घाटल्या मधील संभाजी नगर, विजयदुर्गा, दत्त मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मुक्तीनगर या परिसरातील स्थानिक महिलांनी हळदीकुंकू समारंभांचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला उपस्थित राहून महिलांशी संवाद साधला.
#tanvikate#Ghatla#HaldiKumkum#IndianTraditions#MakarSankranti
घाटला खारदेव नगर परिसरात विविध ठिकाणी हळदीकुंकू समारंभांचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्वांच्या निमंत्रणाला मान देऊन मी या कार्यक्रमांना उपस्थित राहिले.
#tanvikate#ward153#HaldiKumkum#WomenPower#Shivsena
जनमताचा कौल मान्य!
आज बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे. प्रभाग क्रमांक 153 मधील विजेत्या उमेदवाराचे मी मनःपूर्वक अभिनंदन करते.
धन्यवाद.
#Tanvikate#ward153#shivsena
मैदान आणि हिरवळ संरक्षण
प्रभाग क्रमांक 153 घाटला खारदेव नगरमधील मैदान आणि हिरवळ टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरणपूरक निर्णय घेतले जातील. स्वच्छ, हिरवागार परिसर ठेवून पुढची पिढी सक्षम घडवणार, हा माझा शब्द आहे.
#tanvikate#ward153#shivsena
एसआरए डेव्हलपमेंट
प्रभाग क्रमांक 153, घाटला खारदेव नगरमधील नागरिकांना एसआरए डेव्हलपमेंटच्या माध्यमातून पक्की आणि सुरक्षित घरं मिळावीत, यासाठी मी ठोस प्रयत्न करणार आहे. प्रत्येक कुटुंबाचं घराचं स्वप्न पूर्ण करणार, हा माझा शब्द आहे.
#Tanvikate#ward153#shivsena
युवकांसाठी रोजगार
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक 153, घाटला खारदेव नगरमधील युवकांना रोजगार मिळावा, यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणं आणि योग्य ठिकाणी नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करणार, हा माझा शब्द आहे.
#tanvikate#ward153
प्रचारादरम्यान तुम्हा सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मन भरून आलं. आता फक्त काही दिवस बाकी आहेत, आणि यामध्ये तुमचा पाठिंबा आणि साथ माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुमच्या विश्वासामुळेच मी तुमच्या सेवेत अधिक चांगलं काम करू शकेन.
#tanvikate#ward153#shivsena
ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा
प्रभाग क्रमांक 153 मधील ज्येष्ठ नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी मी विशेष लक्ष देणार आहे. त्यांचा आयुष्याचा उत्तरार्ध आनंदी, सुरक्षित आणि सन्मानाने जावा, यासाठी काम करणार, हा माझा शब्द आहे.
#tanvikate#ward153#Shivsena