मी पुन्हा पुन्हा हेच सांगतोय...
कोलकत्यातील भगिनीवर झालेला असो किंवा बदलापूर मधील चिमुरडीवर झालेला लैंगिक अत्याचार असो...
या सगळ्यांना तुम्ही आम्ही सर्वजण जबाबदार आहोत.
मागे सदाशिव पेठेत झालेल्या कोयता हल्ल्यानंतर कित्येकांनी मलाच उपवासाचे डोस पाजले की "यामध्ये त्या मुलीचीच चूक असणारे, नाहीतर एवढं टोकाचं पाऊल कोण कशाला उचलेल..?? " विशेष म्हणजे असं विचारणाऱ्यांमध्ये महिलांचं प्रमाण जास्त होतं... असून असून काय एवढी मोठी चूक असेल त्या बिचारीची कि तिच्यावर ही वेळ येतेय??? तुमची वासना पूर्ण करायला तिची " ना " येतेय एवढीच ना???
दुसऱ्या बाजूला हजारो भगिनींचे त्यांच्यावर या ना त्या स्वरूपात होणाऱ्या अन्यायाचे msg आहेत... ना त्या कोणाला सांगू शकतायत ना कुठं व्यक्त होऊ शकतायत...!!!
मग अरे हलकटांनो आता कसल्या मेणबत्त्या पेटवता?? कोणाला श्रद्धांजली वाहता?? कोणाचा निषेध करता???
आपला मित्र क्लासमध्ये, रस्त्यावर एखाद्या मुलीवर टॉन्ट मारतो (आजकाल हे शिक्षिकांच्या बाबतीत पण होतंय), अभिमानाने बॉडीकाउंट सांगतो... तेव्हा आपल्याला तो cool वाटतो आणि असं नको करू म्हणणारा बायल्या ठरतो...
तो टॉन्ट त्यावेळी तिच्यावर झालेला बलात्कार नसतो का??? सांगितलेल्या बॉडीकाउंटचं काहीही reaction न देता गप्प ऐकून केलेलं समर्थन आणि आपण त्या टॉन्टवर काढलेले दात हे त्या बलात्काराचं समर्थन नसतं का???
घरात बहिणीने आपल्यावर अधिकार गाजवायचा प्रयत्न केला तर मुलीच्या जातीने कसं लायकीत राहायचं असतं हे धडे शिकवणारे आपण... गर्लफ्रेंड ने मित्रांसमोर आपल्यावर आरडाओरडा केला तर तिला तिची लायकी दाखवणारे किंवा पोरी त्यांना मिळालेल्या कायदेशीर हक्काचा गैरवापर कसा करतात यावर सभाच्या सभा हाणणारे हरामखोर पोरं आपण... आज कुठल्या अन्यायाचा निषेध करतोय???
यावर परत मुलींनीच निर्भीड झालं पाहिजे.. स्वसंरक्षण केलं पाहिजे... याचं ज्ञान पाजळणारी ही जमात अजून वेगळीच...!
त्या चार वर्षाच्या पोरींनी कुठून कसलं स्वसंरक्षण करायचं होतं!!??
बलात्कारी आहोत आपणसुद्धा आता कुठल्या तोंडाने, कसल्या निषेधाचं, कुठल्या मेणबत्त्याचं तुणतुणं वाजवतोय???
#shame_on_myself
#BadlapurCrime
विनेश फोगाट ची अपात्रतेची बातमी ऐकून जर तुम्हाला १% जरी आनंद झाला असेल तर समजून जा की भक्त म्हणून तुम्ही १००% अंध झाला आहात आणि या देशाचे तुम्ही होऊ घातलेले शत्रू आहात...
(एक छोटी पण अत्यंत महत्वपूर्ण लिटमस टेस्ट. स्वतःशीच करुन बघा आणि त्याचा निष्कर्ष स्वतःच्या मनाशीच ठेवा..)
#IndiaAtOlympics
#vineshPhogat
महाराष्ट्र शासनाच्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळवून नावलौकिक मिळवणाऱ्या कांबळवाडी गावचा सुपुत्र #स्वप्निल_कुसाळे आज ५० मी रायफल शुटींग स्पर्धेत #ParisOlympics मध्ये अंतिम फेरीत सहभागी होत आहे. देशाला आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे.
*राधानगरी मोठा प्रकल्प* #Kolhapur
दि. 31/07/ 2024
➡️धरणाची एकूण 7 द्वारे ( क्र.1,2,3,4,5,6,7) उघडली आहेत.
विसर्ग - सर्व 7 दरवाजा मधून 10000 cusec
➡️ विद्युतगृह विसर्ग- 1500 क्युसेक्स
एकूण - 11500 क्युसेक्स.
#कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, दुधगंगा, वारणा व तुळशी या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व नद्या धोका पातळीला वाहत आहेत, त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात पाणी येत आहे. याकरीता नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. @Amol_Yedge
***
सत्य की रक्षा हर धर्म का आधार है!
लेकिन रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने शहीद अग्निवीर के परिवार को सहायता मिलने के बारे में संसद में झूठ बोला।
उनके झूठ पर शहीद अग्निवीर अजय सिंह के पिता जी ने खुद सच्चाई बताई है।
रक्षा मंत्री को संसद, देश, सेना और शहीद अग्निवीर अजय सिंह जी के परिवार से माफी मांगनी चाहिए।
चालू वर्षापासून उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या फी वर १८% GST लावून सरकारने ग्रामीण आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षण महाग केलंय.... शिक्षणावरील GST रद्द करून गरीब मुलांच्या शिक्षणाचा अडथळा दूर व्हावा ही अपेक्षा. #GST@NCPspeaks@INCIndia@ShivSenaUBT_@BJP4Maharashtra