महाराष्ट्राचा दहीहंडी उत्सव ज्या पद्धतीने यंदा साजरा झाला, तो प्रत्येक मराठी माणसाने आत्मपरीक्षण करण्याचा विषय आहे..सण-परंपरेच्या नावाखाली महिलांना नाचवणे, सेलिब्रिटींना बोलावून गर्दी जमवणे आणि उथळ हुल्लडबाजीला प्रोत्साहन देणे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही..
#maharashtra
दहीहंडी हा गोविंदांचा उत्सव आहे..तो सेलिब्रिटी, अश्लील मनोरंजन किंवा राजकीय शक्तिप्रदर्शनाचा मंच बनू नये! महाराष्ट्राची संस्कृती जपायची असेल, तर आधी तिच्यासाठी उभं राहण्याची हिंमत मराठी माणसाने दाखवली पाहिजे!
#dahihandi
महाराष्ट्राचा दहीहंडी उत्सव ज्या पद्धतीने यंदा साजरा झाला, तो प्रत्येक मराठी माणसाने आत्मपरीक्षण करण्याचा विषय आहे..सण-परंपरेच्या नावाखाली महिलांना नाचवणे, सेलिब्रिटींना बोलावून गर्दी जमवणे आणि उथळ हुल्लडबाजीला प्रोत्साहन देणे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही..
#maharashtra
मराठी कलाकारांनाही एक विनंती..तुम्ही कार्यक्रमाची सुपारी घेतलीत, मानधन घेतलंत तरी त्या कार्यक्रमात आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, मूल्यांचा आणि स्वाभिमानाचा अपमान तर होत नाही ना, याची खबरदारी घ्या..पैसा कमावणं चुकीचं नाही, पण आपल्या कलेसोबत आपली सांस्कृतिक जबाबदारीही जपा..
न पटणाऱ्या गोष्टीसमोर त्याच क्षणी तिथून निघून जाणं, निषेध नोंदवणं, ही सुद्धा एक भूमिका आहे..गर्दीच नाही राहिली, तर पुढच्या वर्षी अशा कार्यक्रमांची गरजच आयोजकांना भासणार नाही..आपली उपस्थिती ही सुद्धा एक प्रकारची संमती असते, हे आपण कधी समजून घेणार?
आपण शिवाजी महाराज,शाहू महाराज,महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणवतो..मग आपली संस्कृती नाही, आपल्या मूल्यांशी विसंगत आहे असं वाटणाऱ्या कार्यक्रमांत फक्त काँटेंट मिळतो म्हणून उभं राहून मजा घेणं आणि त्याच संस्कृतीला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देणं कितपत योग्य आहे?
मुंबईत सरकार बदलल्यापासूनच उत्तर भारतीयांच्या राजकीय आणि सांस्कृतिक दादागिरीला अधिक बळ मिळाल्याची भावना आज अनेक मराठी माणसांच्या मनात आहे..पण त्याहून मोठा प्रश्न आपल्याला स्वतःलाच विचारायचा आहे..
आणखी गंभीर बाब म्हणजे काही ठिकाणी उत्तर भारतीयांसाठी स्वतंत्र मंडप उभारले गेले, तर काही मराठी मंडपांमध्येही भोजपूरी गाणी वाजवली गेली..आणि या दोन्ही ठिकाणी मोठ्या संख्येने उत्तर भारतीय त्या गाण्यांवर थिरकताना दिसले..
अजून एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा..एवढ्या मोठमोठ्या सेलिब्रिटींना दहीहंडीसाठी बोलावलं जातं, त्यांचं मानधनही तितकंच मोठं असणार..त्यात स्टेज, जाहिरात, व्यवस्था, सुरक्षा आणि इतर खर्च वेगळाच..हा सगळा पैसा येतो कुठून? कधी विचार केलाय का?
या हुल्लडबाजीसमोर नाचून तिला खतपाणी घालणाऱ्या काही मराठी बांधवांचेही आभार. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्यात तुमचाही वाटा आहे..धन्य झाला आजचा 'खरा मराठी माणूस' उत्तर भारतीयांची संस्कृती स्वीकारून तीच महाराष्ट्राची संस्कृती म्हणून मिरवण्याची वेळ आली!
राजकीय स्वार्थासाठी इतर राज्यांतील संस्कृतीचे अंधानुकरण करून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीवर घाला घालण्याचा आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा व अस्मिता लुटण्याचा जो प्रकार सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे, तो खरोखरच लांच्छनास्पद आहे..