लेखकाच्या आजीसह नात्यातील 16 स्त्रियांनी आपल्या गर्भाशयाच्या पिशव्या काढून टाकल्या ! ऊसाच्या मळ्यात वाहणारे माताभगिनींच्या अश्रूंचे पाट!
—विश्वास पाटील
'कुस' (womb) या कादंबरीचे लेखक ज्ञानेश्वर जाधवर यांच्या आजीसह त्यांच्या नात्यातील 16 स्त्रियांनी गर्भाशयाची पिशवी काढली! दर महिन्याच्या मासिक पाळीच्या चार दिवसांच्या काळात कामाचा खोळंबा नको म्हणून असे अघोरी कृत्य करण्याची आपत्ती या दुर्दैवी आणि गरीब ऊसतोड मजूर स्त्रियांवर ओढवली. ही ऊसाची तोड म्हणायची की स्त्रीत्वाची हत्या?
एखाद्या लेखकाच्या वाट्याला कादंबरीपेक्षा अधिक नाट्यमय आणि धक्कादायक जीवन येतं. रोहन प्रकाशनने अलीकडे प्रकाशित केलेल्या 'कुस' या कादंबरीतील हे अनुभव वाचले की, वाचकांच्या अंगावर शहारे उभे राहतात. प्रत्येक महिन्याचे चार दिवस मिळून ऊसतोडीच्या हंगामातील सहा महिन्यांपैकी 24 दिवसांचा खाडा होऊ नये म्हणून या माता-भगिनींना अशा दुर्दैवाच्या भयानक कड्यावरून प्रवास करावा लागतो.
नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या अहवालानुसार अशा गर्भाशय काढून टाकणाऱ्या दुर्दैवी स्त्रियांच्या दुःखाचा पाढा हा जसा काही पर्वतासारखा आहे. त्यानुसार एकट्या बीड जिल्ह्यातील 13,000 ऊसतोड मजूर स्त्रियांनी आपल्या गर्भाशयाच्या पिशव्या काढून टाकल्या आहेत. अर्थातच हा आकडा फक्त एका जिल्ह्यातील काही मर्यादित वर्षांचा आहे. मराठवाड्याच्या लातूर, धाराशिव, परभणी, बीड अशा जिल्ह्यांतून सुमारे दहा ते अकरा लाख ऊसतोड मजूर दरसाल सहा महिन्यांसाठी पश्चिम महाराष्ट्रात साखरपट्ट्याकडे स्थलांतरित होत असतात.
बरे, ही पिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी डॉक्टर 40 ते 50 हजार रुपये फी आकारतात. जे पैसे या गरीब स्त्रिया मुकादमाकडून उचल म्हणून कामापोटीची ॲडव्हान्स रक्कम घेतात आणि डॉक्टरांकडे देतात.
पण ऊसमळ्याच्या वसपलीत, काट्याकुट्यात आणि ऊन-पाऊस-थंडीमध्ये काम करणाऱ्या या स्त्रियांची वास्तव परिस्थिती काय आणि त्यांना असे रोजचे वेतन तरी किती मिळते? आजसुद्धा बाकी सर्व खर्च जाऊन या भगिनींच्या हाती दिवसाला फक्त साडेतीनशे रुपये पडतात. या एवढ्या मजुरीतून या शस्त्रक्रियेचा खर्च भागवण्यासाठीसुद्धा त्यांना कितीपट खर्च करावे लागतात!
'कुस' या मराठी शब्दाचा अर्थ गर्भाशय. कादंबरीकार ज्ञानेश्वर जाधवर यांचे बालपणच आपल्या ऊसतोड कुटुंबाच्या टोळीबरोबर उसाच्या मळ्यात गेलेले आहे. आपल्या काही पिढ्या ऊसतोड मजुरांच्या उसाच्या पाचटापासून बनवलेल्या कोपीमध्ये (छोटीशी झोपडी) गंजल्या गेल्याचे त्यांनी स्वतः अनुभवले आहे. याच ऊसमळ्यात लग्ने जुळतात. अनेकदा पार पडतात. थंडीवाऱ्यात बाळंतपणे उघड्यावरच होतात. कादंबरीकार लिहितो त्याप्रमाणे अचानक एका माऊलीचे बाळ पोटात अडलं, तेव्हा तिची सुटका व्हावी म्हणून दुसरी बाई तिच्या पोटावर बसते आणि आचके देते. शुभम नावाचं पोर दुसरी-तिसरीतलं. मध्येच शाळा सोडून आई-बापासोबत ऊसतोडीकडे त्याला जावं लागलं. शाळेच्या आठवणीने ते लेकरू शाळेतल्या गणवेशातच उसामध्ये फिरत असे. शेजारच्या मळेवाल्याने रानातल्या जनावरांपासून आपली पिकं वाचवण्यासाठी इलेक्ट्रिसिटीची जळती उघडी वायर लावलेली असते. तिकडे पाणी आणायला गेलेले हे पोर विजेच्या उघड्या जळत्या तारेत अडकते. जळून काळानिळा झालेला त्या बाळाचा इवलासा देह त्याच्या अंगावरच्या गणवेशासह तिथे ओल्या मातीतच पुरावा लागतो. कारण उगाच पोलीस केसचे झंझट पाठीशी लागू नये.
कादंबरीची भाषासुद्धा कष्टकऱ्यांच्या रक्त आणि अश्रूंनी भिजल्यासारखी सच्ची! डाळीच्या आणि गव्हाच्या चोथ्याच ते कालवण, मायांग, तिची आजारात दोन्ही स्तन दगडासारखे घोटून निबर झाले होते. उघड्यावरची गोणपाटाच्या तटकरीने बनवलेली स्नानघरे, उघड्या बांधावर शौचाला जाणे, अलीकडे अशा ऊसमळ्यातला बिबट्यांचा वाढता वावर. तुमच्या त्या 33 कोटी देवांना सांगा, पुढच्या जन्मी किडामुंगी म्हणून जन्माला घाल. पण बाईचा जन्म नको रे बाबा.
लेखकाने उभे केलेले हे असे काट्या-सरवट्यांचे जग. जे कादंबरीच्या पानात नव्हे, तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज वास्तवात हुंदके देत आहे.
श्री. जाधवर यांची 'कुस' ही कादंबरी म्हणजे हजारो शेतमजूर स्त्रियांच्या व्यथावेदनांचा एक मोठा आकांत आहे. हजारो अशासाठी म्हणतो की, अशा ऊसमळ्यामध्ये काम करण्यासाठी मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यात येणाऱ्या मजुरांची संख्या नऊ ते दहा लाखांत आहे.
या साखरपीडितांचे जीवनमान सुधारावे म्हणून या आधी पंडितराव दौंड आणि गोपीनाथ मुंडे आदींच्या नेतृत्वाखाली समित्या निर्माण झाल्या. पण मराठवाड्यातल्या या वंचित आणि साखर कारखानदारीने शापित ठरलेल्या कमशिक्षित स्त्रियांना आणि आपल्या बालपणाची उघड्यावर हत्या होणाऱ्या लेकरांना मात्र फारसा न्याय कधी मिळालेला नाही.
श्री. ज्ञानेश जाधवर यांनी 'कुस' कादंबरीमध्ये मांडलेली जळजळीत अनुभवांची परी ही कल्पितापेक्षा आणि प्रतिभेच्या पंखांपेक्षाही उंच आहे. ही कादंबरी वाचताना मला निग्रो वाङ्मयातील झोरा नील हर्षटन यांच्या स्त्री दुःखाच्या वेदनेने अतिशय गाजलेल्या 'देअर आईज वेअर वॉचिंग गॉड' अशा कलाकृतींची आठवण झाली. 'कुस' ही मराठीतील अव्वल वास्तववादी कादंबरी स्त्री दुःखाच्या भळभळत्या वेदनांचे विश्व डोळ्यासमोर उभे करतेच. पण एका मोठ्या सामाजिक प्रश्नावर 'जन हो जागे व्हा' अशा आरोळ्या सुद्धा ठोकते!.
अनेकदा तारुण्याच्या कैफामध्ये गर्भाशय काढणाऱ्या स्त्रियांना पुढे अंगदुखी, पाठदुखी अशा अनेक आजार व व्याधींना सामोरे जावे लागते. त्यांच्या कष्टाळू शरीराचा पुढे अनेक व्याधींनी खुळखुळा बनतो. अतिशय प्रवाही, धारदार आणि अंगावर रोमांच उभे करणारी ही वास्तवाच्या बांधावरची कलाकृती किमान मानवी गरजांच्या नावे टाहो फोडते. एक-दोन ठिकाणी तात्त्विक चर्चेमुळे त्या प्रवाहाला बाधा येते. पण तो एखादा-दुसरा दोष सोडला तरी 'कुस' या श्रेष्ठ कादंबरीचे श्रेष्ठत्व मान्य करून सर्वांनीच तिचे जोरकस स्वागत करायला हवे.
बा. ग. केसकर यांची 'सुरवंता' (कोणाच्या खांद्यावर), विजय जावळे यांची 'लेकमात', सरदार जाधव यांची 'कोयता' तसेच अलकनंदा घुगे-आंधळे यांच्या शैलीदार लेखणीतून उतरलेला कथासंग्रह 'अर्धा कोयता', डॉ. दीपा क्षीरसागर यांचा वैचारिक अंगाने या विषयाचा लेखाजोखा मांडणारा 'झुंज तिची पाचटाशी' हा लेखसंग्रह अशा या विषयावरच्या उत्तम कलाकृती मराठी साहित्यात अलीकडच्या काळामध्ये आल्या आहेत. त्यांची सखोल समीक्षा होणे आवश्यक आहे.
एकीकडे मराठी मरत असल्याच्या हाकाट्या सुरू असताना तिच्या प्रांगणात ‘कुस’सारख्या वेगळ्या सशक्त कलाकृतींची भर पडत आहे, या गोष्टीचे वाचकांनी स्वतः ग्रंथ खरेदी करून स्वागतच करायला हवे.
ही कादंबरी रोहन प्रकाशनच्या [https://t.co/JFGNqUuSZt](https://t.co/JFGNqUuSZt) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरुण कादंबरीकार ज्ञानेश्वर जाधवर यांचा भ्रमणध्वनी 9657985935
—विश्वास पाटील
#vishwaspatil #KusNovel #WomensHealth #HysterectomyCrisis #SugarcaneWorkers #MigrantWorkers #RuralWomen #authorvishwaspatil #GenderJustice #SocialJustice #WomenRights #author
🚨 Due to Ethanol your mileage has dropped by 5% to 20% depending on your vehicle.
🚨 Due to price hike in petrol diesel, fuel became expensive by 20%. More price hike will happen.
🚨 Combining all, Indians are paying 30-45% more for petrol diesel than before.
Apart from higher fuel expense, parts of vehicles are also getting damaged.
🇮🇳 Only low IQ or andhbhakt or both will support this govt in #ethanol blending.
I am a CBSE Class 12 student.
After receiving unexpectedly low marks in Physics, we applied for photocopies of my answer sheets through the CBSE reevaluation process.
Today we received the copies.
And I am shattered because the Physics answer sheet uploaded by CBSE is not mine
Analysis by @UremO_24 👑 was accurate 💯✅
Donald Trump posted this image. Signalling escalation in US IRAN WAR and no ceasefire deal.
Only UremO 👑 kept telling you that market clearly showing no deal will happen.
In telegram channel also posted detailed analysis.
Hit like ♥️ to appreciate efforts 😊