Everyone do SIP for their future, be it for their own retirement or Daughter's education or Son's marriage. What would you do if your SIP corpus goes down 50% due to market crash when you need money? How can one handle the risk involved in SIP? Here's the ideal solution 🧵
सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण !
चूक की बरोबर ?!
आताच हिंदुस्तान झिंक कंपनीने प्रति शेअर १९₹ dividend/ लाभांश जाहीर केला.
या कंपनीची ३०% मालकी भारत सरकारची आहे.म्हणून आता सरकारला २४०० कोटी ₹ ल��ांशांच्या रूपाने मिळतील.
पण..२००२-०३ साली -
१/४
#StockMarketअभ्यास #म
सरकारनं घाईघाईत फार विचार न करता(?) निर्णय घेतले की काय होतं ?!
(भाग १) गोष्ट VSNL ची
साल होते २००२, नव्या दमाचे सरकार होते..आणि त्यांच्या ध्येयापैकी एक ध्येय होते - खाजगीकरण !
VSNL ही तशी भविष्यातील इंटरनेट इ गरजा बघून तयार केलेली कंपनी ही तेव्हा तोट्यात होती.
म्हणून
#म
🎯 टॅक्स सेविंग ��ाठी आज एकत्रित 1,50,000 रुपयांची गुंतवणूक केली तर 15 वर्षानी त्याचे 12 लाख होतील आणि 46000₹ टॅक्स वाचेल.
🎯 टॅक्स सेविंग साठी जर 12,000 रुपयांची (वर्षाला 1.5 लाख) SIP केली तर दहा वर्षानी त्याचे 33 लाख होतील.
उद्या बजेट !
पुढच्या वर्षीसाठी अजून काही नवीन कर येतील..कदाचित जाती��ही..🤞
पण ह्या वर्षीच काय ?
शिवाय आपण F&O केलं..Intraday केलं..Positional केलं किंवा Investment केलं म्हणजे कर कमी लागतो ?
अशा प्रश्नांची उत्��रं आजच्या थ्रेड मध्ये 👇
> > > स्टॉक मार्केटमधील कमाई आणि त्यावरचा इन्कम टॅक्स !
#StockMarketअभ्यास #म
ह्यात समजायला सर्वात सोपी गोष्ट म्हणजे- कर भरण्यासाठी आधी नफा व्हावा लागतो..😅
म्हणून नफ्यासोबत फारसा संबंध नसणाऱ्या प्रकारापासून आधी सुरुवात करू..😜👇
आणि तो प्रकार म्हणजे..अर्थातच -
>>> जे लोक Intra Day किंवा फ्युचर्स & ऑप्शन्स करतात
ह्या भल्या लोकांनी जर चुकून माकून पैसे कमावलेच तर ते त्यांचं बिझीनेस इन्कम पकडले जाते.
म्हणजे हे जर नोकरदार असतील किंवा अजून काही प्रकारे ह्यांचं इन्कम असेल तर त्यात हे इन्कम add केले जाते..आणि एकूण रकमेवर टॅक्स भरावा लागतो.
म्हणजे एखादा जर ३०% स्लॅब मध्ये येत असेल तर त्याला Intraday आणि
F & O नफ्यावर पण ३०% टॅक्स द्यावा लागेल..२०% स्लॅब वाल्याला २०% आणि असंच इतर सर्व टॅक्स स्लॅब वाल्यांसाठी.
थोड्क्यात काय तर - नोकरी करणाऱ्या (२०-३०% स्लॅब मधल्या) लोकांनी Intraday आणि F&O करणे म्हणजे मूर्खपणा आहे.
आणि तेही स्वतःच्या अकाऊंटवरून करणे हा तर महामूर्खपणा आहे..😜
आता ह्याला बिझीनेस इन्कम समजायचा फायदा हा होऊ शकतो की एका वर्षीचा लॉस हे लोक पुढच्या ७ वर्षांच्या नफ्यातून वजा करू शकता..!
म्हणजे एका वर्षी १ लाख तोटा झालाय आणि पुढच्या वर्षी १ लाख नफा तर पुढच्या वर्षीच्या नफ्यावर कर भरावा ल���गत नाही.
फक्त इतकं लक्षात ठेवावं की Intraday चा तोटा Intraday नफ्यातून आणि F&O चा तोटा F&O नफ्यातूनच वजा करता येतो..!
आता..जरा फायद्याच्या गोष्टींकडे वळू..👇
१/n
राज्याला एक कार्यक्षम मुख्यमंत्री आणि दोन अती कार्यक्षम उपमुख्यमंत्री आहेत. गतिमान सरकार कामगिरी दमदार वगैरे टॅगलाईन देत राज्याचा गाडा कसाबसा हाकलायचे काम चालू आहे. म्हाडाच्या अर्जधारकांची अनामत रक्कम गोळा करून ड्रॉ न काढता दोन महिन्यांपासून सरकार सामा���्य नागरिकांना झुलवत आहे.
कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांची कारकीर्द अपयशी आहे अशी माझी भावना होती. मात्र आज बोल भिडूचा एक एपिसोड बघितला आणि त्यातून काही माहिती मिळाली व भाजपाच्या अपप्रचाराचा लोकांच्या मनावर कसा परिणाम होतो ते लक्षात आलं.
"छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांनी 100 दशलक्ष टन तांदूळ आणि 250 दशलक्ष
बऱ्याच ठिकाणी सरकारी कामांसाठी उत्पन्नाचा दाखला मागितला जातो, हा उत्पन्नाचा दाखला आता ऑनलाईन सुधा काढता येतो तो कसा काढायचा हे आपण आजच्या लेखात समजून घेऊ. यासाठी महाराष्ट्र सरकार ने आपले सरकार या त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती ही सेवा दिली आहे.
#Marathi#Thread
🧵१/n
#महिलाआरक्षणबिल
* महिला आरक्षण कधी लागू होईल ?
अनु. 82 नुसार 2026 नंतर होणाऱ्या जनगणनेच्या नंतर मतदारसंघ पुनर्रचना करण्यात येणार आहे. म्हणजे 2031च्या जनगणनेच्या आधारे. म्हणजे हि नवीन रचना आणि संख्या 2034च्या निवडणूकित लागू होईल.
आरोग्य विमा / Health Insurance Series
भाग ३ (अ) -
चांगला आरोग्य विमा कसा ओळखावा ?
(सर्वात महत्त्वाच्या २० मुद्द्यांत)👇
( 20 Point System )👇
१) Network Hospitals -
आपण भारतातला सर्वात भारी आरोग्य विमा निवडला आणि तो विमा -
#StockMarketअभ्यास#मराठी#म
ऑनलाईन पॅनकार्ड बनवा फक्त १०६ रुपयांमध्ये 😯
यासाठी काय करावे लागेल 🤔
एकदम सोप्पं आहे पूर्ण थ्रेड नक्की वाचा आणि शेअर करा.
सर्वप्रथम NSDL पॅनकार्ड या वेबसाईट ला भेट द्या (लिंक बायो मध्ये दिली आहे), त्यानंतर या वेबसाईट वर ...
🧵१/n
#मराठी#महत्त्वाचे
मतदान ओळखपत्रामध्ये बदल करायचा आहे?
तर आता कुठेही पळापळ करायची गरज नाही तुम्ही आता हे घरबसल्या सहज करू शकता.मतदार ओळखपत्र अतिशय महत्त्वाचे आहे कारण एक नागरिक म्हणून आपला हा हक्क आहे ��णि जबाबदारी देखील, आज आपण मतदान ओळखपत्रामध्ये बदल करण्याची प्रक्रिया सविस्तर बघू
🧵१/n
#मराठी
Home Loan #thread
जर तुम्ही नवीन घर घेत असाल किंवा resale(म्हणजे तुम्ही second owner असाल) मध्ये फ्लॅट बुक करत असाल तर किती अमाऊंट तुमच्याकडे बँकेत असली पाहिजे(hard cash).. किती लोन होतं... ह्याबद्दल सोप्या भाषेतलं basic calculation आपण बघूया 👇
मांजराचं पिल्लू लपून बसलं ���ोतं आईपासून...आई आल्यावर ओरडली, एक कानाखाली दिली आणि उचलून घेऊन गेली...
मनुष्य असो वा प्राणी...आई ची शैली समान राहते...!!!
गो फर्स्टचे झाले तरी काय?
गेल्या आठवड्यापासून भारतीय विमान कंपनी गो फर्स्ट चर्चेत आहे. ही कंपनी आता बुडीत झाली आहे. सहसा कंपनी बुडीत केव्हा होते? तर जेव्हा कंपनी आपल्या क्रेडिटर्सला म्हणजेच देणेकऱ्यांना पैसे वेळेत देऊ शकत नाही त्यावेळेस. #म#मराठी#GoFirst
ऐन उमेदी काळात जावेद अख्तर यांच्या कडे काम ही नव्हते आणि पैसे ही नव्हते .त्यांनी साहिर लुधियानवी यांच्याकडून मदत घेतली.साहिर यांच��� परिस्थिती पण फार चांगली नव्हती .जावेद यांनी पैसे मागितल्यावर 200 रुपये टेबल वर ठेवले, कोणी पैसे
परवा लोकसत्तात रिफायनरी विषयी एक बाष्कळ अन् वाह्यात अग्रलेख वाचण्यात आला. कशाचाही कशाला संबंध जोडून रिफायनरी ���शी योग्य आहे यासंबंधी अकलेचे तारे तोडल्याचे दिसले. अग्रलेखात सुरवातीला असं म्हटलं की, स्थानिकांना फार ज्ञान नसत; स्थानिकांची मते विचारात घेणे म्हणजे थोतांड ��गैरे. त्यासाठी त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाच्या महापौर बंगल्याचे उदाहरण दिले. एरव्ही गिरीश कुबेर हे लोकशाही वाचवा म्हणून गळे काढत असतात.नक्राश्रू ढाळत असतात.लोकशाहीच्या व्याख्येत शेवटच्या एका माणसाचेही विरोधी मत सुद्धा विचारात घेतलं पाहिजे तरच तिला लोकशाही म्हणतात. स्थानिकांना अक्कल नाही असं म्हणणे हे कशाचे द्योतक असावे? महापौर बंगल्याच्या जागेची तुलना रिफायनरी सोबत करता? र��फायनरी मुळे हजारो एकर जमिन जाणार,शेकडो परिवार बेघर होणार. त्यांच्या पुनर्वसनाचे काय ? अनेक ठिकाणच्या प्रकल्पबाधितांची तिसरी पिढी न्याय्य हक्कांसाठी लढतेय.तुम्ही प्रकल्पग्रस्त जनतेचे जीवन कधी अनुभवले आहे का? 'मुळात विकासाच्या प्रश्नांची उठाठेव हा काही मूठभर लोकांचा मक्ता नसून, या निर्णयाचे खऱ्या अर्थाने समाजकरण व्हावे. राजकीय नेते अन् बाबूंनी विकास म्हणजे काय हे दिल्ली, मुंबई सारख्या ठिकाणी बसून ठरवू नये. या निर्णयप्रकियेत लोकांचा सहभाग हवा. निसर्गरक्षणासाठी अन लोकशाहीसाठी ते खऱ्या अर्थाने उचित आहे. ग्रामसभांना विश्वासात घेऊन विकास कसा करायचा ते ठरवा' असे ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ समितीचा अहवाल सांगतो. दुसरे, त्यांनी कोकण रेल्वेची तुलना रिफायनरी सोबत केली. रेल्वे���ाठी साधारण आडवी 25 फूट जागा लागत असावी, त्याची तुलना रिफायनरीच्या हजारो एकर जागेशी करणे म्हणजे कुबेरांच्या बुद्धीची दिवाळखोरी समजावी का? असा प्रश्न पडतो.
पुढे त्यांनी सिंगापूरच्या एगझोन-मोबील या रिफायनरीचा दाखला दिला, सिंगापूरमधील प्रदूषणात 80% वाटा हा उद्योगाचा असल्याचे रिपोर्ट सांगतात, तसेच सिंगापूरला सर्वात जास्त मासे आपला भारत देश पुरवतो. दुस��्या देशात हे झाले म्हणून ते आपल्या इथेही करा म्हणणे म्हणजे..? थोडक्यात इस्रायल सारखी प्रगत शेती राजस्थान सारख्या वाळवंटात करण्याचे हे दिवास्वप्नच.
त्या देशाचे भौगोलिक स्थान, वातावरण, तेथील व्यावसायिक गरज, पर्यावरण हे आपल्या पेक्षा वेगळे असेल ना ? त्याचा काही विचार केला आहे का ? पुढे लिहताना त्यांनी शासनाने कोकणात काय केले ? असं तसं विचारलं आहे. मा. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना ��ोकण विकासासाठी खास 10 हजार कोटींचे पॅकेज दिले, त्यातून नवनवीन योजना पुढे येऊन कोकणच्या विकासास हातभार लागला, चिपी एअरपोर्ट, कोकण रेल्वे, हायवे यातून दळणवळणाची साधने सोपी झाली. कोकणी जनता प्रकल्पांना विरोध करते असे भयावह चित्र निर्माण केले जातेय. त्यांचा विरोध हा अणुऊर्जा,रिफायनरी अशा प्रकल्पांना असतो ? मॅनुफॅक्चरिंगचे उद्योग आणायला कोणी विरोध केला आहे ? कोकण किनारपट्टी या रेड कॅटेगिरी प्रकल्पांनी उद्धवस्त होण्याची शक्यता आहे.
जमिनीच्या बाबतीत तर अग्रलेखातून असं लिहलं आहे की तुमचा एकरी मोबदला सांगा, अहो कुबेर साहेब, राज्यभरातून मुंबईत गरजू विद्यार्थी,रुग्ण येत असतात त्यांना मुंबईत राहायला जागा मिळत नाही, त्यांच्यासाठी लोकसत्ताचे एक्सप्रेस टॉवर खुले कराल का ? घरासमोरून फ्लायओव्हर होतोय म्हणून देश सोडून जायची धमकी देणाऱ्या शहरी समाजव्यवस्थेचे प��रतीक तुम्ही आहात. त्यामुळे तुम्ही जमिनीच्या मोबदल्याची भाषा करावी ? जामनगरचे आंबे उत्तम आहेत म्हणता, तुम्ही तरी आजवर खाल्लेत का ? रिफायनरी सारखे प्रकल्प आणल्यावर नियमाने झाडे लावायची असतात, त्यामुळे ते आंबे लावलेत. त्यात केसरचे प्रमाण आहे. हापूस कोकण सोडून कुठेही होत नाही. जामनगर अन सिधुदुर्ग येथील येथील हवेची गुणवत्ता ऑनलाईन तपासा, जामनगर येथील हवा जास्त प्रदूषित आहे.
हे झाले ��ोकसत्ताच्या अग्रलेखा बाबतीत...
कोकण म्हणायला आता 2 जिल्ह्याचा उरला आहे, तिथेही असे प्रकल्प आणत असाल तर कुबेरांसारख्या पुण्या-मुंबईत राहणाऱ्या लोकांनी आपला विकेंड सुखात घालवायला कुठे जावे ? कोकण माथ्यावरून अरबी समुद्रातून पावसासाठी आवश्यक खारे वारे पुढे जातात. तिथे वायूप्रदूषण होत असेल तर जे पावसाचे ढग बनतात त्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता कोणी नाकारु शकत नाही. आधीच अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे. सगळीकडे आपण सिमेंटची अमर्याद जंगले उभा करत चाललो आहोत. कुठेतरी निसर्गाचा समतोल ठेवावा. कोकणात पर्यटनाच्या दृष्टीने हजारो गोष्टी करता येतील. मागच्या सरकार काळात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ताज सारख्या हॉटेल सोबत टायप करुन कोकणातील काही बीचवर त्यांचे हॉटेल्स उभारण्याचे प्रयत्न केलेले. कोकणाला समृध्द करणारं असं काही हवं. पर्यावरणाला घातक काही नको; तर पोषक काही तरी ��वं.