A family travelling towards Mumbai had a terrifying experience when a snake suddenly appeared on the windshield of their Hyundai i20 while the car was moving at around 90 km/h on the Mumbai-Pune Expressway. Staying calm, the driver safely pulled over, after which the snake slithered into the bonnet. Members of the Wildlife Welfare Association rushed to the spot, and rescuer Mayur Dalvi safely removed the reptile from the engine compartment without causing harm.
#MumbaiPuneExpressway #SnakeRescue #Pune #WildlifeRescue
🚨 घाटीवडे (दोडामार्ग) येथे विजघर–तिलारी रस्ता प्रकल्पादरम्यान मोठ्या आकाराची झाडे मुळासकट उपटल्याचे आढळले.
📍15.804762, 74.118926
@MahaForest@mahapwdofficial@CMOMaharashtra@MahaDGIPR
झाडतोडीस परवानगी होती का? किती झाडे नष्ट झाली? जबाबदार कोण?
तात्काळ चौकशी व कारवाईची मागणी
They are saying with such pride that they have hunted 30,000 nilgai in 16 years and have even received a Lifetime Achievement Award for it.
Source:- https://t.co/oCO7le7KFN
२०१४ ते २०२५ या फक्त ११ वर्षांच्या काळात, सरकारच्या आशीर्वादाने अदानी समूह ज्या वेगाने देशात पसरला आणि अनेक क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण करत चालला आहे. त्याची झलक दाखवणारी ही चित्रफीत जरूर पहा...
Over the past few years, the Adani Group has expanded at an extraordinary pace—be it the power sector, ports, airports, or almost every major sphere within the state. One by one, critical sectors are being handed over to a single corporate conglomerate.
As Maharashtrians, if we fail to view this rapid consolidation with the seriousness it demands today, inch by inch, vast stretches of land and key assets of this state will slip into the hands of one corporate group.
This video lays out the staggering scale of the Adani Group’s expansion across the state and is well worth watching.
@RajThackeray आशा करतो तुम्ही जसे दोन भाऊ एकत्र आलात तसेच काही वर्षांपूर्वी हे दोन पक्ष वेगवेगळे झाल्यामुळे ज्या मित्रानं मध्ये ज्या भावांडा मध्ये मतभेद झाले होते तेही एकत्र येतील 🙏
@AdvAshutoshBJP@RajThackeray आज लहान मुलांच्या अपहरणावर, मानवी तस्करीवर
केंद्र-राज्य समन्वयाने यंत्रणा उभी केली जात आहे, हेही सामान्य नागरिकांना कळलं पाहिजे. काय केली आहे ? अधीकृत माहिती फक्त सांगा जरा सामान्य नागरिकांना म्हणजे चांगले काम लोकांना पर्यंत पोहचेल!
@AdvAshutoshBJP@RajThackeray पोस्ट कोणत्या पक्षाने टाकली ?तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारातय
मुंबई महापालिका २५ वर्षे तुमच्याच पक्षाकडे असताना, फूटपाथवरील बालभिक्षावृत्ती, अनधिकृत झोपडपट्ट्या, स्थलांतरित टोळ्या
फेरीवाल्यानं विरोधात,स्थलांतरित टोळी ह्या बाबत कोणता पक्ष बोलतोय?
@AdvAshutoshBJP@RajThackeray Dubye साहेब सत्ता कोणाची आहे सध्या किंवा मागच्या काही वर्षात आपल्या काही माहिती आहे का, महानगर पालिकेत, राज्यात आणी केंद्रात? सांगला का सामान्य नागरिकांना
@AdvAshutoshBJP@RajThackeray Dubye साहेबअभ्यास अर्धवट आहे तुमचा सत्ता कोणाची तुम्ही बोलतायत कोणाला? Law and ऑर्डर हा राज्यसरकार चा विषय आहे महानगरपालिकेचा नाही
तुम्ही वकील आहात ना? नक्की?
प्रति,
श्री. देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
सस्नेह जय महाराष्ट्र,
एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण २०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३०% नी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही...
लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का ? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय ? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते ?
यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही ? आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत ? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का ? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही ?
आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत , यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का ? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का ? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे. खरंतर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही !
असो. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून, फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे.
राज ठाकरे ।