वडाळा पश्चिम येथे वडाळा उद्योग भवन गेट क्र. १ समोर पदपथावर अनधिकृत चायनिज अन्नपदार्थाचा स्टॉल दिवस-रात्र सुरू असतो. पदपथावर अनधिकृतपणे हॉटेल सारखे टेबल देखील ठ���वले आहेत. तेथे अनधिकृत शेड सुद्धा बांधण्यात आले आहे. या अनधिकृत स्टॉल व शेडवर कारवाई करण्यात यावी.
@mybmc @mybmcWardFN
@mybmc@mybmcWardL विनोबा भावे नगर, खान अब्दुल मजीद मार्ग, नोवेलटी बेकरी जवळ अनधिकृत उसाच्या रसाचा गाडा आहे. पदपथावर असलेल्या या अनधिकृत गाड्या मुळे नागरिकांना नाहक उपद्रव होतआहे. तरी यावर कारवाई करावी.
मार्गदर्शक खूण - स्ट्रीट लॅम्प क्र. LJB 025 011 जवळ
भोंगळ कारभाराचा उत्तम नमुना @myBESTBus बस मार्ग क्र.४४ आधीच श्रावण यशवंते चौका पर्यंत मर्यादित केला, आणि आता अनियमित वेळापत्रकानुसार आपण बस गाड्या चालवत आहात. अतिशय बोगस कारभार करून प्रवाशांची सुयोग्य गैरसोय चालू आहे. त्याबद्दल बेस्ट प्रशासनाचे आभार!!!
@myBESTBus भोंगळ कारभाराचा उत्तम नमुना म्हणजे तुम्ही!!! बस मार्ग क्र.४४ वरळी ते काळाचौकी असा मर्यादित केल्यानंतर, आता सकाळी ऐन कामावर जायच्या वेळेत महिला विशेष बस चालू करून, तुम्ही इतर प्रवाशांना वेठीस धरत आहात.
@myBESTBus गेल्या १ तासात २ वेळा बस क्र.४४ केवळ श्रावण यशवंते चौक (काळाचौकी) पर्यंत सोडण्यात आली आहे. वरळी, लोअर परळ या विभागातील आम्हा प्रवाशांना काळाचौकी पुढे प्रवास करावयाचा आहे, आम्ही प्रवास कसा करावा?? कृपया लांबपल्याची डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी चौक पर्यंत धावणारी बस चालवावी.
वाद,प्रतिवाद,टोला, प्रतिटोला, विधानसभा, प्रतिविधानसभा ही नाटक संपली असतील तर जरा जनतेचा विचार ��रा.टाळेबंदी मुळे जनता पिचली आहे लोकल प्रवासाची मुभा द्यावी. मास्क लावून जनतेचं तोंड कायमच बंद करता येणार नाही.