ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांच्या उभारणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
मंत्रालय येथे महसूल मंत्री तथा ओबीसी संदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय आणि सूचना करण्यात आल्या. या बैठकीत ऑनलाइन प्रणालीद्वारे सहभाग घेतला.
१. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी निधी - ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांच्या उभारणीसाठी ६ हजार ८४० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांची शिफारस करण्यात आली. वसतिगृहांसाठी महसूल विभागाची जमीन उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली.
२. वसतिगृहांची उभारणी - प्रत्येक जिल्ह्यात १०० विद्यार्थ्यांची क्षमता असलेले, तर विभागीय स्तरावर २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेले वसतिगृह उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी आराखडे तयार करण्याचे काम सुरू आहे. पुढील उपसमितीच्या बैठकीत अंतिम मान्यता घेऊन मार्च महिन्यापासून बांधकाम सुरू करण्याचे नियोजन आहे.
३. भटक्या-विमुक्त आणि घुमंतू समाजासाठी विशेष शिबिरे - ६, ७ आणि ८ जानेवारी रोजी राज्यभरात ५०० विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या माध्यमातून भटक्या-विमुक्त आणि घुमंतू समाजातील नागरिकांना जन्म दाखला, आधार कार्ड आणि इतर शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
४. ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा - ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा, घरकुल योजना आणि विविध सामाजिक घटकांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या.
५. महात्मा फुले द्विजन्मशताब्दीनिमित्त उपक्रम - महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी निमित्त विविध उपक्रम राबविण्याबाबतही बैठकीत सूचना करण्यात आल्या.
या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री.छगन भुजबळ, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, तसेच ग्रामीण विकास विभागाचे सचिव श्री.चंद्रकांत पुलकुंडवार, बहुजन कल्याण विभागाचे सचिव श्री.अप्पासाहेब धुळाज आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#OBCWelfare #SocialJustice #ओबीसी #बहुजन_विकास

ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना.श्री.जयकुमारजी गोरे यांनी आपल्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यांचे स्वागत करून विविध विषयांवर चर्चा केली..
#Jaykumar_Gore#सदिच्छा_भेट#महाराष्ट्र
..म्हणूनच मा.मोदीजींचा अभिमान वाटतो! 🇮🇳
मनिला येथे आयोजित क्वाड बैठकीदरम्यान पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांनी दाखवलेला आदर हा राष्ट्रनिष्ठेची भावना अधोरेखित करणारा क्षण ठरला. परदेशातील व्यासपीठावरही त्यांनी आपल्या राष्ट्रध्वजाप्रती आदर व्यक्त केला.
तिरंगा हा आपल्या देशाची शान आणि स्वाभिमान आहे. त्याचा मान राखणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.
#Tiranga #NationalPride #RespectTheFlag #NarendraModi #QuadSummit
गोकुळ दूध संघाच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन!
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ दूध संघ) नवनिर्वाचित संचालक मंडळाने आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी चेअरमन श्री.राजेश पाटील आणि संचालक मंडळातील सदस्यांशी संवाद साधला. सहकार क्षेत्रातील गोकुळ दूध संघाचे महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेता, दूध उत्पादक शेतकरी, पशुपालक आणि ग्राहकांच्या हितासाठी संघाची वाटचाल अधिक सक्षम होईल असा विश्वास व्यक्त केला.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#GokulDairy #CooperativeSector #DairyDevelopment #AtulSave #Kolhapur #Maharashtra
राज्याच्या सर्वांगीण विकासाला व जनकल्याणाला गती देणाऱ्या महत्त्वपूर्ण निर्णयांसाठी मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री ना.सुनेत्राताई पवार यांचे मनःपूर्वक धन्यवाद..
#मंत्रिमंडळ_निर्णय#महाराष्ट्र_सरकार #Maharashtra_Government
दुष्काळ, जागतिक इंधन दरवाढ, व्यापार निर्बंध आणि युद्धजन्य परिस्थिती… तरीही भारताचा विकासदर ७.८%! भारताच्या अर्थव्यवस्थेची ही ताकद नेमकी कशामुळे?
दुष्काळ, जागतिक इंधन दरवाढ, व्यापार निर्बंध आणि पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती… यापैकी एक जरी संकट एखाद्या देशासमोर उभे राहिले, तरी त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर अशा संकटांचा परिणाम झाला असून त्यांच्या विकासाचा वेग कमी झाला आहे. मात्र, या चारही आव्हानांचा सामना करत भारताने आर्थिक विकासाचा वेग कायम ठेवला आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने ७.८ टक्के विकासदर नोंदवला. आज भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे.
संपूर्ण माहिती वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://t.co/i744XR5c7o
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
आपल्या परखड विचारांनी, प्रभावी वक्तृत्वाने आणि कणखर नेतृत्वाने त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे विचार आणि कार्य सदैव स्मरणात राहतील.
#हिंदुहृदयसम्राट #BalasahebThackeray #बाळासाहेब #पुण्यतिथी
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वाढीव निर्वाह भत्त्याचा दिलासा!
शासकीय वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या OBC, VJNT आणि SBC प्रवर्गांतील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात दुपटीहून अधिक वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
यानुसार विभागस्तरीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दरमहा १,५०० रुपये, तर जिल्हास्तरीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना १,३०० रुपये निर्वाह भत्ता मिळणार आहे.
विद्यार्थ्यांच्या दैनंदिन खर्चासाठी हा निर्णय निश्चितच दिलासादायक ठरणार आहे.
#विद्यार्थी #निर्वाहभत्ता #OBC #VJNT #SBC
नागपूर येथे मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते ‘महाज्योती’ आणि ‘वनार्टी’च्या जेईई, नीट व एमएचटी-सीईटी परीक्षा पूर्व प्रशिक्षणातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक टॅबलेटचे वितरण करण्यात आले.
ग्रामीण आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
डिजिटल अभ्यास साहित्य, ऑनलाइन व्याख्याने आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीला अधिक बळ मिळणार आहे. या सुविधांचा प्रभावी उपयोग करून विद्यार्थ्यांनी यशाची नवी शिखरे गाठावीत, हीच अपेक्षा!
#Mahajyoti #VJNT #DigitalEducation #StudentEmpowerment #DevendraFadnavis #AtulSave #Maharashtra
भारताचे युवा आशिया कप जिंकले.. शेवटच्या चेंडूपर्यंत लढले… थरारक सामन्यात पाकिस्तानला नमवले!!!
अंतिम सामन्यात भारतीय युवा शिलेदारांनी १ विकेटने ऐतिहासिक विजय मिळवत U-19 आशिया कपवर भारताचे नाव कोरले!
पाकिस्तानच्या ३३७ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना प्रत्येक धावेसाठी झुंज देत विजय खेचून आणला.
टीम इंडियाचे मनःपूर्वक अभिनंदन! 🇮🇳
#TeamIndia #U19AsiaCup #IndiaVsPakistan #Champions #IndianCricket #ProudMoment
मन:पूर्वक अभिनंदन..
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा मा.सौ.विजयाताई रहाटकर यांना मानद डी.लिट. सन्मान!
ओडिशातील प्रतिष्ठित कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस संस्थेतर्फे त्यांना मानद डी.लिट. (D.Litt. Honoris Causa) पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.
विजयाताईंच्या कार्याला मिळालेला हा सन्मान जनसेवा आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव आहे..
#VijayaRahatkar #DLitt #WomenEmpowerment #PublicService #AtulSave #Maharashtra
नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राची राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी.. महाराष्ट्राने देशात पटकावला दुसरा क्रमांक!
उपराष्ट्रपती मा.सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते प्राप्त झाला राष्ट्रीय पुरस्कार!!!
मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वात महाराष्ट्राने नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
यामध्ये मुख्यत्वे पुढील उपक्रमांचा मोलाचा सहभाग राहीला आहे.
📌 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०
• १६,००० मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य
• सुमारे ७,००० मेगावॅट सौर क्षमता कार्यान्वित
• ४,५०० हून अधिक कृषी फीडर्सचे सौरिकीकरण
• १,२०० हून अधिक उपकेंद्रांचे सौरिकीकरण
• १८ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ
📌 सौर कृषी पंप क्षेत्रातही महाराष्ट्राची आघाडी!
‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ आणि पीएम-कुसुम योजनेंतर्गत देशातील एकूण सौर कृषी पंपांपैकी सुमारे ६५% पंप महाराष्ट्रात स्थापित.
📌 रूफटॉप सौर ऊर्जेतही उल्लेखनीय प्रगती: पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर; राज्यातील रूफटॉप सौर क्षमता ७,१०० मेगावॅटच्या पुढे.
शेतकऱ्यांना दिवसा वीज, घरांना सौरऊर्जा, उद्योगांना स्वच्छ ऊर्जेच्या संधी आणि राज्याला ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने नवी गती.. म्हणजेच महायुती!
#AtulSave #DevendraFadnavis #RenewableEnergy #Maharashtra #भाजपामहायुती
छत्रपती संभाजीनगर येथे नोरा हाऊसच्या शुभारंभ सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
नव्या वास्तूतून उत्तम सेवा, नवनवीन संधी आणि यशाची नवी शिखरे गाठली जावोत, ही सदिच्छा. या नव्या प्रवासासाठी संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा!
#NoraHouse#GrandOpening#ChhatrapatiSambhajinagar #NewBeginnings
जिल्हा व्यापारी महासंघ आणि किराणा-तेली मर्चंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात सहभागी होऊन व्यापारी बांधवांशी संवाद साधला व सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
व्यापारी बांधव हे स्थानिक अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. अशा स्नेहमिलनातून परस्पर विश्वास, सहकार्य आणि एकोप्याची भावना अधिक दृढ होते. या सुंदर आयोजनाबद्दल दोन्ही संस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन..
#दीपावली_स्नेहमिलन #जिल्हा_व्यापारी_महासंघ #किराणा_तेली_मर्चंट_असोसिएशन #ChhatrapatiSambhajinagar
शेतकरी कुटुंबातील लेकींशी संवाद 📍 गव्हालीतांडा, ता.कन्नड
दुष्काळाच्या कठीण परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबातील लेकींशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यांच्या शिक्षणात कोणतीही अडचण निर्माण होऊ देणार नाही, याविषयी त्यांना आश्वस्त केले.
शेतीतील संकटामुळे निर्माण झालेली परिस्थिती निश्चितच कठीण आहे; मात्र या संकटातूनही धैर्याने मार्ग काढायचा आहे. सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास यावेळी दिला.
#शेतकरी_दिवाळी_भेट #गव्हालीतांडा #कन्नड #दिवाळी #dipawali