कमिशनचं मिशन पूर्ण होताच या सरकारने समृद्धी महामार्गावरील प्रवाशांना वाऱ्यावर सोडलंय की काय अशी शंका येते. अनेक दिवसांपासून अपघातांचा सापळा बनलेला हा महामार्ग आता दरोडेखोरांचा अड्डाही बनला आणि त्यावर उपाययोजना करण्याऐवजी सरकार दक्षिण ध्रुवावर असल्याप्रमाणे थंडगार पडलंय. सरकारने डोळ्यावरील झापडं काढून समृद्धी महामार्गावर प्रवाशांसाठी सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात, आधीच समृद्धी महामार्ग हा एक पांढरा हत्ती ठरलाय आणि सरकारनेही कमिशन खाऊन ढेकर दिला.. पण त्याचा भार मात्र राज्यातील नागरिकांनी नाहक का सहन करावा?
@Dev_Fadnavis@mieknathshinde
#समृद्धी_महामार्ग #दरोडेखोरी
"शेकडो मैल पायपीट करून भाकरी मिळाल्यानंतर चेहऱ्यावरील समाधानकारक हास्य.."
"आयुष्यात अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावरी�� उमटलेल्या हास्य इतके सुंदर काहीच नाही...."