मतदार यादीतून नाव वगळल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही- सर्वोच्च न्यायालय
नागरिकत्व ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा पुनरुच्चार
#supremecourt#citizenship
उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे आज संध्याकाळी. मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि पोलीस सह आयुक्त ( वाहतूक) यांच्याशी संवाद साधून पाणी तुंबणारी ठिकाणे, दरड कोसळणाऱ्या जागा, धोकादायक झाडे, शाळा, किनारपट्टी वरील झोपड्या, मिठी नदी परिसरातील रहिवासी याबाबत आपत्कालीन यंत्रणेने केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला.
पावसासोबतच सोसाट्याचा वारा आल्यास महापालिकेचे अग्निशमन दल, आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने मदत कार्य होईल या दृष्टीने सतर्क ठेवा अशा सूचना केल्या.
केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर सध्या पतंगबाजी सुरूय
राजनाथ सिंह यांचे मंत्रीपद जाणार, अमित शाह उपपंतप्रधान होणार इथपर्यंत अंदाज लावले जातायेत
मात्र, या केवळ चर्चा असून यापैकी खूपच कमी अंदाज खरे निघतील
खरं काय हे फक्त 2 जणांना माहिती आहे
#cabinetreshuffle
Cabinet Reshuffle is NOT happening this weekend.
PM .@narendramodi Ji is in Seychelles from June 27–29, 2026, as Guest of Honour for Golden Jubilee celebrations of Seychelles' National Day & I don't think Cabinet Reshuffle can happen in his absence 😂
NO CHANGE IN CCS.
Some Big names will be dropped for sure but NO-ONE from CCS.
Rest are all rumours (maybe originated from paid campaigns). Ignore.
Just remember:
-In 12 yrs of Modi Sarkar, no-one has been able to guess what's in Modi-Shah Ji's minds. All speculations have failed.
-Portfolios in Modi Sarkar are not decided by Corporates, Power Brokers or Dalal Prestitutes as used to happen in UPA Govt.
-BJP National Team will be declared 1st followed by Cabinet Reshuffle.
-Modi Ji & .@AmitShah Ji are laughing their heart out reading 'verdicts' given by many in SM.
Take a Chill Pill & Enjoy Weekend.
अचानक दोन-तीन दिवसांची सुट्टी मिळाली. घरात बसून फोन स्क्रोल करत होतो. ट्विटरवर सहज एक व्हिडिओ दिसला, मणी रत्नम यांचा 'अलैपयुधे' चित्रपटाचा एक सीन. संगीत इतकं गोड आणि हृदयाला स्पर्श करणारं होतं की, मी ऐकतच बसलो. मग थोडं शोधलं आणि समजलं की, २००२ साली त्याचा हिंदी रिमेक झाला आहे. त्याचे नाव 'साथिया'. मुख्य भूमिकेत रानी मुखर्जी आणि विवेक ओबेरॉय. मग काय, मी विचार केला ,चला बघूया. आणि मग काय, दोन दिवसांत मी राणी मुखर्जीचे तीन चित्रपट एकामागून एक पाहिले. साथिया, मर्दानी ३ आणि मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे.
पहिला चित्रपट 'साथिया'... हा चित्रपट प्रेमाची सुरुवात दाखवतो. रानी तिथे 'सुहानी' साकारते. एक हळवी, स्वप्नाळू, साधी मुलगी. प्रेमात पडते, लग्न करते, छोट्या-छोट्या गोष्टींमध्येही प्रेम जपते. तिच्या डोळ्यातली ती चमक, हास्य, आणि प्रेमिकेशी बोलतानाची ती सहजता... पाहताना वाटत होतं, प्रेम खरंच इतकं सुंदर आणि खरंखुरं असू शकतं. संगीत ए. आर. रेहमान यांनी दिलेल तर इतकं छान की, गाणी अजूनही मनात घुमतायत. 'साथिया', 'चलका चलका रे'... मुंबईच्या लोकलमधून ते छोट्या घरातल्या नात्यातील गोडवा... सगळं काही हृदयाला घट्ट धरून ठेवतं.
दुसरा चित्रपट 'मर्दानी ३'... इथे रानी पूर्णपणे बदललेली! ती 'शिवानी रॉय'. एक कठोर, धाडसी पोलीस अधिकारी. गुन्हेगारांशी, भ्रष्ट व्यवस्थेशी एकटी लढते. बालकांच्या शोषणाविरुद्ध तिची लढाई पाहून अंगावर शहारे येतात. नजर इतकी तीव्र, आवाजात इतकी ताकद की, केवळ पाहून देखील भीती वाटते. साथिया मधली ती हळवी सुहानी इथे लोखंडी इच्छाशक्तीची शिवानी बनते. एकाच अभिनेत्रीने दोन इतक्या वेगळ्या भूमिका कशा साकारल्या हे पाहून मन थक्क होतं.
आणि तिसरा चित्रपट 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे'... हा चित्रपट खऱ्या घटनेवर आधारित आहे. इथे रानी एक साधी भारतीय आई. 'डेबिका चॅटर्जी'. परदेशात राहत असताना तिच्या दोन्ही लहान मुलांना त्या देशाच्या यंत्रणेकडून काढून घेतले जाते. कारण? फक्त भारतीय पालकत्वा नची पद्धत. हाताने जेवण घालणे, मुलांसोबत झोपणे... हे सगळं त्यांना 'अयोग्य' वाटतं. आता रानी एकटीच उभी राहते. सरकारशी, कायद्याशी, संपूर्ण सिस्टिमशी लढते. मुलांसाठी ती कुठल्याही सीमेपलीकडे जाते. या भूमिकेसाठी राणीला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. तिच्या डोळ्यातली ती आग, लढण्याची ताकद... पाहताना डोळे भरून येतात.तीन चित्रपट... तीन वेगळ्या राणी. एक हळवी प्रेमिका, एक कठोर लढवय्या पोलीस, आणि एक अमर्याद प्रेमाची आई.
पण एक गोष्ट सगळ्यात सारखीच. रानी मुखर्जी प्रत्येक भूमिकेत पूर्णपणे विरघळते. ती फक्त अभिनय करत नाही, ती त्या व्यक्ती साकारते. तिच्या अभिनयात कुठलाही नाट्य नाही, फक्त खरी भावना आहे. या तीन चित्रपटांनी मला एक गोष्ट शिकवली. एक चांगली अभिनेत्री कशी प्रत्येक वेळी नवीन चेहरा दाखवते आणि आपल्या अभिनयाने मन जिंकते. रानी यांचा अभिनय पाहून मन भरून आलं. त्या फक्त अभिनेत्री नाहीत, तर एक पुस्तक आहे.
From anganwadi workers and sanitation staff to women from self-help groups and Ladki Behin beneficiaries, grassroots voices will take centre stage as @mieknathshinde party’s special invitees to witness a historic moment in Parliament during the passage of the Nari Shakti Vandan Adhiniyam. Many have never even stepped on to a flight ever and for them ‘अभी दिल्ली बहुत दूर है’ has always been the only reality…
@Shivsenaofc
On this auspicious Party Sthapana Diwas, heartfelt greetings to all BJP Karyakartas & supporters!
47 glorious years of unwavering dedication to #NationFirst, nation-building & selfless service.
#47YearsOfNationFirst
दोन-तीन वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगाव येथे ‘लोकनिर्माण’ कॅम्पमध्ये माझी विराजशी प्रथम भेट झाली होती. मुळचा गुजरातच्या जुनागढचा असलेला विराज, शिक्षण आणि वास्तव्य सुरतमध्ये पूर्ण केले आहे. याशिवाय, आयआयटी हैदराबादमध्येही त्याने काही काळ उच्च शिक्षण घेतले होते.
त्याचे बोलणे आणि संवाद कौशल्य खरोखरच उल्लेखनीय आहे. एखाद्याला हसवणे, सकारात्मक वातावरण निर्माण करणे आणि संभाषणाला अर्थपूर्ण दिशा देणे यात तो निपुण आहे. गुजराती उद्योजकीय बुद्धिमत्ता म्हणून प्रसिद्ध असते, ती विराजमध्ये स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे एक दिवस तो एक यशस्वी उद्योजक आणि व्यापारी म्हणून नक्कीच उभरेल, याची मला पूर्ण खात्री आहे.
आज अनेक दिवसांनंतर पुन्हा भेट झाली. कॅम्पमधील त्या दहा दिवसांच्या स्मृती, त्यानंतरच्या आयुष्यातील घडामोडी, सर्व काही जिवंत झाले. त्या कॅम्पमध्ये सर्वात जास्त मैत्रीपूर्ण संबंध जोडलेल्या विराजने सध्या मुंबईत नोकरी सुरू केली आहे. नेहमीच व्यस्ततेमुळे भेटी धावत्या होत असल्याने, आज खास वेळ काढून निवांत गप्पा मारण्याचा कार्यक्रम केला.
विराजला काही खरेदी करायची होती म्हणून मी त्याला जुन्या मुंबईतील पारंपरिक बाजारपेठ दाखवली. कपड्यांची निवड केली आणि आठवणींच्या ओघात मोकळेपणाने बोलत राहिलो. त्यानंतर ताडदेव येथील प्रसिद्ध ‘श्रीकृष्णा’ हॉटेलमध्ये जेवणाचा आनंद घेतला.
अशा जुन्या मैत्रीच्या भेटी खरोखरच जीवनाला अर्थपूर्ण बनवतात. विराज, तुझ्यासारख्या मित्रामुळे आयुष्य अधिक समृद्ध आणि प्रेरणादायी होते. आपण मुंबईत आहोत तोपर्यंत अनेकवेळा भेटत राहू.
मला जन्मात कधीच वाटले नव्हते की विराजशी पुन्हा भेट होईल. कॅम्पमधील अनेक मित्रांशी आजकाल फक्त ‘हाय-हॅलो’ पर्यंतच बोलणे होत राहते, पण विराजशी जेव्हा गप्पा मारतो तेव्हा संपुर्ण कँप पुन्हा भेटला असे वाटते.
#Friendship #MumbaiDiaries #Loknirman
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्याने जगाच्या इतिहासात एक नवे पान उघडले. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला आणि बदल्यात इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी प्रभावीपणे बंद केली. जगातील एक-चतुर्थांश तेल आणि गॅस पुरवठा थांबला. कच्च्या तेलाच्या किमती ५० टक्क्यांनी झपाट्याने वाढल्या. यामुळे महागाईने सर्वत्र पाय रोवले आणि लाखो सामान्य कुटुंबांच्या रोजच्या आयुष्यात खोलवर बदल घडवले. इथे मी काही बातम्या व लेख वाचून जगभर या युद्धाचा कसा परिणाम झालाय याचा अभ्यास केला. इराणपासून कुवैत, भारतापर्यंत. विशेषतः भारतात सरकारने घेतलेल्या उपाययोजनांवर आणि जगातील काही ठिकाणी निर्माण झालेल्या लॉकडाऊनसारख्या परिस्थितीवर सविस्तर लिहिण्याचा प्रयत्न केलाय.
इराणमध्ये सामान्य नागरिकांचे आयुष्य पूर्णपणे उलथापालथ झाले आहे. तेहरान आणि इतर शहरांतील कुटुंबांना आता रोजच्या रोटी-पाण्याची चिंता लागली आहे. १९०० हून अधिक लोकांचे बळी गेले. तेलाचे कारखाने, पाण्याचे प्लांट्स नष्ट झाल्याने अन्न आणि पाणी दोन्हींची टंचाई निर्माण झाली. रस्ते रिकामे दिसतात, शाळा बंद आहेत आणि लोक घरातच राहत आहेत. ही परिस्थिती जवळजवळ लॉकडाऊनसारखी आहे. इराण सरकार स्पष्ट सांगते की, अमेरिका-इस्रायलकडून भरपाई मागितली जाईल आणि हॉर्मुझवर आमचे हक्क मान्य करावे लागतील, अन्यथा युद्ध थांबणार नाही. पण सामान्य माणसाच्या मनात एकच प्रश्न आहे, या युद्धात आमचे कुटुंब आणि भविष्य कसे वाचेल? जर हे युद्ध तीन महिने चालले तर लाखो लोक बेघर होतील आणि औषधांचा मोठा तुटवडा निर्माण होईल.
आखाती देशांमध्येही ही काळी सावली दाटली आहे. कुवैत, कतार, सौदी अरेबिया आणि यूएईमध्ये विमानतळ बंद झाली, आकाशात विमाने दिसेनाशी झाली. सामान्य कामगारांना आता फक्त अन्न आणि पाणी हवं आहे. डेसालिनेशन प्लांट्सवर झालेल्या हल्ल्यांमुळे पाण्याची टंचाई भयावह झाली आहे. एलएनजी निर्यात थांबल्याने अर्थव्यवस्था मोडकळीस आलीये. येथेही कामाचे दिवस कमी करून, वाहतूक मर्यादित ठेवून आयुष्य आंशिक लॉकडाऊनसारखे झालयं. या देशांच्या सरकारांनी आंतरराष्ट्रीय मदतीची हाक दिली आणि इराणच्या आक्रमणाचा सामना करण्याची तयारी दर्शवली आहे. पण सामान्य कुटुंबांना रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.
भारतातही या युद्धाची झळ जोरदार पोहोचली. आपल्या देशात ८० टक्क्यांहून अधिक तेल मध्यपूर्वातून येते. त्यामुळे पेट्रोल-डिझेल महाग झाले, शेअर बाजार ७ टक्क्यांनी घसरला आणि रुपया कमकुवत झाला. मुंबईतील टॅक्सी चालकांना इंधन भरण्यासाठी आता पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त खर्च करावा लागतो. देशातील गृहिणींच्या स्वयंपाकघरात जेवण, एलपीजी आणि खत यांच्या किमती वाढल्याने महिन्याचा बजेट आठवड्यातच संपतो. शेती, वाहतूक आणि उद्योग क्षेत्र पूर्णपणे प्रभावित झाले. थोडक्यात महागाई प्रचंड प्रमाणात वाढण्याचा हा इशारा आहे.
पण भारत सरकारने या संकटाला तत्परतेने सामोरे जाण्यासाठी उत्तम उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने सात ‘एम्पॉवर्ड ग्रुप्स’ नेमले. ऊर्जा, अन्न सुरक्षा, महागाई नियंत्रण, शेती, वाहतूक, निर्यात आणि आर्थिक स्थिरता यावर हे रोज बैठक घेऊन निर्णय घेतात. रिझर्व बँकेने १२ अब्ज डॉलर विकून रुपया स्थिर ठेवलाय. ६.२ अब्ज डॉलरचा रिलीफ फंड तयार केला. स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हमधून अतिरिक्त तेल काढले. होटल्स आणि रेस्टॉरंट्सना अतिरिक्त केरोसिन आणि बायोमास वापरण्याची परवानगी दिली जेणेकरून घरगुती एलपीजी वाचेल. रशियन तेलाची आयात वाढवली. परदेशात अडकलेल्या भारतीयांना विशेष विमाने पाठवून परत आणले. पेट्रोल-डिझेलवर कर कमी करून किंमती नियंत्रित ठेवल्या. पंतप्रधान लोकसभेत म्हणाले की, हॉर्मुझ बंदी स्वीकारार्ह नाही आणि आम्ही ऊर्जा सुरक्षितता कायम ठेवू. या सर्व उपायांमुळे सामान्य माणसाला थोडा दिलासा मिळाला, तरीही सर्वसामान्य माणसाच्या खिशावर ताण कायम आहे.
थायलंड, फिलिपिन्स, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका या देशांत इंधन पुरवठ्यात मर्यादा आणलीय. शाळा बंद ठेवल्या, कामाचे दिवस कमी केले आणि घरून काम करण्याचे नियम सक्तीचे केले. यामुळे रस्ते रिकामे दिसतात, दुकाने लवकर बंद होतात आणि आयुष्य लॉकडाऊनसारखे झाले आहे. शेतकरी खत महाग झाल्याने पीक कसे वाढवावे याची चिंता करत आहेत. फिलिपिन्समध्ये शाळा बंद करून इंधन वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही परिस्थिती पूर्ण लॉकडाऊन नाही, पण इंधन तुटवड्यामुळे दैनंदिन जीवन अडकले आहे.
युरोपात जर्मनी, इटली आणि ब्रिटनमध्ये गॅस महाग झाल्याने महागाई ५ टक्क्यांवर गेली. तांत्रिक मंदी आली. लोकांना ऊर्जा बिल इतके वाढले की खाणे-पिणे कमी करावे लागले. सरकारे रशियन तेल घेत आहेत आणि शांतता बोलणी चालवत आहेत. अमेरिकेत गॅस महाग झाला, पण तेल उत्पादक देश म्हणून थोडा फायदा झाला. कॅनडा, नॉर्वे, ब्राझील आणि रशिया या उत्पादक देशांना तेल महागल्याने अर्थव्यवस्था मजबूत झाली.
केनिया आणि मालीसारख्या आफ्रिकन देशांतही इंधन तुटवड्यामुळे महागाई वाढली. नायजेरिया आणि अंगोला यांना उत्पादन वाढल्याने काहीसा दिलासा मिळालाय. मात्र तो पुरेसा नाही.
जागतिक पातळीवर OECD च्या अंदाजानुसार जीडीपी वाढ ०.३ टक्क्यांनी कमी होईल. अन्न आणि वस्तू महाग होतील. शिपिंग खर्च वाढेल. १५० हून अधिक देश या संकटात सापडले आहेत. भारत सरकारने या कठीण प्रसंगी त्वरित आणि व्यवस्थित उपाययोजना राबवून कौतुकास्पद काम केलंय. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एम्पॉवर्ड ग्रुप्स, रुपयाचा स्थिरता, रशियन तेल आयात आणि रिलीफ फंड यांसारख्या पावलांनी सामान्य माणसाला थोडा दिलासा दिलाय. मात्र, अजूनही आपण तेल आयातीवर खूप जास्त अवलंबून असल्याचे स्पष्ट दिसतयं. दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा आणि स्वदेशी पर्यायांवर अधिक ठोस काम करण्याची गरज आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्र संघटनेने (UNO) आपत्कालीन बैठक बोलावल्या आणि तातडीने युद्धबंदी करण्याची मागणी केली. पण आतापर्यंत त्यांचे प्रयत्न फारसे प्रभावी ठरलेले नाहीत. जगाच्या शांततेसाठी UNO ला अधिक सक्रिय, तटस्थ आणि ठोस भूमिका घ्यावी लागेल. हे युद्ध फक्त तेलाच्या किंमती वाढवत नाही, तर लाखो कुटुंबांच्या स्वप्नांना आणि आशांना ठेच पोहोचवते. तरीही सामान्य माणूस शांततेची अपेक्षा करतो. जगाने आता शांततेचा मार्ग निवडला पाहिजे. सामान्य माणसाच्या एकजुटीतच खरी ताकद आहे,शांततेची मागणी करण्याची.
#IranWar #IranMassacre #india #War
२६ मार्च २०२६ रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आकाशाने एक अद्भुत कथा सांगितली...
रात्रीच्या काळ्या कॅन्व्हासवर २००० ड्रोननी रंग भरले आणि महाराष्ट्राची गौरवगाथा उजळून निघाली. राम नवमीच्या पवित्र मुहूर्तावर सांस्कृतिक कार्य विभागाने आयोजित केलेला हा भव्य ड्रोन शो महाराष्ट्रातील पहिल्यांदाच इतक्या विशाल प्रमाणात झाला.
आकाशात उंचावलेल्या ३डी आकृत्यांमध्ये भगवान राम धनुष्यबाण घेऊन उभे राहिले, गणेशजींची प्रसन्न मूर्ती फुलली, संत ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन झाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले उभे राहिले आणि सह्याद्रीच्या रांगांनी पूर्ण आकाश व्यापले.
"जय भवानी जय शिवाजी" चा जयघोष ड्रोनच्या प्रकाशात गुंजला. मुंबईच्या आकाशात आधुनिक तंत्रज्ञान आणि प्राचीन संस्कृती यांचा असा सुंदर संगम क्वचितच पाहायला मिळतो. एकीकडे रामायणातील भक्ती, दुसरीकडे शिवशाहीचे शौर्य आणि मध्यभागी महाराष्ट्राचा समृद्ध वारसा.
हे सगळे रंगीबेरंगी प्रकाशाच्या लाटांमध्ये साकारले गेले. हा सोहळा मुंबईकरांसाठी खरी पर्वणी ठरला. हजारो नागरिक डोळे भरून पाहत होते, मोबाईल कॅमेरे उंचावत होते आणि मनात अभिमान भरत होता. महाराष्ट्राचा इतिहास हा नेहमीच प्रेरणादायी आहे.
स्वराज्यासाठी झगडणारे शिवराय, भक्तीचा ज्वालामुखी फुलवणारे संत, आणि आज त्या वारशाला ड्रोनच्या माध्यमातून नवीन उंची देणारे हे आधुनिक प्रयत्न.
जय भवानी! जय शिवाजी! जय श्री राम!
भारतीय रेल्वेने कन्फर्म तिकिटांच्या रद्दीकरण नियमांत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
हे नवीन नियम १ एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ दरम्यान टप्प्याटप्प्याने लागू होणार आहेत.
नवीन नियमांनुसार, ट्रेनच्या निर्धारित वेळेपूर्वी ७२ तासांपेक्षा जास्त आधी तिकिट रद्द केल्यास फक्त निश्चित रद्दी शुल्क वजा करून पूर्ण परतावा मिळेल.
७२ ते २४ तास आधी रद्द केल्यास भाड्याच्या २५ टक्के रक्कम वजा केली जाईल.
२४ ते ८ तास आधी रद्द केल्यास ५० टक्के भाडे वजा होईल आणि ८ तासां आत रद्द केल्यास कोणताही परतावा मिळणार नाही.
याशिवाय, बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सोयही वाढवण्यात आली आहे. आता प्रवाशांना ट्रेनच्या निर्धारित वेळेपूर्वी ३० मिनिटे आधीपर्यंत बोर्डिंग स्टेशन बदलता येणार आहे.
पूर्वी हे फक्त पहिल्या चार्ट तयार होण्यापूर्वीच शक्य होते.
दिल्ली, मुंबई, चेन्नईसारख्या बहु-स्टेशन शहरांतील प्रवाशांसाठी ही सुविधा विशेषतः उपयुक्त ठरणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने हे बदल मुख्यतः टाऊट्स आणि ब्लॅक मार्केटिंग रोखण्यासाठी तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी आणले आहेत.
#IndianRailways #Ashwinivaishnav #IRCTC #RailwayTickets #Railways
पुणे महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प १५,६६९ कोटी रुपयांचा
स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी महापौर मंजूषा नागपुरे यांच्याकडे केला सादर.
आयुक्तांच्या १३,९९५ कोटींच्या आराखड्यात १,६७४ कोटींची भर.
महिलांसाठी ५०० चौरस फुटांपर्यंत मिळकतीला ५०% मिळकतकर सवलत, स्वतंत्र कन्व्हेन्शन सेंटर, शाळांमध्ये पिंक रूम.
ज्येष्ठ नागरिकांना PMPML बस भाड्यात ५०% सवलत.
११ मल्टी-स्पेशालिटी रुग्णालये + प्रसुतिगृहांत IVF सुविधा.
खड्डेमुक्त रस्ते, चेंबर समपातळी, पाणी-रस्ते विकासासाठी १,२१० कोटी.
#PunePMC #PuneBudget @MDNagpure@PMCPune@BhimaleShrinath
२४ मार्च २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
या निकालानुसार, हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्म सोडून ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्मात धर्मांतर केलेल्या व्यक्तींचा अनुसूचित जाती (एससी) किंवा अनुसूचित जमातीचा दर्जा संपुष्टात येतो.
धर्मांतरण केलेल्या व्यक्तीला आरक्षण व संबंधित लाभ मिळणार नाहीत.
#Supremecourt #Delhi #Verdict
नागपूरमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांना मोठा फटका बसला आहे.
पश्चिम आशियातील संघर्ष आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील अडथळ्यांमुळे भारतातील एलपीजी पुरवठा विस्कळीत झाला असून, व्यावसायिक गॅस मिळण्यास ८ दिवसांपर्यंत उशीर होत आहे.
यामुळे अनेक हॉटेल मालकांनी पारंपरिक कोळशाच्या शेगड्यांकडे वळण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या दोन आठवड्यांत हॉटेल्सचा एकूण खर्च २० ते ३० टक्क्यांनी वाढला असून, कच्च्या मालाच्या किमतीही ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
काही छोट्या रेस्टॉरंट्सना मेनू कमी करावा लागला किंवा व्यवसाय तात्पुरता बंद ठेवावा लागला आहे.
#LPG #lpggascrisis #India #IranWar #Nagpur
The Brihanmumbai Municipal Corporation (BMC) has announced a complete water shutdown for large parts of Bandra West, Khar West, and Santacruz West due to the commissioning of a new 750 mm diameter water pipeline in Bandra West.
The work will be carried out from 11 pm on Saturday, March 28, 2026, to 5 pm on Sunday, March 29, 2026, resulting in approximately 16 hours of water disruption. During this period, most areas in Bandra West, Khar West, and Santacruz West will face a total water cut, while some pockets may experience low water pressure. The regular morning water supply (4 am to 8:30 am) will also be severely affected in many societies.
@mybmc@mybmcWardHW #Bandra #Khar #Santacruz #Mumbai
सोने म्हणजे नेहमीच लोकांच्या मनात सुरक्षिततेची भावना असते. घरात सोन्याचे दागिने असले तर मनाला शांती मिळते, लग्नात सोने घेतले तर आनंद वाटतो, आणि गुंतवणूक म्हणून सोने ठेवले तर भविष्याची काळजी कमी होते. पण गेल्या काही दिवसांत सोन्याचे भाव खूपच खाली आले आहेत. जानेवारी २०२६ मध्ये MCX वर १० ग्रॅम सोने ₹१.९३ लाख पर्यंत गेले होते, आता मार्च २३, २०२६ रोजी ते ₹१.३३ ते ₹१.३८ लाखाच्या आसपास आहे. म्हणजे जवळपास ३०-३५% घसरण! हे कसे घडले आणि पुढे काय होईल, हे सोप्या भाषेत समजावून सांगतो.
सगळ्यात आधी युद्धाची भीती आली. इराण-इस्रायल-यूएस यांच्यातील तणाव वाढला, तेलाचे भाव वाढले (तेल $१००+ गेले), महागाई वाढेल अशी भीती झाली. युद्ध सुरू झाल्यावर लोक सोन्याकडे धावले, कारण सोने हे गुंतवणूकीसाठी सुरक्षित ठिकाण म्हणून ओळखले जाते. त्यामुळे सुरुवातीला सोन्याचे भाव वाढले.
पण नंतर काय झाले? अमेरिकेचा डॉलर खूप मजबूत झाला, अमेरिकेच्या ट्रेझरी बाँडचे व्याजदर वाढले, आणि फेड (अमेरिकेची सेंट्रल बँक) व्याजदर कमी करण्याची शक्यता कमी झाली. सोन्यावर व्याज मिळत नाही, म्हणून जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा लोक सोने विकून बाँड किंवा डॉलरमध्ये पैसे ठेवतात. त्यामुळे सोन्याची मागणी कमी झाली आणि भाव खाली आले. युद्धाची भीती कायम आहे, पण डॉलर आणि व्याजदरांच्या ताकदीने सोन्याला मागे ढकलले.
आता मुख्य प्रश्न, पुढे काय? जर हे युद्धजन्य तणाव आणखी काही महिने टिकले, तर सोन्याचे भाव पुन्हा वाढण्याची चांगली शक्यता आहे. कारण तेल महाग राहिले तर महागाई वाढेल, जगभरात अनिश्चितता वाढेल, आणि लोक पुन्हा सोन्याकडे वळतील. मोठ्या बँका (जसे JPMorgan, Goldman Sachs) म्हणतात की २०२६ अखेरीस सोने $६,००० ते $६,३०० प्रति औंस (म्हणजे MCX वर ₹१.८० लाख ते ₹२ लाख+ प्रति १० ग्रॅम) पर्यंत जाऊ शकते. भारतात रुपया कमकुवत असल्याने आणि लग्न-उत्सवाची मागणी असल्याने भाव आणखी वर जाण्याची शक्यता आहे.
सोपे सांगायचे तर, सोने हे 'काळ्या दिवसाचे साथीदार' आहे. आज भाव कमी आहेत म्हणून घाबरू नका, पण सगळे पैसे सोन्यात घालू नका. थोडे थोडे, समजूतदारपणे गुंतवा. कारण कुटुंबासाठी सोने नेहमीच उपयोगी पडते.
#Gold #GoldRate #MarketVolatility
Most people slow down in their 80s. Vijay Nischal did the opposite.
At 85, with no experience of the internet, she launched a YouTube channel to share her lifelong love for cooking.
Three years later, at 88, she has over million followers, inspiring generations with her quick, heartwarming recipes.
Scroll down to see how this Dadi turned decades of passion into a viral sensation!
#DadiKiRasoi #ViralChef #HomeCooking #QuickRecipes
[Vijay Nischal, Dadi Ki Rasoi, Dadi Ki Rasoi, Quick Recipes]