सौ. सुनंदाताई पवार यांचे वडील, श्री. मोहनराव नामदेवराव भापकर
(रा. बारामती) यांचं आज वृद्धापकाळाने दुःखद निधन झालं. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो!
भावपूर्ण श्रद्धांजली.
(अंत्यविधी आज दुपारी ४:३० वा. ढेकळवाडी,बारामती येथील भापकर वस्तीतील शेतात होईल)
'स्त्रियांनी जी प्रगती केली त्या प्रमाणात मी समुदायाच्या प्रगतीचे मापन करतो.'
या उच्च विचारांची कास धरून दीन- दलितांना समाजात समान स्थान मिळवून देणारे युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
आज जलदिन आहे. पाऊस अनियमित होतोय. प्रत्येकाने पाण्याचा वापर जपून करणे आवश्यक आहे नाहीतर खुप मोठी किंमत मोजावी लागेल. बोलण्यापेक्षा कृती करावी लागेल. इस्रायल सारखा देश आपल्या समोर आदर्श असला पाहिजे. पाणी जीवन आहे 🙏😊💧
या धुलीवंदनला पाणी वाचून पर्यावरण समृद्धीचा वसा घेऊया तसेच यावर्षी रासायनिक रंगाने नाही तर प्रेमाने धुलीवंदन साजरी करूया !
सर्वांना धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा !
#HappyHoli
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
सर्व मराठी भाषिक व रसिकांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!
#मराठी_राजभाषा_दिवस