'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमातील नवोदित व प्रतिभाशाली अभिनेत्री शिवाली परब हिचे आज दहीहंडी कार्यक्रमानिमित्त भोकर येथे आगमन झाले असता स्वागत केले. यावेळी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण देखील उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यातील रेल्वे भुयारी मार्गाच्या प्रलंबित कामांसंदर्भात आज विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेतली. भोकर आणि मुदखेड तालुक्यातील नागरिकांनी अलिकडेच एकंदर ७ कामांसंदर्भातील विषय माझ्याकडे मांडला होता. भुयारी मार्ग, रस्ते व ड्रेनेजची कामे रखडल्याने शेतकरी, शाळकरी मुले व वाहनचालकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत असल्याची त्यांची तक्रार होती. याबाबत आज रेल्वे अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा झाली. ही सर्व कामे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होतील, असे त्यांनी सांगितले आहे.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नांदेड येथे स्मारक उभारण्यास राज्य शासनाने आज मान्यता दिली. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे.
महापुरूषांचे पुतळे व स्मारके ही समाजासाठी प्रेरणास्थळे असतात. राजमाता अहिल्यादेवी होळकर या सेवाकार्य आणि दातृत्वाचे प्रतिक होत्या. त्यामुळे नांदेड शहरात त्यांचे यथोचित स्मारक असावे, या नांदेडकरांच्या मागणीला माझा पाठिंबा व सहकार्य होते. त्याला आज मान्यता मिळाल्याचा अतिशय आनंद आहे.
महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली असली तरी आदर्श आचारसंहिता सुरु आहे त्यात शिथिलता देण्यात आलेली नाही. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार आहे - मुख्य निवडणूक अधिकारी
#लोकसभानिवडणूक
माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण साहेब व माजी आमदार सौ. अमिताताई अशोकराव चव्हाण यांचे सहकारी रमाकांत बांद्रे यांच्या दोन्ही कन्या चि.सौ.कां. वर्षा आणि चि.सौ.कां. राणी यांच्या शुभविवाहास उपस्थित राहून नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या.
अर्धापूर तालुक्यातील माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण साहेबांच्या काही सहकार्यांनी आज सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी अर्धापूर तालुक्यातील सार्वजनिक प्रश्न आणि संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली.