To my grandmother who has left us today for heavenly abode.
Just wanted to put it that I love you and hope you're happy now with grandpa. ♥️
Bless you and hope you find peace now.
@HDFC_Bank@HDFCBank_Cares
HDFC Bank has resorted to spam calling via WhatsApp just to incite fear. This number has repeatedly harrased me despite me calling on a normal call.
HDFC bank, you are in big trouble! #cheaters#fraud
महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! 🌿
यंदाचे वर्ष शेती आणि शेतकऱ्यांसाठी अनेक संकटांचे ठरले आहे. पावसाची अनियमितता, दुष्काळी परिस्थिती, पाण्याची टंचाई, वाढत्या उत्पादन खर्चाने बळीराजाचे जीवन अधिकच संघर्षमय झाले आहे. त्यांची अनेक स्वप्ने या मातीत मिसळली, अपेक्षांना तडे गेले मात्र एवढ्या संकटांतही शेतकऱ्याने कष्टाची साथ सोडलेली नाही. पुन्हा उभे राहण्याची, नव्याने पेरणी करण्याची व चांगल्या उद्याची आशा त्याने आजही जिवंत ठेवली आहे.
दिवाळी...अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा सण. आयुष्यामध्ये कितीही संकटे असली तरी आशेचा दिवा विझू विझू द्यायचा नाही हाच या सणाचा संदेश आहे. आज शेतकऱ्याच्या घरात कदाचित अपेक्षित समृद्धी नसेल..अंगणामध्ये उत्साह कमी असेल पण त्याचे कष्ट, जिद्द व आणि संघर्षाला सन्मान देण्याची हीच खरी वेळ आहे.
शेतकऱ्याच्या घामातूनच राष्ट्राच्या समृद्धीची पायाभरणी होते. गावखेड्यांमधील चैतन्य, शेतीची समृद्धी आणि शेतकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावरील समाधान यातच खऱ्या राष्ट्राचे सौंदर्य दडलेले आहे. त्यामुळे या दिवाळीत प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या आयुष्यात आशेचा नवा प्रकाश यावा, संकटांची तीव्रता कमी व्हावी आणि कष्टाला योग्य फळ मिळण्याचे दिवस पुन्हा यावेत, हीच मनापासून सदिच्छा.
बळीराजाच्या शेतात पुन्हा हिरवळ फुलू दे, विहिरी आणि तलाव पाण्याने भरू देत, जनावरांच्या गोठ्यात समृद्धी नांदू दे आणि प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या घरात सुख, समाधान व आनंद नांदू दे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी बळीराजाच्या मनातील आशेची पणती अशीच तेवत राहू दे...!
बळीराजाच्या कष्टांना आणि त्याच्या जिद्दीला मानाचा सलाम व त्याच्या उज्ज्वल उद्यासाठी मनःपूर्वक प्रार्थना..!
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!
#शेती #शेतकरी #दिवाळी #महाराष्ट्र