"आजकालच्या मुलींना फक्त मोठं पॅकेज हवं!" असं सगळे म्हणतात. पण निसर्गात मादी नेहमीच सगळ्यात सक्षम नर निवडत आली आहे, आणि तिला कोणी लोभी म्हणत नाही. लग्नं का तुटतायत, याचं खरं कारण कोणीच बोलत नाही. 👇
हे वाचून कोणी मला फेमिनिस्ट म्हणेल, तर कोणी स्त्रीविरोधी. मी दोन्ही नाही. आज इतकी लग्नं का तुटतायत, यामागचं लॉजिक समजून घ्यायचा हा प्रयत्न आहे.
व्यवस्था तेव्हाच चालते, जेव्हा भूमिका स्पष्ट असतात.
कोणतीही व्यवस्था तेव्हाच नीट चालते, जेव्हा प्रत्येकाची भूमिका स्पष्ट असते आणि ती स्वीकारलेली असते. लोक दिलेली भूमिका नाकारू लागले, की व्यवस्था कोसळू लागते.
हजारो वर्षं (समाजामुळे असो, असुरक्षिततेमुळे असो किंवा धार्मिक conditioning मुळे असो—जे काही कारण असेल. ) स्त्रीची भूमिका ठरलेली होती: मुलांना जन्म देणं, त्यांना वाढवणं, स्वयंपाक, घर सांभाळणं. पितृसत्ता, धर्म, युद्धं आणि असुरक्षिततेने हे तिच्यावर लादलं. तिच्याकडे पैसा नव्हता, शिक्षण नव्हतं, माहेरचाही आधार नव्हता. लग्नात तिला सांगितलं जायचं, "आता हेच तुझं घर. सगळं तूच करायचं. तक्रार नाही." म्हणून तिने स्वीकारलं.
आपल्या आई-आजींकडे बघा. १९६०-७० पर्यंत पती जसा असेल तसा त्याला स्वीकारणं, त्याच्याबरोबर आयुष्य जगणं आणि त्यातच सुख-समाधान मानणं, अशीच स्त्री आपण जास्त करून पाहिली आहे.
मग शिक्षण स्वातंत्र्य आलं (त्या आधी देखिल शिक्षण होते, समाज जाच्या प्रत्येक घटकला सहज शिक्षण मिळण्याबाबत मी बोलत आहे)
१९५०ते ७०: स्त्रिया पहिल्यांदा नोकरी करू लागल्या. पण दिवसभर ऑफिस करूनही घरी आल्यावर स्वयंपाक तीच करायची, कारण ते "तिचं कर्तव्य" होतं.
८०-९० मध्ये जन्मलेल्या: कमावतात, आणि शहरांत बऱ्याच जणींकडे स्वयंपाकीण आणि मोलकरीण आहे. काही कामांना त्यांनी शांतपणे "नाही" म्हटलं.
Gen Z: स्वतंत्र आयांच्या हाताखाली वाढलेल्या. त्या उघडपणे विचारतात, "हे फक्त माझंच काम का?" आणि "मी हे करणारच नाही हे ठामपणे आणि aggressive पणे त्या सांगतात.
एकदा स्वातंत्र्याची चव चाखली, की माणूस काय कोणीच मागे हटत नाही.
यामध्ये नैसर्गिक इन्स्टिंक्ट किंवा निसर्गाचा खरोखर काय रोल आहे किंवा निसर्गाला नर आणि मादी यांच्याकडून काय अपेक्षित असते?
आता मुळाशी जाऊया. नर आणि मादीच्या एकमेकांकडून नैसर्गिक अपेक्षा काय असतात?
बहुतेक पशुपक्ष्यांचा अभ्यास केला, तर मादी नेहमी सशक्त, सुदृढ आणि तिचं व तिच्या पिल्लांचं रक्षण करू शकेल असा नर निवडते. तिला संरक्षण, स्थिरता आणि मुलांचं सुरक्षित भविष्य हवं असतं.
नराला आपला वंश वाढवायचा असतो. आपली bloodline पुढे जावी, आपला कोणीतरी successor असावा, असं त्याला वाटतं. आणि शारीरिक आकर्षण हे त्याचं मूळ कारण असतं.
याला अपवाद आहेत. पेंग्विनमध्ये नर अंड्यावर बसतो. पण मी अपवादांबद्दल नाही, सर्वसाधारण निसर्गाबद्दल बोलतोय.
मुळात माणूसही वेगळा नाही. स्त्रीला संरक्षण, स्थिरता आणि ती ज्या मुलांना जन्म देणार आहे त्यांचं भविष्य हवं असतं. आजच्या काळात संरक्षण म्हणजे पैसा. म्हणून मुलीला चांगला कमावणारा नवरा हवा असेल, तर ती लोभी नाही. ती नैसर्गिक आहे, कारण आर्थिक स्थैर्यच आयुष्याला स्थिरता देतं.
महत्त्वाचा मुद्दा आहे. अपेक्षा नैसर्गिक आहेत. पण स्वयंपाक कोण करणार, घर कोण साफ करणार, या भूमिका समाजाने बनवल्या. स्त्रीनेच स्वयंपाक करायचा, असं निसर्गाने कधीच सांगितलं नाही.
म्हणूनच स्त्रिया भूमिका नाकारतायत, पण त्यांच्या नैसर्गिक अपेक्षा तशाच आहेत.
खरा संघर्ष इथून सुरू होतो
मुलींच्या अपेक्षा पूर्ण बदलल्या. आज मुलगी स्पष्ट सांगते, "मला याच पद्धतीचा जोडीदार हवा."
मुलांच्या बायकोकडून असलेल्या अपेक्षा मात्र फारशा बदलल्या नाहीत. मुलींचं जगणं खूप बदललं. मुलांचं फारसं बदललं नाही, म्हणून त्यांच्या अपेक्षाही तशाच राहिल्या.
म्हणूनच सोशल मीडियावर मुलींना प्रचंड दोष दिला जातो: "त्यांना असाच नवरा हवा, इतकं पॅकेज हवं." वरवर हे चुकीचं वाटतं. पण आत खोलवर बघितलं, तर हे तिच्यात झालेल्या मूलभूत बदलामुळे आहे. आता तिच्याकडे चॉइस आहे, स्वातंत्र्य आहे. म्हणून ती जास्त मागण्या करणारी वाटते.
आणि इथे एक गंमत आहे. आज ती स्वतः चांगलं कमावते, पण तिचा निसर्ग अजूनही स्वतःपेक्षा सक्षम, जास्त स्थिर पुरुष शोधतो. त्यामुळे तिला योग्य वाटणाऱ्या मुलांची संख्या कमी कमी होत जाते. आणि दुसरीकडे मुलगा अजूनही जुन्या पद्धतीची बायको शोधतोय.
दोघंही जुन्या व्यवस्थेतला आपल्याला सोयीचा असलेला अर्धा भाग धरून बसलेत.
जागा भरायला कोणी नाही
एखाद्या कंपनीचा विचार करा. ज्युनियर इंजिनिअर, लीड आणि प्रोजेक्ट मॅनेजर रोज भूमिका बदलू लागले, तर कंपनी लगेच कोसळेल. कोणी सोडून गेला, तर ती जागा दुसरा भरतो.