भयाच्या साखळ्या तुटल्या की क्रांतीला पाय फुटतात. सत्यासाठी उभा राहिलेला जनसमुदाय हा कोणत्याही सत्तेपेक्षा मोठा असतो. कारण तलवारी राज्य जिंकतात, पण निर्भय माणसं काळ जिंकतात. ❤️
मनातलं सगळं सांगावंसं वाटतं,
पण शब्दांआधी भीती उभी राहते.
उत्तर मनासारखं नसेल तर,
जपलेली भावना कुठे हरवून जाते?
म्हणूनच काही प्रश्न ओठांवर थांबतात,
नजरेतच आपलं उत्तर शोधतात.
प्रेम, अपेक्षा, आणि शांत वेदना,
सगळं काही मौनातच उमलतात.
सामान्य माणसांच्या जीवनात स्वतःचा म्हणून सोहळा नाही. एकच सोहळा आहे, ते म्हणजे लग्न. म्हणून ते जोरदार केले जाते. कर्ज काढून खर्च केला जातो. आयुष्यात एक असा दिवस येतो की तुम्ही सर्वांचे लक्ष वेधून घेता, तुम्ही सेलेब्रिटी होता. नवरा नवरी आणि ह्या दोघांचे आईवडील हे त्या दिवसापुरते सेलेब्रीटी असतात.
म्हणून लग्नाचा मोठा सोहळा केला जातो. लोकांचे डोळे दिपून जातील इतका खर्च केला जातो. उभ्या आयुष्याची कमाई लग्न ह्या कार्यक्रमासाठी जाळली जाते. सारी चढाओढ असते. हेवेदावे असतात. भावकीची जिरवणे असते, ताकद दाखवणे असते. लग्नाचा मोठा भपकेबाज इव्हेंट करणे हा आपला अहंकार अधिकाधिक फुलवणे असते.
ज्याला कधी जीवनात Attention मिळालेले नसते मात्र मिळावे अशी अपेक्षा असते ते अधिक भपकेबाज लग्न करतात. माणूस आपल्या आतले न्यूनगंड झाकण्यासाठी बाहेर अधिकाधिक दिखावा करतो. लग्न हा दोन्ही कुटुंबाचा निर्णय असतो, त्यामुळे एखादी व्यक्ती यात समजदार असली, अनावश्यक खर्च टाळणारी असली तरी तिला बहुमतापुढे शांत राहावे लागते. शहाण्या माणसांना कायमच समजदारी दाखवावी लागते.
ज्यांचे रोजचे जगणेच सोहळा (दुःखमुक्त जीवन) आहे, त्यांना असल्या बाह्य सोंगांची गरज पडत नाही.
- निलेश अभंग, कल्याण
#randomthoughts
शाळा व शिक्षण कमकुवत ठेवायच्या, म्हणजे डोकं विचार करणार नाही.. मग माणूस फक्त घोषणांत, भावनांत आणि अंधश्रद्धेत अडकून राहतो..समाज उभा राहतो तो शिक्षणावर, बाकी सगळं त्यानंतर.!❤️
जेव्हा सर्व काही हरवल्यासारखं वाटेल, तेव्हा आठवा तुमच्याकडे अजूनही खूप काही आहे जे अनमोल आहे.
तुमच्या डोक्यावरचं छत, पोटाची भूक भागवणारं अन्न, आणि तुमच्या चेहऱ्यावरचं साधं हसू... हीच खरी श्रीमंती आहे, जी अनेकांना कधीच मिळत नाही.
प्रत्येक अडचण तुम्हाला अधिक कणखर बनवण्यासाठी येते.
संकटांच्या वादळातही, तुमच्या आयुष्यात शांततेचे आणि समाधानाचे क्षण आहेत हे ओळखा. त्यांची किंमत करा.
#life
*अनुभवाच्या काठीवर आयुष्याचा प्रवास सुरू आहे. कोण कसं वागतंय याचं आता आश्चर्य वाटत नाही. कारण आता फक्त स्वतःच्याच सुखात आणि शांततेत जगणं जास्त मोलाचं वाटतं.!*
पावसाळा आलाय, तुमची प्ले लिस्ट आत्ताच अपडेट करून घ्या-
१) ओल्या सांजवेली
२) निशाण तुला दिसलाना
३) चिंभ भिजलेले
४) मन उधाण वाऱ्याचे
५) रोज मला विसरून मी
६) वाटेवरी मोगरा
७) जरा जरा टिपूर चांदणे
८) रेशमी रेशमी
९) भिजून गेला वारा
१०) कधी तू
११) सर सुखाची श्रावणी
१२) तुला पाहता आज ही
१३) मन तळ्यात, मळ्यात
कुणाच्या मापात बसण्यासाठी
स्वतःला कमी करायचं नाही..
सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना
स्वतःला हरवायचं नाही..
प्रत्येकाला आवडणं शक्य नसतं
आणि प्रत्येकासाठी बदलतही राहायचं नाही..
लोकांना तुमची शांतता दिसते पण
त्यामागे किती वेळा स्वतःला समजावलंय
हे कुणालाच दिसत नाही..
म्हणून स्वतःला इतकंही बदलू नका
की एक दिवस आरशात स्वतःलाच
ओळखता येणार नाही..
कारण जगाला खुश ठेवण्याच्या नादात
स्वतःची साथ हरवली
तर जिंकूनही काहीच उरत नाही..