उद्धव ठाकरेंसोबत अनेकदा राज्यात एकत्र प्रवास करताना त्यांचा स्वभाव जवळून अनुभवता आला. तेव्हाच त्यांच्यातील घरंदाज राजकारणी मला कळाला. ठाकरेंची तिसरी पिढी ही माझ्यावर असेच प्रेम करत आहे त्यामुळे मी कायमच या सर्वांचा ऋणी आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने जी ताकद बनलीआहे ती येणाऱ्या काळात राज्याला नव्हे देशाला दिशा दाखवणारी ताकद असेल. - बाळा नांदगांवकर, ज्येष्ठ नेते, मनसे
#BalaNandgaonkar #MNS #UddhavThackeray #maharashtra
(Bala Nandgaonkar, MNS, Shivsena UBT, Uddhav Thackeray, Maharashtra)
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला मुंबईत देखील विद्यार्थी आंदोलन करून पाठींबा देत आहेत. हे आंदोलन काल चिरडण्याचा प्रयत्न सरकारने काल करून पाहिला. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्याला विरोध केला. आज याच विद्यार्थ्यांनी राजसाहेबांची भेट घेतली. मागे २०१६ ला जेंव्हा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर NEET परीक्षेमुळे अन्याय होत होता तेंव्हा राजसाहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलून त्या विषयात तोडगा काढायला लावला होता. या आंदोलनात देखील राजसाहेबांनी तोडगा काढावा अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे.
#MNSAdhikrut
उद्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री अमित राजसाहेब ठाकरे हे एक विद्यार्थ्याचा नेता म्हणून विद्यार्थ्याच्या प्रश्नांवर दिल्ली च्या जंतर मंतर येथे आमरण उपोषणाला बसलेल्या रमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक ह्यांची भेट घेणार आहेत.
@mnsadhikrut@Wangchuk66
#sonamwangchuk #AmitThackeray
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अमित राजसाहेब ठाकरे उद्या दिल्लीतील जंतर-मंतर येथे सोनम वांगचुक यांची भेट घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज अमित ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला..!
#MNSAdhikrut
Today marks the 19th day of Sonam Wangchuk’s hunger strike. The reports regarding his health and the visuals on television are certainly alarming. It is deeply distressing to say this, but it appears the government has decided to sacrifice Sonam Wangchuk, and by extension, the very space for protest in this country. After all, if this government can remain a silent spectator while the treasury of Lord Ram is being looted, what impact could a citizens' protest possibly have?
Institutions that ought to function impartially have been co-opted, and elections are being manipulated to suit specific agendas. Exorbitant amounts of money are being spent on this, yet the mainstream media largely fails to question the source of these funds. Instead, they are busy discrediting both the opposition and even dissenters within the ruling party, acting on the instructions of their ‘invisible bosses’. And those in the media who speak out, operate under the constant threat of retribution. Consequently, the government finds it all too easy to crush a protest raised for a worthy cause and to inflict physical suffering upon the protester.
There was a time when the Bharatiya Janata Party (BJP) held Sonam Wangchuk in high regard. BJP always cherishes an individual only as long as it serves their convenience. In 2018, Wangchuk was invited to the 'Re-Invest' conference, where the party praised him after listening to his insights on non-conventional energy. Naturally, because the party wanted to showcase its commitment to non-conventional energy. Later, when Ladakh was declared a separate territory, Wangchuk initially appreciated the BJP's move. However, he eventually realized that their intentions were far from honest. Wangchuk demanded separate statehood for Ladakh, two Lok Sabha constituencies for the region, and the protection of local people's land rights; he undertook hunger strikes and protests to this end, yet the government took no action. They offered assurances but failed to follow through. The reason is that stated intentions rarely align with actual motives.
Today, Wangchuk’s demand is simply this: address the chaos surrounding the NEET exam, dismiss the minister responsible for it, and ensure transparency in these examinations. There is nothing amiss in this demand. During the BJP's tenure, irregularities in examinations have been rampant, ranging from the Vyapam scam in Madhya Pradesh and the leaking of NEET papers to the recent leaks of teacher recruitment exam papers. The answer to why this happens under their watch, and why they behave with such callous indifference afterward, is simple: it stems from the unbridled power that comes with controlling all the machinery of the state.
The BJP portrays election victories, often secured through various machinations, as a sign of the people's tacit approval, while simultaneously resenting any questioning. I say ‘BJP’, as their alliance partners lack any independent identity and are effectively controlled from Delhi.
प्रति
श्री. देवेंद्र फडणवीस,
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तो पसरू देताय?
देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं ! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे !
तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, 'Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely' पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे.
कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते.
मी गेली ३७ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती.
आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही .
( बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिम्मत झाली नसती पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात) तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?
तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील.
खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील.
तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत.
राज ठाकरे ।
अवघ्या दोन महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालेल्या मिसिंग लिंक प्रकल्पावर आता खड्डे पडू लागले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची ही अवस्था पाहून खरंच आश्चर्य वाटतं!. उद्घाटनाच्या वेळी विकासाची मोठी आश्वासने देण्यात आली, मात्र प्रत्यक्षात अवघ्या दोन महिन्यांतच रस्त्याची गुणवत्ता आणि कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा विकासाचा नमुना आहे की निकृष्ट कामाचे प्रदर्शन, याचे उत्तर संबंधित प्रशासनाने जनतेला द्यावे.