पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सेवक सहकारी पतसंस्थेच्या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आयोजित गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षकांच्या गौरव सोहळ्यादरम्यान विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांना वाव देत तयार केलेल्या विविध वस्तूंच्या स्टॉल्सना भेट देऊन त्यांच्या कलाकृतींची पाहणी केली. विद्यार्थिनींच्या कल्पकतेचं, मेहनतीचं आणि कौशल्याचं कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिलं.
एबीपी माझा चे न्यूज रिपोर्टर निलेश बुधावले वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा संदर्भात खोट्या आणि तथ्यहीन बातम्या प्रसारित करीत आहेत. याबाबतीत एबीपी माझा च्या संपादकांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे.
जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका मांडायची असेल, तेव्हा ती आम्ही स्वतः प्रसारमाध्यमांसमोर मांडू. विनाकारण कोणतेही तथ्य नसलेले तर्क-वितर्क माध्यमांनी लावणे थांबवावे.
बीड जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण विभागांच्या आढावा बैठका पार पडल्या. यामध्ये नगर–बीड–परळी रेल्वे प्रकल्प, ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास, मानव विकास निर्देशांक, क्रीडा विकास तसेच ऑलिम्पिकवीर स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या आयोजनासंदर्भातील विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
नगर–बीड–परळी रेल्वे प्रकल्प हा बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, मराठवाडा मुक्ती दिन (१७ सप्टेंबर २०२६) पर्यंत प्रकल्पाचा पुढील टप्पा पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासन व स्थानिक प्रशासनाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या. राज्य शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल तसेच स्थानिक अडथळे दूर करून कामांना गती देण्याचे निर्देशही देण्यात आले.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास या क्षेत्रांवर विशेष भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. डीपीडीसीच्या निधीचा पारदर्शक, परिणामकारक आणि गुणवत्तापूर्ण वापर करून शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. विविध विकासकामांचा आढावा घेत निश्चित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
यावेळी दिवंगत अजितदादा पवार यांनी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चित केलेल्या विकासाभिमुख दृष्टिकोनातून काम करण्याचे आवाहन करण्यात आले. लोकाभिमुख आणि उत्तरदायी प्रशासनाच्या माध्यमातून विकासकामांना अधिक गती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
यानंतर जिल्हा क्रीडा संकुल समिती तसेच ऑलिम्पिकवीर स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजन समितीची बैठक पार पडली. बैठकीत जिल्ह्यातील क्रीडा पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा क्रीडा संकुलासाठी २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून, या विकासकामांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या.तसेच जिल्ह्यातील व्यायामशाळांना डीपीडीसीमधून सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करणे तसेच संबंधित प्रस्तावांवर त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ऑलिम्पिकवीर स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन राज्याच्या प्रतिष्ठेला साजेशा, शिस्तबद्ध आणि दर्जेदार पद्धतीने व्हावे, यासाठी खेळाडूंच्या निवास, भोजन, वैद्यकीय सुविधा, वाहतूक, सराव तसेच इतर आवश्यक व्यवस्थांचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून स्पर्धेचे यशस्वी आयोजन सुनिश्चित करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
📍 बीड
आज बीड दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या समस्या, अडचणी आणि विविध प्रश्न जाणून घेतले. प्रत्येकाच्या अपेक्षा आणि भावना समजून घेत संबंधित प्रश्नांवर सकारात्मक, प्रभावी आणि वेळेत तोडगा काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास व्यक्त केला.
📍 बीड
आज पहाटे बीड जिल्हा रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. रुग्णालयातील विविध विभाग, उपलब्ध सुविधा तसेच सुरू असलेल्या कामांची पाहणी करून नागरिकांना अधिक दर्जेदार, गतिमान आणि लोकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
याचवेळी बीड जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक कार्डियाक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असलेल्या या ॲम्ब्युलन्समुळे हृदयविकाराच्या रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत अधिक जलद, सक्षम आणि प्रभावी वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. जिल्ह्यातील आपत्कालीन आरोग्य सेवांची क्षमता अधिक बळकट करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
दिवंगत मा. अजितदादा पवार यांनी बीडच्या विकासासाठी घालून दिलेल्या कार्यपद्धतीचा वारसा पुढे नेत, जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देत विकासकामांची प्रभावी अंमलबजावणीला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.
📍 बीड
आज ऐतिहासिक व पवित्र कंकालेश्वर मंदिरात जाऊन भगवान शंकरांचे विधिवत अभिषेक करून दर्शन घेतले.
त्यानंतर मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून विकास आराखड्याचा सविस्तर आढावा घेतला. मंदिराचे ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात ठेवून ही कामे चांगल्या दर्जाची, नीट नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच पूर्ण झालेल्या काही विकासकामांचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले.
भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी कंकालेश्वर मंदिराचे संवर्धन आणि विकास अधिक प्रभावीपणे करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
📍 कंकालेश्वर मंदिर, बीड
अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आज दूरध्वनीद्वारे सविस्तर आढावा घेतला.
यावेळी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील सद्यस्थिती, मदत व बचावकार्याची माहिती जाणून घेतली. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवावी, कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये तसेच आवश्यक त्या सर्व उपाययोजना अत्यंत सतर्कतेने राबवाव्यात, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
पूरस्थितीवर शासनाचे सातत्याने लक्ष असून नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
#Rainalert
#Amravati
आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं.
या कक्षाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी आवश्यक आर्थिक सहाय्य मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. रुग्ण, त्यांचे कुटुंबीय आणि रुग्णालय यांच्यात प्रभावी समन्वय साधून गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी हा कक्ष महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
शासनाच्या वैद्यकीय सहाय्य योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा आणि प्रत्येक गरजू रुग्णाला वेळेत मदत मिळावी, यासाठी शासन कटिबद्ध आहे.
📍 जिल्हाधिकारी कार्यालय, बीड
Doctors For You यांच्या वतीने बीड जिल्हा प्रशासनाला अत्याधुनिक Cardiac Ambulance प्रदान करण्यात आली.
या जीवनरक्षक सुविधेमुळे बीड जिल्ह्यातील आपत्कालीन आरोग्य सेवांना मोठे बळ मिळणार असून, हृदयविकाराच्या रुग्णांना अधिक जलद, सक्षम आणि अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यास महत्त्वपूर्ण मदत होणार आहे.
बीडच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या या मोलाच्या योगदानाबद्दल Doctors For You संस्थेचे मनःपूर्वक आभार.
#Beed
बीडच्या विकासाला नवी गती... ₹६२३ कोटींच्या जिल्हा नियोजन आराखड्यास मंजुरी!
आज पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०२६-२७ या वर्षासाठी ₹६२३ कोटींच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली.
बैठकीत स्व. अजितदादांनी पाहिलेल्या विकसित बीडच्या स्वप्नपूर्तीसाठी निधी, नियोजन आणि प्रशासनाच्या पातळीवर कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच विकासाच्या या प्रवासात सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
विकासकामांमध्ये पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि दर्जेदार नियोजनावर भर देत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. कोणतेही काम ₹१५ लाखांपेक्षा कमी नसावे, तसेच कामांचे तुकडे करून स्वतंत्र प्रस्ताव सादर करू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
जिल्हा नियोजनांतर्गत जिल्हा परिषद व इतर यंत्रणांना उपलब्ध करून दिलेल्या निधीचा योग्य विनियोग करून लोकांच्या विकासासाठी प्रभावीपणे काम करावे, असेही निर्देश देण्यात आले. विकासकामांमध्ये पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्या आणि प्रशासनाच्या गरजांचा समन्वय साधत विकासकामांना प्राधान्य देण्यावरही भर देण्यात आला.
बैठकीतील प्रमुख निर्णय :
▪️ पशुसंवर्धन अंतर्गत कृत्रिम रेतन केंद्र इमारत बांधकामासाठी ₹५.२७ कोटी मंजूर.
▪️ साकूड येथील पशुपैदास प्रक्षेत्र पाणीपुरवठा योजनेसाठी ₹२.९९ कोटी मंजूर.
▪️ १८ पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी ₹४.८९ कोटी मंजूर.
▪️ जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन, जिल्हा परिषदेस विशेष निधी.
▪️ २०२५-२६ मध्ये वन विभागामार्फत ४७५.४ हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवड पूर्ण; येत्या काळात आणखी २६३.३० हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवडीचे उद्दिष्ट.
▪️ हरित बीड वृक्षलागवड अभियानांतर्गत यंदा ६५ लाख ४९ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट.
▪️ ग्रामपंचायत जनसुविधांसाठी ₹३७.५३ कोटी विशेष अनुदान; ९१ ठिकाणी स्मशानभूमी शेड व ग्रामपंचायत इमारतींची कामे.
▪️ ऊर्जा विकास अंतर्गत ६१ कार्यालयांमध्ये अपारंपरिक ऊर्जा साधन विकासासाठी ₹१२ कोटी मंजूर.
▪️ बीड जिल्हा ग्रंथालय इमारत बांधकामासाठी ₹२ कोटी मंजूर; एकूण प्रकल्प खर्च ₹४.९५ कोटी.
▪️ कंकालेश्वर मंदिर विकासासाठी ₹११.२१ कोटींची तरतूद.
यावेळी स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा लोगो व शुभंकराचे अनावरण करण्यात आले. तसेच स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.
बैठकीत ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसह विविध विकासविषयक मुद्द्यांवर लोकप्रतिनिधींनी सूचना व मागण्या मांडल्या. अतिवृष्टीग्रस्तांना मदत, ग्रामीण विकास, रस्ते, पाणीपुरवठा, शेतकरी, आरोग्य, शिक्षण, उद्योग आणि मूलभूत सुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. उपस्थित सर्व विषयांवर मुख्यमंत्री तसेच संबंधित विभागांच्या मंत्र्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही देण्यात आली.
स्व. अजितदादांनी पाहिलेल्या विकसित, सक्षम आणि समृद्ध बीडच्या स्वप्नपूर्तीसाठी विकासाचा संकल्प अधिक वेगाने पुढे नेण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
📍 बीड
गेवराई तालुक्यातील टाकळगाव (हिंगणी) येथे सिंदफणा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे आधुनिक बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या कामाचे भूमिपूजन आज संपन्न झाले.
गेल्या ३५ वर्षांपासून या परिसरातील शेतकरी आणि नागरिक या बंधाऱ्याच्या अडचणी सहन करत होते. १५ ऑक्टोबरनंतर नदीचा प्रवाह कमी होणे आणि मनुष्यबळाने निडल्स हाताळताना होणाऱ्या गळतीमुळे पाणी साचणे कठीण झाले होते. हीच अडचण ओळखून स्थानिक आमदार श्री. विजयसिंह पंडित यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादांकडे या बंधाऱ्याच्या दुरुस्ती आणि बॅरेजमध्ये रूपांतरासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
स्व. अजितदादांच्या दूरदृष्टीतून या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला २६ ऑगस्ट २०२५ रोजी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. त्यानंतर जलसंपदा विभागाने ६ ऑक्टोबर २०२५ रोजी ₹१९.६६ कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली. आज आपण दादांनी लावलेल्या या रोपट्याचा विस्तार करण्यासाठी इथे एकत्र आलो आहोत, अशी भावना व्यक्त केली.
या प्रकल्पामुळे ०.७२ द.ल.घन मीटर शाश्वत पाणीसाठा निर्माण होऊन ११६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. टाकळगाव, हिंगणी आणि हिरापूर या गावांच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असून, भूजल पातळी वाढण्यास, ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना बळ मिळण्यास आणि जलस्रोतांचे पुनरुज्जीवन होण्यास मदत होणार आहे.
संबंधित विभाग आणि कंत्राटदारांना जून २०२७ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत प्रत्येक शेतापर्यंत पाणी आणि प्रत्येक घरापर्यंत समृद्धी पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
उर्वरित ७ बॅरेजची कामे पूर्ण करण्यासाठीही आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असून, यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठका आयोजित करण्यात येतील, असेही सांगण्यात आले. हे बॅरेज केवळ एक विकासकाम नसून, या परिसराच्या जलसमृद्धी आणि शाश्वत विकासाचे नवे पर्व ठरणार आहे.
📍 टाकळगाव , बीड
गेवराई इथं श्री. जयसिंह शिवाजीराव पंडित, डॉ. अजय पंडित आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ‘Sharada Multispeciality Hospital and Research Centre’चं उद्घाटन संपन्न झालं. या आधुनिक रुग्णालयाच्या उद्घाटनाबद्दल पंडित कुटुंबीय, शारदा हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ, सर्व सहकारी डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल व प्रशासकीय कर्मचारी, अॅम्ब्युलन्स चालक, सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी आणि संपूर्ण टीमचं अभिनंदन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
मल्टिस्पेशालिटी, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयसीयू, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, डायग्नॉस्टिक, पॅथॉलॉजी सुविधा, २४ तास इमर्जन्सी सेवा यांसह अनुभवी आणि सेवाभावी डॉक्टर २४ तास उपलब्ध असणं ही काळाची गरज असून, हे हॉस्पिटल त्या सर्व निकषांची पूर्तता करेल, असा विश्वास व्यक्त केला.
बीड जिल्ह्यातील गेवराई आणि आसपासच्या ग्रामीण भागात अत्याधुनिक खाजगी आरोग्य सेवा मर्यादित प्रमाणात उपलब्ध होत्या. त्यामुळं उपचारांसाठी रुग्णांना छत्रपती संभाजीनगर किंवा पुणे इथं जावं लागत होतं. आता गेवराई इथं सुसज्ज, दर्जेदार आणि अनेक स्पेशालिस्ट डॉक्टरांचा समावेश असलेलं हे हॉस्पिटल सुरू झाल्यामुळं परिसरातील नागरिकांचा प्रवासाचा वेळ, अतिरिक्त खर्च आणि गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
वैद्यकीय क्षेत्र हे रुग्णसेवेचं आणि ईश्वरसेवेचं कार्य असून, मानवसेवेचं व्रत जपण्याचं आवाहन करण्यात आलं. तसंच तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून उपचारांची सुविधा उपलब्ध झाल्यानं परिसरातील आरोग्य सेवांमध्ये गुणवत्तापूर्ण भर पडेल, असा विश्वास व्यक्त केला. निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता, संतुलित आहार, नियमित व्यायाम, ताणतणावमुक्त जीवनशैली आणि काम-विश्रांतीचं संतुलन राखण्याचं आवाहन केलं. आजार टाळण्यासाठी प्रत्येकानं स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि डॉक्टरांनी उपचारांसोबत जनजागृतीचं कार्य करून निरोगी समाजनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असं यावेळी अधोरेखित केलं.
हॉस्पिटलमध्ये प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान होणार नाही याची दक्षता घेण्याचे तसंच गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं. यासोबतच गरजू रुग्णांना माफक शुल्कात उपचार मिळावेत, पैशाअभावी कोणताही रुग्ण उपचाराविना परत जाऊ नये आणि रुग्णाचा जीव वाचवणं हेच सर्वोच्च प्राधान्य असावं, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आपला देश आता मेडिकल टुरिझम म्हणून विकसित होत आहे. जगातले रुग्ण उपचारांसाठी आपल्या देशात येतात. इथले डॉक्टर हुशार आहेत आणि युरोपियन, अमेरिकी देशांच्या तुलनेत इथला वैद्यकीय खर्चही कमी आहे. परंतु या सुविधा प्रामुख्यानं शहरी भागात आहेत. त्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर आल्या पाहिजेत, असं यावेळी नमूद केलं.
📍गेवराई, बीड
पुण्यातील सारसबाग येथे देशाचे गृह व सहकार मंत्री आदरणीय अमितभाई शाह, मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या समवेत, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं.
#अण्णा_भाऊ_साठे
आज पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे प्रदान करण्यात आलेल्या ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६’ सोहळ्यास उपस्थित राहिले. याप्रसंगी देशाचे केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमितभाई शाह, मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष श्री. रोहित टिळक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यंदाचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री. अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले, तसेच साहित्यरत्न व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी-कोटी प्रणाम अर्पण केले.
हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नसून राष्ट्रभक्ती, साहस, दूरदृष्टी आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव करणारा ऐतिहासिक क्षण असल्याचे नमूद केले. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी आणि सक्षम नेतृत्वाखाली भारताने जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली असून आर्थिक विकास, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, संरक्षण, परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा अशा प्रत्येक क्षेत्रात देश नवी उंची गाठत असल्याचे सांगितले.
देशाच्या या गौरवशाली प्रवासाला अधिक बळकटी देण्याचे कार्य मा. श्री. अमितभाई शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री. अजित डोवाल प्रभावीपणे करत असल्याचे नमूद केले. अंतर्गत सुरक्षा बळकट करणे, दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई, सीमांची सुरक्षा आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात त्यांच्या योगदानामुळे भारत अधिक सुरक्षित आणि सक्षम राष्ट्र म्हणून उभा राहिल्याचे अधोरेखित केले.
श्री. अजित डोवाल यांचे जीवन राष्ट्रसेवेचे प्रेरणादायी उदाहरण असून, लोकमान्य टिळकांनी दिलेल्या ‘स्वराज्य’ मंत्राच्या रक्षणाची जबाबदारी आज त्यांच्यासारखे समर्पित अधिकारी पार पाडत असल्याने हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेचाही सन्मान असल्याचे अधोरेखित केले. तसेच मा. श्री. अमितभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली देशाची अंतर्गत सुरक्षा अधिक भक्कम झाली असून, भारताची नागरिक म्हणून याचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले. श्री. अजित डोवाल यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
---
आज पुणे स्थित तिलक स्मारक मंदिर में आयोजित ‘लोकमान्य तिलक राष्ट्रीय पुरस्कार 2026’ समारोह में उपस्थित रही। इस अवसर पर देश के गृहमंत्री श्री अमितभाई शाह, मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, लोकमान्य तिलक स्मारक ट्रस्ट के अध्यक्ष श्री रोहित तिलक सहित अनेक गणमान्य उपस्थित थे। इस वर्ष का प्रतिष्ठित ‘लोकमान्य तिलक राष्ट्रीय पुरस्कार’ भारत के राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार श्री अजीत डोभाल को प्रदान किया गया।
अपने संबोधन में लोकमान्य बाल गंगाधर तिलक जी की पुण्यतिथि पर उन्हें विनम्र श्रद्धांजलि अर्पित की तथा साहित्यरत्न एवं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जी की जयंती पर उन्हें कोटि-कोटि नमन किया।
यह समारोह केवल एक पुरस्कार वितरण कार्यक्रम नहीं, बल्कि राष्ट्रभक्ति, साहस, दूरदर्शिता और कर्तव्यनिष्ठा का अभिनंदन करने वाला ऐतिहासिक अवसर है, ऐसा उल्लेख किया। प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी के दूरदर्शी और सक्षम नेतृत्व में भारत ने विश्व मंच पर अपनी विशिष्ट पहचान स्थापित की है तथा आर्थिक विकास, आधारभूत संरचना, प्रौद्योगिकी, रक्षा, विदेश नीति और राष्ट्रीय सुरक्षा जैसे प्रत्येक क्षेत्र में नई ऊँचाइयों को छू रहा है, ऐसा कहा।
देश की इस गौरवशाली यात्रा को और अधिक मजबूती प्रदान करने का कार्य गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह और राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार श्री अजीत डोभाल प्रभावी ढंग से कर रहे हैं। आंतरिक सुरक्षा को सुदृढ़ करना, आतंकवाद के विरुद्ध कठोर कार्रवाई, सीमाओं की सुरक्षा तथा राष्ट्रहित को सर्वोच्च प्राथमिकता देने में उनके योगदान ने भारत को अधिक सुरक्षित और सशक्त राष्ट्र के रूप में स्थापित करने में महत्वपूर्ण भूमिका निभाई है, ऐसा अधोरेखित किया।
श्री अजीत डोभाल का जीवन राष्ट्रसेवा का प्रेरणादायी उदाहरण है। लोकमान्य तिलक जी के ‘स्वराज’ मंत्र की रक्षा आज श्री अजीत डोभाल जैसे समर्पित अधिकारी कर रहे हैं, इसलिए यह सम्मान केवल एक व्यक्ति का नहीं, बल्कि भारत की राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था का भी सम्मान है, ऐसा कहा। साथ ही, अमितभाई शाह के नेतृत्व में देश की आंतरिक सुरक्षा अधिक सुदृढ़ हुई है और भारत की नागरिक होने पर गर्व होने की भावना व्यक्त करते हुए श्री अजीत डोभाल को इस प्रतिष्ठित सम्मान के लिए हार्दिक शुभकामनाएँ दीं।
कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये महिला बॉक्सिंगच्या ५४ किलो वजनी गटात प्रीती पवार आणि ५७ किलो वजनी गटात जास्मिन लांबोरिया यांनी सुवर्णपदक पटकावत भारताचा गौरव वाढवला आहे.
दोन्ही खेळाडूंची ही ऐतिहासिक कामगिरी देशातील युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरेल. दोन्ही सुवर्णकन्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#CommonwealthGames2026
ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तेजस्विन शंकर यांनी पुरुषांच्या डेकॅथलॉन प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदकाची कमाई केली आहे.
या उल्लेखनीय आणि ऐतिहासिक यशाबद्दल तेजस्विन शंकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही ते अशाच सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरीद्वारे भारताचा गौरव वाढवत राहतील, हीच मनःपूर्वक शुभेच्छा.
#CommonwealthGames2026
ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या शॉटपुट (F57) पॅरा प्रकारात सुवर्णपदक विजेते सोमन राणा आणि रौप्यपदक विजेते शुभम जुयाल यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
एकाच स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण आणि रौप्य अशी ऐतिहासिक कामगिरी करत तुम्ही तिरंगा अभिमानाने फडकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल दोघांनाही पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
#CommonwealthGames2026
लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. प्रतापराव पाटील चिखलीकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
@PratapraoPatilc