I'm Ambedkarite and Buddhist ☸️Socialist, Believe in humanity🤗 JAI JYOTI JAI KRANTI, JAI BHIM, JAI SHIVRAI, JAI RAVIDAS, JAI MANDAL, JAI JOHAR, महाराष्ट्रसैनिक
दोन दिवसांपूर्वी मी पहिल्यांदा मांडलेला, बारावीत अवघे ५०% गुण मिळालेल्या दोन भावंडांनी NEET मध्ये AIR 36 आणि 37 मिळवल्याचा विषय पत्रकारांनी उचलून धरला.
आता ही बाबही तपासली पाहिजे.
ड्रग इन्स्पेक्टर भरतीत दोन भाऊ-बहिणींची निवड झाली. त्यांच्या गुणांमध्ये अनुक्रमे १२१ आणि १३८ गुण आहेत, तर सुमारे १३,००० उमेदवारांपैकी त्यांच्या रँक सुमारे ४,००० आहे.
असा आरोप केला जात आहे की संबंधित उमेदवारांचे वडील तहसीलदार असून त्यांचे सत्ताधारी पक्षातील नेत्यांशी निकटचे संबंध आहेत. या दाव्यांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे.
असे योगायोग फक्त देवेंद्र सरकार मध्ये होतात
स्पर्धा परीक्षेला घोडे लावायचे काम चालू आहे
Kudos to Chetan Bhagat for a behavioural-political, generational sociology, and democratic mobilisation analysis. The article insightfully explains how Digital Native Behaviour, Collective Action, and Institutional Trust intersect to transform online discontent into real-world political participation.
@chetan_bhagat
🔑 Very Important Facts, Arguments & Insights (UPSC | Concise):
🔹 Core Thesis: Gen Z has transitioned from passive digital engagement to active democratic participation. Social media is no longer merely an entertainment platform—it has become an Engine of Civic Mobilisation.
🔹 The article argues that the NEET/Paper Leak Crisis became the Catalytic Trigger, but the underlying drivers were:
Institutional Distrust
Youth Anxiety
Perceived Governance Failure
Demand for Accountability
🔹 The Cockroach Jantar Party (CJP) is presented as a Symbolic Digital Movement, demonstrating how Memes, Reels, and Viral Content can evolve into Mass Political Mobilisation.
🔹 The article challenges the stereotype of Gen Z as Attention-Deficit, arguing instead that they possess High Political Consciousness when issues directly affect their future.
🔹 A key insight is that governments often Misread Digital Behaviour, assuming online outrage is temporary, whereas Digital Networks can rapidly convert into sustained public action.
🔹 The article argues that Institutional Accountability cannot be restored merely through symbolic measures such as resignations or suspensions; Structural Reforms are essential.
🔹 The movement represents a shift from Identity Politics towards Issue-Based Mobilisation, centred on fairness, transparency, and equal opportunity.
🔹 Strategic Insight: Digital Public Sphere is becoming a major arena where democratic legitimacy is negotiated, especially among younger citizens.
🎯 Exactly What the Author Wants to Say
> Gen Z is no longer politically indifferent. It expects transparent governance, institutional integrity, and merit-based opportunity. Governments that dismiss digitally organised youth movements as temporary social-media trends risk underestimating a generation capable of converting online networks into sustained democratic pressure.
⚖️ Constructive Criticism (Balanced Perspective)
🔹 The article effectively captures the energy of youth mobilisation but relies largely on observation rather than Empirical Data measuring long-term political behaviour.
🔹 It could have discussed the risks of Misinformation, Echo Chambers, and Algorithmic Amplification, which also influence digital mobilisation.
🔹 While emphasising public accountability, the article gives comparatively less attention to the practical challenges of implementing systemic examination and administrative reforms.
🧠 UPSC Enrichment Keywords
Digital Democracy • Youth Political Mobilisation • Collective Action • Digital Public Sphere • Networked Citizenship • Institutional Trust • Governance Legitimacy • Behavioural Politics • Issue-Based Politics • Political Socialisation • Participatory Democracy • Social Capital • Civic Engagement • Public Accountability • Democratic Responsiveness
📌 UPSC Value Addition
GS-2: Democracy, citizen participation, governance, public accountability, role of technology in politics.
Essay: Youth in democracy, digital citizenship, institutional trust, governance reforms, social media and political participation.
#GenZ #YouthPower #DigitalDemocracy #Governance #Accountability #PublicPolicy #Democracy #InstitutionalTrust #SocialMedia #CivicEngagement #EducationReforms #UPSC #IndianPolity
ह्यांचं नाव आहे अनिरुद्ध मराठे.
मराठे काका हळू आणि शांतपणे बोलतात. पण त्यांचं प्रत्येक वाक्य लक्ष देऊन, संयमाने ऐका. त्यांनी मांडलेले मुद्दे नक्की ऐकण्यासारखे आहेत. अवश्य ऐका.
आशा करतो, हे पूर्ण ऐकल्यानंतर तरी काही भक्तांचे डोळे उघडतील. सत��य ऐकण्याची तयारी असेल, तर विचार नक्की बदलू शकतात.
“Doctor… उत्साह (Motivation) असतो तेव्हा सगळं छान चालतं… पण दोन-तीन दिवसांनी पुन्हा सगळं थांबतं.”
हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक वयोगट��त ऐकायला मिळतो.
विद्यार्थी…
IT Professionals…
गृहिणी…
व्यावसायिक…
निवृत्त…
फरक फक्त कारणांचा असतो.
समस्या मात्र एकच असते.
आजचा आरोग्याचा साधा नियम…
Motivation सुरुवात करतं…
Routine बदल घडवतं.
1. Motivation म्हणजे ठिणगी (Spark)…
नवीन वर्ष…
नवीन Report…
Doctor चा सल्ला…
किंवा एखादा प्रेरणादायी Video…
आपण लगेच ठरवतो…
“उद्यापासून सगळं बदलायचं.”
पण काही दिवसांनी…
तोच उत्साह कमी होतो.
हा तुमचा दोष नाही.
हा मेंदूचा (Brain) स्वभाव आहे.
2. मेंदूला नवीन गोष्टी आवडतात…
पण त्या कायम ठेवायला तो तयार नसतो.
प्रत्येक नवीन निर्णय…
मेंदूकडून ऊर्जा (Mental Energy) मागतो.
म्हणून…
रोज स्वतःला प्रेरित करावं लागत असेल…
तर अजून सवय तयार झालेली नाही.
3. म्हणूनच यशस्वी लोक Motivation वर अवलंबून राहत नाहीत.
त्यांना र���ज “मूड” असण्याची वाट पाहावी लागत नाही.
त्यांच्याकडे…
एक ठरलेली वेळ असते.
एक ठरलेली जागा असते.
एक ठरलेली कृती असते.
Routine निर्णय कमी करतं…
म्हणून सातत्य वाढतं.
4. रोजच्या आयुष्यातही हेच दिसतं.
दात घासण्यासाठी Motivation लागत नाही.
ऑफिसला जायला Motivation लागत नाही.
फोन चार्ज करायला Motivation लागत नाही.
कारण…
त्या सवयी झालेल्या असतात.
आरोग्यही तसंच घडतं.
5. म्हणून उद्यापासून जास्त उत्साही होण्याचा प्रयत्न करू नका.
त्याऐवजी…
रोज एकाच वेळी एकच छोटी कृती करा.
शरीराला मोठे संकल्प समजत नाहीत.
त्याला दिनक्रम (Routine) समजतो.
आजचा Habit Truth
Motivation तुम्हाला सुरुवात करून देऊ शकतं…
पण Routine तुम्हाला तिथे टिकवून ठेवतं.
✅ Today’s Action
आज स्वतःच्या दिवसात…
एक अशी कृती शोधा…
जी तुम्ही रोज एकाच वेळी करू शकता.
फक्त वेळ ठरवा.
बाकीचं Routine सांभाळेल.
उत्साहाने सुरुवात करणारे खूप असतात.
दिनक्रम तयार करणारे फार थोडे असतात.
पुढच्या काही आठवड्यांत
अशाच लोकांसाठी…
रोजच्या सवयी अधिक सोप्या, टिकाऊ आणि कृतीत आणण्यासाठी काही वेगळे प्रयोग, Reflection Notes, Voice Notes आणि सखोल Habit Discussions सुरू होणार आहेत.
कारण…
Motivation सुरुवात करून देतं.
Routine आयुष्य बदलतं.
Dr Ravindra L Kulkarni
Sr Consultant
Physician & Cardiologist
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
#HabitScience
#HealthyHabits
#JustForHearts
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा हा आजचा १९ वा दिवस. त्यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्य खासकरून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत. हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतंय की सरकारने सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवला आहे. हे सरकार जिथे श्रीरामाच्या तिजोरीला लुटलं जात अस��ाना शांतपणे बघू शकते तिथे त्यांना नागरिकांच्या आंदोलनांने काय फरक पडणार ?
ज्या संस्थांनी निष्पक्ष वागायला हवं त्यांनाच स्वतःच्या ताब्यात घेतलं आहे. निवडणुका हव्या तशा मॅनेज करून घेतल्या जात आहेत. त्यासाठी अतिप्रचंड पैसा खर्च केला जात आहे. तो कुठून आला असा प्रश्न बहुसंख्य माध्यमं विचारत नाहीयेत. उलट हीच बहुसंख्य माध्यमं त्यांच्या अदृश्य बॉसच्या सांगण्यावरून सत्ताधाऱ्यांच्या पक्��ातील स्वकीयांची आणि विरोधकांना कसं बदनाम करता येईल यांत व्य��्त आहेत. आणि जी माध्यमं बोलत आहेत त्यांना आणि त्यांच्या मालकांच्या डोक्यावर एक टांगती तलवार फिरत आहे. त्यामुळे एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्याच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं आहे.
सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती. अर्थात भारतीय जनता पक्षाचं एक बरं असतं की त्यांच्या सोयीचा असेपर्यंत त्यांना तो माणू��� प्रिय असतो. सोनम वांगचुक यांना २०१८ साली री-इन्व्हेस्ट कॉन्फरन्सला बोलावून त्यांच्याकडून अपारंपरिक ऊर्जा इत्यादींबद्दल ऐकून घेऊन त्यांचं कौतुक पण केलं होतं. अर्थात तेंव्हा आम्ही किती अपारंपरिक उर्जेला महत्व देतो हे दाखवायचं होतं म्हणून सोनम वांगचुक चालले. पुढे लडाख हा स्वतंत्र प्रदेश घोषित झाल्यावर वांगचुक यांना पण भाजपचं कौतुक वाटलं. पण पुढे वांगचुक यांच्या लक्षात आलं की यांचे ��ेतू अजिबात स्वच्छ नाहीत. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायला हवा, लडाखमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ हवेत, तिथल्या लोकांच्या जमिनीवरचा हक्क राखला गेला पाहिजे या मागण्या वांगचुक यांनी केल्या, त्यासाठी उपोषण, आंदोलनं केली पण सरकारने काहीही केलं नाही. त्यांना आश्वस्त केलं आणि पुढे कृती काहीच नाही. कारण हेतू जे दाखवले जातात तसे कधीच नसतात.
आज वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाल�� त्या मंत्र्याची हकालपट्टी करा आणि या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे. यात काहीच वावगं नाही. भाजपच्या सत्तेच्या काळात सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आलेत. मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून ते नीटच्या परीक्षांचे पेपर्स फुटणे ते अगदी आत्ता शिक्षकांच्या परीक्षांचे पेपर्स फुटण्यापर्यंत. हे सगळं यांच्या काळात का होतं आणि ते झाल्यावर हे इतके निर्ढावल्यासारखे का वागतात याचं उत्��र सोपं आहे. ते म्हणजे हाताशी सगळ्या यंत्रणांना धरून आलेली अमर्याद सत्ता.
निवडणुकांत अनेक उद्योग करून ओढून आणलेलं यश हे लोकांच्या मूकसंमतीचं द्योतक म्हणून दाखवायचं आणि आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आला आहे. आणि मी भाजप अशा अर्थाने म्हणतोय की त्यांच्या घटक पक्षांना स्वतंत्र अस्तित्वच नाहीये, त्यांना दिल्लीतूनच चालवलं जात आहे.
माझी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नात लक्ष घाला. NEET परीक्षांचा विषय आणि त्यातला गोंधळ हा काही सोपा विषय नाही. या परीक्षेतील घोळाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली आहे. आणि हे आत्ताच घडलं आहे असं नाही याच्या आधी पण असे प्रकार घडले आहेत. *आणि हा विषय राजकीय नाहीये. हा विषय सामाजिक आहे. NEET परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी, त्यांचे पालक हे ज्या त्रासातून गेले, जो मनस्ताप झाला त्याच्याशी संबंधित हा विषय आहे. आणि यात भारतीय जनता पक्षाचे समर्थक, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते या ��गळ्यांनाच त्रास झालेला असणार. त्यामुळे आंदोलनाकडे राजकीय नजरेतून केंद्रातील सत्ताधारी पाहत आहेत, तेच मुळात त्यांच्या लघुदृष्टीचं लक्षण आहे*.
Baat toh Sahi hai @nitin_gadkari ji. If you don't want E-20, You have to pay more. That is, Rs. 170 per liter.
Now stop comparing prices of 100% Petrol in India, Pakistan, Nepal, Bangladesh, Sri Lanka and China. Only Soros funded Anti Nationals will do such cheap comparisons.
सोनम वांगचुक उपोषण सोडा ही विनंती!
2006 डिसेंबर मध्ये डॉ नरेंद्र दाभोलकरांनी जादूटोणा ��िरोधी कायदा व्हावा या मागणीसाठी लातूरच्या गांधी चौकात उपोषण केले होते. हे उपोषण दहा दिवस चालले. विलासराव देशमुख तेव्हा मुख्यमंत्री होते.
या उपोषण व धरणे आंदोलनाला समाज, प्रसारमाध्यमे यांतून चांगला प्रतिसाद मिळाला, पण सरकारने त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले.
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात उपोषण करण्याच्या निर्णयाबद्दल डॉ नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात लिहितात की, 'मुख्यमंत्र्यांकडे मागणी करत याचकाच्या भूमिकेत फिरण्यापेक्षा चळवळीचे तेज प्रगट करत त्या आधारे मागणी मान्य करून घेणे अधिक श्रेयस्कर आहे. संघटना व चळवळी अशा लढ्यांमधूनच वाढतात. अर्ज विनंती मधून नाही.' त्यापुढे ते उपोषणामागील नैतिक सत्याग्रही भूमिकेचा उल्लेख करतात व लिहितात की.. ही आत्मक्लेषाने शासनाच्या व जनतेच्या सदसद्विवेकबुद्धीला घातलेली साद आहे.
डॉ दाभोलकरांनी हे उपोषण सोडावे यासाठी सरकारकडून कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. दहा दिवसानंतर त्यांनी स्वतःहून उपोषण थांबवले. यात कोणतीही हार किंवा अपमान ��ाही ही त्यांची भूमिका होती. माझ्याव्यतिरिक्त दुसरे कोणीही माझा अपमान करू शकत नाही ही विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीची धारणा देखील त्यामागे होती.
डॉ दाभोलकर पुढे म्हणतात की 'प्रत्येक आव्हान ही एक संधी असते. कायद्याबाबत होणारा विलंब ही समाजाचे कायद्याबाबत प्रबोधन करण्याची संधी म्हणून आपण पाहत आहोत. उपोषणामुळे ही घुसळण प्रचंड प्रमाणात घडली. ही वाटचाल आज ना उद्या पण विजयाकडे जाते याबाबत ��ी निःशंक आहे. '
उपोषणाने सुरू झालेली सामाजिक घुसळण पुढे नेण्यासाठी सोनम वांगचुक तुम्ही हवे आहात. तुम्ही उपोषण सोडावे अशी विनंती आहे.
- मुक्ता दाभोलकर
हा खऱ्या अभिमानाचा क्षण आहे...
अमेरिकेची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी 'यूएस फेडरल रिझर्व्ह'ने (US Fed) निवडलेल्या पाच तज्ज्ञांपैकी तीन भारतीय आहेत.
👍डॉ. रघुराम राजन: आरबीआयचे (RBI) माजी गव्हर्नर ज्यांना भारतात 'देशद्रोही' ठरवले गेले होते—त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी पहा:
~ डॉ. राजन 'यूए��� फेड'च्या ताळेबंदाची (balance sheet) देखरेख करतील.
~ 'यूएस फेड'चा ताळेबंद ६.७४ ट्रिलियन डॉलर्सचा आहे.
~ आरबीआयचा ताळेबंद १ ट्रिलियन डॉलर्सचा आहे.
~ अमेरिकेचा जीडीपी (GDP) ३२ ट्रिलियन डॉलर्स आहे.
~ हे भारताच्या जीडीपीच्या आठ पटींहून अधिक आहे.
अमेरिकेला वाटते की डॉ. रघुराम राजन यांनी या प्रचंड संपत्तीचे व्यवस्थापन करावे... तरीही भारताला मात्र डॉ. राजन यांनी भारताचे व्यवस्थापन करावे असे वाटत नाही.
👍प्राध्यापक राज चेट्टी: हार्वर्डमधील अर्थशास्त्राचे 'सेलिब्रिटी प्राध्यापक'... ��क जागतिक स्तरावरील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व... आणि ते [भारतात ज्या प्रकारे 'कठोर परिश्रम' केले जातात असे सांगितले जाते, तसे] 'कठोर परिश्रम' करत नाहीत!!
~ प्राध्यापक राज चेट्टी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी 'लिक्विडिटी मॅनेजमेंट' (तरलता व्यवस्थापन) — किंवा सोप्या भाषेत सांगायचे तर, रोख रकमेचे व्यवस्थापन — पाहतील.
~ अमेरिकेच्या तरलता व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या या भारतीयाला भारतात मात्र स्थान नाही.
👍आशा शर्मा: मायक्रोसॉफ्टच्या गेमिंग विभागाच्या माजी प्रमुख.
~ त्यांच्यावर अमेरिकेतील उत्पादकता आणि रोजगाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
~ अमेरिकन नागरिकांना नोकऱ्या कशा मिळतील आणि प्रत्येक अमेरिकन नागरिकाची उत्पादकता व विकास कसा वाढवता येईल, हे आशा शर्मा ठरवतील.
~ आशा शर्मा 'विश्वगधा'साठी [जगातील सर्वात मोठा गाढव/मूर्ख] टाळ्या वाजवण्यासाठी विमानतळावर जात नाहीत.
आता सध्या भारतात काय चालले आहे?
~ आरबीआय गव्हर्नरने अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला नाही.
~ मा��ील गव्हर्नर इतिहासाचे विद्यार्थी होते.
~ निर्मला सीतारामन यांना काहीच कळत नाही.
~ मोदींकडे बुद्धी नाही; हे सर्व निरर्थक आहे.
~ अर्थ मंत्रालय नक्की कोण चालवत आहे?
२०१४ पासून भारताने कधी विचार केला आहे का की आपली अर्थव्यवस्था कोणाच्या हातात आहे? नोटाबंदीपासून सुरू झालेला भ्रष्टाचार २०२६ पर्यंत वाळवीसारख्या संकटात रूपांतरित झाला आहे.
नरेंद्र मोदी परदेशात प्रवास करतात आणि भाषण देण्य���च्या नावाखाली स्वस्त दर्जाची विनोदबाजी करतात; जेव्हा जेव्हा मोदी काहीतरी निरर्थक विधान करतात, तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतो! तरीही तुमचा यावर विश्वास नाही का?
कोणत्याही भारतीय राजकारण्यापेक्षा डॉ. रघुराम राजन यांच्या शब्दांना जागतिक स्तरावर अधिक वजन आहे; सध्याच्या 'विदूषकांच्या' टोळीपेक्षा त्यांचा प्रभाव नक्कीच अधिक आहे.
अमेरिका डॉ. रघुराम राजन यांना 'यूएस फेड गव्हर्नर' (US Fed Governor) बनवण्यासाठी किंवा त्याहूनही मोठी जबाबदारी सोपवण्यासाठी तयार करत आहे; भविष्यात ��ॉ. राजन अमेरिकेत एखादे महत्त्वाचे पद भूषवण्याची शक्यता आहे.
डॉ. रघुराम राजन यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञाला केवळ म्हणूनच भारतातून बाहेर काढले गेले, कारण त्यांनी मोदींच्या सदोष धोरणांशी तडजोड करण्यास नकार दिला होता.
डॉ. राजन यांचे म्हणणे बरोबर होते—भारतीय अर्थव्यवस्था विनाशाच्या दिशेने वाटचाल करत आहे. चोरी आणि अर्थव्यवस्था यात फरक असतो कारण चौकीदार चोर आहे..
https://t.co/PCi2vmYKKF
आज महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने झालेल्या, माझ्या भाषणात दुसऱ्या महायुद्धाचा संदर्भ देताना विन्स्टन चर्चिल यांचा मुद्दा मांडताना मी चुकीने व्ही फॉर व्हिक्टरी आणि व्ही फॉर विन्स��टन म्हटलं. खरंतर मला भाषणाच्या मांडणीत व्ही फॉर इनव्हिन्सीबल असं अपेक्षित होतं. वी आणि व्ही मधे बोलताना गडबड झाली. ही चूक नंतर माझ्या लक्षात आली म्हणून त्याचं स्पष्टीकरण दिलं. बाकी मुद्दे आणि भाषणाची चित्रफीत सोबत जोडली आहेच.
��) २००८ ला रेल्वे भरती प्रकरणावरून आंदोलन झालं, त्यातून पक्ष वाढत गेला, पक्ष मोठा होत गेला. पक्षाला चिन्ह देखील रेल्वे इंजिन मिळालं. २००८ ला जे रेल्वेचं आंदोलन आपण केलं होतं ते विसरू नका. महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीत मराठी टक्का वाढला पाहिजे यासाठीचं ते आंदोलन होतं. त्यावेळेस माझ्यासकट असंख्य महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या गेल्या, जेलमध्ये टाकलं गेलं. खरंतर प्रश्न साधा होता. महाराष्ट्रात जर रेल्वे भरती आहे तर त्याच्या जाहिराती मराठी वर्तमानपत्रांत न येता त्या उत्तरेकडच्या राज्यांच्या वर्तमानपत्रांत कशा येतात यावरून ते आंदोलन सुरु झालं. त्यावेळेस इथल्या स्टेशनांवर ही उत्तर प्रदेश बिहारच्या तरुणांची गर्दी होती. आपल्या महाराष्ट्र सैनिकांनी जेंव्हा त्यांना विचारलं की तुम्ही इकडे कशाला आलात त्यावेळेस त्यांच्यातल्या काही लोकांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांना शिव्या दिल्या, त्यातून आंदोलन उभं झालं. पुढे या आंदोलनामुळेच हजारो मराठी तरुण-तरुणींना रेल्वेत नोकरी मिळाली. त्यामुळे रेल्वे भरतीवर महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे.
२) मिसिंग लिंकवर दरड कोसळून तिकडे पाणी गळत होतं यावर लोकांनी टीका केल्यावर मुख्यमंत्री म्हणतात या घटनेवर राजकारण करू नका. अरे वा ! तुम्ही दुसऱ्यांच्या वेळेस काय करत होतात ? तेंव्हा तुम्ही जी आंदोलनं केली, टीका केली, ते राजकारण नाही आणि हे मात्र राजकारण. मुख्यमंत्री म्हणतात एकवेळ मला बोला पण महाराष्ट्राला काही बोलू नका. लोकं मिसिंग लिंकबद्दल बोलत आहेत, यात कुठे महाराष्ट्राचा अपमान आला? हे वरपासून खालपर्यंत सुरु आहे. केंद्राची एखादी गोष्ट चुकली आणि तुम्ही काही बोललात की तुम्ही देशविरोधी. लोकांनी प्रश्न विचारायचे नाहीत ? इतके दिवस सत्ताधारी जे ट्रोलिंग विरोधकांना करत होते, ते यांच्या अंगलट आलं आहे. आज यांच्यावर जेंव्हा दाम��ुप्पट टीका सुरु झाली तेंव्हा हे मात्र कांगावा करायला लागलेत.
३) राम मंदिराच्या दानपेटीतील अपहाराबद्दल बोललो की म्हणे धर्माचा अपमान. अरे चोरी आहे ना ती याच्यात धर्म कुठे आला ? राममंदिराबद्दल आम्हाला पण आस्था आहे. पण तिथे जेंव्हा १४०० कोटी गायब होतात तेंव्हा आम्ही बोलायचं नाही. बरं आम्ही बोलल्यावर आम्हाला म्हणणार वक्फ बोर्डावर का नाही बोलत. आम्हाला काय करायचं आहे वक्फ बोर्डात काय सुरु आहे त्याच्याशी? या देशातील हिंदू भाविकांनी श्रद्धेने देवाला अर्पण केलेल्या पैशाचा अपहार होतो यावर बोललो की त��म्ही आम्हाला धर्मविरोधी ठरवणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रय होसबळे म्हणाले की गैरहिंदू या घटनेचा गैरफायदा घेतील. काय बोलताय ? या ट्रस्टवर भाजप, आरएसएस आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांची लोकं आहेत. कल्पना करा असा अपहार भाजप सत्तेत नसताना झाला असता तर? भाजप असो आरएसएस असो की विश्व हिंदू परिषद असो यांनी मोर्चे काढले असते, आंदोलनं काढली असती. त्याला राजकारण म्हणलं असतं तर कोणी ?
४) २००५ ला मुंबई��� प्रचंड ढगफुटी होऊन काही तासांत हजार मिलिमीटरच्या आसपास पाऊस पडला होता. त्यावेळेस मुंबई पाण्याखाली गेली होती. यावेळेस ३०० मिलीमीटर पाऊस झाला तरी मुंबईची तशीच अवस्था झाली. त्यावेळेस टीका करणारे आज गप्प का आहेत ? या सगळ्यावर भाजपचे एक मंत्री म्हणतात, ही नैसर्गिक आपत्ती आहे यावर टीका करू नका. तुमच्याकडून झालं की लगेच नैसर्गिक आपत्ती आठवते का ?
५) काल मुख्यमंत्री विधिमंडळात म्हणाले मिसिं�� लिंकवर राजकारण करणाऱ्यांना बघून घेईन. ही कुठली भाषा ? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात ना तुम्ही ? बरं ते झाल्यावर हिंदीत पण तेच बोलले ? कोणासाठी हिंदीत बोललात ? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विधिमंडळात हिंदीत का बोलतो ? बहुदा वरच्यांना सांगत असतील बघून घेईन म्हणून.
राममंदिराच्या विटांपासून यांचा धंदा सुरू झाला.तो थेट देवळातल्या दानापर्यंत येऊन पोचला.काशी,मथुरा बाकी है- या घोषणेकडे या अर्थाने पाहिले पाहिजे.बाकीचे देव यांच्या कचाट्यातून तूर्तास सुटले आहेत.उद्याची खात्री कुठल्याच देवाला देता येणार नाही.असे खतरनाक भक्त असतील तर देव-धर्माला बाहेरच्या शत्रूंची काय गरज आहे?