प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठले तरी उद्दिष्ट गाठायचे असते.
- महात्मा जोतीबा फुले
#vot4sdpi#hadapasar
बहुजन मुक्ती पक्षाचा SDPIल�� पाठिंबा
पुणे : ‘बहुजन मुक्ती पार्टी’च्या वतीने हडपसर व शिवाजीनगर विधानसभा निवडणुकीत ‘सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’ला जाहिर पाठिंबा घोषित केला आहे. एसडीपीआय व बहुजन मुक्ती पार्टीची विचारसरणी व ध्येय एकच आहे. दोन्ही पक्ष सांप्रदायिक प्रवृत्तीविरोधात लढा देत आहेत. शिवाय मानवी हित जपणे व संविधानाचे रक्षण असा दोन्ही पक्षांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणुकीत SDPIला पाठिंबा देण्याचे निश्चित केले आहे, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष प्रताप दादा पाटील यांनी पत्रकाद्वारे जाहिर केली आहे.
‘भारत मुक्ती मोर्चा’चे बोपोडी अध्यक्ष उत्तम बाराते यांनी पाठिंबा पत्र SDPIच्या पक्ष कार्यालयात येऊन सुपुर्द केले. त्यावेळी बहुजन मुक्ती पक्षाचे पदाधिकारी श्री. बाळासाहेब राखपसैरे (कार्यकारी अध्यक्ष महा. राज्य), मा. प्रतीक भोसले (राज्य प्रभारी, भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र), मा. सोमेश गाडेकर (बोपोडी अध्यक्ष, भारतीय विद्यार्थी मोर्चा), मा. महेंद्र मोतेसरदार (उपाध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चा-बोपोडी) उपस्थित हेतो.
SDPIचे पुणे जिल्हा प्रमुख असलम सय्यद, SDPI पक्षाचे उमेदवार शिवाजीनगरचे श्री. फिरोज मुल्ला व हडपसर विधानसभा मतदारसंघाचे श्री. अजहर तांबोळी यांनी बहुजन मुक्ति पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
यावेळी उत्तम बाराते म्हणाले, “दलित आणि मुस्लिम समुदाय हा पीडित, शोषित व नाडलेला आहे. जोपर्यंत दोन्ही समुदाय एकत्र येणार नाही, एकाच मंचावर येऊन सोबत काम करत नाही, तोपर्यंत आम्ही पीडित व शोषित समुदायच राहणार. समाजाला आर्थिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या सक्षम करायचे असेल तर दोन्ही पक्षाने एकत्र येऊन राजकीय विचार मांडणे गरजेचे आहे.”
जाहिर पाठिंबा दिल्याने श्री. फिरोज मुल्ला व श्री. अज़हर तांबोळी यांनी बहुजन मुक्ती पार्टीचे आभार मानले. निवडणुकीनंतरही प्रागतिक विचार व फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा राजकीय वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी SDPI कडून संयुक्तपणे सक्रिय कृती व उपक्रम राबवले जातील, असा विश्वास दोघांनी व्यक्त केला.
शिवाजीनगर व हडपसर येथील ‘सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’च्या सर्व प्रचार मोहिमा, उपक्रम आणि इतर कार्यक्रमात बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी SDPIला सहकार्य करावे, अशा सूचना श्री. उत्तम बाराते व प्रताप दादा पाटील यांनी केली आहे.
श्री. असलम सय्यद,
जिल्हा प्रमुख, SDPI,
मो. 9762519192
#SDPI #sdpipune #Vote4SDPI #hadapsar #hadapsarvidhansabha #azahartamboli #sdpimaharshtra #sdpipune #hadapsarpune #maharashtrapolitics #vot4democracy #democracy #constitution
आपली निशानी - 'ऑटोरिक्षा'
सर्वांना सांगा, ऑटोरिक्षा...
सर्वांशी बोला, ऑटोरिक्षा
अनुक्रमांक - ५
येत्या २० नोव्हेंबर रोजी 'ऑटोरिक्षा' या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्या असे आवाहन मतदारांना करतो.!
#SDPI#sdpipune#Vote4SDPI#hadapsar#hadapsarvidhansabha #azahartamboli #sdpimaharshtra #sdpipune #hadapsarpune #maharashtrapolitics #vot4democracy #democracy #constitution
Attended reception ceremony of SDPI Maharashtra state secretary Taj Siddiqui Sahab's relative. Met with lots of friends and supporters with their good wishes regarding upcoming Hadapsar Assembly election 2024.
#azhartamboli#sdpi#politics#hadapsar#pune #maharashtraelection2024