आज होणाऱ्या मराठी माणसाच्या विजयी जल्लोषाला मनःपूर्वक शुभेच्छा!
ही मराठी एकजूट अधिकाधिक घट्ट होवो, ही अपेक्षा!
महाराष्ट्रात राहणाऱ्या कुठल्याही राज्यातील व्यक्तीच्या आचरणात #महाराष्ट्रधर्म असेल आणि महाराष्ट्र व मराठीवर त्याचं प्रेम असेल तर तो आमच्यासाठी मराठीच आहे. आमचा कोणत्याही इतर भाषेला विरोध नाही पण मराठी भाषेचा द्वेष करून कुणी इतर भाषा आमच्यावर लादत असेल तर ते चालणार नाही..
#मराठी
#म_मराठी
#मराठी_अस्मिता
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, आमदार श्री नानाभाऊ पटोले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ह्याच सदिच्छा!
@NANA_PATOLE
प्रियांका, असेच वाढदिवस आयुष्यात नेहमी आनंदी, सुखी, आरोग्यदायी येवोत, त्याच बरोबर तुमच्या सगळ्या अशा, अपेक्षा पूर्ण होवो आणि त्या पूर्ण करण्यासाठी माझी ओंजळ सतत आनंदाने भरलेली राहो. ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
काँग्रेस, महाविकास आघाडी आणि India Alliance चे अधिकृत उमेदवार शेखरभाऊ शेंडे यांच्या उपस्थितीत वरूड येथे बैठक संपन्न झाली. या निमित्त सर्वांशी संवाद साधला.
बहीणभावाच्या प्रेमाचे, विश्वासाचे नातं अधिक दृढ करणारा सण म्हणजे भाऊबीज. या सणानिमित्त आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदो, बहिण भावाचे हे सौख्याचे, स्नेहपूर्ण नाते असेच दृढ होत राहो, ही सदिच्छा. भाऊबीज सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#भाऊबीज#दिवाळी#शुभदिपावली🪔
दिवाळी आणि लक्ष्मीपूजन च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो हीच सदिच्छा!
#दिवाळी#Diwali#लक्ष्मीपूजन
धनत्रयोदशीच्या आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा! या शुभ मुहुर्तावर आपणास धन, धान्य, यश आणि कीर्ती प्राप्त होवो, ही आई लक्ष्मी चरणी प्रार्थना!!
#धनत्रयोदशी#धनतेरस