष्ट्राच्या लाल मातीचा सुपूत्र असलेल्या अस्लमचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे.
#udaysamantsaheb #AslamInamdar #Kabaddi #AsianGames #Maharashtra #PrideOfMaharashtra
कोकणाच्या हापूससह सर्व आंबा जातींची ई-पीक पाहणीत आता स्वतंत्र नोंद!
मंत्रिमंडळ बैठकीत मी मांडलेल्या मुद्द्याची दखल घेऊन शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
हापूस, केशर, रत्ना, सिंधु, पायरी या आंबा जातींची ई-पीक पाहणीत स्वतंत्र नोंद होणार आहे.
या निर्णयामुळे केवळ आंबा उत्पादकांनाच नाही, तर काजू, नारळ आणि सुपारी बागायतदारांनाही मोठा लाभ मिळेल.
शासनाचे मनःपूर्वक आभार!
कोकणाच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी, कोकणाच्या अभिमानासाठी… हा एक महत्त्वपूर्ण टप्पा!
@Shivsenaofc@Dev_Fadnavis@mieknathshinde
#udaysamantsaheb #Ratnagiri #Konkan #HapusMango #MangoFarmers #EKpikPahani #MaharashtraFarmers
दुष्काळी पार्श्वभूमीवर लंडनचा नियोजित दौरा रद्द
मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होणारा लंडन इथला नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे. GIBC UK यांच्या वतीने लंडन इथे ७ आणि ८ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘The City Quantum & AI Summit, London’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या परिषदेसाठी माझ्यासह उद्योग विभागाच्या शिष्टमंडळालाही निमंत्रण देण्यात आले होते.
…
Scheduled London Visit Cancelled Due to Drought Situation
The scheduled visit to London, to be led by Chief Minister Shri Devendraji Fadnavis, has been cancelled. GIBC UK has organized 'The City Quantum & AI Summit, London' in London on October 7 and 8, 2026. An invitation had been extended to a delegation from the Industries Department—including myself—to attend this summit under the leadership of Chief Minister Shri Devendraji Fadnavis..
@Shivsenaofc@mieknathshinde@Dev_Fadnavis
#udaysamantsaheb #MaharashtraDrought #Maharashtra #IndustriesDepartment #QuantumAI #GIBCUK