यशस्विनी सामाजिक अभियानाची आढावा बैठक आज पुणे येथे पार पडली. या बैठकीसाठ�� उषाताई दराडे, सुरेखाताई ठाकरे ,आशाताई भिसे यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातून समन्वयक उपस्थित होत्या.
भंडारा-गोंदिया येथे अनेक ठिकाणी ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या तक्रारी आल्याने अनेकांना मतदानास मुकावे लागले, त्यामुळे फेरमतदान घ्यावे अशी मागणी आम्ही केली होती. निवडणूक आयोगाने यावर ४९ ठिकाणी फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. @NCPspeaks#bypolls https://t.co/aGOHAUArtg
.@CMOMaharashtra तुमच्या सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली पेट्रोलवर सेस लावला पण ही कर्जमाफी फसवी निघाली. देशात पेट्रोलच्या दरांनी उच्चांक गाठला असताना कृपया आता तरी हा सेस मागे घेऊन जनतेच्या खिशातून सुरु असलेली ही वसूली थांबवा. सेस मागे घेतल्यास काही अंशी तरी पेट्रोल स्वस्त होईल.
इयत्ता बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दीक अभिनंदन.
Heartiest Congratulations to all the 12th Std. Students whose results are out. #HSCresult
वेल्हा तालुक्यातील घावर, साखर आणि चिरमोडी या गावांना भेट दिली. गावातील विकासकामांचा आढावा घेतला.
Visited Ghavar,Sakhar and Chirmodi Villages in Velha Taluka,. Also took a review of development work in these areas.
पुरंदर तालुक्याच्या गावभेटीदरम्यान काळदरी, माहूर, मांढर या गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
Visited Kaldari, Mahur, Mandhar in Purandar. Also interacted with the residents.
आज मुंबईतील #अणुशक्तीनगर येथे पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व मुख्य प्रवक्ते @nawabmalikncp यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी नवाब मलिक यांनी बैलगाडी चालवत तर कार्यकर्त्यांनी दुचाकी वाहने ढकलून नेत या भाववाढीचा निषेध केला.
यंदाच्या बारावीच्या निकालातही सावित्रीच्या लेकींंनी बाजी मारली. यंदा मुलींच्या उत्तीर्णांचे प्रमाण तब्बल ९२.३६ टक्के इतके आहे. ही बाब समाधानकारक आणि आश्वासक आहे. सर्व यशस्वीतांचे मनःपूर्वक अभिनंदन!
https://t.co/6FXUh5zWUk
इयत्ता बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे अभिनंदन. आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आपण पार केलात. आगामी आयुष्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा. बारावीच्या परीक्षेत अपयश आलेल्या विद्यार्थ्��ांनो खचून जाऊ नका. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. नव्या जोमाने प्रयत्न करा, यश तुमचेच आहे.
.@narendramodi जी पेट्रोलच्या दरांतील वाढ म्हणजे विकास का ? करातून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच कामे होतात हे मान्य पण ते जनतेच्या खिशातून ��बरदस्तीने वसूल करायचे नसतात.तुमच्या सरकारला चार वर्षे पुर्ण होताना जनतेला दिलेली ही गिफ्ट जनता लवकरच मतपेट��तून रिटर्न गिफ्ट देऊन हिशोब चुकता करेल.
शेतकरी, उद्योजक, नोकरदार, विद्यार्थी, महिला या सर्व घटकांना आपले वाटेल असे हे सरकार नाही. केंद्र सरकारच्या चार वर्षांच्या कामगिरीचा उहापोह करणारा ब्लॉग मी लिहिला आहे. अवश्य वाचा-
https://t.co/MTJP12y9XP
(2/2)
#4YearsOfModiGovt