वाढदिवसाची सुंदर सुरुवात ~🌥️🍰🎂🌳✨
वाढदिवसाच्या पूर्वसंध्येपासूनच शुभेच्छांचा ओघ सुरू झाला. आदल्या रात्री महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते श्री. एकनाथ शिंदेजी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर पहाटेपासून अंधेरीतील विविध ठिकाणी लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक जण आवर्जून भेटले. त्यांचा प्रेम स्वीकारत दिवसाची सुरुवात झाली ~
📍 श्री पार्लेश्वर मंदिर, मरोळ
महादेवाचे दर्शन घेऊन अंधेरीकरांसाठी आयोजित आरोग्य शिबिराला भेट दिली. डोळ्यांची व विविध आरोग्य तपासण्या सहज उपलब्ध व्हाव्यात, प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि निरोगी जीवनासाठी आवश्यक तपासण्यांकडे लक्ष द्यावे, या हेतूने वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित उपक्रमाचा लाभ अनेक अंधेरीकरांनी घेतला.
📍 मोरारजी नगर, पवई
अंधेरीकरांसाठी आयोजित आरोग्य शिबिराला भेट देऊन सहभागी होता आलं आणि वाढदिवसाच्या शुभेच्छाही स्वीकारता आल्या. वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्याची काळजी घेण्याचा हा सुंदर विचार मनापासून आवडला.
📍 गावदेवी गावठाण, पवई
माझ्या आदिवासी बांधवांसोबत वाढदिवसाचा आनंद. प्रेमाने केलेलं स्वागत, मनापासून दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद. साधेपणातला हा जिव्हाळा… आणि त्या जिव्हाळ्यासाठी मनापासून कृतज्ञता.
📍 श्री तपेश्वर महादेव मंदिर, आरे कॉलनी
महादेवाचे दर्शन घेऊन वृक्षारोपण केले. वाढदिवसाला लावलेले हे रोप पुढील अनेक वर्षांत वाढताना पाहता यावे, हीच या छोट्याशा उपक्रमाची सुंदर अपेक्षा. या विचाराने वाढदिवसाचा क्षण निसर्गाशी जोडणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार.
📍 गुंदवली
येथे आयोजित आरोग्य शिबिरात कर्करोग तपासणी, संपूर्ण शरीराची तपासणी आणि विविध आरोग्य तपासण्यांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्याची काळजी घेण्याचा हा सुंदर विचार पुढे नेल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.
विशेषतः व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून उपस्थित राहिलेल्या सर्व माननीय डॉक्टरांचे आभार. अंधेरीकरांची तपासणी करून, त्यांच्याशी संवाद साधत या उपक्रमाला दिलेला वेळ आणि सहकार्य मोलाचे आहे.
आवर्जून भेटलेल्या प्रत्येकाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मनापासून स्वीकारले. ज्यांनी वेळ दिला, विचार केला, आयोजन केले आणि या दिवसात आपुलकीची भर घातली, त्या प्रत्येकाच्या प्रेमाची जाणीव माझ्यासाठी मोलाची आहे.
शुभेच्छा शब्दांत मिळतातच; पण त्या शुभेच्छांना जेव्हा सुंदर कृतीची जोड मिळते, तेव्हा त्या अधिक जपून ठेवाव्याशा वाटतात.
या सगळ्या प्रेमासाठी, शुभेच्छांसाठी आणि आशीर्वादांसाठी सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार मुरजी पटेल यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.
@MurjiPatel_
अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्र के जननायक, दिन रात जनता की सेवा करने वाले दमदार आमदार श्री मुरजीभाई पटेल जी को जन्मदिन की ढेरों शुभकामनाएँ।
#happybirthday@MurjiPatel_
@AMISHDEVGAN गोदी मीडिया जो दिन रात हिन्दू मुस्लिम करता हैं गोदी मीडिया जो देश कि समस्या छोड़ के जात धर्म की बात करता हैं गोदी मीडिया जो तुम्हारे जैसे लोग हैं शर्म करो अमीष
पावसाळी अधिवेशनात मुंबईच्या सुरक्षेसंदर्भातील दोन अत्यंत महत्त्वाचे मुद्दे सभागृहात मांडले.
1️⃣ Drug Peddling विरुद्ध अधिक कडक कायदेशीर चौकट
मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ड्रग्सची विक्री उघडपणे होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. पोलीस कारवाई करतात, आरोपींना अटकही होते; मात्र काही दिवसांत Bail मिळून तेच आरोपी पुन्हा त्याच बेकायदेशीर व्यवसायात सक्रिय होताना दिसतात. ही केवळ Enforcement ची नव्हे, तर Deterrence मधील उणीव आहे. गुन्हेगारांच्या मनात कायद्याची प्रतिबंधात्मक दीर्घकालीन भीती निर्माण होण्यासाठी विद्यमान चौकटीत अधिक परिणामकारक सुधारणा आवश्यक आहेत.
NDPS Act, 1985 हा कायदा कठोर असला तरी Repeat Offenders, Habitual Peddlers आणि Organised Drug Networks यांच्याविरोधात अधिक प्रभावी Legal Framework आवश्यक आहे. केवळ अटक हा उपाय नसून कठोर Prosecution, जलदगती Trial, Repeat Offenders साठी Bail च्या तरतुदींचा गैरवापर रोखण्यासाठी आवश्यक ते विधायी बदल आणि सातत्याने गुन्हे करणाऱ्यांसाठी अधिक कठोर दंडात्मक तरतुदी आवश्यक आहेत. अमली पदार्थांचा व्यापार हा आपल्या तरुणाईच्या भविष्यावर थेट आघात असून त्याविरोधात Zero Tolerance Policy हीच काळाची गरज आहे.
2️⃣ Smart Surveillance द्वारे अधिक सुरक्षित मुंबई
मुंबईतील प्रमुख Junctions, सार्वजनिक मार्ग, Remote Pockets आणि कमी वर्दळीच्या भागांमध्ये CCTV Surveillance Network मोठ्या प्रमाणावर वाढवण्याची मागणी सभागृहात केली.
आजही अनेक ठिकाणी CCTV Coverage अपुरे असल्यामुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती अपेक्षित प्रमाणात नाही. Surveillance हे केवळ गुन्ह्यानंतरचा पुरावा नसून, गुन्ह्यांना प्रतिबंध करणारी प्रभावी यंत्रणा आहे.
प्रत्येक CCTV Camera ला संबंधित Local Police Station आणि City Monitoring Network शी Real-Time Integration करून 24×7 Monitoring, Rapid Response आणि Evidence-based Investigation सक्षम करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर AI-based Video Analytics, ANPR आणि Integrated Command & Control Systems चा अधिक प्रभावी वापर आवश्यक आहे.
आपल्या माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक व प्रत्येक मुंबईकराला दिवस असो वा मध्यरात्र—शहरात कुठेही निर्भयपणे वावरता आले पाहिजे. सुरक्षित शहर हे केवळ अधिक पोलीस दलामुळे नव्हे, तर सक्षम कायदे, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी अंमलबजावणी यांच्या एकत्रित बळावर उभे राहते.
कडक कायदे, प्रभावी अंमलबजावणी, Smart Surveillance आणि Zero Tolerance Approach यांच्या बळावरच अधिक सशक्त, सुरक्षित आणि विश्वासार्ह मुंबई घडवता येईल.
मुंबईतील वाढत्या Stray Dogs च्या समस्येकडे विधानसभेचे लक्ष वेधून तातडीच्या आणि प्रभावी उपाययोजनांची मागणी केली.
मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या ही केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय राहिलेली नाही, तर ती आता Public Safety आणि Public Health या दोन्ही दृष्टीने अत्यंत गंभीर बाब बनली आहे. राज्यभरातून, तसेच माझ्या मतदारसंघातूनही, डॉग बाईटच्या वाढत्या घटनांबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त होत आहेत. विशेषतः लहान मुलांवर होणारे हल्ले अत्यंत चिंताजनक असून, अनेक निष्पाप मुलांना गंभीर जखमा होऊन टाके घालण्याची वेळ आली आहे.
वारंवार तक्रारी करूनही अनेक ठिकाणी नागरिकांना वेळेत प्रतिसाद मिळत नाही. अस्तित्वातील यंत्रणा कार्यरत असली तरी वाढत्या समस्येच्या तुलनेत तिची क्षमता आणि प्रतिसाद यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
हा विषय प्राण्यांविरोधात नाही. भटक्या प्राण्यांनाही मानवीय पद्धतीने संरक्षण, उपचार, Sterilisation आणि Anti-Rabies Vaccination मिळणे तितकेच आवश्यक आहे. मात्र त्याच वेळी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ नये, हीदेखील शासनाची तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे.
यासाठी विधानसभेत पुढील मागण्या मांडल्या —
➡️ प्रत्येक प्रशासकीय Ward मध्ये Dedicated Stray Animal Management Cell स्थापन करण्यात यावा.
➡️ नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी Rapid Response Team कार्यरत करण्यात यावी.
➡️ वारंवार हल्ले करणाऱ्या आक्रमक भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र Standard Operating Procedure (SOP) तयार करण्यात यावी.
➡️ Sterilisation आणि Anti-Rabies Vaccination मोहिमेला अधिक गती देऊन त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, पशुवैद्यकीय अधिकारी आणि साधनसामग्री वाढविण्यात यावी.
➡️ प्रत्येक Ward मधील तक्रारी, डॉग बाईटच्या घटना, Sterilisation आणि Vaccination यांची माहिती नागरिकांसाठी Public Dashboard वर उपलब्ध करून पारदर्शकता वाढविण्यात यावी.
नागरिकांची सुरक्षितता आणि प्राण्यांचे कल्याण या दोन्हींचा समतोल राखत, या वाढत्या समस्येवर वेळेत, प्रभावी आणि शाश्वत उपाययोजना करणे ही आजची गरज आहे. शासनाने या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने पाहून तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी मी विधानसभेत केली.
यावर माननीय मंत्री श्री. उदय सामंतजी यांनी सकारात्मक दखल घेत, संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश देण्यात येतील तसेच या विषयावर तातडीने योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन सभागृहात दिले.
During the Monsoon Session of the Maharashtra Legislative Assembly, I raised the long-pending demand for establishing a dedicated, full-fledged Government Children’s Hospital for Mumbai Suburban.
Despite being one of the most densely populated regions in Mumbai, Mumbai Suburban still does not have a comprehensive pediatric hospital. Consequently, families are often compelled to seek specialized pediatric treatment outside the suburban district, placing additional pressure on patients during critical situations.
In the VidhanBhavan, I highlighted the inadequate availability of essential pediatric facilities, including NBSU (Newborn Stabilization Unit), SNCU (Special Newborn Care Unit), NICU (Neonatal Intensive Care Unit) and PICU (Pediatric Intensive Care Unit), and emphasized the need to strengthen pediatric healthcare infrastructure in the suburban district.
I also pointed out that although many land parcels are reserved for hospital development in Mumbai Suburban, a dedicated children’s hospital has yet to be established. Given the region’s growing population and increasing healthcare requirements, this gap warrants urgent attention.
Accordingly, I urged the Government to establish a modern, fully equipped Government Children’s Hospital in Mumbai Suburban to ensure that specialized pediatric healthcare is accessible within the district.
Responding to the issue, Hon’ble Minister Meghana Sakore Bordikar, Minister of Public Health and Family Welfare, informed the House that the matter primarily falls within the jurisdiction of the BMC, but assured that the availability of reserved hospital land and the requirement for strengthening pediatric healthcare infrastructure in Mumbai Suburban would be brought to the attention of the concerned authorities and that appropriate follow-up would be undertaken.
This is a critical healthcare requirement for Mumbai Suburban, and I will continue to pursue this demand until the region receives the dedicated Government Children’s Hospital its residents need.
सध्या रात्री १२:४० वाजता, पावसाळी अधिवेशनातील अंतिम ठरावाच्या प्रस्तावांवर गंभीर चर्चा सुरू असताना अत्यंत धक्कादायक बाब निदर्शनास आली.
सभागृहात आमदार आपल्या मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न मांडत होते, दोन कॅबिनेट मंत्री उपस्थित होते; मात्र अधिकाऱ्यांच्या गॅलरीत एकही अधिकारी उपस्थित नव्हता. विधिमंडळाप्रती ही अत्यंत निष्काळजी आणि दुर्दैवी बाब आहे.
मी हा मुद्दा तात्काळ सभागृहात उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत जाब मागितला. याची गंभीर दखल घेत अध्यक्ष महोदयांनी तसेच मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्याचे आश्वासन दिले आहे.
लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत सभागृहात उपस्थित राहतात. अशा वेळी संबंधित अधिकारी उपस्थित नसणे ही केवळ निष्काळजीपणा नसून विधिमंडळाच्या कामकाजाबद्दलची उदासीनता दर्शवणारी बाब आहे. भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी हा मुद्दा उपस्थित केला.
Way past midnight—3:38 a.m.
As I concluded my final remarks during the discussion on the Final Resolution of the Monsoon Session, I couldn’t help but reflect on the extraordinary day we have all shared.
From the commencement of proceedings at 7:00 a.m. until 3:38 a.m. the following morning, every Hon’ble Member, the Hon’ble Speaker, Hon’ble Ministers, officers, Legislature staff, security personnel, and members of the media remained at their respective responsibilities with remarkable dedication.
My sincere gratitude to each one of you.
Days like these remind us that the work of the Legislature is a collective effort. Every individual present has a role to play, and today’s proceedings are a testament to that shared sense of duty.
Thank you all, and I wish everyone a safe journey home and some well-earned rest.
अंधेरीकरांचा आवाज, मैदानावरचे अनुभव आणि प्रश्न घेऊन पुन्हा एकदा विधान भवनात दाखल…
गेल्या काही दिवसांत अंधेरीच्या प्रत्येक भागात, पावसामुळे निर्माण झालेल्या प्रत्येक संकटात नागरिकांसोबत उभा राहिलो. आता त्या प्रत्येक अनुभवाला, प्रत्येक प्रश्नाला आणि प्रत्येक नागरिकाच्या अपेक्षांना महाराष्ट्र विधिमंडळात आवाज देण्याची वेळ आली आहे.
पावसाळी अधिवेशनात अंधेरीकरांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा ठाम पाठपुरावा कायम राहील.
मरोळ पोलीस कॅम्पमधील पोलीस बांधवांच्या निवासस्थानांची अत्यंत दयनीय व धोकादायक अवस्था लक्षात घेता, आज महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्ववान आणि कणखर मुख्यमंत्री, आमचे मार्गदर्शक मा. श्री @devendra_fadnavis जी यांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण परिस्थिती सविस्तर मांडली.
घरांची झालेली दुरवस्था, कोसळणारी छते, मागील आठवड्यात घडलेल्या घटनांचे photos त्यांना दाखवत सर्व वस्तुस्थिती त्यांच्या समोर मांडली. आपल्या कर्तव्यावर दिवस-रात्र कार्यरत असलेल्या पोलीस बांधवांच्या कुटुंबियांना अशा असुरक्षित परिस्थितीत राहावे लागत असल्याची बाब अत्यंत वेदनादायी असल्याचेही त्यांना सांगितले.
मा. मुख्यमंत्री महोदयांनी या विषयाची अत्यंत संवेदनशीलतेने आणि गांभीर्याने तात्काळ दखल घेतली. माझ्या समोरच त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त मा. श्री देवेन भारती जी @CPMumbaiPolice जी यांना phone करून त्वरित आवश्यक कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. कोणत्याही पोलीस कुटुंबाला कोणतीही इजा होऊ नये, त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्वतोपरी उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या प्रकरणात तातडीने कारवाई होईल, असे आश्वासन त्यांनी मला दिले.
यापूर्वीही काल रात्री मी मा. गृह राज्यमंत्री @iYogeshRKadam जी यांनाही या संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली होती. त्यांनीही या विषयाची अत्यंत गांभीर्याने दखल घेत मला आश्वस्त केले आहे की, या प्रश्नावर लवकरच मोठी आणि ठोस पावले उचलली जातील.
आज मी स्वतःही मा. मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार असून या विषयाचा पुढील पाठपुरावा करणार आहे. आपल्या सुरक्षेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या पोलीस बांधवांच्या कुटुंबियांना सुरक्षित आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्या वेदना केवळ ऐकून न घेता, त्यावर ठोस उपाय होईपर्यंत मी नियमित आणि सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहे. प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीची माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवत राहीन.
सततच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कोंडीवीटा येथील सनबीम सोसायटी व मन्नुबाई पटेल चाळ परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
संरक्षक भिंत कोसळल्याने निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीचा आढावा घेत संबंधित यंत्रणांना तातडीने कोसळलेली झाडे व ढिगारा हटविण्याच्या सूचना दिल्या. तसेच अर्धवट उभी असलेली धोकादायक भिंत त्वरित पाडून परिसर सुरक्षित करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून कोणताही जीवित धोका निर्माण होणार नाही.
याचबरोबर, लवकरात लवकर संरक्षक भिंतीचे पुनर्बांधकाम करण्याबाबत तसेच शेजारील नाल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
अंधेरी पूर्वमधील विविध भागांमध्ये निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीची पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजनांचा आढावा घेत आहे. जिथे जिथे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे, तिथे आमची संपूर्ण टीम संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत नागरिकांपर्यंत आवश्यक ती मदत तातडीने पोहोचवण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.
अनेक ठिकाणी संरक्षक भिंती कोसळणे, घरांच्या छतांचे भाग ढासळणे, झाडे पडणे तसेच दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याच्या घटना समोर येत आहेत. अशा प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक ती तातडीची कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देत आहोत.
आपल्या परिसरातही कोणतीही धोकादायक परिस्थिती आढळल्यास कृपया तात्काळ आमच्या २४x७ हेल्पलाईनवर संपर्क साधा. अनावश्यकपणे धोकादायक ठिकाणी जाणे टाळा, कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या भिंती, झाडे किंवा दरडग्रस्त भागांपासून सुरक्षित अंतर ठेवा आणि कोणतीही आपत्कालीन बाब त्वरित कळवा. आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच या संकटाचा प्रभावीपणे सामना करता येईल.
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या आणि जोरदार वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबईभर मोठ्या प्रमाणात झाडे कोसळत आहेत, तर अनेक झाडे धोकादायक स्थितीत उभी आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मी मुंबई महानगरपालिकेच्या गार्डन विभागातील अत्यंत गंभीर मनुष्यबळाच्या कमतरतेचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला.
मुंबई महानगरपालिकेच्या गार्डन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी अत्यंत कमी मनुष्यबळात, दिवस-रात्र प्रामाणिकपणे काम करत आहेत. शहरभरातून सातत्याने येणाऱ्या वृक्ष पडण्याच्या, धोकादायक झाडांच्या आणि तातडीच्या वृक्षछाटणीच्या तक्रारींचा प्रचंड भार त्यांच्यावर आहे. उपलब्ध मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे अनेक ठिकाणी प्रतिबंधात्मक वृक्षछाटणी, धोकादायक फांद्यांचे वेळेत निर्मूलन आणि आवश्यक तपासण्या इच्छाशक्ती असूनही वेळेत पूर्ण करणे शक्य होत नाही. हा प्रश्न अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा नसून, उपलब्ध मनुष्यबळाच्या गंभीर कमतरतेचा आहे.
मुंबईसारख्या महानगरात लाखो वृक्ष, उद्याने, रस्त्यालगतची वृक्षसंपदा आणि सार्वजनिक हिरवळींची देखभाल करण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित अधिकारी, पर्यवेक्षक आणि कर्मचारी उपलब्ध असणे ही मूलभूत गरज आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा मुसळधार पावसाच्या काळात ही गरज अनेक पटींनी वाढते. अशा वेळी २४ तास काम करूनही प्रत्येक तक्रारीवर तातडीने प्रतिसाद देणे विद्यमान मनुष्यबळासाठी शक्य होत नाही.
त्यामुळे गार्डन विभागासाठी तातडीने आवश्यक ते अधिकारी, कर्मचारी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी मी सभागृहात केली. माझ्या या मागणीची दखल घेत माननीय मंत्री माधुरी मिसाळ यांनी याबाबत लवकरच आवश्यक निर्देश दिले जातील, असे सभागृहात सांगितले.
मात्र हा प्रश्न केवळ एका दिवसाचा किंवा एका पूरपरिस्थितीचा नाही. ही दीर्घकालीन नियोजनाची बाब आहे. वारंवार मागणी करूनही गार्डन विभागाला आवश्यक त्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. ही परिस्थिती बदलणे अत्यावश्यक आहे.
मुंबईतील वृक्षसंख्या आणि त्यांची जबाबदारी ज्या प्रमाणात आहे, त्या प्रमाणात त्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचारीही उपलब्ध असले पाहिजेत. यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत राहणार असून, गार्डन विभागाला आवश्यक ते मनुष्यबळ प्रत्यक्षात उपलब्ध होईपर्यंत हा विषय वारंवार सभागृहात मांडत राहणार आहे.
@aajtak बहोत बडा मुद्दा बताया तुमने बस इसलिए तुम्हें गोदी मीडिया कहा जाता हैं कभी हमारे देश के परेशान लोगों का भी हाल लेके देखो फिर पता चलेगा देश में क्या चल रहा हैं
काल कोंडीवीटा येथे झालेल्या मोठ्या वृक्ष कोसळण्याच्या घटनेनंतर, BMC Garden Department च्या टीमला अत्यंत गुंतागुंतीचे आणि धोकादायक बचावकार्य पार पाडताना शक्य ते सर्व सहकार्य आणि आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली.
गेल्या ७२ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे मुंबईभर, विशेषतः अंधेरीमध्ये, मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटणे आणि धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
आमची Emergency Helpline गेल्या अनेक दिवसांपासून 24×7 कार्यरत असून, झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटणे आणि धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत आहेत. प्रत्येक तक्रारीची नोंद करण्यात आली असून, संबंधित विभागांशी सातत्याने समन्वय साधून त्यावर सक्रियपणे पाठपुरावा केला जात आहे.
BMC Garden Department आणि आमचे कार्यकर्ते संपूर्ण अंधेरीमध्ये सातत्याने बचावकार्य आणि झाडे हटविण्याचे काम करत आहेत. जीवितास तातडीचा धोका, रस्ते बंद होणे किंवा मालमत्तेच्या नुकसानीची शक्यता असलेल्या घटनांना सर्वोच्च प्राधान्य देऊन तातडीने कार्यवाही केली जात आहे.
या परिस्थितीत नागरिकांना होत असलेला मनस्ताप आम्हाला पूर्णपणे समजतो. तक्रारींचे प्रमाण अत्यंत मोठे असले तरी प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली जात आहे. कृपया संयम बाळगा. आम्ही संबंधित विभागांच्या सातत्यपूर्ण संपर्कात असून प्रत्येक तक्रारीवर शक्य तितक्या लवकर कार्यवाही व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत.
या कठीण परिस्थितीत मुसळधार पाऊस, सोसाट्याचे वारे, चिखल आणि पाण्याने भरलेल्या रस्त्यांमध्ये प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता अहोरात्र काम करणाऱ्या BMC Garden Department मधील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे, तसेच मदतकार्यामध्ये सहभागी आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार. गेल्या अनेक तासांपासून ते नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि रस्ते पूर्ववत करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत.
सर्व नागरिकांनी कृपया अनावश्यकपणे धोकादायक किंवा नुकसानग्रस्त झाडांच्या परिसरात जाणे टाळावे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती किंवा धोकादायक झाड दिसल्यास त्वरित आमच्या Emergency Helpline वर अथवा संबंधित यंत्रणेला कळवावे.
आपली सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.