कर्जबाजारीपणा, नापिकी, दुष्काळ याला कंटाळून गेल्या महिन्यात २७ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केलेले फुलसावंगी (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथील शेतकरी स्व. जगजीवन डोंगरे यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचं सांत्वन केलं. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि एक मुलगा आहे. वडील गेल्याने त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी असल्याचं सांगत धीर दिला आणि दिव्यांग असलेल्या त्यांच्या एका मुलीच्या उपचाराच्या खर्चाबाबत काहीही काळजी करु नका, त्याची जबाबदारी आम्ही घेत असल्याचा विश्वास त्यांना दिला. यावेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोल्हापूर, सांगली, मिरज आणि परिसरातील हजारो नागरिक रोज रोजगार, शिक्षण, व्यवसाय आणि वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईकडे प्रवास करतात. करोना काळात बंद असलेली कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस त्यानंतर पुण्यापर्यंत करण्यात आली होती. आणि आता पुढे खडकीपर्यंत करण्यात आली आहे.
कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस पश्चिम महाराष्ट्राच्या लाखो प्रवाशांच्या जीवनरेषा ठरलेली आहे. सह्याद्री एक्सप्रेसला पुन्हा मुंबईपर्यंत करण्याची मागणी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नागरिक करत आहेत. मा. केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. @AshwiniVaishnaw जी यांना विनंती आहे की, त्यांनी सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत करावी.
https://t.co/TuVnyFPYPc
बहुमत असल्याने कुणाला विचारण्याची गरज नाही ही सरकारची सर्व पातळ्यांवर वाढत चाललेली मनोवृत्ती अत्यंत धोक्याची आहे...
लोकसत्ता वृत्तपत्रासाठी मी लिहिलेला लेख!
https://t.co/JCzpSXIM47
राष्ट्रवादी परिवारातील आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या आयुष्यातील आजचा दिवस सर्वात वाईट दिवस आहे असेच म्हणावे लागेल. अजितदादांच्या निधनाची बातमी ही अक्षरशः सुन्न करून टाकणारी आहे. अजितदादा आणि माझे गेल्या जवळपास ३५ ते ४० वर्षांपासूनचे मैत्रीपूर्ण संबंध होते प्रदीर्घकाळ आम्ही एकत्र काम केले.
महाराष्ट्राच्या राजकीय सार्वजनिक जीवनाला अजितदादा पवार यांच्याकडून अजून मोठ्या कार्याची अपेक्षा असतानाच अशा प्रकारे अजित दादांचे अपघाती निधन आम्हा सर्वांच्या राजकीय जीवनात एक कायमस्वरूपी पोकळी निर्माण करून गेलेले आहे. दादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे जे नुकसान झाले आहे ते नुकसान कधीही भरून निघणार नाही.
महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक सर्वाधिक उत्तम प्रशासक व एक अत्यंत मोठा लोकनेता महाराष्ट्राने कायमचा गमावला आहे. अजित दादांची उणीव कायम भासत राहील.
@AjitPawarSpeaks
नगरपंचायत महागांव यांनी तब्बल 30 लाख रुपये खर्च करून डम्पिंग ग्राउंड साठी जमीन खरेदी केली होती, पण सदर खरेदी केलेल्या जमिनीला रस्ता नसल्यामुळे पावसाळ्यात गावातील कचरा घाण हि मेन मार्केट मधील खाजगी मालकीच्या खुल्या भूखंडावर टाकणे सुरुआहे तरी मा.@CollectorYavatm यांनी लक्ष घालावे
अखेर सत्य सामोरे आलेच ! निवडणूक आयोगानेही नाव देतानाही कळत- न कळत हे दाखवून दिले की, एनसीपी ही शरद पवार साहेबांचीच आहे. म्हणून आम्हाला नाव मिळालं, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरद पवार" . हेच खरे जन्मदाते होते पक्षाचे. पण, काही पाकिटमारांनी घड्याळ चोरले. पण, त्यांच्या दुर्देवाने मनगट आमच्याकडेच राहिले. लढाईत नेहमी मनगटच कामी येत असतं. शरद पवार आमचे मनगट अन् त्यात असलेला जोर पुन्हा एकदा महाराष्ट्रात जादू करेल. आता त्यांनी नाव घ्यावे, "एनसीपी - अलिबाबा आणि चाळीस चोर"
@InfoYavatmal@pankaj_ashiya महागांव तालुक्यात प्रचंड प्रमाणात या योजनेत भ्रष्टाचार झाला आहे, कार्यकारी अभियंता यांनी चौकशी करण्याचे आदेश देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची चौकशी तत्कालीन उपअभियंता यांनी केले नाहि. आपण स्वतः यामध्ये लक्ष घालावे हि विनंती.