वेळ हे तुमच्या जीवनातलं एक नाणं आहे. तुमच्याकडे तेवढं एकच नाणं आहे आणि ते कसं खर्च करायचं ते फक्त तुम्हीच ठरवू शक��ा. त्यामुळे सावध रहा, नाहीतर तुमच्याऐवजी दुसरेच कुणी ते खर्च करतील. - कार्ल सॅण्डबर्ग
नव्या वर्षात...
नको तो करोना,
नको कोंडमारा l
फुलवून पिसारा,
लुटू आनंद सारा l
का थांबला प्रवास ?
जगण्याची आस
सुख शांतीचा वास,
भरूनी रहावा ||
आपल्या सर्वांना २०२१ हे आलेले नवीन वर्ष सुखाचे आणि आरोग्याचे जावो ह्या मनापासून सदिच्छा!!!
चिखलात आपण कायमचेच रूतून रहात नाही त्यातून बाहेर निघण्याचा आटोकाट प्रयत्न करतो त्यात प्रमाणे एखाद्या गोष्टीत, वाईट काळात अडकून राहण्यात काही अर्थ नसतो. #मराठी
आपला अहंकार, गर्व हा हेलियम भरलेल्या फुग्यासारखा असतो आपण जसजसे वर जाऊ लागतो तोच परिस्थितीची टोचणी त्याला लागते आणि गपकन फुगा फुटला जातो आणि आपल्याला जबरी मार बसतो. #मराठी