खटाव तालुक्यातील कटगुण मध्ये जन्मलेल्या ज्योतिबा फुले यांनी पेटवलेल्या क्रांतिज्योतीने समाजाला आयुष्याकडे डोळस पणे पाहण्याचा आदर्श दिला. शिक्षणाची गंगा महिला, गरिब व उपेक्षितांपर्यंत आणणाऱ्या आद्य शिक्षणमहर्षीस त्यांच्या पुण्यादिनी विनम्र अभिवादन !
#mahatmajyotibaphule
हे लक्षात घ्यायला हवे. मराठी चित्रपट सृष्टी समृद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टी आणि रसिकांकडून एवढे तर शिकायला हवे. सिनेमा बनवण्यासोबत तो दाखवण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागत असेल तर मराठीचे हे दुर्दैव आहे.
@hemantdhome21@jitendrajoshi
आमचे मित्र, उत्तम लेखक दिग्दर्शक आणि निर्माता हेमंत ढोमे यांचा सनी व सुप्रसिद्ध अभिनेते जितेंद्र जोशी यांची अफाट कलाकृती गोदावरी हे सिनेमे नुकतेच प्रदर्शित झालेत.. लोकांचा प्रचंड प्रतिसाद या सिनेमांना मिळत असूनही महाराष्ट्रात मराठी चित्रपटाला सिनेमागृह मिळत नाही ही शोकांतिका आहे.
माझे सर्व मराठी प्रेक्षकांना आवाहन आहे की एक वर्ष कोणीही काहीही झाले तरी मराठी शिवाय इतर कोणत्याही भाषेचा सिनेमा पाहायला जाऊ नका. सर्वांनाच मराठी माणसाचा बाणा आणि स्वाभिमान दाखवून द्या. बरोबर सगळे लाईन वर येतील. आपण आपल्या भाषेचा मान सन्मान ठेवला नाही तर दुसरे अजिबात ठेवणार नाहीत
कळत्या वयापासून काँग्रेसच्या सर्वसमावेशक आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा सन्मान करणाऱ्या विचारांचे कमालीचे आकर्षण मला राहिले आहे. ज्या नेहरूंनी भारताच्या सार्वभौमत्वाचा पाया रचला त्यांच्या जन्मदिनी आज राहुल गांधी यांना भेटण्याचा सुवर्णयोग आला.
जय हो !
@RahulGandhi#BharatJodoYatra
आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त श्री. रघुनाथ कुचिक यांनी आयोजित केलेल्या अभिनय लेखन आणि दिग्दर्शन कार्यशाळेत मला लेखन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायची संधी मिळाली.