माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
महाराष्ट्राच्या अस्मितेचा, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा आणि लोकशाही मूल्यांचा सातत्याने पुरस्कार करणाऱ्या आपल्या नेतृत्वाला निरंतर यश लाभो. आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ह्याच सदिच्छा 💐
@uddhavthackeray
@mybmcWardA@mybmc@ritutawde@TawdeRitu पुढे काय झाले? प्रत्यक्ष कार्यवाही कधी होणार ? लोक मरायची वाट बघताय का? या घटनेचे गांभीर्य लक्षात घ्या, कधी आपलाच कोण तरी जीव गमावून बसेल.
CST कबुतरखान्यात बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात कबुतरांना दाणे टाकले जात आहेत. त्यामुळे कबुतरांची विष्ठा, दुर्गंधी व संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. तात्काळ दाणे टाकण्यास बंदी घालून कठोर कारवाई करा. @mybmc@mybmcWardA @mybmcCommr @RituTawde
प्रवाशांपेक्षा प्रभावशालींची सोय महत्त्वाची? बी जयकर मार्गावरील अधिकृत बसथांबा हटवून वीज खांबावर फलक लावण्यात आला.शेजारील आलिशान हॉटेलसमोरील जागा मोकळी करण्यासाठी हा निर्णय घेतला का यांनी सत्य स्पष्ट करावे.जनतेच्या सुविधेचा बळी कोणाच्या दबावाखाली दिला गेला?@mybmc@TawdeRitu
@BhatkhalkarA राममंदिरासाठी लोकांनी दिलेले दान लुटताना बापाचा माल वाटला होता का? मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून चापलुसी करणं बंद करा.
@RRPSpeaks@AUThackeray
मिसिंग लिंकवर durability चेक करण्यासाठी खड्डे पडले होते, मग आज durability चेक करण्यासाठी दरड कोसळली आहे का?
मिसिंग लिंकच्या कामात केवळ दलाली आणि भ्रष्टाचाराची लिंक झाल्याने सुरक्षाच मिसिंग झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसात पुण्यापासून मुंबईपर्यंत पावसाने या नतभ्रष्ट सरकारच्या पोकळ दाव्यांची पोलखोल करत या भ्रष्ट सरकारचे काळे कारनामे उघड केले आहेत. या नतभ्रष्ट सरकारला जनता माफ नाही करणार!
#MissingLink #MissingSuraksha
#जनतेच्याजीवाशीखेळ #SafetyFirst #InfrastructureFailure
मुंबईत पावसापेक्षा जास्त पाणी साचतंय ते @BJP4Mumbaiच्या फुगवलेल्या विकासाच्या दाव्यांचं! प्रत्येक वर्षी तीच अवस्था, तेच आश्वासन आणि नागरिक मात्र पाण्यात.हा व्हिडिओ त्याचाच पुरावा आहे. तात्काळ जलनिस्सारण व्यवस्था सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्या.@mybmc@mybmcWardGS#WaterLogging
डॉ विगास स्ट्रीट कॉर्नर, काळबादेवी रोड, मुंबई - 2 येथे रस्त्याच्या अलीकडील कामानंतर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे. त्यामुळे वाहनचालक,पादचारी आणि स्थानिक व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.कृपया तातडीने पाहणी करून योग्य जलनिसरणाचीव्यवस्था करावी.@mybmc@mybmcWardC
फणसवाडीतील एका construction site वरून बाहेर पडणाऱ्या ट्रकमधून रोज चिखलयुक्त माती सार्वजनिक रस्त्यावर सांडत आहे. ती साफ केली जात नसल्याने नव्याने बांधलेला सिमेंट काँक्रीट रस्ताही खराब होत आहे. दुचाकीस्वार घसरत आहेत, बाजूलाच शाळा आहे. अपघात झाल्यास जबाबदार कोण – BMC की Contractor?
@Tukaram_IndIAS जी मुंबईतील फोर्ट येथील मिया कबाब या हॉटेल मध्ये पिण्यायोग्य पाण्याची मागणी केली असता देण्यास नकार देऊन packaged drinking water देण्यात येते व त्याचे पैसे ग्राहकांकडून वसूल केले जात आहेत.(तेही छापील किमतीपेक्षा 50%अधिकच्या दरात) @mybmc@mybmcWardA
लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं... हा अत्यंत किळसवाणा राजकीय व्यभिचार असून संविधान व लोकशाही मोडून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु असल्याचं हे लक्षण आहे. याला ‘ऑपरेशन टायगर’ नाही ‘ऑपरेशन बाजार’ म्हणावं लागेल आणि हा ‘ऑपरेशन बाजार’ लायकीचा, माणसांचा की विचारांचा हे लोकंच ठरवतील.
एकेका खासदाराचा रेट ८५ कोटी..??? 🤔
एवढे पैसे द्यायला संबंधित पक्षाकडं पैसे येतात तरी कुठून?
शिवसेना, राष्ट्रवादी, आप, तृणमूल काँग्रेस आणि आता पुन्हा शिवसेना.. देशात हे असंच सुरू राहिलं तर एक दिवस लोकंच रस्त्यावर उतरून पळून जाणाऱ्यांना आणि पळवून नेणाऱ्यांना चोपल्याशिवाय राहणार नाहीत.
आज डोक्यावर दुष्काळाचं सावट आहे, पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी नाही, मालाला भाव नाही, बेरोजगारी वाढलीय, नोकरभरतीचा बट्ट्याबोळ केलाय, मध्यमवर्गीयांना ईएमआय भरण्यासाठी पैसे नाहीत आणि अशा परिस्थितीत सामान्य माणूस कधी नाही एवढा अडचणीत असताना यावर मात्र चर्चा होत नाही, हे दुर्दैव आहे.
#शिवसेना #OperationBazaar
#राजकीय_व्यभिचार #संविधान #लोकशाही