क्रांती फक्त शब्दांतून नाही, तर कृतीतून घडते!
ज्यांना समाजाने नाकारले अशा विधवा, परित्यक्ता महिलांना स्वतःच्या वाड्यात आश्रय देऊन फुले दांपत्याने माणुसकीचा आदर्श समाजासमोर ठेवला.
#MahatmaPhule#SavitribaiPhule#SocialReform#HumanityFirst
दिवाळीचा पाडवा.. पण यंदा दादा सोबत नाहीत, ही उणीव प्रत्येक क्षणी जाणवतेय..!
आदरणीय अजितदादांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बारामती सनसेट पॉईंटवर यंदा बारामतीकरांनी एकत्र येत ‘चला, एक पणती घेऊन या...’ या उपक्रमातून दादांच्या स्मृतींना उजाळा दिला. या उपक्रमाला उपस्थित राहून बारामतीकरांशी संवाद साधला.
प्रत्येक पणतीच्या प्रकाशात दादांच्या आठवणी होत्या, त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता होती आणि त्यांनी दिलेल्या प्रेमाची जाणीव होती. दादा आज आपल्यात नसले, तरी बारामतीच्या मातीशी, इथल्या माणसांशी आणि प्रत्येकाच्या मनाशी त्यांचं नातं कायम आहे. हा जिव्हाळा, हे प्रेम आणि या आठवणीच माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे.
दादा, तुमची उणीव कधीच भरून निघणार नाही... पण तुम्ही दिलेला प्रकाश असाच कायम तेवत ठेवण्याचा प्रयत्न करत राहीन..!
पाडवा आणि दादा..!
दिवाळी पाडवा म्हटलं की माझ्यासह राष्ट्रवादी परिवारातील प्रत्येक सदस्यासाठी जणुकाही आनंदाची पर्वणीच..
ज्यांच्याकडे पाहून आपण समाजकारणात पाऊल टाकलं ते आपले प्रेरणास्थान, महाराष्ट्राचे लाडके दादा आज भेटणार, आपल्याला आशीर्वाद.. शुभेच्छा देणार या कल्पनेने सर्वांच्याच मनात एक वेगळाच उत्साह असायचा.. माझ्याही मनात असायचा..
आजही पाडवा आहे, पण आज आपले दादा आपल्यात नाहीत. राष्ट्रवादी परिवाराला आशीर्वाद देण्यासाठी आपले कुटुंबप्रमुख नाहीत. दादांशिवाय हा पाडवा आपल्या पोरकेपणाची जाणीव तीव्र करणारा आहे !
#ajitdada #ncp #dipawalipadwa #diwali
थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त त्यांचे समता, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
मदरशांमध्ये ‘महात्मा फुले शैक्षणिक सप्ताह’, राज्यातील ३६ जिल्ह्यांत निबंध व वक्तृत्व स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमध्ये ‘महात्मा फुले ग्रंथ कोपरा’ तसेच ‘गुलामगिरी’ आणि ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथांचे उर्दू भाषांतर अशा उपक्रमांतून महात्मा फुले यांचे विचार अधिक व्यापक स्तरावर पोहोचणार आहेत.
महात्मा फुले यांच्या समतावादी, पुरोगामी आणि परिवर्तनवादी विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत आणि समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प आहे.
गोकुल में दूध उत्पादकों ने भाजपा को हरा दिया।
तो भाजपा ने चुनाव के बाद नियम बदल दिए - 4 डायरेक्टर ठूँसो, 12 को 16 बनाओ, बहुमत चुराओ। ये दूध उत्पादकों के वोट की चोरी है - जनादेश में मिलावट।
भाजपा इतनी हताश हो चुकी है कि हर जगह सत्ता बचाने के लिए किसी भी हद तक जा रही है।
दूध उत्पादकों का वोट चुराने वाले याद रखें - किसान भूलता नहीं।
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतीची ठिणगी पेटवणारे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
१८७९ मध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करून त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. त्यांचे धाडस, शौर्य आणि मातृभूमीप्रती असलेली निष्ठा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरली.
📍मुंबई प्रेस क्लब : स्व. प्रताप आसबे यांच्या शोकसभेस उपस्थिती
ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि सामाजिक चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते स्व. प्रताप आसबे यांच्या श्रद्धांजली सभेस उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी, स्व. प्रताप आसबेंच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय विचारविश्वाची मोठी हानी झाली आहे. ते केवळ घडामोडींची बातमी देणारे पत्रकार नव्हते, तर राजकीय व सामाजिक घटनांचा सखोल अन्वयार्थ लावणारे व्यासंगी विश्लेषक होते. 'नवशक्ती' आणि नंतर 'महाराष्ट्र टाइम्स'मधील 'महाराष्ट्र देशी' या सदराच्या माध्यमातून त्यांनी केलेले अभ्यासपूर्ण व सडेतोड विश्लेषण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा मोलाचा दस्तऐवज ठरले. सत्तेच्या जवळ राहून नव्हे, तर सत्तेला निर्भीडपणे प्रश्न विचारून त्यांनी पत्रकारितेची प्रतिष्ठा जपली. वैयक्तिक आकस न ठेवता तत्त्वांवर आधारित परखड भूमिका घेणे हे त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य होते, असे यावेळी बोलताना सांगितले.
पत्रकारितेत येण्यापूर्वी युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते म्हणून शेतमजूर, गिरणी कामगार आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातील त्यांचा सक्रिय सहभाग त्यांची सामाजिक बांधिलकी स्पष्ट करतो. त्यांचा हाच पुरोगामी आणि समतेचा विचार त्यांच्या लेखनात सातत्याने दिसत राहिला. विषयाचा सखोल अभ्यास, प्रश्न विचारण्याचे धाडस आणि वंचितांशी असलेली नाळ ही त्यांनी घालून दिलेली त्रिसूत्री आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे. त्यांची लेखणी शांत झाली असली तरी त्यांचे विचार आणि मूल्ये सदैव जिवंत राहतील, अशा भावना व्यक्त करत स्व. प्रताप आसबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
या शोकसभेस माजी खासदार कुमार केतकर, प्रेस क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण, प्रकाश अकोलकर, संजय जोग यांच्यासह पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
#PratapAsbe #HeartfeltTribute #JournalismLegacy #RestInPeace
📍मंत्रालय, मुंबई : जनवादी महिला संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक
राज्यातील कष्टकरी महिला, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शालेय पोषण आहार कर्मचारी व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत महिला कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्न व मागण्यांसंदर्भात मंत्रालयात अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या शिष्ट मंडळासोबत महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत महिला कर्मचारी तसेच जनहिताच्या महत्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पात्र भगिनींचे थकीत व नियमित मानधन, ई-केवायसीसाठी मुदतवाढ तसेच मानधनात वाढ करण्याबाबत मा. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत आवश्यक प्रस्ताव मांडण्यात येईल. तसेच अर्ज नोंदणीचे काम केलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा प्रश्नही वित्त विभागाच्या मान्यतेने तत्काळ मार्गी लावला जाईल, असे यावेळी सांगितले.
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी सवलतीच्या दरात 'आनंदाचा शिधा' तसेच २०२७ मधील महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त 'महात्मा फुले समता शिधा' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्याचा शासनाचा मानस असल्याचे यावेळी सांगितले. याबरोबरच प्राधान्य कुटुंबांची उत्पन्न मर्यादा वाढवून अधिक कुटुंबांचा समावेश करणे आणि डाळी, खाद्यतेलासह जीवनावश्यक वस्तू रास्त भाव दुकानांतून उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार व राज्य वित्त विभागाकडे आपण सातत्यपूर्ण पाठपुरावा करत असल्याचेही यावेळी सांगितले.
शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या थकीत मानधनासाठी १५२.६१ कोटी रुपयांचा निधी जिल्हा स्तरावर वर्ग करण्यात आला आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत सर्व स्वयंपाकी व मदतनीसांच्या खात्यावर रक्कम जमा होईल; तसेच त्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे यावेळी सांगितले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करून त्यांना सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. कष्टकरी महिला, अंगणवाडी व शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या सुरक्षेबरोबरच सामाजिक न्यायासाठी सरकार संवेदनशील पावले उचलण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे शिष्टमंडळातील महिलांना आश्वस्त केले.
#WomenEmpowerment #WomenWorkersWelfare #SocialJustice #MaharashtraGovernment
आदरणीय अजितदादांनी पाहिलेलं स्वप्न उद्या प्रत्यक्षात उतरणार!
पुणे मेट्रो मार्गिका-३ च्या लोकार्पणासह पुणेकरांच्या प्रवासाला मिळणार वेगवान आणि आधुनिक पर्याय!
#PuneMetro
ब्रेकींगः एनसीपी पक्षाचे नेते अमित शाहांना भेटले, दिल्लीत झाली भेट
प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांनी घेतली भेट
राज्यातील सद्य परिस्थितीवर केली चर्चा
📍नाशिक : 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाच्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थिती
नाशिक येथील ऐतिहासिक रामतीर्थावर देशाच्या राष्ट्रपती मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांच्या शुभहस्ते नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाचे धर्मध्वजारोहण उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाले. या ऐतिहासिक सोहळ्यास उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्यासमवेत उपस्थित राहून यज्ञकुंडात मंत्रपुष्पांजली अर्पण केली तसेच धर्मध्वजाचे विधिवत पूजन करून दर्शन घेतले. जीवनदायिनी गोदावरीचे पूजन, यज्ञहवन, वैदिक मंत्रोच्चार आणि शंखनादाच्या मंगलघोषात साधू-संतांच्या पावन उपस्थितीने संपूर्ण गोदातीर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
सिंहस्थ कुंभपर्व हा केवळ धार्मिक उत्सव नसून विविध भाषा, प्रांत आणि संप्रदायांना एकत्र बांधणारा आपल्या समृद्ध सांस्कृतिक व सामाजिक एकतेचा महासंगम आहे. १२ वर्षांनंतर येणाऱ्या या महापर्वाच्या निमित्ताने देश-विदेशातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या स्वागतासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर नगरी सज्ज होत आहे. भाविकांसाठी दर्जेदार पायाभूत सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता, आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थापन या दृष्टीने सर्व प्रशासकीय यंत्रणांचे सूक्ष्म व नियोजनबद्ध काम सुरू आहे. परंपरेचे पावित्र्य जपत आधुनिक नागरी व्यवस्थापनाची सांगड घालत आगामी सिंहस्थ सर्वार्थाने सुकर आणि यशस्वी करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
या प्रसंगी केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्री.प्रतापराव जाधव, नाशिकचे पालकमंत्री श्री. गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. गुलाबराव पाटील, शालेय शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे, पणन मंत्री श्री. जयकुमार रावल, वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे, अन्न आणि औषधी,विशेष सहाय्य मंत्री श्री. नरहरी झिरवाळ, मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. नितेश राणे, महापौर सौ. हिमगौरी आडके-आहेर, खासदार, आमदार तसेच अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्रपुरी महाराज, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज, धर्मसम्राट महंत ज्ञानदास महाराज यांच्यासह विविध आखाड्यांचे प्रमुख महंत, साधू-संत आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
#NashikKumbhMela #SimhasthaKumbh2027 #Trimbakeshwar #SanatanTradition
📍 हॉटेल ताज , नाशिक :
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. याप्रसंगी त्यांचे नाशिक शहरात स्वागत केले.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे उपस्थित होते.
@SunetraA_Pawar
#Nashik #SimhasthaKumbhMela #SunetraPawar #NCP
📍मुंबई : ‘बॉम्बे टाइम्स फॅशन वीक’च्या ‘वीण - द विव्ह’ ‘ए भुजबळ इनिशिएटिव्ह’ कार्यक्रमास उपस्थिती
मुंबईतील सांताक्रूझ येथील ग्रँड हयात येथे आयोजित प्रतिष्ठित ‘बॉम्बे टाइम्स फॅशन वीक’च्या भव्य मंचावर ‘वीण - द विव्ह’ (The Weave) ‘ए भुजबळ इनिशिएटिव्ह’ या संकल्पनेतून येवला पैठणीचे देखणे आणि नजाकतदार रूप देश-विदेशातील फॅशन जगतासमोर दिमाखात सादर झाले. स्थानिक विणकर बांधवांच्या सक्षमीकरणाचा ध्यास घेऊन डॉ. शेफाली भुजबळ आणि पल्लवी गोयल यांनी सादर केलेल्या या विशेष शोमध्ये पारंपरिक पैठणीला आधुनिक डिझायनिंगचा सुरेख साज चढवण्यात आला होता. प्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया डिसुझा-देशमुख यांनी शो-स्टॉपर म्हणून रॅम्पवर उतरत येवला पैठणीच्या राजेशाही सौंदर्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आणि समृद्ध ऐतिहासिक परंपरा लाभलेली येवला पैठणी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मंचावर पाहून मन अभिमानाने भरून आले.
या विशेष फॅशन शोमध्ये पारंपरिक पैठणीला आधुनिक डिझायनिंगचा सुरेख साज चढवण्यात आला होता. प्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया डिसुझा-देशमुख यांनी शो-स्टॉपर म्हणून रॅम्पवर उतरत येवला पैठणीच्या राजेशाही सौंदर्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. येवल्याच्या कष्टकरी आणि कुशल विणकरांच्या हातातील सुवर्णकलेला अशा प्रतिष्ठित व्यासपीठावर मानाचे स्थान मिळवून देणे, ही आपल्या सर्वांसाठीच अभिमानास्पद बाब आहे. या दिमाखदार फॅशन शोचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल डॉ. शेफाली आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष कौतुक आणि अभिनंदन केले.
येवला पैठणीला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी आणि स्थानिक विणकर बांधवांच्या हाताला निरंतर काम देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले. आपल्या प्रयत्नांना मिळालेले हे यश समाधान देणारे आहे. पैठणी हे केवळ एक वस्त्र नसून तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, संस्कृतीचा आणि कारागिरांच्या घामाचा अनमोल ठेवा आहे. येवल्याच्या या शाही हातमाग वारशाला प्रतिष्ठित आणि लोकप्रिय मंचावर पोहोचवण्यासाठी डॉ. शेफाली भुजबळ आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत कौतुकास्पद व दिशादर्शक असल्याचे यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास राज्याचे परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक, महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंजक भुजबळ, आमदार श्री. प्रकाश सुर्वे, आमदार श्री. मिलिंद नार्वेकर, आमदार श्री. सत्यजित तांबे, श्रीमती वर्षा पटेल, अभिनेत्री नेहा पेंडसे, फॅशन डिझायनर प्राजक्ता दातार, यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
#YeolaPaithani #BombayTimesFashionWeek #VeenaTheWeave #MaharashtraHandloomHeritage
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय आ. दिलीप वळसे पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
साहेब आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो हिच सदिच्छा !!
@Dwalsepatil
डॅड…
आज तुम्हाला आमच्यातून जाऊन नऊ महिने झाले, पण मन आजही तुम्ही आमच्यात नाही, हे स्वीकारायला तयार नाही.
प्रत्येक दिवस तुमच्या आठवणींनी सुरू होतो आणि तुमच्या उणीवेची जाणीव करून देत संपतो. आजही वाटतं, तुम्ही अचानक समोर यावं, नेहमीच्या करारी आवाजात हाक मारावी, पाठीवर हात ठेवून “काळजी करू नकोस, मी आहे ना!”असं म्हणावं. पण आता या भावना आठवणींतच जपून ठेवाव्या लागत आहेत.
डॅड, तुम्ही आयुष्यभर कामालाच प्राधान्य दिलंत. स्वतःच्या अडचणी बाजूला ठेवून जनतेच्या प्रश्नांसाठी धावणं, आव्हानांना सामोरं जाणं आणि प्रत्येक जबाबदारी निष्ठेने पार पाडणं, हे मी तुमच्याकडून शिकलो. शेतकरी, कष्टकरी, युवक आणि सर्वसामान्य माणसाची सेवा हीच खरी जबाबदारी आहे,ही शिकवण तुम्ही कृतीतून दिलीत.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असो किंवा बारामती विधानसभा पोटनिवडणूक, प्रत्येक टप्प्यावर तुमची उणीव प्रकर्षाने जाणवली. या काळात जनतेने दाखवलेलं प्रेम आणि व्यक्त केलेला विश्वास पाहून मन भरून आलं. तुम्ही आयुष्यभर जनतेला आपलं कुटुंब मानलंत आजही जनतेच्या मनात तुमच्याविषयी असलेली आपुलकी तुमच्या कार्याची खरी पावती आहे.
डॅड, अवघ्या महाराष्ट्रासाठी तुम्ही अजितदादा होतात, पण माझ्यासाठी तुम्ही माझे वडील, माझा भक्कम आधार, माझी ताकद आणि माझं सर्वस्व होतात. आयुष्यात कितीही यश मिळालं, कितीही संकटं आली, तरी तुमचा सल्ला, तुमच्याशी होणारं बोलणं आणि यशानंतर तुमची पाठीवर मिळणारी कौतुकाची थाप कायमची हरवली,ही उणीव मनात राहील.
तुम्ही दिलेले संस्कार आणि शिकवण हाच माझा आधार आहे. तुमच्यासारखं कामाप्रती प्रामाणिक राहणं, जनतेशी बांधिलकी जपणं आणि प्रत्येक जबाबदारी निष्ठेने पार पाडणं, हाच माझा प्रयत्न असेल. तुमच्या विचारांशी प्रामाणिक राहून जनतेने तुमच्यावर केलेल्या प्रेमाचा मान राखणं, हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे.
तुम्ही प्रत्यक्ष माझ्यासोबत नसाल, पण माझ्या प्रत्येक निर्णयात तुमची शिकवण, प्रत्येक पावलात तुमचे संस्कार आणि प्रत्येक श्वासात तुमच्या आठवणी कायम असतील.
डॅड, तुमची खूप आठवण येते तुमचा मुलगा म्हणून तुमच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा जपण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहीन.
मिस यू डॅड..
📍वांद्रे, मुंबई :
मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार स्व. प्रताप आसबे यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी सोबत माजी खासदार समीर भुजबळ हे होते.
महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक घडामोडींचे तटस्थ विश्लेषण करणारे आणि तीन दशकांहून अधिक काळ निर्भीड व विवेकवादी पत्रकारिता जपणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व आज आपण गमावले आहे. त्यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि आसबे कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती लाभो, हीच प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली!
#PratapAsbe #HeartfeltTribute #RestInPeace #JournalismLegacy
मंत्रिमंडळातील सहकारी, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. मकरंद जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेच्या वाटचालीस यश लाभो, हीच सदिच्छा!
@makrandpatil99#happybirthday
आदिकवी महर्षी वाल्मिकी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
महर्षी वाल्मिकी यांनी रामायण या महान ग्रंथाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला सत्य, न्याय, त्याग, कर्तव्य, बंधुता आणि मानवतेचा अमूल्य संदेश दिला. त्यांच्या साहित्याने भारतीय संस्कृती, परंपरा आणि नैतिक मूल्यांना समृद्ध केले. प्रभू श्रीरामांच्या जीवनचरित्रातून आदर्श राज्यव्यवस्था, कुटुंबातील नात्यांचे महत्त्व, वचनपूर्ती आणि कर्तव्यनिष्ठेची शिकवण देणारे रामायण आजही समाजाला योग्य दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहे.
#MaharishiValmikiJayanti #AdiKaviValmiki #Ramayana #IndianCulture