This guy/bot won 4 crore and made Karun Nair captain and also included Karn Sharma ahead of Bumrah. Both Karn Sharma and Karun Nair didn't play so far and were not in playing xi.
Never play grand league.... Complete Fraud!!
आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती. आधुनिक भारतातील समाजसुधारणांचा पाया महात्मा ज्योतिबा फुलेंनी घातला. १९ व्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यात देशात, राज्यात जेंव्हा मोठ्या प्रमाणवर धर्मसुधारणा, सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी सुरु झाल्या, त्याचं नेतृत्व महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं.
महात्मा ज्योतिबांकडे सखोल चिंतन होतं, समाज हिताबद्दलची कमालीची आस्था होती आणि त्यां��ं चिंतन कृतिशील होतं. शिक्षण व समता या दोन शब्दांत त्यांच्या आयुष्यातील विविध टप्प्यांमध्ये केलेल्या सामाजिक कार्याची मूळ प्रेरणा दिसते. समाजोद्धारासाठी शिक्षण हेच प्रमुख अस्त्र आहे हे हेरून १८४८ ला पहिली मुलींची शाळा सुरु करणारे महात्मा ज्योतिबा फुलेच आणि ‘ईश्वर एकच व निर्गुण-निराकार आहे. ईश्वराच्या भक्तीसाठी कोणालाही कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. धार्मिक कर्मकांडावर विश्वास ठेवू नका म्हणत समाजाचे प्रबोधन करणारे महात्मा फुलेच.
राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांवर महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांचा पगडा होता.
महात्मा जोतिबा फुलेंना आधुनिक भारताचे पहिले समाज क्रांतिकारक असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, इतकं त्यांचं कार��य म���ठं आहे.
महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याच ऐकलं .
देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय ? भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत ��रून दाखवावं.... आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का ? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता... भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का ?
सध्या MMR रिजन मधे चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्���व्यातून सुरवात होताना दिसत आहेत . हे काय चाललय हे न समजण्या इतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं ! हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडाव ?
आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला , त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येउन मराठीत बोलून गेले . त्या ब्रि��िश माणसा��ाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशी बुवांना हे समजू नये ? या असल्या काड्या घालून ( अर्थात राजकीय हेतू असल्या शिवाय हे होणे नाही ) नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे ! बाकी सविस्तर ३० तारखेला गुढीपाडव्याला बोलूच !
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्���ात ठेवावं !
राज ठाकरे ।
��गप्रसिद्द तबला वादक, पद्मविभूषण, उस्ताद झाकीर हुसैन यांचं दुःखद निधन झालं. निसर्गातील प्रत्येक गोष्ट एका लयीत सुरु असते, मग तो श्वास असू दे की वाहणारा वारा असू दे की फुलणारी फुलं असू देत, या प्रत्येकातील लय अगदी मोजक्या लोकांना जाणवते, अनुभवता येते, आणि अशी माणसं अतिशय लयबद्ध असतात, तालबद्ध असतात, आणि ती त्यांच्या क्षेत्रातील योगी पुरुष ठरतात. उस्ताद झाकीर हुसैन हे तबल्��ातील 'तालयोगी' हो��े असं मला नेहमी वाटत राहिलं.
असं म्हणतात झाकीर हुसैन यांचे वडील अल्लाह रखा खान साहेबांनी, जाकीरजींच्या जन्मानंतर लगेचच त्यांच्या कानात हळूच तबल्याचे बोल सांगितले.
असलं जबरदस्त बाळकडू किती जणांच्या वाट्याला येतं मला माहित नाही, आणि जरी आलं तरी ते पेलवावं झाकीरजींनीच.
वयाच्या १२ व्या वर्षापासूनच ते वडिलांच्या सोबत मैफिलीत साथीला बसू लागले. तो काळ असा होता की पंडित रविशंकर यांच्याम��ळे ��ारतीय वाद्यसंगीताबद्दल जाग��िक पातळीवर प्रचंड आकर्षण निर्माण झालं होतं, आणि जगभरातील नामांकित वादक, भारतीय वाद्यसंगीताच्यासोबत विविध प्रयोग करायला उत्सुक होतं. एका अर्थाने भारतीय संगीत जागतिकरणाच्या युगात शिरत होतं, अशावेळेला झाकीर हुसैन यांनी, 'शक्ती' बँडची स्थापना केली, आणि भारतीय संगीताची शक्ती जगाला अधिकच जाणवू लागली.
प्रत्येक वाद्य त्या वादकाला काहीतरी सांगत असतं, आणि ते ऐक�� येणं आणि त्याला वादकाने प्रत��साद देणं ही क्रिया निरंतर सुरु असते. अशी निरंतर पण खूप खोल प्रक्रिया उस्तादजी आणि तबल्यात जवळपास ७३ वर्ष सुरु होती. जी आज थांबली. उस्तादजी जरी अनंतात विलीन झाले तरी त्यांच्या तबल्यावरचा ताल अनंत काळापर्यंत ऐकू येईल.
उस्ताद झाकीर हुसैन यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.
#ZakirHussain