@ashimamittal01 Superb Initiative and nice to see such work being implemented in rural Maharashtra. Many thanks to you and all the people who are supporting such noble cause. 👏👏👏
छत्रपती शिवाजी महाराज इतिहासात रमले असते, पुर्वपुण्याईच्या कथा सांगत बसले असते तर आयुष्य “नको त्यांच्या सोबत ॲडजेस्ट करून” घेण्यात गेले असते.
जोरदार लढाई, सततचा संघर्ष अन प्रचंड ताकदवान शत्रूशी प्राणपणानं निकराची झुंज देता यायला हवी. स्वराज्य तेव्हांच शक्य.
क्षेत्र कोणतंही असो.
महाराष्ट्रासमोर औद्योगिक, शेती, सर्व्हीस इंडस्ट्री, मेटल्स, आयटी, नवतंत्रज्ञान, वाहतूक, खाजगी क्षेत्रातील रोजगार या सर्व बाबतीत भारतातील अनेक राज्यांनी मोठी स्पर्धा उभी केलीये.
चर्चा, वादविवाद आणि ठोस कृती खालील मुद्यांवरही व्हायला हवी!
▪️ ही स्पर्धा अजून कितीतरी पटीत वाढेल. त्याला तोंड द्यायला आपल्याकडे काय स्ट्रॅट्रेजीज आहेत?
▪️आता कोणत्या पॅालिसीज बनवायला हव्यात?
▪️मॅन्यूफॅक्चरिंगची कोणती क्षेत्र वाढतील?
▪️इंडस्ट्री सेगमेंट वाईज काही क्लस्टर्स कुठे आणि कसे बनवायचे?
▪️शेतीतल्या तंत्रज्ञानात पुढे काय बदल होतील?
▪️सेवा क्षेत्रासाठी काय करायलं हवं?
▪️शिक्षणाचं नक्की काय अन कसं करायचं?
▪️महाराष्ट्रातल्या कोणत्या विभागात कसा विकास करायचा?
▪️स्पर्धा असताना नक्की उद्योग आणायचे कसे?
▪️बदलते उर्जा धोरण काय असायला हवे?
▪️शहरात घरं, अन्न, पाणी इतर सुविधा कशा पुरविणार?
▪️गिग कल्चरचा सामना करण्याची, लोकांना सुरक्षा द्यायची हमी कोण घेणार?
▪️नव्या तंत्रज्ञानावरील आधारीत उद्योग यावेत म्हणून कोणती इकोसिस्टम तयार करणार आहोत?
▪️शहरांचा शाश्वत विकास नक्की करणार कसा?
▪️इतर राज्यांच्या तुलनेत आपण कसे वेगळे ठरणार?
▪️या बदलत्या मानसिकतेला आपण आता सामोरं जाण्यासाठी काय करायला हवं?
▪️त्यासाठी काय तयारी करायला हवी?
माझं काम हे फक्त पोट भरण्याची जागा नाही.
ते माझं आनंदी राहण्याचं माध्यम आहे. एकमेकांचं जगणं समृद्ध करण्याचं हक्काचं ठिकाण आहे.
हे जेव्हा प्रत्येकाला आतून कळेल तेव्हाच सर्वार्थीने आपल्या प्रगतीला सुरुवात होते.
"किं किं न साधयति कल्पलतेव विद्या"
म्हणजे कल्पवृक्षाप्रमाणे विद्या काय काय मिळवत नाही? अर्थातच, विद्या माणसाला अशक्य वाटणाऱ्या सर्व गोष्टी प्राप्त करून देऊ शकते.
आणि यासाठी योग्य गुरूंची तितकीच गरज असते.
सहकुटुंब पहा.
धन्यवाद @rajivkhandekar सर आणि @abpmajhatv 🙏🏻
https://t.co/KU2AZO2dUb
या देशात आजही करोडो कंप्युटर, आयटी, सॅाफ्टवेअर्स अन बेसिक इंजिनियरिंग झालेले तंत्रज्ञ आहेत. यातील बहुसंख्यांचा कल “सर्व्हिस सेक्टरकडे” असतो.
आपल्या देशाला महासत्ता बनायचे असेल तर आज अन उद्याही मॅन्यूफॅक्चरिंग, फाऊंडेशनल रिसर्च, कोअर इंजिनियरिंगशिवाय पर्याय नाही.
#माझाकट्टा
Take 5 minutes to read this. It’s worth a whole book.
Byju's was not destroyed by a lack of vision. It was destroyed because vision eventually outran discipline.
Financial hygiene and discipline must remain the top priority for any organization, from early-stage startups to multinational conglomerates. Without it, growth is just a countdown.
https://t.co/qTHOcPWU2C
अक्षयची कहाणी ही प्रत्येकाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारी, संकटांपुढे कधीही झुकायचं नाही हे शिकवणारी आणि मनात चिरस्थायी भाव उमटणारी आहे.
संकटांना भिडणारी, त्यांना हेड-ऑन घेणारी माणसं भारी असतात. अक्की खरा “फायटर” आणि फार वेगळं रसायन आहे.
हे पुस्तक नक्की वाचा. खूप नवं जग दिसेल.
कारकूनाचा लिपिक,
लिपिकाचा क्लर्क,
क्लर्कचा कंप्युटर ॲापरेटर बनवला म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर केला असं नाही.
माणसाचं आयुष्य आपल्याकडील टेक्नॉलॉजीने समृद्ध, सुकर, सोप्पं व्हायला हवं…. त्यामुळे व्हॅल्यू ॲडीशन व्हायला हवी.
नवं तंत्रज्ञानाची बीजं आपल्या मातीत नीट रूजायला हवीत.
फलटण, सोलापूर आणि परिसरात डाळींबावरील प्रक्रिया उद्योग तसेच कापूरहोळ व खेडशिवापूर परिसरात सिताफळ, अंजिरावरील प्रोसेस इंडस्ट्री वाढायला हवी.
महाराष्ट्रातील प्रत्येक भागात फळप्रक्रिया आणि कृषीप्रक्रिया उद्योग वाढू शकतात.
डिसेंट्रलायझेशन करण्याची ही बेसिक पायरी असेल.
कोल्हापूरात एक प्रयोग करायचा.
१००/२००/५०० रूपयांच्या काही नोटांमधे जीपीएस चिप्स लावून ट्रॅक करायच्या.
त्या नोटा हमखास
मटनाचं ठिकाण,
मिसळ,
बेकरी,
चप्पल,
रंकाळ्यातल्या तलावावर फेरी मारून येणार म्हणजे येणारच!
तुमच्या गावात/शहरात असा पैसा कोणत्या दुकानातून फेरफटका मारून येऊ शकतो?