राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हे पुरस्कार देशाच्या राजधानीच्या दिल्ली शहरातून हलवून गुजरातमध्ये केवाडिया येथे होणार आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीचं, मुंबई शहराचं महत्व संपवण्याचा खटाटोप एकीकडे सुरू असताना दुसरीकडे देशाच्या राजधानीचं जे महत्व आहे ते हळूहळू संपवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. मुळात हा पुरस्कार सोहळा हलवण्याचं कारण काय ? स्वतःला काही निर्माण करता आलं नाही की बदल नावं, बदल स्थळं आणि यातून भ्रामक इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे असं दिसतंय. बरं कधी ना कधी आता उरलो गुजरातपुरते अशी आपली गत होणार याची खात्रीच वाटत असल्यामुळे किमान तिकडे तरी माहात्म्य निर्माण करून घेऊ हा अट्टाहास सध्या केंद्रातील २ सत्ताधीशांचा दिसतोय.
बरं समजा पुरस्कार सोहळ्याचं स्थळ हलवायचं होतं तर ते मुंबईत का नाही आणलं? ज्या दादासाहेब फाळकेंनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला त्या राज्यात का नाही पुरस्कार वितरण ? किंवा देशात सगळ्यात जास्त सिनेमे महाराष्ट्र आणि दक्षिणेतील तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा येथे घडवले जातात यापैकी कुठल्या राज्यात हा सोहळा का नाही ? दक्षिणेत तर सिनेमांनी तिथल्या राजकारणाला आकार दिला आहे. गुजरातच का ?
या आधी देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले, ज्यांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेली राज्य त्यांनी ओढूनताणून मोठी करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. इथे कॉमनवेल्थ स्पर्धा गुजरातमध्ये, २०२३ च्या क्रिकेट वल्डकपचा अंतिम सामना गुजरातमध्ये, बाहेरून राष्ट्राध्यक्ष आले त्यांना गुजरातमध्ये घेऊन जायचं, गिफ्ट सिटी मुंबईतून गुजरातमध्ये न्यायची. या सगळ्यातून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना काय दाखवायचं आहे की या देशाच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा पाळणा हा गुजरातमध्ये हलला ? आज जो देश उभा आहे तो कित्येक पिढ्यांच्या त्यागातून आणि देशातील प्रत्येक प्रांताच्या योगदानातून उभा आहे. यांना गुजरातपलीकडचा देश फक्त आठवतो त्या त्या राज्यात निवडणुका आल्या की. मग तिकडे जाऊन तिथले कपडे घालून भाषणं करून, माझं कसं या राज्याशी जुनं नातं आहे सांगून मतं मिळवायची एवढंच जमतं का ?
सध्याचे सत्ताधीश ‘कलासक्त’ नाहीत हे माहित आहे. कशाही निवडणुका जिंकायच्या ही एकमेव कला आणि त्यासाठी सगळ्यांवर सक्ती इतकाच यांचा ’कलासक्त’पणाशी संबंध. आणि चित्रपटांशी संबंध म्हणाल तर वाट्टेल ते प्रचारकी सिनेमे बनवून घ्यायचे आणि त्यांना पुरस्कार द्यायला लावायचे इतकाच संबंध. बरं या सगळ्याला दक्षिणेतील इतर सिनेमाप्रेमी राज्य कडाडून विरोध करतील, पण महाराष्ट्रात काहीही घडणार नाही. पण कलाकारांनी या विरोधात आवाज उठवायला हवा. मुद्दा केवाडिया किंवा इतर शहर हा नाही, देशाच्या राजधानीत या पुरस्कराची जी उज्वल परंपरा आहे ती का मोडली जात आहे यावर कलाकारांनी बोललं पाहिजे. नाहीतर उद्या गुजरातमधली स्थळं नसतील तर राष्ट्रीय पुरस्कार नाही असा फतवा पण हे लोकं काढतील. ऑस्कर सोहळा लॉसएंजलिसला होतो . ट्रम्प किंवा बुश किंवा ओबामा यांनी आपल्या राज्यात हा सोहळा नेला नाही.
माझी गुजराती बांधवाना विनंती आहे की तुम्ही यांच्या नादी लागून उगाच वाहवत जाऊ नका. आपल्या भाषिक नेत्यांची सत्ता आहे याच्या ज्या गुदगुल्या होत आहेत, त्या सत्ता गेली की अस्वलाच्या गुदगुल्या होतील. भारतातील इतर प्रांतांचे नागरिक आणि नेते आपल्या राज्यांवर, तिथल्या व्यावसायिकांवर काय अन्याय झाला याचा हिशेब ठेवतील.
या विषयाला आम्ही वाचा फोडूच पण देशातील समस्त कलाकारांनी पण भूमिका घ्यायला हवी. सरकारच्या स्तुतीची गीतं गायला सांगितली की ती लगेच गायला सुरुवात केल्यामुळे आजची ही वेळ आली आहे. त्यामुळे सर्वांनी याविरोधात भूमिका घ्यायलाच हवी. आणि महाराष्ट्र आणि दक्षिणेतील राज्यांनी जर कणखर भूमिका नाही घेतली तर या दख्खन प्रांताची जी ओळख आणि अस्मिता आहे त्यावरच हे वरवंटा फिरवतील आणि तेंव्हा वेळ निघून गेली असेल.
राज ठाकरे ।
#राष्ट्रीय_चित्रपट_पुरस्कार
#NationalFilmAwards
आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा २० वा वर्धापनदिन. त्यानिमित्त आयोजित मेळाव्यात माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतील सहकाऱ्यांना संबोधित केलं.
१) माझ्या राजकारणाची सुरुवात विद्यार्थी सेनेतून झाली. तिथे काम करत इथपर्यंत आलो. अमित आणि त्याचे सहकारी उत्तम काम करतील अशी अपेक्षा आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणीला भरघोस प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
२) NEET परीक्षेतील गोंधळाच्या नंतर देशभर विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं त्यानंतरचा विद्यार्थ्यांचा हा पहिला मेळावा. मी जेंव्हा कामाला सुरुवात केली तेंव्हा काळ वेगळा होता, तेंव्हाचे विद्यार्थ्यांच्या समोरचे प्रश्न वेगळे होते, आजचे प्रश्न वेगळे आहेत. सगळं स्वरूपच बदललं आहे. मी टेलिग्राम ते इंस्टाग्राम काळ पाहिला आहे.
३) आज 'जेन झी' आंदोलनानंतर 'जेन झी' बद्दल खूप बोललं जात आहे. पण जेन झी म्हणजे फक्त शहरातील जेन झी असा समज करून घेऊ नका. जसे त्यांचे प्रश्न आहेत ते समजून घेतले पाहिजेत तसे ग्रामीण महाराष्ट्रातील पण याच वयोगटातील जे तरुण-तरुणी आहेत. त्यांचे प्रश्न काय आहेत हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सहकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे.
४) सगळ्याच कल्पना आता बदलल्या आहेत. आमच्या लहानपणी सांगायचे की रोज डोक्याला तेल लावा मग बुद्धी तल्लख होते. पण सध्या राज्याचे जे उच्चशिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री आहेत ते त्यांच्या डोक्यावरच्या प्रत्येक केसाला तेल लावतात तरीही त्यांच्या बुद्धीत फारसा फरक पडला नाही. ते म्हणाले दिल्लीत आंदोलनाच्या दरम्यान जी दगडफेक झाली त्या दगडांवरचे फूटप्रिंट घेऊन ते आधार कार्डशी लिंक करून दगडफेक करणाऱ्याना शोधणार. काय बोलताय ? फूटप्रिंट आणि फिंगरप्रिंटमधला फरक नाही कळत ? अशा माणसांबद्दलचा 'जेन झी' च्या मनात राग असणारच ना. कोल्हापूरकरांनी पुण्याला यांना पाठवलं की विद्येच्या माहेरघरात जाऊन काही फरक पडेल पण काहीही फरक पडला नाही यांच्यात.
५) आज सकाळीच पंतप्रधानांचं निवेदन पाहिलं. त्यात त्यांनी म्हणलं आहे ते मान्य आहे. त्यांच्याबद्दल जी भाषा वापरली गेली ती अयोग्यच होती. अशी भाषा कोणी कोणाच्या बाबत वापरूच नये. हे चूकच आहे. पण हे तुमच्या लोकांना पण सांगा. २०१२ पासून ज्या ट्रोलच्या सेना तुमच्या पक्षाने पोसल्यात त्या महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू ते इंदिरा गांधी ते आमच्यासकट सगळ्यांना घाणेरड्या पद्धतीने ट्रोल करतात. आज महाराष्ट्रात कलाकारांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली तर ट्रोल केलं जातं. या सगळ्याबद्दल तुमच्या लोकांना पण कधीतरी सांगा. जे पेराल तेच उगवतं.
पंतप्रधान म्हणाले की माझ्या आईबद्दल चुकीचं बोललं गेलं. ते चूकच आहे. असं होता कामा नये. पण दुसऱ्यांना सुद्धा आई असते हे तुमच्या पक्षातील लोकांना सांगा. तुमच्या पक्षाने जे ट्रोल पोसलेत त्यांना सांगा. तुम्ही म्हणालात की 'मुलांना माफ केलं आहे'. पण तुमच्या लोकांनी जे केलं त्याची माफी कोण मागणार ? ज्यांनी विद्यार्थ्यांवर लाठ्या मारल्या, ज्यांनी विद्यार्थ्यांची डोकी फोडली आणि हे सगळं करा असं ज्यांनी सांगितलं ते कधी माफी मागणार ?
६) जे आंदोलन झालं ते फक्त NEET परीक्षांतील गोंधळामुळे झालं आहे असं नाहीये. त्याच्या पलीकडे जाऊन मुलांच्या, तरुण-तरुणींच्या मनात काय खदखदतंय याचा विचार करा. आज रस्ते धड नाहीत, सगळीकडे पाणी तुंबतं, मैदानं नाहीत, बागा नाहीत, धड शिक्षण नाही, नोकऱ्या नाहीत, सर्वत्र खाजगीकरण सुरु आहे. सगळ एकाच उद्योगपतीच्या घशात टाकणं सुरु आहे. आज आमदार, खासदार ५०, १०० कोटी देऊन फोडले जात आहेत. डिजिटल इंडियाची घोषणा करणारं सरकार आमदार खासदार फोडताना कार्ड कुठे स्वाईप करता ? या सगळ्या परिस्थितीचा राग आज विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या, तरुण-तरुणींच्या मनात आहे, आणि त्याचा हा उद्रेक होता. आणि अजून सुद्धा उद्रेक बाहेर येणार आहे. कोणाला सत्तेवरून खेचणं आणि कोणालातरी सत्तेत आणणं हा विषय नाहीये. देशातील तरुणांच्या भविष्याचा विषय आहे.
७) ग्रामीण भागातील तरुण-तरुणींच्या मनात काय सुरु असेल ? ते काय विचार करत असतील ? आज त्यांच्या आसपास शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. जे आत्महत्या करत आहेत ते तरुण-तरुणींच्या नात्यातील, ओळखीतील लोकं असतील. त्यांच्या अंत्यविधीला जाताना या मुलांच्या मनात काय विचार येत असेल ? आपल्या घरच्यांवर ही वेळ येऊ नये म्हणून ही मुलं गाव सोडून शहरांत येतात. नोकरीसाठी वणवण करतात. आणि इथे येऊन सुद्धा काय तर शहरं बकाल झालेली आहेत हे पाहतात.
८) या सरकारने 'स्मार्ट सिटी'चा गाजावाजा केला. कुठे आहेत त्या स्मार्ट सिटी ? इथलं एकही शहर धड नाही. आज मुलं परदेशात जात आहेत. का तर इथे त्यांना राहावंसं वाटत नाही. शहरं बकाल आहेत, मुलाबाळांना कुठे बाहेर नेण्याची सोय नाही. परदेशात उत्तम रस्ते, मैदानं, बागा, स्वच्छता, खेळांची संकुल सगळं काही आहे. या सगळ्यामुळे या मुलांना परदेशात जाऊन स्थायिक व्हावंसं वाटतं. आणि आपल्याला याचं काहीच वाटत नाही ?
९) सरकारने लोकसभेत मान्य केलं आहे की या देशातील उद्योजक हा देश सोडून जात आहेत. मोदींच्या आयुष्यावरच्या सिनेमात मोदींची भूमिका करणारा विवेक ओबेरॉय हा दुबईत राहतो. मोदींच्या काळात कसं सगळं छान झालं, कसा देश बदलला असल्या गप्पा मारणारा आर माधवन कुटुंबासकट दुबईत जाऊन राहतो. जर मोदींनी सगळं कसं छान केलं आहे असं वाटतंय ना मग तुम्ही का परदेशात स्थायिक होत आहात ? हे लोक इथे येणार सरकार स्पॉन्सर्ड फिल्ममधे काम करणार आणि पुन्हा दुबईला जाणार.
उद्योगपती परदेशात जात आहेत
१०) पंतप्रधान म्हणतात विद्यार्थी चुकीच्या रस्त्यावर भरकटलेत. ते भरकटले नाहीयेत तर त्यांना तिकडे ढकललं जात आहे. ओशोंच एक सुंदर वाक्य मध्ये ऐकलं, ते म्हणाले, "कौन कहता है देश का युवक गलत रास्ते पर भटक रहा है। अगर रास्ता बननेवालेने गलत रास्ता बनाया है तो युवकों का क्या उसमें दोष ?" या मुलांच्या अपेक्षा मारल्या जात आहेत. त्यांना आसपास आपल्यासाठी काहीच चाललं नाहीये हे दिसल्यावर त्यांनी काय करायचं ?
११) आज देशातील तरुण-तरुणी माझं सगळं चांगलं होऊ दे, मला नोकरी मिळू दे, माझं लग्न होऊ दे म्हणून देवळात जाऊन देवाकडे प्रार्थना करतात. त्या देवाच्या देवळातच चोरी होत आहे. राम मंदिर या देशातील करोडो लोकांच्या भावनेचा विषय. पण त्याच देवळातून पैशाचा अपहार होणार असेल तर या मुलांनी कुणाकडे बघायचं ? मोदी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला स्वतः एकटे आत होते आणि स्वतः एकट्याने पूजा केली. मग मोदी राम मंदिरातील अपहाराबद्दल का बोलत नाहीत ? का अयोध्येत खासदार निवडून नाही आला म्हणून यांचा संबंध संपला ?
१२) या देशातील तरुण-तरुणी श्रद्धाळू आहेत जे योग्य आहे पण त्यांना धर्मांध बनवू नका. त्यांना शिक्षणाच्या वाटेवर न्या. त्यांना चुकीच्या मार्गावर नेऊ नका. फक्त जय श्रीराम म्हणून काय होणार ? देशात गोरक्षक गाड्या पकडतात आणि नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियात अभिमानाने सांगतात की जगात बीफ एक्स्पोर्टमध्ये भारताचा नंबर पहिला आहे. गायी मारल्याशिवाय बीफ एक्स्पोर्ट होईल का ? मग गोरकाक्षांनी काय करायचं ?
१३) देशातील एक लाख शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे नाहीत... १५,००० शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही... १० लाख शिक्षकांची पदे रिक्त आहेत.२००४ मध्ये शिक्षणावर ३.२% खर्च होत होता, आज २०२६ मध्ये २.८%. खर्च होत आहे.
१४) सिद्धिविनायक मंदिरात अपहार झाल्याचं या मंदिराच्या विश्वस्तांनी एकनाथ शिंदेंना पत्र लिहून कळवलं आहे. दानपेटीतुन १८ कोटी रुपये लुटले गेल्याची शंका व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांना सरकारवर विश्वास ठेवता येत नाही, म्हणून ते देवळात जाणार तर त्या देवळातच चोरी सुरु आहे, या मुलांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर ?
१५) माझ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतील सहकाऱ्यांना सांगणं आहे की सदस्य नोंदणी कराच पण या विद्यार्थ्यांच्या मनात नक्की काय सुरु आहे हे पण समजून घ्या.
राज ठाकरे
Today marks the 19th day of Sonam Wangchuk’s hunger strike. The reports regarding his health and the visuals on television are certainly alarming. It is deeply distressing to say this, but it appears the government has decided to sacrifice Sonam Wangchuk, and by extension, the very space for protest in this country. After all, if this government can remain a silent spectator while the treasury of Lord Ram is being looted, what impact could a citizens' protest possibly have?
Institutions that ought to function impartially have been co-opted, and elections are being manipulated to suit specific agendas. Exorbitant amounts of money are being spent on this, yet the mainstream media largely fails to question the source of these funds. Instead, they are busy discrediting both the opposition and even dissenters within the ruling party, acting on the instructions of their ‘invisible bosses’. And those in the media who speak out, operate under the constant threat of retribution. Consequently, the government finds it all too easy to crush a protest raised for a worthy cause and to inflict physical suffering upon the protester.
There was a time when the Bharatiya Janata Party (BJP) held Sonam Wangchuk in high regard. BJP always cherishes an individual only as long as it serves their convenience. In 2018, Wangchuk was invited to the 'Re-Invest' conference, where the party praised him after listening to his insights on non-conventional energy. Naturally, because the party wanted to showcase its commitment to non-conventional energy. Later, when Ladakh was declared a separate territory, Wangchuk initially appreciated the BJP's move. However, he eventually realized that their intentions were far from honest. Wangchuk demanded separate statehood for Ladakh, two Lok Sabha constituencies for the region, and the protection of local people's land rights; he undertook hunger strikes and protests to this end, yet the government took no action. They offered assurances but failed to follow through. The reason is that stated intentions rarely align with actual motives.
Today, Wangchuk’s demand is simply this: address the chaos surrounding the NEET exam, dismiss the minister responsible for it, and ensure transparency in these examinations. There is nothing amiss in this demand. During the BJP's tenure, irregularities in examinations have been rampant, ranging from the Vyapam scam in Madhya Pradesh and the leaking of NEET papers to the recent leaks of teacher recruitment exam papers. The answer to why this happens under their watch, and why they behave with such callous indifference afterward, is simple: it stems from the unbridled power that comes with controlling all the machinery of the state.
The BJP portrays election victories, often secured through various machinations, as a sign of the people's tacit approval, while simultaneously resenting any questioning. I say ‘BJP’, as their alliance partners lack any independent identity and are effectively controlled from Delhi.
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा हा आजचा १९ वा दिवस. त्यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्य खासकरून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत. हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतंय की सरकारने सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवला आहे. हे सरकार जिथे श्रीरामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघू शकते तिथे त्यांना नागरिकांच्या आंदोलनांने काय फरक पडणार ?
ज्या संस्थांनी निष्पक्ष वागायला हवं त्यांनाच स्वतःच्या ताब्यात घेतलं आहे. निवडणुका हव्या तशा मॅनेज करून घेतल्या जात आहेत. त्यासाठी अतिप्रचंड पैसा खर्च केला जात आहे. तो कुठून आला असा प्रश्न बहुसंख्य माध्यमं विचारत नाहीयेत. उलट हीच बहुसंख्य माध्यमं त्यांच्या अदृश्य बॉसच्या सांगण्यावरून सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील स्वकीयांची आणि विरोधकांना कसं बदनाम करता येईल यांत व्यस्त आहेत. आणि जी माध्यमं बोलत आहेत त्यांना आणि त्यांच्या मालकांच्या डोक्यावर एक टांगती तलवार फिरत आहे. त्यामुळे एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्याच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं आहे.
सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती. अर्थात भारतीय जनता पक्षाचं एक बरं असतं की त्यांच्या सोयीचा असेपर्यंत त्यांना तो माणूस प्रिय असतो. सोनम वांगचुक यांना २०१८ साली री-इन्व्हेस्ट कॉन्फरन्सला बोलावून त्यांच्याकडून अपारंपरिक ऊर्जा इत्यादींबद्दल ऐकून घेऊन त्यांचं कौतुक पण केलं होतं. अर्थात तेंव्हा आम्ही किती अपारंपरिक उर्जेला महत्व देतो हे दाखवायचं होतं म्हणून सोनम वांगचुक चालले. पुढे लडाख हा स्वतंत्र प्रदेश घोषित झाल्यावर वांगचुक यांना पण भाजपचं कौतुक वाटलं. पण पुढे वांगचुक यांच्या लक्षात आलं की यांचे हेतू अजिबात स्वच्छ नाहीत. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायला हवा, लडाखमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ हवेत, तिथल्या लोकांच्या जमिनीवरचा हक्क राखला गेला पाहिजे या मागण्या वांगचुक यांनी केल्या, त्यासाठी उपोषण, आंदोलनं केली पण सरकारने काहीही केलं नाही. त्यांना आश्वस्त केलं आणि पुढे कृती काहीच नाही. कारण हेतू जे दाखवले जातात तसे कधीच नसतात.
आज वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्याची हकालपट्टी करा आणि या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे. यात काहीच वावगं नाही. भाजपच्या सत्तेच्या काळात सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आलेत. मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून ते नीटच्या परीक्षांचे पेपर्स फुटणे ते अगदी आत्ता शिक्षकांच्या परीक्षांचे पेपर्स फुटण्यापर्यंत. हे सगळं यांच्या काळात का होतं आणि ते झाल्यावर हे इतके निर्ढावल्यासारखे का वागतात याचं उत्तर सोपं आहे. ते म्हणजे हाताशी सगळ्या यंत्रणांना धरून आलेली अमर्याद सत्ता.
निवडणुकांत अनेक उद्योग करून ओढून आणलेलं यश हे लोकांच्या मूकसंमतीचं द्योतक म्हणून दाखवायचं आणि आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आला आहे. आणि मी भाजप अशा अर्थाने म्हणतोय की त्यांच्या घटक पक्षांना स्वतंत्र अस्तित्वच नाहीये, त्यांना दिल्लीतूनच चालवलं जात आहे.
माझी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नात लक्ष घाला. NEET परीक्षांचा विषय आणि त्यातला गोंधळ हा काही सोपा विषय नाही. या परीक्षेतील घोळाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली आहे. आणि हे आत्ताच घडलं आहे असं नाही याच्या आधी पण असे प्रकार घडले आहेत. *आणि हा विषय राजकीय नाहीये. हा विषय सामाजिक आहे. NEET परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी, त्यांचे पालक हे ज्या त्रासातून गेले, जो मनस्ताप झाला त्याच्याशी संबंधित हा विषय आहे. आणि यात भारतीय जनता पक्षाचे समर्थक, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांनाच त्रास झालेला असणार. त्यामुळे आंदोलनाकडे राजकीय नजरेतून केंद्रातील सत्ताधारी पाहत आहेत, तेच मुळात त्यांच्या लघुदृष्टीचं लक्षण आहे*.
पोहोचलेला नाही.
त्याची उंची सुमारे 5 फूट 8 इंच असून अंगाने सडपातळ आहे. कोणास त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास किंवा तो कुठे आढळल्यास कृपया खालील क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधावा.
📞 लालाजी दवंडे (वडील): 74472 58474
📞 सतीश पाटील फाले
सरपंच, मासा-सीसा-उदेगाव
मो. 8007649499
🚨 हरवलेल्या व्यक्तीचा शोध 🚨
📢 गजानन उर्फ आशिका लालाजी दवंडे
रा. मासा, ता. अकोला, जि. अकोला
गजानन उर्फ आशिका लालाजी दवंडे हा युवक कामानिमित्त मिरज (जि. सांगली) येथे होता. तो शुक्रवार दि. 19/06/2026 रोजी मिरज येथून आपल्या गावी अकोला येथे येण्यासाठी निघाला, परंतु अद्यापपर्यंत घरी