लोक म्हणतात की तुम्ही सिनेमा बघितला आहे का तर त्याआधीच तुम्ही तो सिनेमा वाईट आहे हे कसे ठरवणार?
जर का एखादा सिनेमा श्रीकृष्णांच्या आयुष्यावर काढाचा ठरवला आणि त्यामध्ये AK हंगल श्रीकृष्ण म्हणून दाखवले तर तेथेच सिनेमा बघण्याचा उद्देश संपुष्टात येतो.
ज्याप्रमाणे बाजीराव मस्तानी च्या प्रोमो मध्ये काशीबाई आणि मस्तानी एकत्र नाचताना दिसतात तिथेच तो सिनेमा थेटर मध्ये पैसे देऊन बघण्याचा विषय संपलेला असतो.
सिनेमाचा प्रोमो मुळात यासाठीच बनवलेला असतो की तो तुम्ही सिनेमा बघायला थेटर मध्ये जा. परंतु त्या प्रोमो मध्येच प्रचंड मोठ्या विसंगती समोर आल्या तर सिनेमा बघायला का जाऊ?
कोणाचा प्रश्न असा असतो की तुम्हाला त्या पात्राचा फील यावा त्यासाठी सिनेमा बघायचा आहे का?
तर अर्थातच हो.
सिनेमामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे कास्टिंग. आणि त्यासाठी शेकडो लोकांची टेस्ट का घेतली जाते?
केवळ उत्तम अॅक्टींग आहे म्हणून कोणालाही तो रोल देणे शक्य नसते ना. नसरुद्दीन शहा किंवा ओम पुरी हे जबरदस्त अॅक्टर आहे. पण म्हणून त्याला चॉकलेट बॉय ची भूमिका दिली तर किती पसंत पडेल?
सूर्यवंशम मध्ये म्हातारा अमिताभ आहे तो योग्य वाटतो परंतु त्याचा मुलगा अमिताभ जो त्यावेळी 55 ते 60 वर्षांचा होता तो इतका विचित्र दिसतो आणि त्यासाठी त्यावर टीका देखील होते. अमिताभ बच्चन अगदी उत्कृष्ट सिनेमा कलाकार असला तरी देखील. कारण तो रोल त्याला शोभतच नाही.
Period.
पवार कुटूंबातील सर्वात मोठ्या फ्रॉड व्यक्तीला बघून घ्या. आपली आणि आपल्याच घराण्याची सत्ता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर रहावी म्हणून रोहित पवार या फ्रॉडने MCA ची सदस्यसंख्या १५४ वरून ५७१ पर्यंत वाढवली.
रोहित पवारांनी हा फ्रॉड करताना आपल्या जवळच्या तब्बल ४०० लोकांना MCA चे आजीवन
जीवनाचे खरे सौंदर्य त्या क्षणांत आहे जेव्हा आपण स्वतःशी जोडलेले असतो, सत्याशी प्रामाणिक असतो आणि प्रत्येक श्वासाला कृतज्ञतेने स्वीकारतो.
#मराठी#नेमेचीकाहीतरीलिहितजावे
सर्व परवशं दु:खं
सर्वम् आत्मवशं सुखम् ।
एतद् विद्यात् समासेन
लक्षणं सुख-दु:खयो: ॥
ज्या गोष्टी पराधीन आहेत त्या दु:ख कारक असू शकतात,पण ज्या आपल्या हाती आहेत त्या तर सुखकारक आहेत ना? आणि हेच सुख दु:खाचे लक्षण आहे.
#सुभाषित#मराठी#संस्कृत
तारीख ३ फेब्रुवारी वार मंगळवार वेळ संध्याकाळी ५ ची ! ह्या वेळी मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर आडोशी घाटात "प्रोपेलिन गॅस" चा टँकर उलटला आणि एकच खळबळ उडाली !
महामार्ग पोलिसांना ही बातमी कळताच त्यांनी तात्काळ मुंबईकडे जाणारी लेन बंद केली आणि इथूनच मोठ्या ट्रॅफिक जॅम ला सुरुवात झाली !
"टँकर तर उलटला आहे काय त्याला ? क्रेन ने उचला आणि मोकळा करा रस्ता" ! अशा प्रतिक्रिया येत होत्या पण अश्या प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांना विषयाचे गांभीर्य माहिती नव्हते ! तेच सांगण्याचा हा खटाटोप !
सामान्य लोकांना रस्त्यावरून फिरणारे पेट्रोल टँकर माहिती आहेत परंतु परवा जो उलटला तो प्रोपेलिन गॅस टँकर होता !
पेट्रोल चा टँकर उलटला तर तो क्लिअर करणे तुलनेने सोपे असते कारण पेट्रोल डोळ्यांना दिसते
पेट्रोल जास्त पसरत नाही आणि पेट्रोल चां वास देखील येतो ! परंतु प्रोपेलिन मध्ये पूर्ण उलटे गणित असते ! प्रोपेलिन गॅस दिसत नाही तो बेमालूमपणे हवेत मिक्स होतो ! मिक्स झालेला हा गॅस वाऱ्या सोबत सर्वदूर पसरतो ! आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ह्या गॅस ला "वास" नसतो !
थोडक्यात प्रोपेलिन गॅस लीक म्हणजे "अदृश्य बॉम्ब" असतो !!
स्वेटर घालून खुर्ची वर बसल्यावर आणि अचानक उठल्यावर छोटासा स्टॅटिक करंट चां शॉक आपण प्रत्येकानेच खाल्ला असेल !
बास एवढा छोटासा स्टॅटिक चार्ज देखील प्रोपेलिन गॅस चा भडका उडवायला खूप झाला !
त्यामुळेच घटनास्थळी क्रेन उपलब्ध असताना देखील क्रेन ने टँकर हटवला गेला नव्हता !
कारण जरा जरी घर्षण झाले असते तर होत्याचे नव्हते झाले असते !
आता authoritis कडे एकच पर्याय होता तो म्हणजे नवीन गॅस टँकर आणणे, पडलेल्या गॅस टँकर ची गळती बंद करणे आणि त्यात उरलेला गॅस ट्रान्स्फर करणे ! आता जो रिकामा गॅस टँकर पाहिजे तो पण प्रोपोलिन गॅस नेऊ शकणारा म्हणजेच तसे मानके असणारा पाहिजे होता त्यानंतर ज्या कंपनीचे ते टँकर होते तेथील एक्सपर्ट देखील बोलवावे लागले !
मधल्या काळात ट्रॅफिक ची पर्यायी व्यवस्था करावी लागली , बघ्यांची गर्दी बाजूला करून सेफ झोन बनवावा लागला, फायर ब्रिगेड ला स्टॅण्डबाय वर ठेवावे लागले ! NDRF ची टीम बोलवावी लागली !
रात्र झाल्याने धोका आणखीन वाढला !
बोगद्याच्या शेजारी.टँकर असल्याने बोगदाच एक मोठा सिलेंडर बनला ! कारण बोगद्याच्या दुसऱ्या टोकाला जरी एखादा स्पार्क झाला असता तरी गॅस ने पेट घेतला असता आणि किमान ५ किलोमीटर चां परिसर धमाक्याने उडाला असता!
एवढा भयंकर डिझास्टर टाळण्यासाठी प्रशासनाणे रात्रीचा दिवस केला आणि महत्प्रयासाने गॅस ट्रान्स्फर केला !
जरी सगळे काम झाले असले तरी अजून एक धोका.होता तो म्हणजे एवढ्या वेळात हवेत मिक्स झालेला.गॅस ! त्यामुळे गॅस चे मीटर घेऊन हवेची गुणवत्ता सतत तपासावी लागली !
समजा घाई घाईत ट्रॅफिक मोकळे केले असते तर वातावरणात जमा झालेला गॅस पेटून पुन्हा स्फोट होण्याची शक्यता होती !
त्यामुळे जेव्हा काही तासांनी हवेची गुणवत्ता सुधारली तेव्हाच टँकर उचलण्यात आला आणि मग रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला गेला!
ट्रॅफिक जॅम मोठा झाला त्याची बातमी झाली पण देवा भाऊंच्या प्रशासनाने अथक परिश्रमातून खूप मोठी दुर्घटना टाळली ही खरी मोठी बातमी आहे !
ह्या भीम पराक्रमासाठी महामार्ग पोलिस, NDRF चे जवान, आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय, गॅस कंपनीचे कर्मचारी, क्रेन वाले, फायर फायटर, अशा अनेक निनावी कर्मचाऱ्यांचे ,माणसांचे आभार मानावे तेव्हढे कमीच !🙏
एक साधा नगरसेवक ज्याला निवडून आणता येत नाही जो दर अमावस्या पौर्णिमेला भूमिका बदलतो तो माणूस geo politics शिकवणार 🥴🥴 ते पण कोणाला ? नरेंद्र मोदीला ??
Lol 😂😂
काल मी पुणे शहर वाहतूक पोलीस अंतर्गत सिंहगड रोड वाहतूक विभागातील पोलीस हवालदार प्रमोद कोकणे यांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईबाबत ट्विट केलेले आहे. त्याबाबत अधिकच्या पुराव्यासह हे ट्विट करत आहे.
साधारणतः काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्वप्निल जाधव हा तरुण दुचाकीवरून जात असताना त्याला सिंहगड रस्त्यावरील वडगाव ब्रीज खाली पोलीस कर्मचारी प्रमोद कोकणे यांनी अडवले. लायसन, इंडीकेटर, आरसा, हॉर्न, पीयुसी सगळं तपासलं क्लीअर होतं! हेल्मेट ही घातलेलं होतं!
कशातच सापडत नाही म्हणून साहेब म्हटले गाडीच्या चाकांमध्ये हवा कमी आहे 500 ची पावती कर नाही तर मी ऑनलाईन 1500 ची पावती टाकीन. स्वप्नील म्हटला काहीच चूक नाही साहेब तर पावती का करु? साहेब म्हटले जास्त बोलू नको तुझ्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे अशी आणखी पावती टाकीन!
चूक नसल्याने स्वप्निल पावती करणार नाही यावर ठाम होता. महत्वाचे म्हणजे तो शांतपणे हे प्रमोद कोकणे यांना सांगत होता. परंतु 'अपेक्षित' प्रतिसाद न मिळाल्याने प्रमोद कोकणे यांनी ऑनलाईन चालान नं PNCCM25003891760 ने Signal Jumping चा 1500 रुपये दंड टाकला!
लायसन, आरसा, हॉर्न, पीयुसी, हेल्मेट, वाहतुकीस अडथळा, 500 रु पावती असा प्रवास signal jumping वर येऊन थांबला ज्याचा काहीही संबंध नव्हता!
महत्वाचे म्हणजे ऑनलाईन पावती करताना त्याला evidence image जोडावी लागते. त्या इमेज मी या ट्विट सोबत जोडत आहे. रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या गाडीचे दोन फोटो सिग्नल जंपिंगचा पुरावा म्हणून जोडण्यात आले आहेत!
पावती जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आली आहे हे स्पष्ट आहे. अशाप्रकारे ऑनलाईन पावती टाकायची आणि मग ती खोटी आहे हे सिद्ध करण्यासाठी नागरिकांनी तक्रारी करुन हेलपाटे मारत बसायचे ही काय पद्धत?
सुडबुद्धीने वाहतूक पोलीसांच्या कारवाईचे अनेक प्रसंग ऐकायला मिळत आहेत. जिथे नियमांचा भंग होतो तेथे अवश्य कारवाई व्हायला हवी परंतु अशाप्रकारे मनमानी करुन नागरिकांना मनस्ताप होईल असं वर्तन करणं कितपत योग्य आहे?
शासन प्रशासनाने याबाबत काहीतरी नियमावली तयार करायला हवी. वाहतूक पोलीसाने चुकीची पावती टाकल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचे प्रावधान असावे. या प्रकरणी पोलीस हवालदार प्रमोद कोकणे यांच्यावर काय कारवाई होतेय ते कळायला हवं. पावतीसोबत असलेल्या दोन्ही evidence image येथे जोडत आहे. @CPPuneCity@PuneCityTraffic@PuneCityPolice@DGPMaharashtra@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@ChakankarSpeaks@supriya_sule@iambadasdanve@anjali_damania@BJP4Maharashtra@NCPspeaks@ShivSenaUBT_@Shivsenaofc@mnsadhikrut@MahavikasAghad3@Awhadspeaks@VijayWadettiwar@mohol_murlidhar@DhangekarRavii
पवारांचा पिंट्या थोडक्यात म्हणतोय की मुघलांनी मराठ्यांवर – आया बहिणींवर अत्याचार केले त्यात मुघलांची काहीच चूक नव्हती. छत्रपतींनी आवाज उठवला आणि लढले म्हणून मुघल असे वागले. त्यांनी गपगुमाने अत्याचार सोसले असते तर मुघलांनी प्रेमाने अत्याचार केले असते
म्हणूनच औरंग्या ह्यांचा लाडका!
अनेकदा टाळलं पण काही गोष्टी स्पष्ट होणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर बोलणं सोपं आहे.. १० कामांची यादी देतोय
१. अर्थात मेट्रो
२. सिंहगड रस्त्यावरील, कर्वे रस्त्यावरील, घोरपडी पेठेतील कोंडी फोडण्यासाठी flyover
३. जवळजवळ शून्य लोड शेडींग
४. पुणे विमानतळाचे extension (मी प्रवास करतो मला माहिती आहे याचा किती उपयोग झालेला आहे ते)
५. पुणे मुंबई महामार्गावरील कायमची कोंडी तोडली चांदणी चौकात
६. पुण्यात अनेक झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन झालेले आहे, आणखीनही होत आहे.. एक तर आपल्याच भागात आहे
७. Amongst top 5 FDI destinations in India. कित्येकांची कुटुंबे यावर जगत आहेत
८. वारकरींच्या साठी संपूर्ण पथावर उत्तम व्यवस्था केली. (वारीमुळे प्रदूषण आणि कचरा वाढतो म्हणत घरी बसणाऱ्यांसाठी फायदा होणार नाही पण वारकऱ्यांसाठी निश्चित फायदा झालेला आहे)
९. PMPLM च्या ताफ्यात अनेक इ बसेस आलेल्या आहेत. (अर्थात जे वापरतात त्यांनाच फायदा माहिती आहे), अजून येणार आहेत.
१०. रिंगरोड चे काम सुरु आहे.
आता थोडीशी माहिती असावी म्हणून,
पोटनिवडणुकीत भाजपला नाकारून ज्या माणसाला आमदार व्हायला नकारात्मक लोकांनी भाजप ला मतदान न करून अप्रत्यक्षपणे मदत केली त्याने काय दिवे लावले आहेत म्हणून याही वेळेस पुन्हा त्यालाच जिंकायला मदत करणार आहोत? सध्याच्या कसब्याच्या आमदाराने केलेली किमान ३ विधायक कामे सांगा.. किमान ३! मी भाजपची १० सांगितली
आणखीन एक गोष्ट, आमदाराची कर्तव्ये आणि नगरसेवकाची (महानगरपालिकेची) कर्तव्ये यातला फरक कितपत माहिती आहे? की बाबूंनी वाट लावलेल्या महानगरपालिकेच्या नाकर्तेपणाचे खापर देखील निवडून न दिलेल्या भाजपच्या उमेदवाराच्या खात्यावर ढकलायचं आहे?
याचा अर्थ सगळं काही आलबेल आहे का? नाही! पण कुठल्या तरी आदर्श राज्याची (Utopia) स्वप्नं बघत असाल तर इथेच काय, युरोपमध्ये जाऊन सुद्धा पदरी निराशाच येईल. प्रश्न फक्त इतकाच आहे, सर्व options मध्ये पुण्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि त्याहून पुढे देशासाठी योग्य आहे? माझ्या मते भाजप हाच उत्तम पर्याय आहे.
अवश्य विचार करा आणि .. असो आधी विचार तरी करा! मग चर्चा करू.
आज फोटो टिपण्याचा मोह आवरला नाही, एक हास्याची पाटी हाती लागली, आणि दुसरा पितृपक्षाच्या साक्षीने, Fortuner वर Fortuner चा प्रवास जुळून आला.
@AmhiDombivlikar@MarathiRT@BotMarathi
"निर्लज्ज मानसिकता" कशी असते पहा.
एक अनुभव - आत्ता ५ वाजताची गोष्ट -
मी आणि माझी मुलगी , तिची दुरुस्तीला टाकलेली गाडी गॅरेज मधून आणायला गेलो होतो. नेमकं गॅरेज बंद होतं म्हणून परत फिरलो आणि शिक्षक नगर , कोथरूडच्या सिग्नल वर थांबलो होतो. मागून एक माणूस (ज्याच्या मागे एक छोटीशी - साधारण १ ली मधील मुलगी बसली होती) त्याने जोर जोरात हॉर्न वाजवत "अहो जा ना पुढे" असे सांगितले. मी म्हंटल की " काका , सिग्नल आहे , मी कसा जाऊ ?" तर म्हणाला की "बाकीचे जातायेत तोडून तू पण जा"...मी त्यांना जागा दिली आणि सांगितले तुम्ही जा म्हणून. पण , वाहनं सुरू होती आणि त्यांना वेळेवर जाता आले नाही म्हणून त्यांनी मला जोर जोरात आई बहिणीवरून शिव्या द्यायला सुरुवात केली...जास्त शहाणपणा करून नकोस नाहीतर इथेच दाखवतो अशी धमकी दिली...आणि , गाढवे कॉलनीत निघून गेला.
माझी मुलगी म्हटली की कशी लोकं आहेत ही की स्वतःची नात मागे बसली आहे तरी घाण घाण शिव्या देतात ही माणसं...मी तिला सांगितले की ही मानसिकता निर्लज्जपणाची आहे. स्वतःही कुठले नियम पाळायचे नाहीत आणि आपल्या पुढच्या पिढीला पण तेच शिकवायचे...जो पर्यंत नागरी शिष्टाचार पूर्ण , शेवटच्या माणसापर्यंत रुजत नाही , तो पर्यंत आपला देश , आपले राज्य आणि आपले शहर पुढे जाणार नाही.
.@rajivkhandekar तुम्हाला दलाल म्हणणे चुकीचे ठरेल का?
एका दहशतवादी घटनेला राजकीय वळण देण्यासाठी नीच मानसिकता असलेल्या या फरशी फुष्या ची ट्विट "टीकास्त्र" म्हणून दाखवताना पत्रकारिता खुंटीला टांगून ठेवली का?
सावरकर कळायला बुद्धि आणि लायकी दोन्ही लागते!
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जात्युच्छेदक कार्याची तुलना थेट तथागत गौतम बुद्ध यांच्याशी करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव दृष्टे होते.
सावरकर यांची थोरवी कळायला डॉ. आंबेडकर यांच्यासारखे थोर विचार असायला लागतात! ते येड्या-गबाळ्यांचे काम नाही🤦🏻♂️
गोष्ट - अमूल , NDDB आणि महानंदची
आणि उत्तरं - ' महानंद ' गुजरातला NDDB कडे जाणं महाराष्ट्रातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी असू शकते का याची !!?
ह्या गोष्टीची सुरुवात..खरे वाटणार नाही पण होते एका युद्धापासुन..'दुसऱ्या' महायुद्धापासून..🤯👇
१९३९ ते ४५ चाललेल्या दुसऱ्या महायुद्धाचा भारताला..मुंबईला..फार मोठा फायदा झाला..मुंबईचा व्यापार..पर्यायाने लोकसंख्या ह्या काळात झपाट्याने वाढली..सोबतच..मुंबईच्या गरजाही वाढल्या..ह्यातलीच एक महत्वाची गरज म्हणजे..सकाळच्या चहाची..न् त्याला लागणाऱ्या दुधाची..!
त्यावेळी बहुतेक सर्व गुजरात..पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक मिळून एकच बॉम्बे हे महाराज्य होते..आणि ह्या राज्याचे मुख्यमंत्री होते..गुजरातचे मोरारजी देसाई..!
त्यांनी मुंबईच्या दुधाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी
' बॉम्बे मिल्क स्कीम ' आणली..ह्या स्किमसाठी त्यांनी साहजिकच गुजरातच्याच(😤)..मुंबईपासून ४५० किमी वर असलेल्या कैरा ह्या जिल्ह्याची निवड केली.
तेव्हाच्या बॉम्बेला दूध मिळाले..पण तरीही..तो काळ इंग्रज भांडवलदारांचा होता..म्हणून शेतकऱ्यांना नफा मिळत नव्हता..शेवटी त्या सर्वांनी सरदार पटेल यांनी सांगितल्याप्रमाणे आनंद येथे सहकारी दुग्ध संघ स्थापन केला..व सत्याग्रह करून मुंबईला दूध पुरवठ्याचे कंत्राट त्या सहकारी संघाला मिळवून दिले.
आता..धनाढ्य मुंबईला दूध पुरवून हा संघ चांगलाच मोठा झाला..पण..मुंबईची दुधाची भूक वाढतच होती..त्याच्या पुरवठ्यासाठी हळू हळू गुजरातच्या तालुक्यात - गावात असे दूध संघ तयार झाले.
आणि १९५४-५५ येता येता - 👇
#मराठी
#म
१/n
'मोदींचे आंतरराष्ट्रीय अंधभक्त!' 🤣😄
गेले चार पाच दिवस, आंतरराष्ट्रीय 'अंधभक्तांनी' अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडिया तर या भक्तांच्या लिलांनी दुथडी भरून वाहतो आहे..
'पापुआ न्यू गिनी' हा खरं तर स्वतःला 'ब्लॅक ख्रिश्चन' म्हणवून घेणारा देश. तिथले ९८% नागरिक ख्रिश्चन आहेत.
केरळमधील हिंदू अभिमानाची कथा : सुजया पार्वतीची कथा
सुजया पार्वती हे नाव गेल्या दोन दिवसांपासून केरळ सोशल मीडिया सर्कलवर ट्रेंड करत आहे. ती एक ज्येष्ठ मल्याळी पत्रकार आणि जगभरातील मल्याळी लोकांमध्ये एक परिचित चेहरा आहे. मग ती ट्रेंडिंग का आहे?
8 मार्च रोजी, सुजया यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संघ परिवाराशी संलग्न कामगार संघटना BMS (भारतीय मजदूर संघ) ने आयोजित केलेल्या महिला परिषदेला संबोधित केले. डाव्यांचे वर्चस्व असलेल्या राज्यात जिथे एका धर्माभिमानी हिंदूकडेही "संघी" म्हणून पाहिले जाते, ही घोर चूक होती. परिस्थिती आणखी बिघडवण्यासाठी तिने आपल्या भाषणात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कामाची प्रशंसा केली. तिने असेही नमूद केले की अनेक लोकांनी तिला त्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याच्या निर्णयाबद्दल प्रश्न विचारले, काहींनी तिला "संघी" आहे का असे विचारले. तिने आपल्या भाषणात पुढे म्हटले की, बीएमएस कार्यक्रमाला उपस्थित राहणे तिला संघी बनवत असेल, तर तसं समजा !
एका दिवसानंतर, तिला तिच्या मिडीया हाऊसने 24 न्यूजने निलंबित केले. गंमत अशी आहे की 24 न्यूजचे सीईओ श्रीकांतन नायर यांनी यापूर्वी CITU आणि इतर कम्युनिस्ट-संलग्न संघटनांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावली होती. "फॅसिझम" हा शब्द कम्युनिस्टांनी शक्य तिथे राष्ट्रवादीवर चिखलफेक करण्यासाठी वापरला आहे.
तिचे निलंबन धक्कादायक होते ज्याचे रूपांतर संतापात झाले. लवकरच बीएमएसतर्फे 24 न्यूजच्या मुख्य कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. 24 न्यूजच्या मुख्य भागधारकांपैकी एक असलेल्या गोकुलम गोपालन यांनी तिचे निलंबन मंजूर केले नसल्याचेही म्हटले आहे. काही दिवसांनंतर, सुजया दुसर्या सार्वजनिक कार्यक्रमात हजर राहिली जिथे तिने पुनरुच्चार केला की तिच्या पहिल्या बैठकीत तिने जे सांगितले होते त्यावर ती ठाम आहे.
24 न्यूजच्या व्यवस्थापनाने अखेरीस विविध स्तरांच्या दबावाला बळी पडून तिचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला. सुजया 29 मार्च रोजी पुन्हा रुजू झाली. जणू तिला संदेश पाठवायचा होता, तिने पुन्हा सामील झाल्यानंतर प्रसारित झालेल्या पहिल्या बातमीत भगवा पोशाख घातला आणि त्याच रात्री 24 न्यूजला आपला राजीनामा पाठवला.
सुजयाने स्पष्ट केले आहे की ती मीडिया
क्षेत्रात राहणार आहे, जरी तिने तिच्या योजना स्पष्टपणे स्पष्ट केल्या नाहीत. ज्या राज्यात कम्युनिस्ट, मंदिरे आणि हिंदू जीवन पद्धतीत हस्तक्षेप करून हिंदूंचा अभिमान दुखावणे आणि ठेचून काढणे ही त्यांची करमणूक मानतात आणि जिथे हिंदूंना शक्य तितक्या सर्व मार्गांनी कोपरा दाखवला जातो, तिथे सुजया पार्वती हे खरे प्रेरणास्थान आणि हिंदूंनी कसे असावे याचे ज्वलंत उदाहरण आहे. कम्युनिस्ट फॅसिझमच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या गोष्टींसाठी बोलले पाहिजे. केरळच्या हिंदूंना तुमचा अभिमान आहे, सुजया पार्वती!
#Kerala #KeralaNews #Communism #Hinduism #InternationalWomensDay2023 #HindusUnderAttack @sujayaparvathy