अवघ्या रायगडाची शक्ती ज्या ठिकाणी एकवटलेली आहे त्या ठिकाणी नतमस्तक होऊन बंदिस्त डोळयांनी २ मिनिटं जरी व्यतीत केली तरी सहज आपण शेकडो वर्षं ओलांडुन आपण त्या काळात जातो.!
त्यांनी अडचणीतल्या माणसाला धीर दिला, कोरड्या जमिनीला आशेची ओल दिली निराश झालेल्या शेतकऱ्याच्या मनात विश्वास जागवला आज पुन्हा दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यात त्यांचं जाणं अधिक वेदनादायी वाटतं. नाना गेले पण जाताना मराठवाड्याच्या अन्नदात्याला एका मोठ्या आधारापासून पोरकं केलं
मराठवाड्याच्या दुष्काळी मातीत आशेचा थेंब बनून उतरलेलं नाव आज काळाच्या पडद्याआड गेलं. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी मकरंद अनासपुरे यांच्यासोबत बीडसह संपूर्ण मराठवाड्यात पाणी, दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ज्या तळमळीने काम केलं ते विसरणं अशक्य आहे. गावोगावी फिरून +
विद्यानंद बापट यांच्या मतांशी सहमत असणे बंधनकारक नाही; पण त्यांच्या भाषेच्या वैभवापुढे थांबून ऐकावेसे मात्र नक्की वाटते. शब्दांना संस्कारांची किनार तर्काला अभ्यासाची धार आणि मांडणीला पुणेरी पेठसंस्कृतीचे वैचारिक अधिष्ठान लाभले की संवाद किती उंची गाठू शकतो याचे ते उत्तम उदाहरण आहे
डीजे बंदीच्या मुद्द्यावर विद्यानंद बापट आणि मेधा कुलकर्णी यांची मुलाखत नक्की ऐका. त्यांच्या मतांशी सहमत असणे आवश्यक नाही, पण भाषेवरील प्रभुत्व, विचारांची मांडणी आणि मुद्देसूद संवाद कसा असावा याचा उत्कृष्ट नमुना या मुलाखतीत दिसतो.
https://t.co/bMfbP20JFc
एक काळ असा होता की आयटी क्षेत्र म्हणजे यशाची हमी मानली जात होती.दोन-तीन वर्षांचा अनुभव असला तरी लाखो रुपयांचे पगार, आकर्षक जीवनशैली आणि झगमगाट यामुळे तरुणाईचा ओढा एका दिशेने वळला. आवड, क्षमता,कौशल्य आणि समाजाच्या विविध गरजा बाजूला पडल्या;पगाराच्या आकड्यांनीच करिअरची दिशा ठरवली /१
पैसा आवश्यक आहे, नोकरी आवश्यक आहे; पण शिक्षणाचे अंतिम ध्येय फक्त तेवढेच नसते. शिक्षण माणूस घडवते, दृष्टी देते आणि बदलत्या काळाशी जुळवून घेण्याची ताकद देते. म्हणूनच करिअर निवडताना गर्दीच्या दिशेने धावण्यापेक्षा स्वतःची क्षमता, आवड आणि समाजाची गरज ओळखणे अधिक महत्त्वाचे आहे. /५
आई-वडिलांच्या अपेक्षा, स्वतःची स्वप्ने आणि तारुण्याची अनेक वर्षे पणाला लावणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा जर बाजार मांडला जात असेल, तर त्यापेक्षा मोठी शोकांतिका दुसरी कोणती?
कष्ट करणाऱ्यांच्या हातात यशाऐवजी अन्याय येत असेल तर विश्वासाची ही पडझड अत्यंत वेदनादायी आणि चिंताजनक आहे
तर तो कष्ट, स्वाभिमान आणि माणुसकीच्या असंख्य कथांनी घडलेला आहे....बीडविषयी एखाद्या अभ्यासू आणि संवेदनशील व्यक्तीच्या तोंडून आदराचे शब्द ऐकायला मिळाले की मनाला वेगळीच ऊब मिळते.
#बीडकर❤️
काही मथळे आणि काही घटना एखाद्या जिल्ह्याची ओळख ठरवू शकत नाहीत. बीडकडे पाहायचं असेल तर इथल्या मातीचा संघर्ष, माणसांची जिद्द आणि प्रतिकूलतेशी दोन हात करत उभं राहिलेलं जीवन पाहावं लागतं.ज्यांनी बीड जवळून अनुभवलं आहे, त्यांना माहिती आहे की हा जिल्हा केवळ बातम्यांमध्ये दिसतो तसा नाही.